I Miss My King!!

बाजीप्रभू's picture
बाजीप्रभू in जनातलं, मनातलं
10 Jan 2017 - 7:23 pm

खाs वोरा पुथा चाओ,
आव मनो लय सिरा क्रान,
नोप फ्रा फुमि बान बुन्यडीरेक.

"थाई रॉयल अँथम" च्या ह्या सुरवातीच्या ओळी. या ओळींचा अर्थ असा होतो कि "हे महान राजा आम्ही तुझे नोकर/सेवक आहोत, आम्ही झुकून, मनापासून आदरपूर्वक तुला आणि तुझ्यातल्या अमर्याद गुणवत्तेला नमन करतो". अँथममधे पुढे बरंच काही चक्री साम्राज्याच्या स्तुतीपर लिहिलं गेलेले आहे. थाई राष्ट्रगीत रोज सकाळी ८ आणि संध्याकाळी ६ वाजता प्रसारित होते तर वरील "रॉयल अँथम" सिनेमागृहांत, सार्वजनिक कार्यक्रमांच्या सुरवातीला आणि खेळ सुरु होण्यापूर्वी म्हटली जाते.

आपल्या भारतासारख्या "फ्रिडम ऑफ स्पीच"चा अतिरेक झालेल्या देशाच्या राष्ट्रगीतात अश्या काही ओळी असत्या तर कपाळावर "आठ्या" पडल्या असत्या. जेएनयु सारख्या विद्यापीठात घोषणाबाजी झाली असती आणि NDTV वर रात्री-बेरात्री अव्हेलेबल असणाऱ्या बुद्धिजीवी मंडळीनीं या असल्या गुलामगिरी विरोधात वैचारिक किस पाडला असता. असो,

थायलंडसारख्या बऱ्यापैकी व्यक्ती स्वातंत्र्य असलेल्या पुढारलेल्या देशात याबद्दल विरोध मला कधीच ऐकू आला नाही याचं कारण अगदी सोप्प आहे. वरील सगळ्या ओळी तुम्ही "देवासाठी, प्रभू रामचंद्रांसाठी" गाताय असं इम्यॅजीन करा मग स्वर कसे हृदयातून निघतात कि नाही हे स्वतःच पहा. थाई मंडळींचं अगदी तसंच आहे. राजे "भूमिबोल अतुल्यतेज" (थाई अपभ्रंश "अदुल्यदेज") अर्थात "रामा नववे" यांना देवाचा दर्जा दिलेला आहे. तब्ब्ल ७० वर्षे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा जाणता राजा "१३ ऑक्टोबर २०१६" रोजी, वयाच्या ८८ व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेला आणि अख्खा थायलंड शोकसागरात बुडाला. आताची तरुण पिढी आणि सत्तरीच्या आसपास असलेल्या जनतेला जन्मापासूनच "भूमिबोल" हा एकच राजा आणि राज्य करण्याची त्याची पध्दत माहित आहे. पूर्वींच्या राजांबद्दल ते फक्त तुमच्या आमच्या सारखं ऐकून, वाचून आहेत. राजे भूमिबोल यांच्या पश्चात नवीनच राज्याभिषेक झालेले त्यांचे पुत्र "वजिरालोंगक्रोन" यांना राज्यकारभार पहातांना "भूमिबोल" यांच्याशी होणाऱ्या तुलनेचं प्रचंड दडपण इथल्या स्थानिक बातम्यांत दिसून येतं.

