चांगली-वाईट, सुष्ट-दुष्ट, काळ्या-पांढर्या अशा एकाच रंगातल्या व्यक्तिरेखांच्या गर्दीत अचानक कधीतरी करड्या व्यक्तिरेखा सापडतात आणि मी चौकस होते. त्या जर स्त्रिया असतील तर अपील जरा जास्तच. अॅना केरनीना, स्कार्लेट-ओ-हारा, लिजबेथ सेलँडर... यांना ननायिका म्हणतात. यांच्यात काही सद्गुण सहजपणे सापडतात म्हणून त्या नायिका. पण तेवढेच दुर्गुणदेखील असतात त्यामुळे ननायिका. अँटीहिरोइन.
पण कधीकधीमात्र अश्श्या बायका भेटतात की बस्स! धक्काच बसतो! काय चांगलं काय वाईट याची जाण यांच्यात भीषणपणे गंडलेली असते. या बायका स्वतःहून कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाहीत. पण जर कोणी यांच्याशी वाईट वागलं तर मात्र त्याची काही खैर नाही. तरीही या खलनायिका किंवा ननायिका नाहीत. त्या नायिकाच. अशाच काही 'व्हिलन हिरोइन'च्या पुस्तकांची थोडक्यात ओळख:
1. गॉन गर्ल - एमी एलीअट:
निक आणि एमी यांच्या लग्नाचा ५वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे न्याहरी करुन निक कामाला (बहिणीसोबत चालू केलेला बार) जातो. थोड्या वेळाने घरासमोर राहणार्याचा फोन येतो की तुमच्या घराचं दार सताड उघडं आहे. निक घरी येऊन पाहतो तर हॉलमधलं सामान विखुरलं आहे आणि एमी गायब झालीय. मग पोलीसतपास, खून/अपहरणची शक्यता, आसपासच्या भागात एमीचा शोध, मिडीया सर्कस इ. चालू होतं आणि सांगाडे कपाटातून बाहेर पडू लागतात. निकला बायको गायब झाल्याचं दुःख, काळजी वाटत नाही. तिचे मित्रमैत्रीण कोण, तिचं घरातलं रुटीन काय अशा साध्या प्रश्नांची उत्तरं त्याला देता येत नाहीत. एवढंच काय तिचा रक्तगटदेखील त्याला आठवत नसतो. अधिक तपासात नुकताच एमीचा जीवनविमा दुप्पट केल्याचं कळतं. आणि अर्थातच संशयाची सुई त्याच्याकडे वळते. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
या पुस्तकाने इतका धुमाकूळ घातला की त्यानंतर थ्रिलर प्रकारात एखादे क्रेझी पुस्तक आले की त्याला 'नेक्स्ट गॉन गर्ल' म्हणले जाऊ लागले. एक पुरुष आणि एक स्त्री असे एकाआडएक न्यारेटर असलेली बरीच पुस्तकं लिहली जाऊ लागली. त्यातला एक किंवा सगळेच अविश्वासू असतील. ते वेगवेगळ्या काळातील घटनांबद्दल बोलत असतील. किंवा एकाच घटनेकडे आपापल्या दृष्टीकोनातून बघत असतील. त्यातून बरेच रेड हेरींग मिळतील. व्यक्तिरेखांबद्दलची वाचकाची मतं एका टोकापासून चालू होऊन पुर्ण विरुद्ध दुसर्या टोकाला जातील. एकंदरच फुलटू रोलर कोस्टर राइड.
2. सायलेंट वाइफ - ज्योडी ब्रेट:
निक-एमी तरुण, लग्नाला पाचंच वर्ष झालेलं जोडपं होतं. इथे टोड आणि ज्योडी यांचं २० वर्ष मुरलेलं नातं आहे. एखाददुसर्या पेशंटला सायकोथेरपी काऊंसलींग करणारी ज्योडी मुख्यतः होममेकर आहे. घर टीपटॉप ठेवणे, टोड कामाहून आल्यावर त्याच्या आवडीचे खाणेपिणे तयार ठेवणे इ कामं ती वर्षानुवर्ष करत आली आहे. टोड हा बाहेरख्याली आहे. ज्योडीला ते माहीत आहे. पण त्याबद्दल ती काही बोलत नाही. छोटेछोटे प्रतिशोध घेऊन ती शांत राहते. हे केवळ कचरा गालिचाखाली ढकलणं असतं का? ज्योडीची शांतता ज्वालामुखीसारखी ठरणार का? हे जाणून घ्यायला पुस्तक नक्की वाचा.
गॉन गर्ल सुरवातीपासूनच डिस्टर्बींग आहे. तर सायलेंट वाइफ हळूहळू अँटीसिपेशन वाढवत नेणारं आहे. नात्यांमधला साचलेपणा, गृहितकं यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करणारं पुस्तक.
3. द गर्ल ऑन द ट्रेन - रेचल, अॅना, मेगन:
घटस्फोटीत, वांझोटी, बेकार, बेवडी रेचल रोज ट्रेनने (दारु पीत पीत) नोकरीवर जाण्याचे नाटक करत असते. वाटेत सिग्नलला ट्रेन जिथे स्लो होते तिथल्या एका घरातील पर्फेक्ट कपल मेगन-स्कॉट यांचे डेली रुटीन पाहणे हा तिचा छंद आहे. एकेदिवशी ती मेगनला त्रयस्थ इसमाचे चुंबन घेताना पाहते आणि तिला फार धक्का बसतो. रेचलला दारुमुळे बर्याचदा ब्लेकआऊट येत असतात. अशाच एका ब्लेकआऊटमधुन चिखल, रक्ताने माखलेल्या कपड्यांत ती जागी होते आणि आदल्या दिवशी मेगन बेपत्ता झाल्याची बातमी येते. मेगनचं काय झालं? अॅना कोण आहे? रेचलचा या सगळ्याशी काय संबंध? हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.
मला स्वतःला हे पुस्तक अर्ध्यापर्यंतच आवडलं. पुढेपुढे कंटाळले आणि शेवटीशेवटीतर 'कमॉनऽ संपवा आता!' झालं. पण हे पुस्तकदेखील नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून फ्रेंझी निर्माण करणारं होतं (कदाचीत केवळ मार्केटींग गिमीक) म्हणून इथे या यादीत आलं.
4. लकीएस्ट गर्ल अलाइव - अॅनी फनेली:
सुंदर, चांगले करीयर, श्रीमंत+प्रेमळ मंगेतर... वरवर पाहता २८ वर्षीय अॅनीचे आयुष्य कोणालाही पर्फेक्ट वाटेल. पण पौगंड वयातील काही भयानक अनुभवांनी अजूनही तिची पाठ सोडलेली नाही. ते अनुभव कोणते हे जाणून घ्यायचे असेल तर पुस्तक वाचा.
हे पुस्तकदेखील मला फारसे आवडले नाही. पण गऑदट्रेप्रमाणेच हे पुस्तकदेखील नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून फ्रेंझी ब्ला ब्ला ब्ला :-D. वेलऽ लेखिकेने स्वतःचा 'अनुभव' यात लिहला आहे. अमेरीकेतील कॉलेज लाइफ, बुलिइंगबद्दल मला थोडीफार आयडीया यातून मिळाली म्हणता येइल.
5. द काइंड वर्थ किलींग - लिली किटनर:
टेड आणि लिली विमानतळावरील बारमधे भेटलेले अनोळखी. कॉकटेल रिचवताना ट्रुथ गेम चालू होतो. अगदी जवळच्या व्यक्तिशी जे बोलू शकणार नाही ते परत कधीच न भेटणार्या अनोळखी व्यक्तिलामात्र सांगू शकतो. टेड आपल्या बायकोच्या व्याभिचाराबद्दल बोलतो. लिली विचारते "मग तू काय करणार आहेस याबद्दल?". टेड डोळा मारायचा प्रयत्न करत उत्तरतो "तिचा खून करावासा वाटतोय". लिली डोळे मोठे करत म्हणते "मला वाटतं तू हे जरुर करावं." पुढे काय होतं जाणण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.
