अँबी वॅली हा काय माहौल आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इतकाच या लेखनाचा उद्देश आहे. माझ्या असिस्टंटनं आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती. तिचा पती तिथे डिरेक्टर आहे आणि त्यानं डे-वन पासून अँबी वॅलीची संपूर्ण निर्मिती गेल्या तेवीस वर्षात केलीये. तिथे वी वेअर ट्रिटेड अॅज इनवेस्टर्स पण अदरवाइज ते एकूण प्रकरण आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे सुब्रता रॉय, सहारा कंपनी, सुप्रीम कोर्ट केस, पिकनिक अफोर्डेबिलीटी हे विषय बाजूला ठेवलेत तर पोस्टचा आनंद नक्की घेता येईल.
(आयडेंटिटी सिक्युरिटीसाठी पोस्टमधे नांवं बदलली आहेत)
______________________
`वी मीट अॅट द साइट ऑफिस सर', रिया म्हणाली.
`वी विल बी देअर इन अनदर टेन मिनीटस' म्हणून पत्नीनं फोन ठेवला. एकाच वेळी रियाची आणि आमची गाडी ऑफिससमोर आली.
`यू विल बी रिलेटेड टू द वॅली आफ्टर सीइंग द टोटल साइट प्लान’ विस्मय म्हणाला आणि मला साइट ऑफिस हा मिटींग पॉइंट का ठेवला ते कळलं.
भारतातली सर्व हिलस्टेशन्स ब्रिटीशांनी वसवली आहेत. भारतीयांनी वसवलेलं, एखादं जगातलं सर्वोत्तम, अत्यंत हाय-फाय पण तरीही कमालीचं सौंदर्यपूर्ण हिलस्टेशन असावं या कल्पनेनं सुब्रता रॉयनी, अकराहजार एकरांवर साकारलेली जादुमयी दुनिया म्हणजे अँबी वॅली सिटी. या अफाट परिसराची हद्द म्हणजे तीन नालाकृती डोंगर आहेत. अँबीचं स्वत:चं एअरपोर्ट आहे, गेली तीन वर्ष जगातलं सर्वोत्तम ठरलेलं गोल्फ कोर्स आहे, सदासर्वकाळ वाहाणारी नयनरम्य नदी आहे, या नदीवर बांधलेली तीन धरणं आहेत, सिनेमात असतात तसे वॉटर स्पोर्टस आहेत, अशक्यप्राय भासावी अशी जायंट अॅक्वा-बस आहे (जी जमीनीवरुन सरळ पाण्यात शिरते आणि तुम्हाला वॉटर-राइड घडवते), स्वत:च्या खर्चानं सतरा/अठरा किलोमिटर्स लाईन टाकून नॅशनल ग्रीडमधून घेतलेली अखंड पुरवठा करणारी वीज आहे, एकर/ दोन एकर अशा विस्तीर्ण परिसरात वसलेल्या अलीशान विलाज आहेत, सेवन स्टार हॉटेल्स आहेत, एकसोएक स्वीमिंग पूल्स आहेत, अफलातून बांधलेले शॅलेज आहेत आणि पर्यटकांना आत फिरण्यासाठी मर्सिडीज बेंझ गाड्यांची फ्लीट आहे. एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी !
अँबी वॅली सिटीची झलक ! माइंड यू, एवरीथींग इज अ ग्राउंड रिअॅलिटी ! हे सगळं जसच्या तसं तिथे आहे. सहाराच्या कोर्ट केसची जरा सुद्धा सावली इथे कशावरही नाही.
_________________
विस्मी, जस्ट टेल मी वन थिंग....वॉट मेक्स अ विस्मी... हू कॅन चेंज इलेवन थाउंजड एकर्स ऑफ लँड इंटू समथिंग विज इज बियाँड द हेवन ? अँबीच्या अलीशान साइट ऑफिसमधल्या ऑडिटोरियममधून बाहेर पडल्यावर, तो विस्तीर्ण परिसर अंतर्बाह्य बदलणार्या विस्मयला, मी मनातला नेमका प्रश्न विचारला.
‘सर, देअर इज अ टाइम एवरी फॉर्म इन द एक्झिस्टंस अंडरगोज अ चेंज. वन हॅज टू वेट फॉर दॅट टाइम!’
‘माय गॉड, वॉट अ थॉट मॅन ! आय हॅव कम अक्रॉस अ पर्सन आफ्टर अ लाँग टाइम, हूम आय वूड लव टू लिस्टन अवर्स टुगेदर ! मी अगदी मनापासून म्हणालो.
(अँबी साईट ऑफिस ! डाव्याबाजूला इन्व्हेस्टर्सना अँबी वॅलीची फिल्म बघण्यासाठी मिनी थिएटर आहे)
________________________________
(एंटर दि अँबी वॅली !)
(अँबी रिसेप्शन)
एखाद्या लावण्यवतीचं केवळ बाह्यरुप बदलणं अनेकांना शक्य असेल. पण जिथे सौंदर्य इतकं रहस्यमय आहे की ते बदलतांना जराशी जरी चूक झाली तर सगळ्या रंगाचा बेरंग होईल... तिथे सृष्टीच्या स्वत:त बदल घडवायच्या वेळेचा सही अंदाज़ बांधू शकणारी व्यक्तीच, ते आव्हान पेलायला समर्थ आहे. प्रश्न सृष्टीवर विजय मिळवण्याचा कदापीही नाही... तर तिच्या मनाचा अंदाज़ घेत तेवीस वर्ष तिचं अंगप्रत्यांग बदलून टाकायचा आहे. म्हणजे जी लावण्यखणी स्वत:च्या रहस्यमय, रौद्रभिषण, कमालीच्या रमणीय रुपामुळे कुणाला जवळही फिरकू देत नाही, तिच्या कलाकलानं घेत, तिचे सर्व कॉंट्युअर्स एकसोएक तर्हेनं आकर्षक करायचे. कधी त्यांच्यावर बंगले बांधायचे, कधी त्यांना वळसे घालून बंगले बांधायचे तर कधी त्यांच्या पायथ्याशी इमला उभारायचा. कधी दोन विस्तीर्ण टेकड्यांच्यामधे जगातलं पहिल्या क्रमांकाचं गोल्फ कोर्स तयार करायचं. तर कधी हवेची दिशा, वैमानिकाची सोय, विमानांच्या आकाराचा आवाका लक्षात घेऊन, एअरपोर्ट तयार करायचा. तर कधी तीनतीन धरणं बांधायची. स्वत:च्या विलाजचं बांधकाम बघायला येणार्या अब्जाधिशांना सुखासिन वाटतील आणि तिथल्या पावसाळ्यात कमालीच्या रौद्र तांडवाशी जुळवून वर्षानुवर्ष दिमाखात उभे राहातील असे शॅलेज बांधायचे. जगातल्या अत्याधुनिक सोयी पुरवणारं हॉस्पिटल बांधायचं जिथे पेशंटची रुम पाचहजार चौरसफूटाची असेल, अत्युच्च सिस्टम असलेलं सिनेमा थिएटर बांधायचं, हॉर्स रायडींगसाठी ट्रॅक्स तयार करायचे, शाही लग्नसोहोळ्यांसाठी अद्वितीय लोकेशन्स तयार करायची, कल्पवृक्षाखाली बसलोयं असं वाटावं अशी अप्रतिम रेस्टॉरंटस तयार करायची.....आणि हे सर्व एका आयुष्यात करायचं, माय गॉड जस्ट अनइमॅजीनेबल !
______________________
(आमचा दुमजली शॅले)
(पहिल्या मजल्यावरचं सिटींग)
(वरच्या मजल्यावरचं मास्टर बेड)
( मास्टर बेडरुम मधला जॅकुझी)
(जॅकुझीतनं दिसणारा बाहेरचा नजारा)
(सिटींग मधली डायनिंग स्पेस)
(डायनींगच्या समोर असलेला बार)
(डायनींगच्या डाव्याबाजूचं फुल्ली फंक्शनींग किचन)
(स्वीमिंगपूल, इथे दीड तास पोहोल्यावर रेस्टॉरंटमधे ब्रेकफास्ट करणं म्हणजे परम सुख !)
(प्रॅक्टीस गोल्फ कोर्स!)
(वॉटर स्पोर्टस - जेट्टी)
(स्पीड बोट)
(क्रूझ)
(अ विला - स्पॅनिश स्टाईल. नो कपांउडस अलाउड !)
(तिथला विलोभनीय फाऊंटन शो)
प्रतिक्रिया
7 Apr 2017 - 12:01 pm | अभिजीत अवलिया
सांगा कोणते रिसाॅर्ट आहे ते.
7 Apr 2017 - 5:40 pm | मोदक
http://jungleretreatwayanad.com/
7 Apr 2017 - 6:31 pm | अभिजीत अवलिया
धन्यवाद
20 Apr 2017 - 11:18 pm | अभिदेश
हो मस्त .. मी तिथे ४ दिवस राहून आलो आहे...
