राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!
*आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो.
*मिपावर काटछाट करणार्या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्या संपादकांच्या नावाने रे भो...!
*खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो.
*मिपाच्या बॅनर बनविणार्याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो.
* काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो.
* साहित्य संपादकांच्या वात आणनार्या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो.
* कोनाडा सुरु न करणार्या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो.
* बंडखोर, विद्रोही, पिरा, सृजा, यशो.... च्या रे भो....बोबोबोबो.
*अलंगडीवर पलंगडी, पलंगडी पडली खळ्यात आणि ..... टींबटींब रे भो...बोबोबोबो.
*मी चाललो नदीकाठाने मला सापडली लकडी आणि ... ...भो... बोबोबोबो.
* डिस्क्लेमर :
१. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन खाज मिटवु नये.
२. व्यक्तीगत आरोप करु नये. मा.मोदी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा. यांना दूर ठेवावे.
मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!
प्रतिक्रिया
13 Mar 2017 - 11:06 pm | अभ्या..
.
आयोव... म्या कुटं फाटक्या तोंडाचा माय. खरं हाय ते बोलितो.
सवयीच्या लिस्टात घातलं जणू नाव आमचं. लै कष्टानं कमवलं हाय बरं ते. ;)
14 Mar 2017 - 4:33 am | पिलीयन रायडर
आपण मराठवाड्याचे ना अभ्या.. आपली तोंडं फाटकीच!
13 Mar 2017 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या हं गोव्याला, या हं गोव्याला असे म्हणून गोव्यात आल्यावर लांज्याला पळणाऱ्या पैच्या बैलाला रे भो. ;)
-दिलीप बिरुटे
13 Mar 2017 - 10:29 pm | पैसा
ह्या! राहिल्या कुठे? मग इतक्या वेळ कोणाच्या नावाने बरेच लोक बोंबलत आहेत तर!!
मिपावरच्या सगळ्या बैलांच्या बैलाला होऽऽऽ
सुटीत गोव्याला नक्की या हं. =)) =))
13 Mar 2017 - 11:22 pm | समाधान राऊत
झोपायच्या पहिले थोडे बोंबलुन घ्यवा म्हणतोय
बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅाबॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा बॅा
चुना लावुन बोंबलायची रेसिपी मिळाली तर बर व्हयील
13 Mar 2017 - 11:34 pm | अभ्या..
कुठं?
14 Mar 2017 - 5:58 pm | समाधान राऊत
बस का भावा..आपुन रंग अन चुना फक्त हाताला अन दुसर्याल्या लावतो
14 Mar 2017 - 6:18 pm | अभ्या..
ए...जिगर.
घे भावा डब्बल.
आपल्यातलाच तू...
14 Mar 2017 - 12:05 am | अभ्या..
थोडा वेळ आहे राव धुळवड संपायला.
बरेच आयडी राह्यलेत बोंबलिस्टीत.
घेऊ त्यांना पण ....
.
आदी नमन आदूबाळाला,
चोवीस तास प्रतिभा नळाला.
अविरत
मग येऊ बॅटूखाटीकाकडं
गणितसंस्कृताचं घेऊनी धडं
गाजवत
प्रगो बैसी बकध्यानाला
मारीयुआनाच्या प्रभावाला
मिरवत
गणपा आणे आव्हनाला
ड्रंकन बम चिकनाला
बसवत
आता पायघड्या टाकू
हसत येतील नाखू
खाजवत
वप्याच्या मागं लै किडं
संगतीनं देव बी बिघडं
लाजवत
सूडक्याची येगळीच जात
पाण्यात मारी उगा हात
भिजवत.
.
तमाम माझ्या मिपाकर मित्रांनो. तुम्ही हायेत तर मिपा हाये.
म्हणोन तुमच्या सगळ्या खिल्ल्ल्लाराच्या नावानं
बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
14 Mar 2017 - 12:14 am | संदीप डांगे
वर्षभर माझ्या नावानं (आणि नाव न घेताही) बो बो करणार्यांच्या बैलान्ला ....... बो बो बो बो बो!!!!!!!
14 Mar 2017 - 12:27 am | कैलासवासी सोन्याबापु
चरस गांजा अफीम पेक्षा भयानक व्यसन असलेल्या मिपाच्या मालकांच्या तेल्हारकर बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
बॅनरकर्ते संदीपा अन अभ्याच्या बैलाला फ्लेक्सचा बॉ बॉ बॉ बॉ
अभ्याच्या बैलाला पेशल बॉ बॉ बॉ (काय नाय सहजच राग नाही येत त्यानीला)
सगळ्या आजी माजी अन भावी अन मनात मांडे संपादकांच्या नावे बॉ बॉ बॉ बॉ
संक्षीच्यापण बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
मीना प्रभूंच्या लेव्हलची प्रवासवर्णने लिहायची हातोटी असूनही काथ्या कुटत बसणाऱ्या म्हात्रे काकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
एखादी मोठ्ठी घटना घडून गेल्यावर नेमकी ती घटना ज्या क्षेत्राशी निगडित असते त्याच क्षेत्रातला उच्चपदस्थ 'मित्र' बरोबर दाखले द्यायला का तयार करायला अनायासे सापडणाऱ्या सन्माननीयांच्या बैलाला पण बॉ बॉ बॉ बॉ बॉ
बाकी, कशात काय नाय तरी आमच्या जवळच्या गोटातला म्हणून सच्च्या होबासक्याच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ
मंटो सारखे लेखक हाताळत मधेच काशिनाथ होणाऱ्या मंदाऱ्या भालेरावच्या बैलाला 'खोल दो' बॉ बॉ बॉ
अमरावतीच्या चिनार भाऊंना 'विचारवंत पदवी' मिळवल्याबद्दल बॉ बॉ बॉ (तुम्ही ज्यूनीवर भारत गणेशपुरेच बरे हाय हो)
एका हाताने गोंजारत दुसऱ्या हाताने (पक्षी आयडी ने) थापड मारणाऱ्या थोरामोठ्यांच्या बैलाला बॉ बॉ बॉ
संदिप भाऊ डांगे ह्यांच्या कीबोर्डच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
ये**व्या बॅट्याच्या डच बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ
सरते शेवटी, आम्हाला चपला पिशवीतही न घालता थेट *डीवर लाथ पडून आम्ही बॅन होऊ असले प्रतिसाद द्यायला लावणाऱ्या अन असले धागे काढणाऱ्या मास्तरांच्या मराठवाडी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
आता झोपतो, तुम्ही बसा काशी करीत.
अन, हो स्वतः कवडीची साहित्यसेवा न करता नुसते मोरल पोलिसींग करत हिंडणाऱ्या अन चोम्बडेपणा करत लोकांना अक्कल शिकवणाऱ्या फक्त शीनेरिटीच्या बेसिस वर टिकून असलेल्या हुच्च शिरोमणी मेंबर्सच्या बैलाला पण इग्नोरी बॉ बॉ बॉ बॉ बॉ
14 Mar 2017 - 12:34 am | टवाळ कार्टा
एकाच प्रतिसादात धा बारा जणांना बडवणाऱ्या बापूंच्या लष्करी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
14 Mar 2017 - 7:17 am | कैलासवासी सोन्याबापु
इथूनही गायब झालेल्या टक्याच्या बैलाला फोर स्ट्रोक बॉ बॉ बॉ बॉ बॉ
जामोप्याच्या बैलाला बांग स्पेशल बॉ बॉ बॉ बॉ बॉ
गामा पैलवानाच्या भगवी छाटी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ
आदुबाळ साहेबांच्या व्यंसगी बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ
गविंच्या रडवणाऱ्या कथांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ, अन पेशल बॉ बॉ ब्राऊ सारखी कथा परत न लिवल्यामुळे.
