पहाट धुके २

Pradip kale's picture
Pradip kale in जे न देखे रवी...
11 Jan 2017 - 6:42 pm

नमस्कार. हि माझी दुसरी कविता. माझ्या पहिल्या कवितेचे नाव देखील पहाट धुके हेच होतं. दोन्ही कवितां मधे काहीही फरक नाही. फक्त शब्दरचनेत बदल आहे. फरकच नाही तर मग हि कविता लिहली कशासाठी असेहि वाटु शकते. तर निसर्गाचे अनेक अवतार आहेत, कधी शांत वाटनारा निसर्ग अचानक रौद्र रूप घेतो तर कधी इतका रम्य वाटतो की आपण याच्या प्रेमात पडतो. आणि अशा रम्य क्षणांच कितीही वर्णन केले तरी कमीच आहे. पहाटेची वेळ ही अशाच क्षणाच उदाहरण. शांत वारा, बोचरी थंडी आणि धुक्याची चादर खुपच सुंदर दृश्य, त्याच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. अलीकडे असे क्षण खुपच कमी अनुभवायला मिळतात, आणि तेच क्षण जर शब्दांमध्ये गुंफुन कविता केली तर ती वाचताना जो एक फिल येतो ना, की स्वत: तो क्षण अनुभवल्या सारखे वाटते. पुर्वी चौथीच्या अभ्यासक्रमात भा.रा.तांबेंची "सायंकाळची शोभा" या नावाची एक कविता होती. तीची सुरवात अशी होती,

"पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दुर"

या कवितेत सायंकाळच्या प्रसंगाच खुपच सुंदर वर्णन आहे. तशीच दामोदर अच्युत कारे यांची "झुळुक" ही कविता. या कविता आजही लक्षात राहतात. त्या वाचताना एक वेगळीच मजा येते. या कवितांपुढे माझी ही कविता म्हणजे काहीच नाही. तरीही ते क्षण टिपण्याचा हा एक प्रयत्न.
धन्यवाद.

पहाट धुके २

धुंद सकाळी काढत वाट
चालत होतो धुक्यात
गर्द धुके हे जणु उतरले
आकाशीचे नभ वनात

शुभ्र धुक्याचे जाळे पसरले
मोहुनी गेली पहाट
पाहण्या हा सोहळा धुक्याचा
पाखरांची गर्दी दाट

किलबील किलबील गाऊ लागली
पाखरे मिळुनी सुरात
वनराईच्या देखाव्याने
भुलुनी गेलो सुखात

दवबिंदुच्या अोलाव्याने
भिजुनी गेली पहाट
किती नयनरम्य हा
दिसे निसर्गाचा थाट

दाट धुक्यातुन शोधीत आली
सुर्यकिरण हीे आपुली वाट
आनंदाची सकाळ घेऊन
आली धुक्याची पहाट.

कधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीहिरवाईकविता