Skip to main content

Utterly Butterly

लेखक पियुशा
Published on बुधवार, 08/03/2017
.

इ. स. १९६६ला अवतरली ही बाला .. लागे पोस्टर्स चहूकडे अमूलचा बोलबाला

निळे केस, लाल गाल, पोलका डॉट फ्रॉक न भलीमोठी हेअरपिन, गोडुली, बबली, छबिली, बिना नोजवाली ब्युटी क्वीन

क्रिकेट, सिनेमा, राजकारण, सीमा प्रश्न, युद्ध .. अमूल गर्लच्या दोन ओळी वाचून येते हरपलेली शूद्ध

कधीकधी खुसखुशीत, कधीकधी गोड लाथा अमूल गर्लच्या तोंडी आपल्या मनीच्या बाता

कधी खेळी, कधी कोपरखळी .. कधी गंभीर, कधी खुळी ..

कधी काढे विकेट, कधी हाणें टोला ज्वलंत मुद्द्यावर नेहमीच विचार करण्याजोगा स्लोगन आला ..

कच्ची उमर की ये बच्ची कर चली साल पुरे पचास अमूल गर्ल न तिचे टू-लाइनर्स सदैव आमच्यासाठी ख़ास

अरे ऐसा मस्का और कहा मिलेगा जब तक हे अमूल, तब तक ये कारवाँ ऐसेही चलेगा

वेगवेगळे विषय न वेगवेगळ्या गेटअपमध्ये येई सदैव भेटीला सगळ्यांनी किती किती जीव लावला ह्या छोटू नकटीला

छोटुश्या सखीला देऊ गुड़ गुड़ wishes .... म्हणुनिया सारे जण "utterly butterly delicious……" .


वाचन संख्या 25962
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

आणी तिच्या कॅची टॅगलाईन्स. गरवारे शाळेजवळ लागणारा बोर्ड हमखास बघते मी

माझं वास्तव्य बऱ्याच ठिकाणी झालं,नेहमी अमूलच्या जाहिरातीचा बोर्ड कुठे लागतो याचीही बाजार,औषध दुकान अशा महत्वाच्या जीवनावश्यक जागांची चौकशी करताना व्हायची. पियू खूप सुंदर कविता.अमूलच्या फेसबुक पेजवर टाक तिला. बरीच वर्षे भारत दाभोळकर लिहित असे या ओळी.

हि अटरली बटरली मला नेहमिच गोडुली वाटलीय. लहान असताना आम्ही 'आटली बाटली फुटुली' असं काहीतरी बडबडायचो. सुंदर कविता!

स्लोगन आला ..
स्लोगन आला नाही गं पिवडे, स्लोगन आली. आता टोल्याला यमक म्हणून आला झाले पण स्लोगन महिला असते. ;) बाकी छान.

मस्तच गं पिवडे

पियु, कसली मस्त केली आहेस कविता. तुझ्यासारखीच चुलबुली आहे ती !

जिल्बुचाची ही जिब्ली वाचलीच नव्हती. ह्ही ह्ही . छान आहे. समांतर- बायकू लांबून बगतीया मागून..आनी ल्येखाचं टायटल तिणं उतरलेली ब्याट्री वाचलन.http://emojipedia-us.s3.amazonaws.com/cache/c5/06/c5063fc759491495452f6cbc3e4cedc5.png खिक्ककन् हासलू म्या!

कविता चांगलीय. ( पण दाभोळकराने फार लांबवलीय जाहिरात॥ सगळे विनोद हिंग्लिश असतात)

छान कविता, आवडली. स्वाती