20 Apr 2017 - 11:08 am | कबीरा
व्यिथीरी रिसॉर्ट
9 Apr 2017 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संक्षी सेठ, लेखन माहितीपूर्ण आहे. संधी मिळाली तर नक्की जाईन. छायाचित्रे सुंदर....!
-दिलीप बिरुटे
18 Apr 2017 - 10:19 am | सतिश गावडे
अँबी वॅली लिलावात निघणार.
18 Apr 2017 - 10:43 am | संजय क्षीरसागर
अँबीची आजची वॅल्यू १,१३,००० कोटी आहे आणि सुब्रता रॉयचं एकूण देणं (फक्त) ५,००० कोटी आहे.
18 Apr 2017 - 11:14 am | मोदक
वरच्या लिंक मध्ये काहीतरी वेगळेच दिले आहे स्वामीजी.
असो, तुम्ही टुरिष्ट म्हणून गेला होतात त्यामुळे सहाराची जबाबदारी घेऊन भांडत बसू नका.
18 Apr 2017 - 12:33 pm | संजय क्षीरसागर
न्यूज पाहा :
In March, the Supreme Court had said that it would auction off Sahara's prime Aamby Valley property in Pune, if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding by April 17. Sahara values the property at Rs 34,000 crore.
देणं मी म्हटल्याप्रमाणे ५,००० कोटीच आहे. मी एकूण प्रॉपर्टी पाहिली आहे. तिथला एकूण तामझाम बघता ३४,००० कोटी हे वॅल्युएशन फार किरकोळे . लेट अस सी.
18 Apr 2017 - 3:38 pm | मोदक
if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding
शुद्ध मराठीत याचा अर्थ काय होतो ते सांगा बघू..!
18 Apr 2017 - 3:44 pm | हेमंत८२
साहेब एखादा दिवाळखोरीत जातो तेव्हा तयाची किंमत खूप कमी होते. भले हि ती प्रॉपर्टी काही करोडोंची असेल. यासाठी मल्ल्या यांचे उदाहरन समोर ठेवण्यात यावे. गाओ येथी प्रॉपर्टी पहिल्यादा ९० crore ठेवली होती ती ७२ crore ला विकली गेली. असे सुद्धा अँबी वॅली बद्दल होऊ शकते.
मी प्रॉपर्टी बघितली नाही त्यामुळे ३४००० का ३४ कोटी हे सांगू शकत नाही.
19 Apr 2017 - 1:08 am | संजय क्षीरसागर
if the company failed to deposit Rs 5,000 crore of the Rs 14,000 crore outstanding शुद्ध मराठीत याचा अर्थ काय होतो ते सांगा बघू..!
बहुदा तुम्हाला आधीचे प्रतिसाद वाचायची सवय दिसत नाही.
एकूण देणं
१४,००० कोटींचं आहे हे मान्य, पैकी सध्या ५,००० कोटींचा तगादा असला तरीअँबीची आजची वॅल्यू १,१३,००० कोटी आहे
मी तर फुल एंजॉय केलीये अँबी वॅली. सो नो डिफरंस फॉर मी. शिवाय आपण इथे चर्चा करुन काही फरक पडत नाही. मला जी इन-साइड माहिती आहे आणि जे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यावरनं अँबी वॅलीची किंमत ३४,००० कोटींपेक्षा कित्येक पट जास्त आहे.
19 Apr 2017 - 10:36 am | मोदक
गिर्या तो भी टांग उपर - याचा अर्थ माहिती आहे ना..? नसला तरी हरकत नाही. ;)
सुब्रता रॉयचं एकूण देणं (फक्त) ५,००० कोटी आहे.
एकूण देणं १४,००० कोटींचं आहे हे मान्य
तुमचीच वाक्ये आहेत ना..? मुद्दाम लाल रंगात दिली आहेत. तुमच्या प्रकृतीला बरोब्बर फिट बसतील.
असो.. गेट वेल सून.
19 Apr 2017 - 10:45 am | संजय क्षीरसागर
सुद्धा दिग्विजय मिळवल्याचा आनंद होतो. माझा आणि सहाराच्या अर्थिक परिस्थितीचा काहीएक संबंध नाही. तरी थोडा फार प्रकाश पडावासा वाटत असेल तर कंजूसना दिलेला प्रतिसाद आहेच. जमल्यास वाचावा, वास्तविक परिस्थिती कळू शकेल. असो !
