अंगणातील जाई हरवली सुगंधात
लोटूनी भय ये तू क्षणात
पांघरली कुसूमांनी रात्र काजळी
शहारतो गारवा राहूनी वल्लरीत
कोवळे चांदणे पानापानांत उतरले
लहरतो चांदवा पाहूनी जलात
चोरपाऊलांच्या मार्गातील धुंद झाली रेती
लाजिरे गुलाब हसले मोरपिसात
नजरेचे म्रूग लागले दौडू
सजे माणिक हिरव्या त्रूणात
ये सामोरी कर दूर चलबिचल
पायघड्या ठेवूनी उभा मी परसात
अधीर डोळ्यांत डुले काजवा
भिजू दे निशा दिव्य तुझ्या सहवासात