स्पर्श वेडे चांदव्यात रूतलेले
खुळ्या अंबरी भाव फुललेले
गेले ढळलेल्या टिपूर रानातूनी
कवडसे गुंतवीत शुभ्र घाटातूनी
शीळ घालीत पवनाच्या दारी
सुरांनी विणली नक्षी त्यावरी
झाकले आभाळ उधाणलेल्या तिमिरातूनी
किलबिल्या रात्री मोकाट फिरूनी
डोळ्यांत बिलगणारे ते काजळनाते
हसूनिया हे ह्रदयातूनी गाते
चांदण्यात उतरूनी आला मुलूख
सुटे गुंता नसे चांदणे नसे तिमिर
नक्षत्रे सारी फिकी ते तुझे चंद्रमुख