19 Apr 2017 - 10:50 am | मोदक
येथे तुमच्या दोन वाक्यातील विसंगती आहे हीच वास्तविक परिस्थिती आहे. ते तुम्ही बेशर्त मान्य करणार नाहीच. त्यामुळे टांग उपरच राहुदे.
गेट वेल सून.
19 Apr 2017 - 7:37 am | कंजूस
मला वाटतं या प्रॅाजिक्टमध्ये १)बाहेरून कर्ज काढून भांडवल उभे करण्याची मर्यादा जी प्रत्येक कंपनीस दिलेली असते ती ओलांडून { अधिक} रक्कम कर्जाउ घेणे गुन्हा आहे आणि ती परत करायची आहे ताबडतोब.
२) हे पैसे देणाय्रांनी त्यांना कबूल केलेले व्याज मिळत नाही अथवा पैसेही परत देत नाही कंपनी असा तगादा लावलेला आहे का? - बहुतेक नाही. यांपैकी कोणी एखाददुसरा मागणी करायला आल्यास ते पैसे देत असतीलच.
- वरचा पाच हजार को चा प्रतिसाद आल्यावर हे लिहिले कारण लेखाचा आर्थिक अनियमितता विषय नव्हता.
असो.
19 Apr 2017 - 10:36 am | संजय क्षीरसागर
सध्या सहारा ग्रुप लिक्विडिटी क्रायसिसमधे दिसतो (रोख रकमेची चणचण) त्यामुळे त्यांना पैसे परत करता येत नाहीत. परंतु त्यांची मालमत्ता देण्याच्या रकमेपेक्षा कित्येक पट आहे. उदा. एअरपोर्ट, गोल्फ-कोर्स, त्यांची धरणं, त्यांनी नॅशनल ग्रीडमधून घेतलेली स्वतःची पॉवर लाईन, त्यांच्याकडे असलेला ७,००० एकरचा थीम पार्कसाठी राखून ठेवलेला संपूर्ण स्वतंत्र विस्तार, तिथली हॉटेल्स, हॉस्पिटल्स, कम्युनिटी सेंटर्स, स्वतःचे शॅलेज .... शिवाय सुब्रता रॉय मल्यासारखे देशसोडून परागंदा झालेले नाहीत त्यामुळे (वर एका सदस्यानं म्हटल्याप्रमाणे) त्यांची मालमत्ता बेवारस पडलेली नाही आणि तिची किंमतही मातीमोल होण्याजोगी नाही.
मी वर म्हटल्याप्रमाणे, जरी सहाराला वॅली विकायला लागली ( तशी शक्यता दुरापास्तच) तरी ते रिसॉर्ट म्हणूनच राहील आणि लोकांना तिथं हवं तेव्हा जाता येईल (अर्थात, मी तर नक्कीच जाईन कारण माझ्या क्लायंटचा तिथे शॅले आहे आणि अदरवाईज सुद्धा मला तिथल्या खर्चाची फिकीर नाही). तस्मात, वर उपस्थित केलेले मुद्दे सेन्सेशनल (आणि केवळ चर्चा भरकटवण्यासाठी असले) तरी अँबी वॅलीचा आनंद घेण्याकरता, ज्यांची तशी टेस्ट आहे त्यांच्या दृष्टीनं गैरलागू आहेत.
19 Apr 2017 - 10:43 am | मराठी_माणूस
मग "जस्ट फॉर चेंज" म्हणून इतके दिवस गजाआड काढले का ?
19 Apr 2017 - 10:47 am | संजय क्षीरसागर
लिक्विडिटी क्रायसिस आहे .
19 Apr 2017 - 11:15 am | मराठी_माणूस
लोकांचे गोळा केलेले पैसे कूठे गेले ?
20 Apr 2017 - 10:02 am | कंजूस
>>तस्मात, वर उपस्थित केलेले मुद्दे सेन्सेशनल ~~>>
मी लिहिलंच आहे लेखाचा विषय नाही परंतू वर एक मुद्दा आला तो कशाबद्दल यावर टाइम्समध्ये सविस्तर लेख वाचल्याचं आठवतय. पैसे परत मागायला इन्वेस्टर आलेले नाहीत परंतू कंपनी लॅा MOAतल्या तरतुदींचा भंग हे स्वरूप असा आर्थिक गुन्हा आहे. सुखसोयींचा आढावा यास भरकटवण्याचा हेतू नाही.