अतिआदर्शवादी तरी भोळे अन सच्चे असलेल्या मुवि काकांच्या तीन एकर कुरणातल्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ बॉ
स्पान्डूच्या भयकथेतील बैलाच्या कवटीला बॉ बॉ बॉ बॉ
आटमुसगुरुजींच्या रांगोळी बैलाला बॉ बॉ बॉ
कुठं ते औताला उलटलेल्या नाखुन चाचाच्या बैलाला बॉ बॉ बॉ
थत्तेचाचाच्या पंजाप्रेमाला बॉ बॉ बॉ बॉ
श्रीगुर्जींच्या कमळ प्रेमी गिरे तो भी टांग उप्पर बैलाला पण बॉ बॉ बॉ बॉ बॉ
वाचन मात्र मोडातुन बाहेर न येता बुडास मोड आले तरी नवे काही पक्षी रेशीप्या न लिवणाऱ्या गणपाभाऊच्या बैलाला पण बॉ बॉ बॉ बॉ बॉ
14 Mar 2017 - 10:47 am | चिनार
चिमायबीन मले ज्यानं कोनं इचारवंताची पदवी देल्ली असंनं त्येच्या बैलाले बॉ बॉ बॉ बॉ
14 Mar 2017 - 3:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
मीना प्रभूंच्या लेव्हलची प्रवासवर्णने लिहायची हातोटी असूनही काथ्या कुटत बसणाऱ्या म्हात्रे काकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ
प्रवासवर्णने लिहिणे हे केवळ माझ्या छंदाचे उप-उत्पादन आहे. पण, "राजकारण्यांच्या (किंवा स्वतःच्याही) डोक्यातून निघणार्या तात्कालीक स्वार्थी हितसंबंधी विचारांना बाजूला ठेऊन, स्वतःचे डोके 'वापरून' देशाच्या (व पर्यायाने स्वतःच्या आणि स्वतःच्या पिढीच्या) दीर्घकालीन भवितव्याचा विचार करा", या माझ्या सांगण्याला काथ्या कुटणे समजणार्या सोन्याबापूंच्या बैलाला घोsss बॉबॉबॉबॉबॉबॉबॉssssss
(नो डाऊट थँकलेस जॉब. बट, समबडी गॉट टू दू इट ! अँड, इफ अँड व्हेन टाईम कम्स, आय अॅम नॉट द वन हू विल् रन अवे. :) )
14 Mar 2017 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रसिद्ध अशा होळी उर्फ़ मिपावरील जाल शिमग्याला हजर राहून प्रतिसाद लिहिणारे सर्व मिपाकर, वाचक, मालक, तंत्रज्ञ, सर्वांचेच सर्व प्रतिसाद हलकेच घेतल्याबद्दल, चिमटे घेतल्याबद्दल , धमाल मज़्ज़ा केल्याबद्दल अभ्यासहीत सर्वांचे मन:पूर्वक आभार...!!! _/\_
-दिलीप बिरुटे
(आभारी मिपाकर )
14 Mar 2017 - 10:58 am | किसन शिंदे
१००
15 Mar 2017 - 4:23 pm | सूड
चांगला दणक्यात झाला की शिमगा!!
20 Mar 2019 - 1:14 pm | अभ्या..
होळीच्या गवऱ्या पाच
शिमगा घेऊन नाच
21 Mar 2019 - 2:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा...!!! ;)
-दिलीप बिरुटे
9 Mar 2020 - 2:41 pm | प्रचेतस
हा धागा टाकूनही त्यावर न फिरकणाऱ्या प्राडॉ काकांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..!
9 Mar 2020 - 3:12 pm | ज्ञानोबाचे पैजार
मागच्या दोन वर्षात केवळ दोन लेख लिहिणार्या वल्लीदांच्या बैलाला हो बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..!
पैजारबुवा,
10 Mar 2020 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख न पाडणा-या वल्ली चा रे भो....!!
-दिलीप बिरुटे
10 Mar 2020 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्व मिपाकरांच्या बेलाचा रे घो.....!!!
-दिलीप बिरुटे