गॉन गर्ल-एमीइतकीच कावकि-लिली मला आवडली. गर्ल ऑन द ट्रेनपेक्षा या पुस्तकाला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी होती. फार जबरदस्त पुस्तक आहे. आणि शेवट तर खल्लासच! याचा सिक्वेल यावा अशी माझी फार इच्छा आहे. आणि हो पुस्तकात एक फार विनोदी कविसुद्धा आहे बरं का. नक्की वाचा.
===
* ही सगळी पुस्तकं थ्रिलर/सस्पेंस असल्याने प्लॉट, बायकांच्या श्रुडपणाबद्दल जास्त लिहले नाही.
* तुम्हीदेखील इतरत्र समिक्षा, चिरफाड वाचत बसू नका. सरळ पुस्तक वाचा किंवा चित्रपट बघा. आणि काय वाटलं ते इथे लिहा.
* डिटेल लिहणार असाल तर स्पॉयलर अलर्ट टाकायला विसरू नका.
* लेखातील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा.
* वांझोटी शब्द ट्रीवलाइज करण्यासाठी मुद्दाम वापरला आहे.
प्रतिक्रिया
24 Mar 2017 - 2:40 am | स्रुजा
यातलं गर्ल ऑन द ट्रेन वाचलंय आणि चित्रपट पण पाहिलाय. होतं काय की अशा पुस्तकांशिवाय राहवत पण नाही आणि ते नंतर हाँट पण करत राहतात त्यामुळे सध्या ब्रेक घेतलाय. पण ही यादी साठवली आहे आता, नक्की बघेन. छान परीचय :)
24 Mar 2017 - 7:00 am | एस
चांगला परिचय करून दिला आहे. यातले एकही पुस्तक अद्याप वाचलेले नाही. परंतु वाचायची उत्सुकता निर्माण झाली आहे हे तुमच्या लेखाचे यश म्हणू शकता.
24 Mar 2017 - 10:36 am | पुंबा
सेम टू सेम. आधी प्रचंड उत्कंठा निर्माण करून शेवटी इतकं रटाळ होतं हे पुस्तक की बास. गॉन गर्ल ची सर मुळीच नाही या पुस्तकाला.
बाकीची वाचली नाहीयेत अजून. तुम्ही इतका सुंदर परिचय करून दिलायत की वाचावीशी वाटताहेत.
24 Mar 2017 - 11:05 am | मराठी कथालेखक
पुस्तकं चांगली वाटतायत पण जास्त इंग्लिश जमत नाही.. अनुवादित उपलब्ध आहे का ? नसल्यास तुम्ही मिपावर संक्षिप्त आवृत्ती आणा.
24 Mar 2017 - 11:45 am | संजय क्षीरसागर
बघायला आवडतील.
24 Mar 2017 - 11:54 am | पैसा
छान परिचय
24 Mar 2017 - 12:40 pm | बरखा
का कुणास ठाऊक पण ही पोस्ट या आधी वाचलीये अस वाटतयं.
मी बहुदा वाखु मधे पण अशी पोस्ट ठेवली होती, मला सध्या वाखु हा विभाग दिसत नाहीये :( नाहीतर लगेच बघितल असत.
24 Mar 2017 - 1:04 pm | एमी
प्रतिसाद देणार्या सगळ्यांचे आभार _/\_
===
स्रुजा, अगदी अगदी :-) असली पुस्तकं हाँट करतात.
सौरा, तेच की :-@ शेवटी शेवटी तर त्या येडपटांना खांद्याला पकडून गदागदा हलवावं वाटत होतं. उठा... काहीतरी करा...
मक, अनुवाद उपलब्ध नसणार. ही सगळीच नवीन पुस्तकं आहेत आणि यांना मराठी वाचकांमधे फार मार्केट/डिमांड नसेल असे वाटते.