माझ्यासारख्या त्रयस्थ फॉरेनरला या सगळ्यांशी खरंतर काही देणं घेणं नाही. शक्य तितके पैसे छापायचे आणि मायदेशी परतायचं या एककलमी ऑब्जेक्टिव्हने आलेल्या मला जवळपास प्रत्येक घरा-घरांत, अस्थापनांत, रेस्टॉरंटमधे राजा-राणीचा फोटो पाहून आश्चर्य वाटायचं. राजाच्या फोटोला मिशी काढणाऱ्या एका जर्मन टुरिस्टला २५ वर्षे सक्त मजुरी, एका थाई कामगाराला राजाच्या आवडत्या पाळीव कुत्र्याबद्दल केलेल्या कडवट कमेंटबद्दल ३७ वर्षांची शिक्षा, यासारख्या बातम्या वाचल्यानंतर इथली लोकं दहशतीमुळे तर "जयजयकार" करत नसतील ना? हा प्रश्न मला नेहमी पडायचा.
राजे भूमिबोल यांच्याबद्दल असलेली पुस्तकं, आंतरजालावरील माहिती, त्यांचं कार्य, राज्य करण्याची पद्धत, जनसंपर्क, आंतरराष्ट्रीय योगदान, टीव्हीवरील बातम्या, अगदी खाजगीत, दारूच्या नशेत असलेल्या थाई स्टाफशी केलेल्या राजाबद्दलच्या चर्चे नंतर उत्तरोत्तर माझा "दहशती" बद्दल असलेला कयास बदलू लागला. आंतरराष्ट्रीय राजकारणात "अजात शत्रू" अशी थाई देशाची प्रतिमा निर्माण करणारा हा राजा जनतेला दहशतीखाली ठेवेल का? उत्तर नाही असंच येतं. थाई जनता अगदी दिलोजानसे राजावर प्रेम करतात, राजकीय उलथापालथीच्या प्रसंगात त्यांच्या शब्दाचा आदर करतात. मात्र जेएनयुतल्या "उमर खलिद" सारख्या विंचवांची नांगी वेळीच ठेचावी यासाठी काही "रॉयल डीफेमेशन लॉ" कठोर बनवलेले आहेत.

दुसऱ्या महायुद्धात आपल्या मुसद्दीगिरीने थाई देशाला युद्धापासून तटस्थ ठेवणारा, देशाला आधुनिकतेकडे घेऊन जाणारा, खेडोपाडी जाऊन विकास कामांवर जातीने लक्ष ठेवणारा आणि काळाची गरज पाहून यॊग्यवेळी सत्ता जनतेच्या हाती सोपवणारा, पण वेळ पडल्यास आपल्या घटनादत्त अधिकाराच्या चाकोरीत राहून अतिशय सभ्यपणे हस्तक्षेप करणाऱ्या या जाणत्या राजाचा फोटो माझ्याही घरातल्या भिंतीवर कधी आला हे माझं मलाच आठवत नाही. एखादा/एखादिचा सलमानखान फेवरेट असतो, कुणी मायकल जॅक्सनचा डायहार्ट फॅन असतो तर कुणाला नेल्सन मंडेला आवडत असतात. साम्यवादी लोकांना "कार्ल मार्क" तर एखाद्याला गांधीजी आदर्श वाटत असतात, हि यादी न संपणारी आहे. माझं स्वतःचं विचाराल तर मी "राजे भूमिबोल" यांचं नाव घेईन हे हि पोस्ट वाचणारा शेंबडपोरही सांगेल. असो,

१३ ऑक्टोबरला या राजाच्या मृत्यूच्या बातमीने त्रयस्थ असूनही मला भरून आलं होतं. या आवडत्या राजाचं अंतिम दर्शन तरी घेऊ हि इच्छा एव्हना प्रबळ झाली होती. साधारण ७ कोटी जनसंख्या असलेल्या थाई जनतेला, राजाच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी पार्थिव "१३ ऑक्टोबर २०१७" पर्यंत बँकॉकच्या ग्रँड पॅलेसमधे ठेवण्याचा निर्णय थाई सरकारने घेतला. १० नोव्हेंबरला पीएम मोदी जपानच्या परतीच्या प्रवासात थाई राजाचं दर्शन घेऊन गेल्यानंतर मलाही "ग्रँड पॅलेस" ला भेट देण्याची घाई झाली होती. ती पूर्ण झाली मागच्या विकांतात, ०७ जानेवारी २०१७ रोजी.

"नॉट पॉसिबल मिस्टर!!, यु कांत गो. ट्रॅफिक टू मच, ऑल रोड क्लोज बिकॉज ह्याव सम सीरामनी, बेटर यु गो बाय बोट. सेव टाईम शुअर!!, बाय रिव्हर वे चिपर यु नो"

बँकॉकच्या रस्त्यांवर ग्रँड पॅलेसला जाण्यासाठी टॅक्सी शोधणाऱ्या "टुरिस्ट" ना ऐकवलं जाणारं हे नेहमीचं वाक्य. एकदा का टुरिस्ट जाळ्यात सापडला कि जवळच्या पिअरवर नेऊन ३-४ हजार थाई बाथचं (५ ते ७ हजार रुपये) पॅकेज गळ्यात मारायचं. बँकॉक शहराच्या फक्त ८-१० किलोमीटरच्या परिघात असणाऱ्या ग्रँड पॅलेससाठी जवळपास सगळेच टुरिस्ट बोटीमार्गे का येतात यामागची टुरिस्ट लोकांना गंडवणारी "सिंडिकेट" यंत्रणा मला माहित असल्याने ऑफिसमधील एका स्टाफकडून कमी खर्चात जाण्याचा मार्ग समजावून घेतला. बँकॉकमधे "रेड बस" सर्व्हिस फ्री असते हे फार कमी टुरिस्टना माहित असतं. १८० किलोमीटर लांब असलेल्या पटायातून ग्रँड पॅलेससाठी चालू केलेला प्रवास "बस, BTS आणि MRT" च्या माध्यमातून केवळ २८० रूपयांत झाला.

सूर्यनारायणाच्या पहिल्या-वहिल्या किरणांच्या साक्षीने सुटलेली पहिली बस पटायाहुन पकडून शार्प ९ वाजता ग्रँड पॅलेसच्या पटांगणात पोहोचलो तेव्हा माझा नंबर साधारण ३५,००० वा होता. चार वाजेपर्यंतच दर्शन शक्य असल्याने आज नंबर लागला नाही तर एक रात्र बँकॉकमधेच राहून "गवळी" मुहूर्तावर ग्रँड पॅलेसवर दुसऱ्यादिवशी धडकायचं या निर्धारानेच आलो होतो. चपला कुठे ठेवायच्या? हातातल्या बॅगेचं काय? असले क्षुद्र विचार करत वेटिंग एरियातल्या खुर्चीवर बसलो तेव्हा एक लक्षात आलं त्या थाई महासागरात मी एकटाच "फॉरेनर" होतो. पोक्त बायकांच्या गराड्यात आणि अगम्य थाई भाषेत चाललेल्या अनाऊंसमेंट्समधे एकूण व्यवस्था काय आहे याबद्दल बराचवेळ चाचपडत होतो.

थायलंडमधे इंग्रजीची आधीच बोंब. माझंही थाई भाषेचं ज्ञान शेजारणीसमोर रितं करायला फक्त ३० सेंकंद लागली आणि तिला तिच्या इंग्रजीसाठी १५ सेकंद. संवाद माध्यमाच्या अगदी विरुद्ध टोकाला असलेले आम्ही दोघे मग थाई भाषेची माझ्याकडून आणि इंग्रजीची तिच्याकडून अशी येथेच्छ मोड-तोड करत, हातवारे करत दिल्या जाणाऱ्या सूचना समजावून घेतल्या. राज प्रासादात गेल्यानंतर नमस्काराची पद्धत कशी असावी, फोटोग्राफी कुठंपर्यंत अलाऊड आहे. चपला, हातातल्या सामानाचं काय करायचं या सगळ्या शंकांचं निरसन आजूबाजूच्या बायकांनी आनंदाने केलं.

साधारण १ तासाने धीटपणा वाढल्यावर, एकूण परिस्थितीचा अंदाज घेऊन, आपली सीट नेमकी कुठे आहे याची खुणगाठ बांधून पूर्ण पंडाल फिरायला निघालो. लग्नाच्या हॉलमधे कसं लहान मुलं खुर्च्यांना हात लावत फिरत असतात तसं प्रत्येक खुर्चीला हात लावत एका ओळीत चार आणि २५० रांगा असं करत एका ब्लॉक मधे १००० खुर्च्यांची आकडेमोड चटकन केली. एकूण ५० ब्लॉक धरून एकावेळी ५०,००० हजार लोकांना बसायची सोय होती. साधारण २० मिनिटाच्या अंतराने एकेका ब्लॉकचा नंबर लागत होता. या वेळेच्याहि कमीवेळात परत भरणारे ब्लॉकवरून दिवसभरात साधारण लाख-सवा लाख लोकं रोज दर्शनाला येत असावीत हा अंदाज मी बांधला.

शब्दांपेक्षा चित्र जास्त बोलतात म्हणून यापुढच्या सगळ्या गोष्टी चित्रांत सांगतो. इतक्या प्रचंड संख्येने येणाऱ्या लोकांसाठी निशुल्क असलेली खाण्या-पिण्याची, वैद्यकीय इमर्जनसी, राजाच्या चरित्र दर्शनाची, लाईव्ह कव्हरेज आणि सुरक्षेची सोय कशी होती यासाठी अटॅच केलेलं फोटो पहा. शिस्त पाळण्याचा उपजत गुण असलेले आणि सतत हसमुख रहाण्याची नैसर्गिक देणगी लाभलेली थाई जनता ५-६ तासांचा वेटिंग पिरियड आनंदाने सहन करत होती. विविध सामाजिक संस्था, कंपन्या, मोकळा वेळ असलेल्या शाळा कॉलेजातील मुलं, व्हाईट कॉलर मंडळी, थाई सैनिक इत्यादी अगदी आनंदाने खाद्य पदार्थांचे वाटप आणि होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करत होते. थाई मंडळींचा सेवाभाव माझ्यासाठी नवीन नाही आणि आपल्या "शीख" समुदायाचाही. नोटबंदीच्या रांगेत सर्वप्रथम "चहाची किटली" घेऊन पोहोचणारी आपली शीख मंडळी या गर्दीत दिसली याचं मला अजिबात नवल वाटलं नाही. संजय सिंग आणि बिट्टू नावाचे हे दोन शीख युवक सगळ्यांना "चहा-कॉफी आणि सरबताचे" निशुल्क वाटप करत होते. थाई बायको असलेला एक यूरोपियनही या गर्दीत दिसला.

शक्य तितके फोटो आणि शूटिंग करत राजाचं पार्थिव असलेल्या ग्रँड पॅलेसच्या गाभाऱ्याजवळ पोहोचलो तेव्हा. यापूर्वीचं हलकं-फुलकं असलेलं वातावरण कमालीचं बदललं होतं. अखंड मंत्रोच्चार, धुपाचा किंचितसा सुगंध, थाई रॉयल आर्मीची शिस्तबद्ध हालचाल, मुसमुसत रडणारे माझ्या आजूबाजूचे थाई. थाई ट्रॅडिशनल वाद्यांचा उदास करणारा मंद आवाज यासर्वांमुळे वातावरण गंभीर आणि शोकाकुल झालं. सूचनांची परत एकदा उजळणी झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात प्रवेश मिळाला. साधारण ३० लोकांच्या एका तुकडीला अर्ध्या मिनिटाचा वेळ देतात. माझा आदर्श असलेल्या मखरात सजवलेला राजे "भूमिबोल" यांचा देह खरंतर दिसत नाही, पण त्यांचं अस्तित्व जाणवण्याइतपत श्रद्धा माझ्यात नक्कीच तयार झाली होती. साडेतीन वाजता तिथून बाहेर पडतांना आठवण म्हणून मिळालेली राजाची प्रतिमा आणि थाई समृद्धीचं प्रतीक असलेली "तांदळाची पुडी" घेतांना अंतःकरण जड झालं होतं. आणि म्हणूनच "I miss my King" हे वाक्य टायटल म्हणून लिहिण्यात बिलकुल संकोच वाटत नाही, त्रयस्थ असलो तरीही. __/\__

राजे "भूमिबोल अतुल्यतेज" (थाई अपभ्रंश "अदुल्यदेज") अर्थात "रामा नववे"

ग्रँड पॅलेसचं हे विहंगम दृश्य. (आंतरजालाहुन साभार)

पॅलेसच्या या इमारतीत राजाचे पार्थिव ठेवले आहे.

हुआ लंपोंग MTR स्टेशनपासून ग्रँड पॅलेसला जाण्यासाठीची सरकारतर्फे सोय.

मंडपात स्वतःचा नंबर येण्याची वाट पहात असलेली थाई जनता.

गर्दीत लक्ष वेधून घेणारी हि छोटी.

