* महामानव गांधी*

अनिरुद्धशेटे's picture
अनिरुद्धशेटे in जे न देखे रवी...
2 Oct 2008 - 3:01 pm

* महामानव गांधी*

स्वतसाठी नसलेल स्वप्न महात्म्याने पाहिल,
सामान्यांच्या स्वप्नात नसलेल स्वातत्र्य महात्म्याने आणल !

बाबा तुझ्या या देशात
लोकशाहीची पाळ्मुळं घट्ट आहेत अजुन,
मात्र, मेळघाटातल्या आदिवासींना
स्वातंत्र्य कशाशी खातात हे , माहित नाही अजुन !

तुझ्यावर इतके प्रेम या लोकांचे
तुझ्या जन्मदिवशी ठेवलाय यांनी ड्राय डे,
बहुतेकांचा असतो याच दिवशी
पहिला-वहिला 'ट्राय डे'

बाबा सान्गु नकोस कुणाला
तुला म्हणुन सांगतो ,
पण इतर दिवसांच्या पेक्षा
ड्राय डे च्या दिवशी बाट्ल्यांचा खच जास्त असतो !

घेतील काही लोक जेव्हा
असत्य व हिंसेचा वसा,
तेव्हा दोनच तत्वे सर्वांना दिसतील
ती म्हणजे सत्य अहिंसा !

अनिरुद्ध

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Oct 2008 - 4:53 pm | विसोबा खेचर

तुझ्यावर इतके प्रेम या लोकांचे
तुझ्या जन्मदिवशी ठेवलाय यांनी ड्राय डे,

ड्राय डे ही संकल्पनाच मुळात अन्यायकारक आहे. एखाद्या बारमध्ये जाऊन निवांतपणे दोन पेग प्यायच्या जनतेच्या हक्कावर हे गदा आणण्यासारखे आहे. मी 'ड्राय डे' या अन्यायकारक संकल्पनेचा निषेध करतो...

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2008 - 5:16 pm | प्रभाकर पेठकर

मी 'ड्राय डे' या अन्यायकारक संकल्पनेचा निषेध करतो...
निषेधास माझे अनुमोदन आहे.
गांधीजी नॉन्व्हेजही खात नव्हते (म्हणे..) मग मटणाची आणि कोंबड्यांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी का देते सरकार?

गांधी जयंतीला शेळीचे दूध, शाकाहारी मिताआहार आणि नेसूचे सूती वस्त्र (पुरूषांसाठी फक्त कमरेलाच) अशी सक्ती पाहिजे, तरच त्या महात्म्याचा काहीतरी आदर ठेवल्यासारखे होईल. (त्यांची तत्वे नाही पाळली तरी चालतील).

१.५ शहाणा's picture

2 Oct 2008 - 5:44 pm | १.५ शहाणा

ड्राय डे च्या दिवशी पिण्याची मजा काही औरच

इनोबा म्हणे's picture

2 Oct 2008 - 5:57 pm | इनोबा म्हणे

गांधी जर महामानव आहेत तर,त्यांच्याच अहिंसावादी विचारसारणीचा आदर ठेवत सिमेवरचे सैन्य माघारी बोलवा. पाकिस्तान बरोबरचा तंटा आपण अहिंसा आणि प्रेमाच्या जोरावरच मिटवूया. चलनी नोटांवरचा आणि नाण्यांवरचा गांधींचा फोटो ही काढून टाका, कारण याच पैशापायी सर्वात जास्त हिंसा होते.

(सावरकरवादी) -इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

टारझन's picture

2 Oct 2008 - 7:41 pm | टारझन

गांधी जर महामानव आहेत तर,त्यांच्याच अहिंसावादी विचारसारणीचा आदर ठेवत सिमेवरचे सैन्य माघारी बोलवा. पाकिस्तान बरोबरचा तंटा आपण अहिंसा आणि प्रेमाच्या जोरावरच मिटवूया. चलनी नोटांवरचा आणि नाण्यांवरचा गांधींचा फोटो ही काढून टाका, कारण याच पैशापायी सर्वात जास्त हिंसा होते.
=D>
टाळ्या .. आणि एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. बाकी मला भारतिय चलन केवळ त्या फोटू मुळेच आवडत नाही. :)
चलनावर कसे कत्रिना , आयेशा टाकियांचे फोटो हवेत. असो ...

नथु गोडसे झिंदाबाद
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

टारझनशी सहमत... पूर्णपणे....

भारताला स्वातंत्र्य गांधीजींमुळे मिळाले...
असे लहानपणापासून पुस्तकात आम्हाला शिकवले गेले....

पण आपल्या देशाचे दोन तुकडे (आणि कधीही न बरी होणारी अश्वत्थाम्याची जखमसुद्धा) समस्त भारतवासियांना देण्यासाठी हाच "महामानव" जबाबदार आहे हे कोणीही विसरु शकत नाही...

मी हिंसेचे समर्थन करीत नाही. पण स्वतःचा बचाव ही हिंसा होऊ शकत नाही...
२ ऑक्टोबर ला या 'महात्म्या' ला वंदन करणे कोणी विसरत नाही.
पण लो.टिळक, हुतात्मा भगतसिंग, नेताजी, सारख्या लाखो क्रांतीकारकांना हे काँग्रेसी सरकार हेतुपुरस्सर विसरते... (मला वाटते २८ सप्टेंबर ला नुकतीच हुतात्मा भगतसिंग यांची १०१ वी जयंती साजरी झाली, पण हे कोठेही जाणवले नाही...)

