इ. स. १९६६ला अवतरली ही बाला ..
लागे पोस्टर्स चहूकडे अमूलचा बोलबाला
निळे केस, लाल गाल, पोलका डॉट फ्रॉक न भलीमोठी हेअरपिन,
गोडुली, बबली, छबिली, बिना नोजवाली ब्युटी क्वीन
क्रिकेट, सिनेमा, राजकारण, सीमा प्रश्न, युद्ध ..
अमूल गर्लच्या दोन ओळी वाचून येते हरपलेली शूद्ध
कधीकधी खुसखुशीत, कधीकधी गोड लाथा
अमूल गर्लच्या तोंडी आपल्या मनीच्या बाता
कधी खेळी, कधी कोपरखळी ..
कधी गंभीर, कधी खुळी ..
कधी काढे विकेट, कधी हाणें टोला
ज्वलंत मुद्द्यावर नेहमीच
विचार करण्याजोगा स्लोगन आला ..
कच्ची उमर की ये बच्ची कर चली साल पुरे पचास
अमूल गर्ल न तिचे टू-लाइनर्स सदैव आमच्यासाठी ख़ास
अरे ऐसा मस्का और कहा मिलेगा
जब तक हे अमूल, तब तक ये कारवाँ ऐसेही चलेगा
वेगवेगळे विषय न वेगवेगळ्या गेटअपमध्ये येई सदैव भेटीला
सगळ्यांनी किती किती जीव लावला ह्या छोटू नकटीला
छोटुश्या सखीला देऊ गुड़ गुड़ wishes ....
म्हणुनिया सारे जण "utterly butterly delicious……"
प्रतिक्रिया
8 Mar 2017 - 4:19 pm | इशा१२३
मस्त गोड कविता पियुडे!हि अटरली बटरली गर्ल आणि तिचे विषय नेहमीच आवडतात.
8 Mar 2017 - 4:24 pm | मनिमौ
आणी तिच्या कॅची टॅगलाईन्स. गरवारे शाळेजवळ लागणारा बोर्ड हमखास बघते मी
8 Mar 2017 - 10:43 pm | पद्मावति
अटरली बटरली ....अबसोल्यूटली गोडुली :)
कविता आवडली.
9 Mar 2017 - 3:57 pm | कविता१९७८
छान कविता गं, सगळ्यांची लहानपणीची सोबतीण अटरली बटरली गर्ल
9 Mar 2017 - 5:13 pm | नूतन सावंत
माझं वास्तव्य बऱ्याच ठिकाणी झालं,नेहमी अमूलच्या जाहिरातीचा बोर्ड कुठे लागतो याचीही बाजार,औषध दुकान अशा महत्वाच्या जीवनावश्यक जागांची चौकशी करताना व्हायची.
पियू खूप सुंदर कविता.अमूलच्या फेसबुक पेजवर टाक तिला.
बरीच वर्षे भारत दाभोळकर लिहित असे या ओळी.
9 Mar 2017 - 5:47 pm | पूर्वाविवेक
हि अटरली बटरली मला नेहमिच गोडुली वाटलीय.
लहान असताना आम्ही 'आटली बाटली फुटुली' असं काहीतरी बडबडायचो.
सुंदर कविता!
9 Mar 2017 - 5:53 pm | प्राची अश्विनी
:) छानच!
9 Mar 2017 - 6:22 pm | अभ्या..
स्लोगन आला नाही गं पिवडे, स्लोगन आली. आता टोल्याला यमक म्हणून आला झाले पण स्लोगन महिला असते. ;)
बाकी छान.
9 Mar 2017 - 6:27 pm | अजया
आपली पियुडी पण अशीच आहे. तिने अमूल गर्ल शोधली आश्चर्य नाही वाटलं!
9 Mar 2017 - 6:38 pm | रेवती
अमूल गर्ल व टू लाईनर्सबाबत सहमत.
10 Mar 2017 - 12:17 pm | सस्नेह
छान छोटुकली ...फोटोतली, कविता आणि कवियत्री !
..पळा आता, पिवशी यायच्या आत ..
11 Mar 2017 - 11:03 am | सविता००१
मस्तच गं पिवडे
11 Mar 2017 - 2:41 pm | Maharani
झक्कास पियु
11 Mar 2017 - 4:52 pm | मोनू
पियु,
कसली मस्त केली आहेस कविता. तुझ्यासारखीच चुलबुली आहे ती !
11 Mar 2017 - 9:11 pm | पैसा
गोग्गोड!
11 Mar 2017 - 9:27 pm | मोक्षदा
छान कविता
11 Mar 2017 - 9:28 pm | मोक्षदा
छान कविता
13 Mar 2017 - 8:13 pm | प्रीत-मोहर
पिवडे आवडली ग अमूल गर्ल आणि कवितापण :)
13 Mar 2017 - 8:15 pm | पिशी अबोली
अटरली बटरली देलिशियस कविता
17 Mar 2017 - 8:00 am | मदनबाण
ट्विटी, एकदम "चस्का मस्का" कविता ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We don't talk anymore, we don't talk anymore, We don't talk anymore, like we used to do... (feat. Selena Gomez) :- Charlie Puth [Official Video]
23 Mar 2017 - 2:16 pm | भुमी
खूप आवडली.
23 Mar 2017 - 9:42 pm | मितान
मस्त !
23 Mar 2017 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा
जिल्बुचाची ही जिब्ली वाचलीच नव्हती. ह्ही ह्ही . छान आहे.
समांतर- बायकू लांबून बगतीया मागून..आनी ल्येखाचं टायटल तिणं उतरलेली ब्याट्री वाचलन. खिक्ककन् हासलू म्या!
24 Mar 2017 - 8:39 pm | कंजूस
कविता चांगलीय.
( पण दाभोळकराने फार लांबवलीय जाहिरात॥ सगळे विनोद हिंग्लिश असतात)
24 Mar 2017 - 11:38 pm | स्वाती दिनेश
छान कविता, आवडली.
स्वाती