"जीवन असं जगावं की नंतर पश्चाताप होऊ नये."

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
3 Oct 2008 - 11:03 pm

असाच मी एकदा सूट्टी घेऊन गोव्याला गेलो होतो.गोव्याच्या समुद्राच्या किनारपट्टीवर अनेक छोटी छोटी घरं आहेत.एक घर भाड्याने घेऊन मी थोडे दिवस राहत होतो.आमच्या बाजूच्या घरात एक जोडपं असंच काही दिवस मजेत घालवण्यासाठी येऊन राहिलं होतं.सुरवातीला आम्ही सकाळीच ऊठून समुद्र किना‌र्‍यावर फिरायला म्हणून जात होतो.सकाळीच कोळ्यांच्या मासे जाळ्यात पकडून टोपल्या भरभरून आणणार्‍या मोठ्या होड्या किनार्‍यावर आल्यावर कुतुहल म्हणून निरनीराळ्या प्रकारचे मासे निवडून आणलेल्या टोपल्यामधून आम्हाला हवे ते मासे त्यांच्याकडून विकत घेऊन दुपारच्या जेवणाला त्याचा उपयोग करायचो.ताज्या मास्यांची चव निराळीच असते.त्यामुळे रोज मासे खायची चटकच लागली होती.

आमचे शेजारी सुद्धा हळू हळू आमच्याच बरोबर सकाळीच ऊठून आम्हाला त्यांची कंपनी द्दायला लागले.त्यानाही मासे खाण्यात दिलचस्पी होती. त्यामुळे त्यांची आमची चांगलीच गट्टी जमली होती.हे आमचं शेजारचं जोडपं आमच्या नंतर आणखी काही दिवस गोव्याला राहाणार होतं.
अधिक चौकशी केल्यावर कळलं की त्यांच्या पत्नीला गोवं खूपच आवडायला लागल्याने त्यानी त्यांचा मुक्काम आणखी वाढवला होता. ते जवळपास आमच्या बरोबरच जायला निघणार होते.पण आता त्यानी विचार बदलला होता.बोलता बोलता कळलं की त्यांच्या बायकोला सर्विकल कॅनसरचा आजार झाला असून तिचा तो टर्मिनल आजार होता.हे ऐकून मला खूपच वाईट वाटलं.

गोवा सोडून परत निघण्यापूर्वी एकदा असेच आम्ही संध्याकाळी किनार्‍यावर त्यांच्या बरोबर फिरायला गेलो होतो.पौर्णिमेचा तो दिवस होता.समुद्राच्या फेसाळ लाटावर चंद्राचा प्रकाश पडून त्या जास्तच फेसाळलेल्या दिसत होत्या.थंड वारा पण आल्हादायक वातावरणात भर घालत होता.चालून चालून थोडे पाय दमले म्हणून जवळच वाळूत बसून गप्पा मारत होतो.
बोलता बोलता त्यांची पत्नी म्हणाली,
"माझ्या लहानपणी मला आठवतं माझी आई बरेच वेळा म्हणायची,
"जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये.
सदा सर्वदा प्रत्येकजण मरत असतो आणि जगत असतो.तुमचा काय अनुभव आहे ह्याचं यतार्थ चित्र तुम्ही तुमच्या मनात तयार केलं पाहिजे.तुमच्या बुद्धिमतेपूर्वक तुम्ही निवड केली पाहिजे."
ती तशीच जगली.ती एका प्रसिद्ध मुलींच्या शाळेची प्रिन्सीपॉल होती.खेळाच्या दुनियेत तिनं नांव कमावलेलं होतं.आणि तिन सुदृढ मुलीना जन्म देऊन माझ्या वडीलाना संसारात मदत करून एका खेड्यात निवृतीच्या दिवसात लागणारं छोटसं घर बांधण्यात मदत करूं शकली.तिला हवं ते ती निमूटपणे करून आणि वयाच्या पंचायशी वर्षावर शांतिने निर्वतली.

पश्चाताप न होता आयुष्य़ जगणं हा मला तिच्याकडून मिळालेला धडा होता.मी माझ्या शिक्षणासाठी पैनपै जमवून शिकले आणि देशात जमेल तिथे प्रवास केला.चांगलं कार्य समजून समाजात जमेल तेव्हडी सेवा केली.पंचवीस वर्षाच्या माझ्या करियर मधे मी बर्‍याच मुलीना शिकवलं.
मी आणि माझ्या पतिने तिन मुलांच व्यवस्थित संगोपन केलं.आणि पाच नातवंडाच्या सहवासात आनंदाने जीवन कंठित आहो.
मी मला नशिबवान समजते की माझ्या पतिने मला माझ्या मर्जीचं जीवन जगायला संपूर्ण मूभा दिली.
मला आणखी शिक्षण मिळावं म्हणून त्याने घर संभाळून मदतीसाठी खूप धडपड केली.

अलीकडे एकाएकी माझ्या पोटात वेदाना येऊन खूप दूखू लागलं.आणि त्याचं निदान काढलं गेलं की मला सर्विकल कॅन्सर झाला आहे.त्याच्यावर उपाय म्हणून औषध उपचार केले गेले. मला डॉक्टर म्हणाले की मी जेमतेम एक वर्ष काढीन.पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते.

