माणूस

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
4 Feb 2017 - 8:16 pm

(हि गझल मला पूर्वी डिसेंबरच्या महिन्यात इथे टाकल्यासारखी वाटतेय. पण आता कुठेच सापडत नाहीये मिपावर त्यामुळे गोंधळलोय. पुनरावृत्ती होत असल्यास कृपया कुठली तरी एकच प्रत ठेवावी ही संपादक मंडळाला विनंती.)

माणसांना बदलण्याला वेळ कोठे लागतो ?
बदलण्याने काळ ही माणूस कोठे बदलतो?

नित्य येथे हातघाई अन लढाई प्राक्तनी
हारण्याचे लाख रस्ते, रोज आता शोधतो

भाकरीचे शोधताना चंद्र रस्ता हरवला
वाटमारी जीवनाची कोण येथे टाळतो ?

पोर कोणाची गुलाबी स्वप्न विकते हासुनी
नजर चुकवुन रोज मी ही काच का हो चढवतो?

पाठ थोपटते कुणीसे, लाज मग धिक्कारते
ओढुनी पडदे मनाचे मी स्वतःला शोधतो !

विशाल कुलकर्णी ...

मराठी गझलगझल

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Feb 2017 - 5:25 pm | पैसा

मला मिपावर वाचलेली आठवत नाही. सुंदर गझल आहे!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2017 - 9:37 pm | अत्रुप्त आत्मा

@

पाठ थोपटते कुणीसे, लाज मग धिक्कारते
ओढुनी पडदे मनाचे मी स्वतःला शोधतो !

››› बहुत भा गया ये|

रातराणी's picture

6 Feb 2017 - 12:36 pm | रातराणी

सुरेख! वाचलेली आठवतेय. डिसेंबरमध्ये मिपा डाऊन झालं होतं तेव्हा कोणत्यातरी एका आठवड्यात आलेलं सगळं लेखन स्वाहा झालेलं. त्यात ही गझलपण असावी..

विशाल कुलकर्णी's picture

6 Feb 2017 - 1:03 pm | विशाल कुलकर्णी

बहुतेक, तेव्हाच झाले असावे.

विशाल कुलकर्णी's picture

6 Feb 2017 - 1:03 pm | विशाल कुलकर्णी

धन्यवाद :)