पाणीवाली बाई. ("चांग" चा अर्थ हत्ती.. हि इथली एक "बियर" बनवणारी कंपनी)

निशुल्क खानपान सेवा. (विविध पदार्थांची रेलचेल होती. इथे फक्त वानगीदखल दोन-तीनच पेस्टवतोय)


इन्फर्मेशन काउंटरला जायचं नाव नोंदवायचं आणि "स्वयंसेवक" बॅच गळयात घालून आपल्या पसंतीची, झेपेल ती जवाबदारी उचलायची.

डॉक्टरांनाच्या मदतीसाठी आलेल्या ह्या दोन शाळकरी मुली.

भारताची मान उंचावणारे हे शीख युवक "संजय सिंग आणि बिट्टू"

आनंदाने जेवायला आग्रह करणारा थाई सैनिक.

सुरक्षेवर फिरती नजर ठेऊन असलेला थाई सैनिक.

अभिमानाने राजाची प्रतिमा मिरवणारे आजोबा.

गर्दीत भेटलेला एक युरोपियन.

माझ्या बाजूच्या रांगेची दर्शनाला जाण्यासाठी चाललेली लगबग.

दर्शनापूर्वीचा हा एक थांबा.

अस्मादिक.

पॅलेसच्या या इमारतीत जाण्यापूर्वीची पायपीट.

इथून आत शिरल्यावर फोटोग्राफी बंद करावी लागली.

तरीही मी दोन फोटो काढलेच. :-)

दर्शन घेण्याची पद्धत हि साधारण अशी होती.

राजाचं पार्थिव या सुवर्ण मकरात ठेवलेले आहे. (आंतरजालाहुन साभार)

राजे भूमिबोल यांच्या पश्चात नवीनच राज्याभिषेक झालेले त्यांचे पुत्र "वजिरालोंगक्रोन"(रामा दहावे)(आंतरजालाहुन साभार)

जपानच्या परतीच्या प्रवासात थायलंड देशात हॉल्ट घेऊन दर्शन घेणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. (मोदींच्या या कृतीचं ऑफिसमधल्या बऱ्याच स्टाफने माझ्याकडे येऊन कौतुक केलं)

आशियायी देशांची लाईफ लाईन असलेल्या भाताची कापणी करतांना राजे भूमिबोल.

जाता जाता भेट म्हणून मिळालेली थायलंच्या समुद्धीचं प्रतीक असलेल्या "भाताची पुडी" आणि राजाचा जुना फोटो.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

बाजीप्रभू's picture

10 Jan 2017 - 7:26 pm | बाजीप्रभू

फोटो दिसताहेत का?

अभिजित - १'s picture

10 Jan 2017 - 7:38 pm | अभिजित - १

नाही

एस's picture

10 Jan 2017 - 7:54 pm | एस

गणेशा.

मनिमौ's picture

10 Jan 2017 - 8:00 pm | मनिमौ

वाचताना. छान लिहिलय. पण फोटो दिसत नाहीत

इशा१२३'s picture

10 Jan 2017 - 8:36 pm | इशा१२३

छान.पण फोटो दिसत नाहीयेत.

नवीन टॅब मध्ये ओपन केले की फोटो दिसतात

भुमन्यु's picture

10 Jan 2017 - 8:44 pm | भुमन्यु

लेख मस्त. आवडलं लिखाण

बाजीप्रभू's picture

10 Jan 2017 - 8:53 pm | बाजीप्रभू

गुगल ड्राईव ऐवजी "फोटोबकेट" वापरून पाहतो.

पद्मावति's picture

10 Jan 2017 - 8:54 pm | पद्मावति

खुप खुप सुरेख लिहिलेय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jan 2017 - 9:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार सुंदर लिहिले आहे. मनापासून लिहिले आहे हे जाणवते.

तुम्ही थंबनेल्सच्या लिंक्स वापरल्या आहेत. त्या ऐवजी चित्रे पूर्ण आकारात असतानाच्या लिंक्स वापरून इथेच एका प्रतिसादात टाकल्यास साहित्य संपादक अथवा संपादक त्यांना लेखात हलवू शकतील.

यशोधरा's picture

10 Jan 2017 - 9:21 pm | यशोधरा

संवेदनायुक्त.

