उमेद

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
6 Oct 2008 - 6:12 am

जर तुझ्या जगात उलथापालथ होताना
कुणी तुझ्या हाकेला ओ दिलीच नाही,
तुला आधाराची नितांत गरज असताना
निसटत्या क्षणी मदत मिळालीच नाही,

कातरवेळी दूर जाणा‍र्‍या वाटेकडे पाहूनही
मायेचा स्पर्श करणारं कुणी आलंच नाही,
नजरेमध्ये गगनभरारीचं स्वप्न असताना
तुझ्या पंखांना कुणी जर बळ दिलंच नाही,

जर कधी झाकोळून गेलं निळं आभाळ सारं
तू भर दर्यात अन कधी बेईमान झालं वारं,
निरव एकाकी वाटेत तू अडखळत असताना
कुणीच नसेल बाजुला तुला आधार देणारं,

माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन
तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे
विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन
मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे

कविताविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

6 Oct 2008 - 6:21 am | मदनबाण

माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन
तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे
विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन
मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे
कविता आवडली रे...
अरे पण एव्हढ सुंदर लिहतोस आणि नाव फटू ?
काही तरी मस्त धिनच्याक नाव घे की रे...

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

पद्मश्री चित्रे's picture

6 Oct 2008 - 9:13 am | पद्मश्री चित्रे

किती छान ,आश्वासक लिहिलं आहेस...

प्रभाकर पेठकर's picture

6 Oct 2008 - 9:17 am | प्रभाकर पेठकर

विसरुन जा जिवलगा सार्‍या जगाला अन
मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे

क्या बात है| मस्त आहे कविता. अशा आधाराची गरज अनेकदा भासते.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

राघव's picture

7 Oct 2008 - 10:28 am | राघव

फार सुंदर लिहिलेत.
"..मनामध्ये नवी उमेद पुन्हा एकदा भरून घे" क्या बात है! बहोत खूब.
येऊ देत अजुन.
मुमुक्षु

अनिल हटेला's picture

7 Oct 2008 - 10:39 am | अनिल हटेला

मस्त च रे !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 3:04 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच रे...

माझ्या खांद्यावर विश्वासाने डोकं ठेव अन
तुझ्या आसवांना तू वाट मोकळी करुन दे

कधी येतो आहेस दुबईला? ऍट लीस्ट खांदा तरी पाठवून दे तुझा? ;)

बिपिन.

फटू's picture

8 Oct 2008 - 8:17 am | फटू

ना आम्हाला दुबईला येणं शक्य आहे ना आमचा खांदा पाठवणं...

आमच्या आधाराची गरज दुबईच्या लोकांपेक्षा अमेरिकेच्या लोकांना जास्त आहे... :D

(संगणक प्रणाली आधार विकासक)
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

घासू's picture

7 Oct 2008 - 6:52 pm | घासू

कोणीही सोबत नसेल तरी चालेल पण एक विश्वासाचा खा॑दा आणी उमेद हवीच. जबरदस्त मानल तुम्हाला

प्राजु's picture

7 Oct 2008 - 9:27 pm | प्राजु

कोई जब तुम्हारा हृदय तोडदे.. तडपता हुआ जब कोई छोडदे
तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा दर खुला है खुला ही रहेगा तुम्हारे लिये..
या मुकेश च्या गाण्याची आठवण झाली..
कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Oct 2008 - 11:59 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो...

बिपिन.