पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जे न देखे रवी...
17 Apr 2017 - 8:13 am

तरूस लगडली सुवासिक आम्रफळे
परी कोयी अन बीया मोजतो हा बळे

पाण्यात मासे उसळतात
रेतीच्या खोप्यास हसतात

तृष्णार्त कृष्णा टोचती का खडे
जळात उतरू कसा प्रश्न हा पडे

आर्जवी पाणिते अवीट
परी कृष्णास दिसे का मीठ

खेळती कधी लहर कधी लाट
प्रश्नांकीत किनारी मुरलींची पाठ

तुडूंब सरोवर नरतनी पक्ष्यांचे थवे
पाण्यात हसरी राधा रुक्मिणी सवे

आता मला वाटते भितीकालगंगाजिलबीप्रेम कविताभूछत्रीरोमांचकारी.करुणमुक्तक

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

17 Apr 2017 - 11:35 am | चांदणे संदीप

गार गेले राव तुम्ही. :)

प्रेर्ना पण सांगा.

Sandy

पहिल्यांदा स्विमिंगपूलवर जाऊन यावा मग गार व्हावा, पाण्यात न उतरताच गार व्हन बरं न्हव!

बाकी तसे प्रेर्ना एका पेक्षा अधिक काव्य कथा ती सध्या तो सध्या काय करतो इत्यादी इत्यादी आहेत, पण खरे सांगायचे तर अपूर्ण आहे, मूळात ज्या कवितेचे विडंबन करावयाचे होते ते सुचलेच नाही आणि ऐनवेळी सुचलेल्या शब्दातून कविता वेगळ्याच वळणावर धावली, पुन्हा गावली कि प्रेर्ना