संजय क्षीरसागर's picture

10 Jan 2017 - 9:31 pm | संजय क्षीरसागर

आता फोटो दिसण्याचा मार्ग शोधा .

जबरदस्त! फोटो दिसत नाहीत, पण भावना पोचताहेत.

संदीप डांगे's picture

11 Jan 2017 - 12:26 pm | संदीप डांगे

+१

रातराणी's picture

10 Jan 2017 - 10:10 pm | रातराणी

सुंदर लिहिलंय, फोटोंची वाट पहात आहे.

लाल टोपी's picture

11 Jan 2017 - 8:33 am | लाल टोपी

लेखन आवडले!

पुंबा's picture

11 Jan 2017 - 9:17 am | पुंबा

राजाच्या फोटोला मिशी काढणाऱ्या एका जर्मन टुरिस्टला २५ वर्षे सक्त मजुरी, एका थाई कामगाराला राजाच्या आवडत्या पाळीव कुत्र्याबद्दल केलेल्या कडवट कमेंटबद्दल ३७ वर्षांची शिक्षा

ह्याला म्हणायचं व्यक्तीस्वातंत्र्य. बादवे, लेख छान आहे.

सुबोध खरे's picture

20 Jan 2017 - 9:55 am | सुबोध खरे

सौरा साहेब
आपल्याकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली तर काय होईल ते लक्षात घ्या. आपल्याकडे लोकांना बाबासाहेबांबद्दल जितकी भक्ती आणि आत्मीयता वाटते तितकीच आत्मीयता सर्वसामान्य थाय माणसाला त्यांच्या राजे भूमिबोल यांच्या बद्दल वाटते.
मुळात तो देश सध्या लष्करी प्रशासनाच्या हातात आहे हेही लक्षात घ्या.

अनुप ढेरे's picture

11 Jan 2017 - 10:05 am | अनुप ढेरे

लेख छान लिहिलाय.

नि३सोलपुरकर's picture

11 Jan 2017 - 10:58 am | नि३सोलपुरकर

फोटो दिसत नाही आहेत.... खोतानु
लेख छान झाला आहे .
"१३ ऑक्टोबर २०१७" , वर्षभर मृतदेह अंतिम दर्शनासाठी .._/\_.

प्रसाद_१९८२'s picture

11 Jan 2017 - 11:27 am | प्रसाद_१९८२

सुंदर लिहिलंय, सर्व फोटों देखिल सुदंर आहेत.

एकनाथ जाधव's picture

11 Jan 2017 - 12:14 pm | एकनाथ जाधव

गणेशा झालय

बाजीप्रभू's picture

11 Jan 2017 - 3:26 pm | बाजीप्रभू

राजे "भूमिबोल अतुल्यतेज" (थाई अपभ्रंश "अदुल्यदेज") अर्थात "रामा नववे"

ग्रँड पॅलेसचं हे विहंगम दृश्य. (आंतरजालाहुन साभार)

पॅलेसच्या या इमारतीत राजाचे पार्थिव ठेवले आहे.

हुआ लंपोंग MTR स्टेशनपासून ग्रँड पॅलेसला जाण्यासाठीची सरकारतर्फे सोय.

मंडपात स्वतःचा नंबर येण्याची वाट पहात असलेली थाई जनता.

गर्दीत लक्ष वेधून घेणारी हि छोटी.

पाणीवाली बाई. ("चांग" चा अर्थ हत्ती.. हि इथली एक "बियर" बनवणारी कंपनी)

निशुल्क खानपान सेवा. (विविध पदार्थांची रेलचेल होती. इथे फक्त वानगीदखल दोन-तीनच पेस्टवतोय)


इन्फर्मेशन काउंटरला जायचं नाव नोंदवायचं आणि "स्वयंसेवक" बॅच गळयात घालून आपल्या पसंतीची, झेपेल ती जवाबदारी उचलायची.

डॉक्टरांनाच्या मदतीसाठी आलेल्या ह्या दोन शाळकरी मुली.

भारताची मान उंचावणारे हे शीख युवक "संजय सिंग आणि बिट्टू"

आनंदाने जेवायला आग्रह करणारा थाई सैनिक.