अरे बापरे! मिपावर संक्षिप्त आवृत्ती? मी? शक्य नाही :-| एकतर माझं मराठी दिव्य आहे आणि टंकायचे कष्ट कोण घेणार. पण आयेम ऑनर्ड :-)
संक्षी, १ (बेन अफ्लेक आणि रोजमंड काहीतरी पार्क बहुतेक. याच्या स्क्रिनप्लेला ऑस्कर नामांकनदेखील होतं) आणि ३ वर चित्रपट येऊन गेलेत. ४ वर बनतोय. जेनिफर लॉरेन्स अॅनी बनली आहे.
बरखा, हा लेख मी माबोवर जानेवारीतच टाकला होता. तिकडे वाचला असेल. ही त्याची लिंक
http://www.maayboli.com/node/61384
24 Mar 2017 - 2:09 pm | पुंबा
गॉन गर्ल पिक्चर भारी आहे. शेवटी लग्नसंस्थेवरचा विश्वास उडतो. :))
24 Mar 2017 - 3:34 pm | एमी
Are you my siemese twin born after ummm around 15 years?? ;-)
Others: Don't read below links if you haven't yet read the book or seen the movie. Read it if you are never going to do either....
www.newyorker.com/culture/cultural-comment/marriage-abduction
www.theguardian.com/books/2013/may/01/gillian-flynn-bestseller-gone-girl...
http://gillain-flynn.com/for-readers
www.newyorker.com/books/joshua-rothman/gone-girl-really
http://thebooksmugglers.com/2013/02/joint-review-gone-girl-by-gillian-fl...
29 Mar 2017 - 11:08 am | पुंबा
हाहाहा.. I am 26.. :))
http://www.newyorker.com/books/joshua-rothman/gone-girl-really
हा लेख जबरा आहे. फार आवडला.
आणखी एक अपडेट.. द काईंड वर्थ किलिंग चालू केलंय.. मस्त वाटतंय आता तरी. पूर्ण झाल्यावर सांगतो आणखी.
29 Mar 2017 - 11:29 am | एमी
हाहाहा.. I am 26.. :)) >> 12 years :-)
http://www.newyorker.com/books/joshua-rothman/gone-girl-really हा लेख जबरा आहे. फार आवडला. >> Agree.
आणखी एक अपडेट.. द काईंड वर्थ किलिंग चालू केलंय.. मस्त वाटतंय आता तरी. पूर्ण झाल्यावर सांगतो आणखी. >> cool...
Sorry for english. Can't type marathi from mobile :-(
24 Mar 2017 - 2:42 pm | विचित्रा
आभार
24 Mar 2017 - 9:07 pm | आनंदयात्री
जबरदस्त धागा. या पुस्तकांच्या ओळखीबद्दल धन्यवाद. गॉन गर्ल या वीकेण्डला घेतोच वाचायला.
24 Mar 2017 - 10:55 pm | श्रीगुरुजी
परिचय व थोडक्यात केलेली समीक्षा आवडली.
27 Mar 2017 - 8:26 pm | अॅस्ट्रोनाट विनय
उत्तम पुस्तकांची ओळख करून दिल्याबद्दल आभार.
28 Mar 2017 - 2:39 am | एमी
प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार _/\_
28 Mar 2017 - 2:43 am | स्रुजा
आज सकाळी विचार करत होते तर हिंदी मधल्या अशा न-नायिका आठवल्या. कौन मधली सायको उर्मिला , प्यार तुने क्या किया मधली एकतर्फी प्रेम करणारी उर्मिला, पुकार मध्ये नायकाने नाकारलं म्हणुन त्याचं करीअर संपवणारी माधुरी (हा सिनेमा तद्दन मसालापट होता त्यामुळे ती लगेच न-नायिकेची नायिका झालीच आणि मग अनिल कपुर पण प्रेमात पडणे वगैरे) , ऐतराझ मधली प्रियांका (गाणी घातली नसती तर हा सिनेमा अजुन चांगला झाला असता) , गुप्त मधली काजोल वगैरे.
