अंजलीची गोष्ट - रिप्लाय

aanandinee's picture
aanandinee in जनातलं, मनातलं
7 Mar 2017 - 1:06 pm

"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं.
"हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली
"हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती.
"ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली.
"हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं.

"हो आठवतो.... इतक्या वर्षांत कधी बोलणं नाही झालं त्याच्याबद्दल. कुठे असतो तो?आणि मेसेज का केला होता?" अंजलीने विचारलं.

" बँगलोरला असतो तो. आम्ही अजिबात टचमधे नव्हतो. दोनचार वर्षांपूर्वी कधीतरी त्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तीसुद्धा मी डिक्लाईन केली होती. पण आजकाल सगळे रियुनियनचे वारे वाहातायत ना त्यामुळे इथून तिथून कॉन्टॅक्ट डीटेल्स मिळाले असतील." .....मनस्वी

"हं ....काय म्हणतोय तो?" अंजली.

"मोठ्ठा मेसेज आहे. त्याचंही लग्न वगैरे झालंय. मुलं आहेत. आणि तरी म्हणतोय की मी तुला आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. लाईफ पार्टनर होण्याचा आपला चान्स तर गेला. आता किमान गुड फ्रेंड्स म्हणून तरी राहूया. फोनवर टचमधे राहूया असं म्हटलंय त्याने" मनस्वी.

"मग तू काय करणार आहेस? आणि ऋषिकेशची काय रिएक्शन?" मनस्वीच्या बाबतीत ऋषीला सांगितलंस का हा प्रश्न व्हॅलिडच नव्हता हे अंजलीला चांगलच ठाऊक होतं.

"तो तर काय नावाप्रमाणे ऋषीच आहे. त्याला या सगळ्याचं काही वाटतं असं वाटतच नाही. My love should not tie you down. It should liberate you.... असं काय काय बडबडत होता" मनस्वीने थोडंसं वैतागून म्हटलं.

"तुला आनंद व्हायला पाहिजे तुझा नवरा टीपीकल ऑर्थोडॉक्स नाहीये म्हणून!" अंजलीने हसून म्हटलं.

"आनंद आहेच गं. आमच्या लग्नाला आता पंधरा वर्ष झाली. सुरुवातीची कितीतरी वर्ष माझा ऋषीवर विश्वासच नव्हता. अगदी लव्ह मॅरेज असूनसुद्धा. अधून मधून त्याचा खिसा चेक कर, फोन चेक कर, झालंच तर इमेलसुद्धा चेक कर, असं सगळं मी करत असे. बर्याच उशिरा मला कळलं की मी त्याला सारखं तपासतेय कारण 'त्याचं काही आहे' असं नाही तर मीच माझ्या मनात इन्सिक्युअर आहे. मग प्रयत्नपूर्वक सगळं बंद केलं आणि माझंच मला इतकं पीसफुल वाटायला लागलं!"... मनस्वी.

"मग स्वपनीलला सांगून टाक की ऋषीसारखा नवरा असताना आणखी वेगळ्या मित्रांची गरजच नाहीये मला म्हणून!" ...अंजली.

"अगदी खरं आहे. ऋषी लग्ना आधी माझा मित्र होता. आणि लग्नानंतरसुद्धा नवरा बायकोच्या नात्याबरोबर आमच्यात मैत्री आहेच. पण समजा ऋषीच्या जागी एखादा खडूस नवरा असता तरीही मी लगेच जुन्या मित्राकडे गेले असते का? जुन्या नात्यामध्ये तेवढं बळ असतं तर तेव्हाच ते नातं तुटलं नसतं ना? मग जे टिकू शकत नाही म्हणून तोडलं ते धरून ठेवण्याचा अट्टाहास कशाला? तुटलं... तुटलं.... आता सोडून दिलं पाहिजे ना?" ....मनस्वी.

"बरोबर आहे. मला वाटतं बायका बहुतेक वेळा त्यांच्या संसारात साखरेसारख्या विरघळून जातात. नवरा, मुलं, घर, संसार आणि सगळं सांभाळून झालंच तर स्वतःचं करिअर हेच त्यांच्यासाठी विश्व बनून जातं . त्यामुळे या असल्या जुन्या गोष्टी उगाळण्याची गरजच रहात नाही त्यांना. स्वप्नील सारखे पुरुष मात्र भरल्या संसारात असूनही नर्मदेतले गोटेच रहातात ..... मग आता तू नो थँक्यू चा रिप्लाय करणार की रिप्लाय करणारच नाही?" ....अंजली

"तेच कन्फ्युज होतंय. खरं सांगू, जर कोणी मला आधी सांगितलं असतं की चाळीशी येऊ घातली असताना मला असा "तुला विसरू शकत नाही" वाला मेसेज येईल तर मला वाटलं असतं की मला छान थोडं फ्लॅटर्ड वाटेल, अजूनही आपले चाहते आहेत म्हणून! पण इथे तर उलट मला का कोण जाणे गिल्टीच वाटतंय." ....मनस्वी.

"मनू, तू तिथे लंडनला रहा, जीन्स घाल नि काहीही कर. मनातून तू तीच सरळ साधी मनस्वी आहेस. हे गिल्टबिल्ट सोडून दे. सीता काही रावणाला टेम्प्ट करायला गेली नव्हती तरीही सीताहरण झालंच ना? पुरुषांच्या ढिल्या कॅरॅक्टरसाठी स्वतःला गिल्टी का वाटून घ्यायचं आपण? नात्यांमध्ये ऑनेस्ट राहणं महत्वाचं आहे. ते तर तू आणि ऋषी आहेत ना! मग गिल्ट कशाला !" ...... अंजली

"बरोबर आहे तुझं ! थँक्स फॉर टॉकिंग! बरं वाटलं बोलून. चल मी घरी पोहोचतेय . आता मुलं येऊन चिकटतील. नंतर बोलूया?"... मनस्वी

"हो शुअर " अंजलीने फोन ठेवला.

मनस्वी घरी शिरली. ऋषी ऑफिस मधून येताना मुलांना घेऊनच आला होता. एकदा घरात शिरल्यावर स्वप्नीलच्या मेसेजची आठवणही तिच्या मनातून हद्दपार झाली.

बँगलोरच्या ऑफिसमध्ये ओव्हर टाइम करत बसलेल्या स्वप्नीलने निघण्यापूर्वी पुन्हा एकदा आपला मोबाईल चेक केला. आधीच्या शेकडो वेळांप्रमाणे आता सुद्धा रिप्लाय आला नव्हता.

डाॅ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/2017/02/blog-post_27.html?m=1

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कार चालवत असताना इतकं बोलू शकतात का कोणी? बोलत असतील बुवा.

सुमीत's picture

7 Mar 2017 - 2:17 pm | सुमीत

नेमका प्रश्न विचारलात.
असो, कथे चा विषय वेगळाआणि काळा ला अनुसरून.
बाकी इंग्रजी शब्दांचा भडीमार कमी करा.

मुंबईमधले डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स अशाच इंग्रजीमिश्रित भाषेत बोलतात. जर शुद्ध मराठी करून लिहिलं असतं तर ते एका डॉक्टर आणि इंजिनीअरचं संभाषण वाटलंच नसतं . आणि हे मी स्वानुभवाने सांगू शकते.

गवि's picture

8 Mar 2017 - 11:23 am | गवि

सहमत.

संवाद वास्तव वाटणं गरजेचं असतं. शुद्ध मराठी पण विशिष्ट पात्रांच्या व्यक्तिमत्वाशी न जुळणारे शब्द वापरले तर विसंगत वाटू शकतं.

मराठी कथालेखक's picture

8 Mar 2017 - 12:22 pm | मराठी कथालेखक

मुंबईमधले डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स अशाच इंग्रजीमिश्रित भाषेत बोलतात.

मान्य, आणि मुंबाईच नव्हे तर अनेक शहरातले अनेक लोक (फक्त डॉक्टर , इंजिनिअरच नाहीत) अशा मिश्र भाषेत बोलतात. शुद्ध मराठीत संवाद लिहिलेत तर ते कृत्रिम वाटू शकतील हे मान्यच.
पण संवादाशिवायच्या इतर भागात म्हणजे कथनात इंग्लिश शब्द टाळता येवू शकतील का ते बघा.
उदा:

दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती

या ऐवजी "दोघीनाही घरी जाताना प्रवासात (किंवा गाडी चालवताना) एकमेकींना फोन करायची सवय होती"
तुमच्या या आधीच्या धाग्यावर मी अशाच अर्थाची प्रतिक्रिया दिली होती.

सुमीत's picture

8 Mar 2017 - 2:53 pm | सुमीत

मला नेमके हेच सुचवायचे होते, त्यामुळे लिहिले की इंग्रजीचा भडिमार कमी करा

सुमीत शिंदे
जन्माने मुंबईकर, आता ठाणेकर, सध्या डब्लिन
संगणक सुरक्षा सल्लागार

सुमीत तुमच्या प्रतिक्रियेचा सूर मला खोचक वाटला "हा हा हा .... नेमका प्रश्न विचारलात.....बाकी इंग्रजी शब्दांचा भडीमार कमी करा...." त्यामुळे उत्तरही तसंच दिलं .

आणि खरं सांगायचं तर तुमचा जन्म कुठला, सद्ध्या कुठे असता आणि हुद्दा काय यांच्याशी मला काहीही देणंघेणं नाही.

सुमीत's picture

14 Mar 2017 - 10:06 pm | सुमीत

आणि त्याची अपेक्षा पण नाही, बाकी सगळे सर सकट मुंबईतले डॉक्टर आणि इंजिनियर तुमच्याच भाषेत बोलत नाहीत. कळावे त्या साठी लिहिले मी कोण आणि काय करतो ते.

अनिरुद्ध.वैद्य's picture

7 Mar 2017 - 3:44 pm | अनिरुद्ध.वैद्य

आम्ही तर कॉन्फ कॉल पण करतो!

एस प्रवासात ब्लूटूथ वापरून फोन वर बोलू शकतो. विशेषतः मनस्वी सारख्या बाहेरच्या देशांमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रवासात सगळे फोन करून घ्यायची सवय असते कारण रस्त्यांवर मुंबई पुण्यासारखं ट्रॅफिक नसतं.

अच्छा! आणि अंजली कुठे राहते? मागच्या कथेतून ती भारतात पुण्या-मुंबईसारख्या शहरात राहते असं ध्वनित होतंय. हा प्रश्न विचारण्याचा उद्देश हा आहे की कथेच्या ओघात लिहितानाही कथेच्या बांधणीत काही कच्चे दुवे राहून जाता कामा नयेत. उदा. लंडनच्या वाहतुकीत मनस्वी अगदी निवांत गाडी चालवू शकत असेल तर ती किती वाजताची वेळ असेल आणि तेव्हा भारतात किती वाजले असतील आणि अंजली काय करत असेल, ह्या बारीकसारीक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. बाकी पुढील लेखनाला शुभेच्छा आहेतच. असो.

शुभेच्छांबद्दल धन्यवाद.

देश, वेळ यांचा विचार केला आहे. अंजली भारतात आहे. मनस्वी लंडनला आहे. म्हणून दोघींच्या वेळेत उन्हाळ्यात साडेचार किंवा हिवाळ्यात साडेपाच तासांचा फरक आहे. म्हणूनच अंजली रात्री सर्व आटपून निवांत असताना मनस्वीची संध्याकाळची कामावरून घरी जायची वेळ आहे .

गणामास्तर's picture

8 Mar 2017 - 3:04 pm | गणामास्तर

कार चालवत असताना इतकं बोलू शकतात का कोणी?

हो. .आरामात !

प्रीत-मोहर's picture

7 Mar 2017 - 1:55 pm | प्रीत-मोहर

आवडली गोष्ट.

जेपी's picture

7 Mar 2017 - 2:33 pm | जेपी

टेम्प्ट मंजे काय?

मराठी कथालेखक's picture

7 Mar 2017 - 3:52 pm | मराठी कथालेखक

सिड्युस :)

टेम्प्ट म्हणजे भुलवणं

छान लिहिलय. प्रॅक्टिकल संभाषण आणि चपखलही !

पैसा's picture

7 Mar 2017 - 7:10 pm | पैसा

छान लिहिलंय

प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार. बरच शिकायला मिळतं आहे.

प्राची अश्विनी's picture

8 Mar 2017 - 7:56 am | प्राची अश्विनी

छान लिहिलय. थोडे ईंग्रजी शब्द कमी करावेत असं मला वाटतं.

सपे-पुणे-३०'s picture

8 Mar 2017 - 10:19 am | सपे-पुणे-३०

ही भागसुद्धा आवडला .

गामा पैलवान's picture

11 Mar 2017 - 1:04 am | गामा पैलवान

aanandinee,

कथा चांगली आहे. आजून फुलवता आली असती. संवादात आणि इतरत्र इंग्रजी शब्द फार आहेत. पुढील लेखनास शुभेच्छा.

जाताजाता :

म्हणूनच अंजली रात्री सर्व आटपून निवांत असताना मनस्वीची संध्याकाळची कामावरून घरी जायची वेळ आहे .

लंडनला कचेरीतून परतणारे चाकरमानी वा व्यावसायिक सहसा स्वत:चं वाहन चालवंत नसतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (म्हणजे बस, भुयारी रेल्वे वा रेल्वे) वापरतात. कथा वस्तुस्थितीशी जुळावी म्हणून ही माहिती दिली आहे.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै. प्रतिक्रियेबद्दल आभार. मी स्वतः लंडनला राहिले आहे. आता अॅबर्डिनला असताना सुद्धा दर सुट्ट्यांमध्ये कुटुंबाच्या भेटीसाठी जात असते. माझ्या ओळखीतले बहुतेक सगळे लोक हे स्वतः ड्राईव्ह करतात. मी 'सेंट्रल' लंडन बद्दल लिहिलं नाहीये. तसंही मनस्वी एक्सॅक्टली परदेशाच्या कोणत्या भागात आहे याने कथेत काहीही फरक पडतो का! कथेचा विषय काय आणि प्रतिक्रियांचे विषय काय :)

आनद्न्दिनी तुझी कथा आवडली , खोच्क न भोच्क प्रतिक्रिया येत राहतीलच ;) त्याला फाट्यावर मारणे ;)
मुळात तुझी लिहिण्ञाची स्टाइल आवडली .जास्ती विचार क्रु नये लिहीत रहा शुभेच्छा :)

मनिमौ's picture

15 Mar 2017 - 12:25 pm | मनिमौ

ला मम म्हणते. कारण भोचक लोक रावण सीताहरण करायला आला तेव्हा श्रीलंकेहून नक्की किती वाजता निघाला यावर चर्चा करत बसतील.