20 Apr 2017 - 10:23 am | अनुप ढेरे
कारण ते हवेतले इन्वेस्टर्स आहेत. हा राजकारण्यांचा धुवायला काढलेला पैसा होता म्हणे जो यांनी लाखो लोकांच्या मायक्रो इन्वेस्ट्मेंट म्हणून दाखवला होता.
20 Apr 2017 - 11:14 am | सतिश गावडे
तसं असेल तर ज्यांच्या नावे पैसे गुंतवलेत असं दाखवलंय ते "आपले" पैसे मागू शेतात. =))
20 Apr 2017 - 11:14 am | सतिश गावडे
*शकतात
20 Apr 2017 - 10:32 am | संजय क्षीरसागर
Sahara India Real Estate Corp आणि Sahara Housing Investment Corp - या दोन कंपन्यातून ऑप्शनली फुल्ली कन्वर्टिबल डिबेंचर्स (OFCDs) इश्यू करुन उभे केलेले पैसे, त्यांना इन्वेस्टर्सना परत करता येत नाहीत असा तो गुन्हा आहे.
एनी वे, वर म्हटल्याप्रमाणे माझी पोस्ट अँबी वॅलीच्या माहौल बद्दल आहे आणि मालकी बदलली तरी त्यात काहीएक फरक पडणार नाही.
19 Apr 2017 - 11:12 am | पैसा
एन पी ए रिकव्हरी साठी कर्जाची थकबाकी पाच रुपयेसुद्धा कर्जदार भरत नसेल तर बँका मालमत्तेचा लिलाव करून आपले पाच रुपये वसूल करून घेऊ शकतात. कर्जाच्या अॅग्रीमेंटमधे तसे कर्जदाराने मान्य केलेले असते. त्यामुळे कर्ज एन पी ए झाल्यानंतर मालमत्तेची बाजारभावाने किंमत काय हा मुद्दा संपूर्णपणे गैरलागू असतो. सूचना देऊनही पाच सहा लाखाची घरकर्ज थकबाकी काही कारणाने कर्जदार भरू शकला नाही तर बँक त्या घराचा लिलाव करून आलेल्या रकमेतून आपले कर्ज कापून घेते आणि शिल्लक रक्कम कर्जदाराला देऊन टाकते. अशा वेळी ६०/७० लाखाचा फ्लॅट घेणारा किती किंमतीला घेतो आहे याचे बँकेला सोयरसुतक नसते. लिलाव बहुधा मालमत्तेच्या डिस्ट्रेस व्हॅल्यूला होतो. बँकेची पाच सहा लाख थकबाकी वसूल झाल्याशी कारण.
19 Apr 2017 - 1:46 pm | संजय क्षीरसागर
पण अँबी वॅली सदर प्रकरणात गहाण नाही. अन्यथा त्यांना आदेश वगैरे देण्याची गरज नव्हती, कोर्टानंच लिलाव केला असता.
20 Apr 2017 - 10:21 am | चित्रगुप्त
फोटो मस्तच आहेत. परन्तु बाहेरच्या उंच कमानींच्या वर AMABY असे, तर आतील काऊंटरावर AAMBY लिहीले आहे, यात काही विशिष्ट हेतु आहे, चूक आहे की हा काही चमत्कार आहे ? नेमके नाव अँबी की अंबे की आम्बे आहे ?
20 Apr 2017 - 11:12 am | सतिश गावडे
ते ऋतूनुसार कस्टमायझेशन करत असतील. आंब्याच्या हंगामात आम्बे असं काही असेल.
20 Apr 2017 - 12:03 pm | मोदक
A इकडून तिकडे चुकीचा बसवला आहे.
21 Apr 2017 - 12:00 am | डॉ सुहास म्हात्रे
हेवनमधला सोमरस घेऊन काम केल्याचा परिणाम असेल ! ;)
20 Apr 2017 - 3:22 pm | सावत्या
आमच्यासाठी ही काँप्लिमेंटरी पिकनिक अरेंज केली होती!!!!
काँप्लिमेंटरी पिकनिकला जाणाऱ्याला खर्चाची कसली फिकीर....
20 Apr 2017 - 5:17 pm | दशानन
तुमचा किती हिस्सा हो?
नाही एवढे रेटून प्रतिवाद करत आहात?
8 Sep 2022 - 5:53 pm | विजुभाऊ
अँबी वॅली अजून चालू आहे का?
मुख्य म्हणजे तेथे जाण्यासाठी बुकिंग करावे लागते का?