कौन मधली उर्मिला आणि ऐतराझ मधली प्रियांका सोडली तर सगळ्याजणी प्रेमामुळेच सायको होतात असं हिंदी सिनेमावाल्यांचं एकजात मत दिसतंय !
28 Mar 2017 - 3:55 am | एमी
तीन पुर्ण भिन्न प्रकार आहेत. खलनायिका, ननायिका आणि व्हिलनहिरोइन.
माझ्यामते कौन आणि प्यार तुनेमधल्या उर्मिला, ऐतराझ मधली प्रियांका या खलनायिका आहेत. त्या चांगल्या/नॉर्मल माणसांना त्रास देतायत. पुकार आणि गुप्त पाहिला नाही.
व्हिलन-हिरोइन म्हणजे एक हसिना थी मधली उर्मिला म्हणता येइल बहुतेक. यातदेखील शंका आहे; कारण उर्मिलावर फारच अन्याय झालाय. व्हिलन हिरोइनवरच्या अन्यायाची तीव्रता एवढी नसते. आणि त्यांना इतर कायदेशीर/समाजमान्य पर्याय उपलब्ध असतात; तरी त्या वेगळाच मार्ग शोधतात.
न-नायिका हिंदीत आहेत की नाही आठवावे लागेल, त्या व्हिलन हिरोइनइतक्या ट्विस्टेड नसतात. आणि खलनायिकेसारख्या चांगल्यांना त्रास देत नाहीत.
28 Mar 2017 - 11:23 am | तुषार काळभोर
एक हसिना थी हा माझ्या ऑल टाईम फेवरीट पिच्चरमध्ये आहे.
सैफचा देखील तोपर्यंतचा कदाचित सर्वोत्तम रोल असावा.
28 Mar 2017 - 2:03 pm | एमी
हो चित्रपट छानच आहे.
श्रीराम राघवनचे जॉनी गद्दार (या शिन्मामधुनच मला जेम्स हैडली चेस माहीत झाला. निनिमु ट्रेनमधे पुस्तक वाचत असतो :-)) आणि बदलापूरपण झक्कास आहेत.
रामुने एकेकाळी फारच छान चित्रपट बनवले, नवीन टैलेंटेड लोकांना संधी दिली. उर्मिला त्याच्या आयुष्यातून गेली आणि काहीतरी बिनसलंच ;-(
सैफची चेहरेपट्टी नायकापेक्षा खलनायक म्हणून जास्त शोभते हेदेखील याच चित्रपटात प्रथम कैप्चर केलं गेलं. तोपर्यंत तो फारच नाजूक/बायकी वाटत होता.
बाकी या चित्रपटातले सुरवातीचे आणि तुरुंगातले कथानक सिडनी शेल्डनच्या इफ टुमॉरो कम्सवर बेतलेले आहे.
===
एनीवे तर मुळ विषयाबद्दल:
काळी ते पांढरी या स्केलवर, मधे जे पाचशे शेड्स ऑफ करडे :-P येतात, त्यात रँक साधारण अशी
खलनायिका(काळी) > व्हिलन हिरोइन > ननायिका > नायिका(पांढरी)
मला वाटतं एक व्हिलन हिरोइनचे (गॉग, कावकि) आणि एक ननायिकेचे गॉविविं, दगविड्रैटै) पुस्तक वाचले किंवा चित्रपट पाहिला तर कळेल मला काय म्हणायचं आहे ते.
16 Jul 2018 - 9:20 am | एमी
जिलीयन फ्लिनचे पहिले पुस्तक 'शार्प ऑब्जेक्टस्'वरून बनलेली मालिका HBOवर चालू झाली आहे 8 जुलैपासून.
कोणी बघतेय का? कशी आहे?
हि एक मुलाखत
https://www.goodreads.com/blog/show/1305-inside-gillian-flynn-s-dark-and...