सुरक्षेवर फिरती नजर ठेऊन असलेला थाई सैनिक.

अभिमानाने राजाची प्रतिमा मिरवणारे आजोबा.

गर्दीत भेटलेला एक युरोपियन.

माझ्या बाजूच्या रांगेची दर्शनाला जाण्यासाठी चाललेली लगबग.

दर्शनापूर्वीचा हा एक थांबा.

अस्मादिक.

पॅलेसच्या या इमारतीत जाण्यापूर्वीची पायपीट.

इथून आत शिरल्यावर फोटोग्राफी बंद करावी लागली.

तरीही मी दोन फोटो काढलेच. :-)

दर्शन घेण्याची पद्धत हि साधारण अशी होती.

राजाचं पार्थिव या सुवर्ण मकरात ठेवलेले आहे. (आंतरजालाहुन साभार)

राजे भूमिबोल यांच्या पश्चात नवीनच राज्याभिषेक झालेले त्यांचे पुत्र "वजिरालोंगक्रोन"(रामा दहावे)(आंतरजालाहुन साभार)

जपानच्या परतीच्या प्रवासात थायलंड देशात हॉल्ट घेऊन दर्शन घेणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. (मोदींच्या या कृतीचं ऑफिसमधल्या बऱ्याच स्टाफने माझ्याकडे येऊन कौतुक केलं)

आशियायी देशांची लाईफ लाईन असलेल्या भाताची कापणी करतांना राजे भूमिबोल.

जाता जाता भेट म्हणून मिळालेली थायलंच्या समुद्धीचं प्रतीक असलेल्या "भाताची पुडी" आणि राजाचा जुना फोटो.

नूतन सावंत's picture

11 Jan 2017 - 3:42 pm | नूतन सावंत

भावना पोचल्या.भाचेसून थायी असल्याने हे शोकाकुल वातावरण त्यांच्या घरातही अनुभवले आहे.

आलेल्या प्रतिक्रियांसाठी धन्यवाद!!

सुबोध खरे's picture

20 Jan 2017 - 9:52 am | सुबोध खरे

आताच थाय देशाला भेट देऊन आलो (१० जानेवारी ते १७ जानेवारी.) त्यात बाजीप्रभू यांनी लिहिलेल्या सर्व गोष्टी चक्षुर्वैसत्यं पाहून आलो. अजूनही अशाच लांब रांगा आपल्या देवतुल्य राजाचे पार्थिव पाहण्यासाठी लागलेल्या आहेत. त्यामुळे राजवाडा पाहण्याचा आमचा बेत रद्द करावा लागला. त्याच्या बाजूला असलेली दोन देवळे (वाट फो आणि वाट अरुण) मात्र पाहून घेतली.
तेथील सर्वसामान्य माणसांना आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल जितका जिव्हाळा, प्रेम आणि भक्ती वाटते तितकीच भक्ती वाटते हे स्वतः अनुभवले आहे.
या महान राजाने आपल्या देशाला आधुनिक जगात प्रगती करण्यासाठी किती कष्ट घेतले त्याचे वर्णन वाचून आणि प्रत्यक्ष पाहून लोकांना इतकी भक्ती का वाटते या बद्दल आश्चर्य वाटत नाही. त्यांना थायदेशाचे शिवाजी महाराज म्हणता येईल अशा तर्हेच्या दूरदृष्टीचा हा राजा होता.
तेथिल सर्व सामान्य लोकांशी( टॅक्सी ड्रायव्हर, दुकानदार, हॉटेलातील कर्मचारी इ) मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलताना त्यांना आपल्या राजाबद्दल वाटणारे प्रेम सहज जाणवते. फक्त एखाद्या माणसाने राजाबद्दल अनुदार उद्गार काढले तर ते लोक दंगे करत नाहीत तर त्या माणसाशी बोलणे सोडून देतात. थाय देशाच्या सभ्य संस्कृतीला अनुसरून ते मारामारी करीत नाहीत.
या भेटीत पट्टाया येथे बाजीप्रभू यांना भेटण्याचा हि अपूर्व योग आला. थाय देशात ते मराठी माणसाची खिंड लढवत आहेत हे पाहून भरून आले.