प्रत्येकात गुण असतात तसेच अवगुणही असतात, पण गांधीजींनी फाळणीला संमती दिली आणि लाखोंची कत्तल झाली. तेव्हा या महात्म्याला हातचे राखूनच नमन.....

(अहिंसेच्या शक्तीने देशाला स्वातंत्र्य मिळाले यावर विश्वास न ठेवणारा) - सागर

सचिन जाधव's picture

2 Oct 2008 - 7:21 pm | सचिन जाधव

नमस्कार,आण्या
कवीता छान आहे.....पण ड्राय डे चा निशेध का बर????????
तुझ्या द्रुष्टी ने तु पाहतो आहेस्.......जरा ईतरान्च्या द्रुष्टितुनहि पहायला हव............
असो ,,,,,,,प्रेमाच्या कविता येवुदेत कि लेका..............

प्राजु's picture

2 Oct 2008 - 9:09 pm | प्राजु

पण.. याबाबतीत मी न बोलणंच चांगलं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिरुद्धशेटे's picture

3 Oct 2008 - 7:53 pm | अनिरुद्धशेटे

शुभसंध्या,

अतिपरिचयात अवज्ञा,
सततगमनामुळे अनादर हो,
भिल्लांगना मलयीच्या त्या,
योजिती इंधनार्थ चंदन हो !

महात्मा गांधी यांच्या ऐकीव माहितीवर व त्यांच्यावर केलेली टीका या अनुशंगाने आपण वरील प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. परंतु वरील सुभाषीताप्रमाणे आपणास देशासाठी चंदनाप्रमाणे झिजलेल्या महात्मा गांधी या महामानवाची खरी ओळख नाही.
मी आपणास प्रांजळ्पणे सुचवितो की , त्यासाठी आपण वि.स.वाळिंबे यांचे सत्तावन्न ते सत्तेचाळीस आणि गं.बा. सरदार यांचे गांधी आणि आंबेडकर ही पुस्तके वाचावीत.
कविता वाचल्याबद्दल धन्यवाद !
आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल शतशः धन्यवाद !

अनिरुद्ध

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2008 - 10:45 pm | प्रभाकर पेठकर

आपणास देशासाठी चंदनाप्रमाणे झिजलेल्या महात्मा गांधी या महामानवाची खरी ओळख नाही.

काव्य करू शकणार्‍या संवेदनशील माणसाचे वरील एकांगी विचार वाचून वाईट वाटले. गांधीजींबद्दल तुम्हाला आदर वाटणे हा जितका तुमचा हक्क आहे तितकाच त्यांच्या बद्दल प्रतिकुल मते असणे हाही विरोधकांचा हक्क आहे. जर तुम्हाला गांधीजी खरोखर कळले आहेत असे वाटत असेल तर त्यांच्या विरोधकांनी लिहिलेली पुस्तकेही वाचा, त्यांचे विचारही समजून घ्या.

नेताजी सुभाषचंद्र बोसांवरील 'महानायक', टिळकांवरील 'दुर्दम्य', गोपाळ गोडसेंचे 'गांधी हत्या आणि मी' (एखादे मनुष्य स्वभावाचे विश्लेषण करणारे पुस्तक) इत्यादी पुस्तकांमधून समग्र गांधी डोळ्यासमोर उभे राहतील.

मी गांधीजींना खलनायक मानत नाही. पण महात्माही मानत नाही. त्यांच्या जनजागृती आंदोलनाचा स्वातंत्र्य लढ्यातील प्रभाव मी नाकारत नाही. ते एक मुत्सद्दी राजकारणी होते हे नि:संशय. त्यांच्या सर्व सद्गुणांचा, सद्आचारांचा मी आदर करतो पण म्हणून चुकांकडे दुर्लक्ष्य करू शकत नाही. त्या चुकांमुळे जर कोणाला त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील निगेटीव्ह छटा प्रखरतेने जाणवल्या असतील तर, 'त्यांना गांधी कळलेच नाहीत' असे म्हणणे निरोगी चर्चेला बगल देऊन 'मला समजले तेच खरे गांधी' असा अट्टाहास (गांधीजींप्रमाणेच) चालविणे गांधीवादास पोषक आहे का?

अजूनही मी म्हणेन गांधीजींवरील जितकी शक्य होतील तितकी पुस्तके वाचून जर मला माझे मत बदलता आले तर आवडेलच.

माझ्या प्रतिसादात, गांधीजींवर नाही तर आजकालच्या आपमतलबी सरकारवर टिका आहे.

गांधीजी नॉन्व्हेजही खात नव्हते (म्हणे..) मग मटणाची आणि कोंबड्यांची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी का देते सरकार?

गांधी जयंतीला शेळीचे दूध, शाकाहारी मिताआहार आणि नेसूचे सूती वस्त्र (पुरूषांसाठी फक्त कमरेलाच) अशी सक्ती पाहिजे, तरच त्या महात्म्याचा काहीतरी आदर ठेवल्यासारखे होईल. (त्यांची तत्वे नाही पाळली तरी चालतील).

हा माझा प्रतिसाद मी इथे मुद्दाम तुमच्या संदर्भासाठी दिला आहे.
»

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

अनिरुद्धशेटे's picture

4 Oct 2008 - 11:07 am | अनिरुद्धशेटे

नमस्कार,
प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असु शकतात. पण
माझ्या प्रतिसादात, गांधीजींवर नाही तर आजकालच्या आपमतलबी सरकारवर टिका आहे.
=>यातच सर्व काही आले आहे.

अनिरुद्ध

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2008 - 4:20 pm | प्रभाकर पेठकर

????