माझ्या जीवनावर माझा विश्वास आहे.कदाचीत एकवेळ अशी येईल-बहूदा डॉक्टरांच्या भाकिताच्या पलिकडे जाऊन-ज्यामुळे मला जगताना अत्यानंद व्ह्यायचा तो आनंद कमी होईल.त्यानंतर मात्र माझ्या आई सारखं मी करीन.माझ्या कुटूंबाबरोबरच्या माझ्या आठवणी मी ताज्या करीन.
आणि जो ऐकील त्याला मी सांगेन,
"जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये"

किनार्‍यावर एव्हाना खूप काळोख झाला होता.पण चंद्राच्या शितल चांदण्यात आणि त्या थंड वार्‍याच्या
वातावरणात त्यांच्या पत्नीची ही कथा ऐकून माझं मन खूपच उदास झालं .परंतु उद्दा सकाळीच मी गोवं सोडून परत जाणार असल्याने,त्यांची कंपनी पण सोडवत नव्हती.पण काय करणार कुठतरी थांबावं लागतच.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

3 Oct 2008 - 11:34 pm | सुचेल तसं

सामंतकाका,

तुमच्याकडे काय जादूची पोतडी आहे का हो? रोज एक नवीन गोष्ट सांगता..........

छान!!! keep it up.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Oct 2008 - 12:27 am | श्रीकृष्ण सामंत

ह्रषिकेश,
तुझ्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
खरंच तुला असं वाटणं स्वाभाविक आहे.पण खरं सागू का,इतक्या वर्षाच्या अनुभवाची पोतडी,केलेलं वाचन,करीत असलेलं वाचन,विविध विषय घेऊन लिहिण्याची जीद्द,भरपूर वेळ,तुम्हा मायबाप वाचकांच्या प्रतिक्रियेने मिळणारी प्रेरणा,मिसळपावावरचे चोखंदळ, मोठ्या मनाचा वाचक समुह,तात्यारावांची कृपादृष्टी,त्यांच्या लेखनस्वातंत्र्याची मुभा, संगणकाच्या सुलभ सोयी,अंतरजालाची आणि ब्लॉग- स्फिअरची क्रांती,आणि अल्लाची मर्जी ह्याचं मेतकूट जमलं असल्याने हे होत आहे.
बघूया,घडता घडता घडेल ते घडेल.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

विसोबा खेचर's picture

4 Oct 2008 - 12:41 am | विसोबा खेचर

पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते.

क्या बात है! जियो....

तात्या.

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Oct 2008 - 1:16 am | श्रीकृष्ण सामंत

तात्याराव,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मदनबाण's picture

4 Oct 2008 - 4:06 am | मदनबाण

"जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये"

अगदी खरं आहे,,असंच जगता आल पाहिजे...

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

शितल's picture

4 Oct 2008 - 7:44 am | शितल

तुमचे लेख वाचले की असे वाटते लहान पणी आजोबा कसे गोष्टी सांगायचे नेहमी वेगळी त्याची आठवण येते. :)

"जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये"

हे अगदी खरे आहे.

मी ही मा़झ्या जवळच्यांना सांगते कोणत्याही क्षणी मरण आले तरी कशातच इच्छा राहता कामा नये असे जगावे.
:)

प्रमोद देव's picture

4 Oct 2008 - 1:15 pm | प्रमोद देव

दिसायला अतिशय साधं आणि सोपं तत्वज्ञान आहे. आवडलं.
मात्र सगळ्यांनाच जमायला कठीण आहे.
सामंतसाहेब अगदी नेटक्या शब्दात मांडलंय तुम्ही हे सगळं. अभिनंदन!

प्रकाश घाटपांडे's picture

4 Oct 2008 - 6:28 pm | प्रकाश घाटपांडे

मला डॉ सुनंदा / अनिता अवचट यांची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे

श्रीकृष्ण सामंत's picture

4 Oct 2008 - 11:31 pm | श्रीकृष्ण सामंत

मदनबाण, शितल, प्रमोद देव, प्रकाश घाटपांडे,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

ब्रिटिश's picture

5 Oct 2008 - 11:38 am | ब्रिटिश

जल्ला क भारी लीवलाय र आजूस !
दीसभरचे कामान आवरा येल कस भेटतं तूला ?

तुजी परतीभा, तुजी ईविधता, तुज नालेज, तुजे लेकनाचा येग ह्ये सगल्यांस लाक लाक सलाम

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

श्रीकृष्ण सामंत's picture

5 Oct 2008 - 9:19 pm | श्रीकृष्ण सामंत

आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मृदुला's picture

5 Oct 2008 - 10:04 pm | मृदुला

लेख आवडला.

यशोधरा's picture

5 Oct 2008 - 10:06 pm | यशोधरा

खूप आवडला हा लेख.

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Oct 2008 - 10:43 am | श्रीकृष्ण सामंत

मृदुला,यशोधरा,
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

गिरीश's picture

6 Oct 2008 - 3:00 pm | गिरीश

सहि आह्वे ...राव

केवळ_विशेष's picture

6 Oct 2008 - 4:35 pm | केवळ_विशेष

आ.सामंतकाका,

नेहमी तुमचे लेख वाचतो...
तुमच्याकडे काय जादूची पोतडी आहे का हो? रोज एक नवीन गोष्ट सांगता..........

सहमत!

माफ करा काका...एवढ्याचसाठी की, इतक्या चांगल्या गोष्टी वाचूनही आज पहिल्यांदाच प्रतिसाद लिहितोय...राग मानू नका.

असेच लिहित रहा...

धन्यवाद!

श्रीकृष्ण सामंत's picture

6 Oct 2008 - 7:36 pm | श्रीकृष्ण सामंत

गिरीश,विशेष,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com