(गद्य,पद्य वेचे.)
तू मला पहायला आला होतास
सफेद प्यॅन्ट अन सफेद फुल शर्ट
काळा सावळा असलास तरी दिसलास स्मार्ट
तू नेसली होतीस अंजरी साडी
ब्लाऊझवर होती नक्षी वाकडी तिकडी
गोरीपान होतीस अन दिसलीस फाकडी
मी कांदेपोहे घेऊन आले होते
तू मान खाली करून बसला होतास
दोन चमचे खाल्यावर वर बघून हसलास
उजव्या गालावरच्या खळीमुळे मोहक दि़सलास
जाताना मी गेलो पोपटाच्या पिंजर्या जवळ
तुच पोपटाला विचारत होतीस कोण रे तो?
पोपट मला म्हणाला चोर चोर
ते ऐकून तू जोरात हसलीस
मी मनात म्हणाले होते
माझं हृदय चोरणारा तूच तो चोर
तुझा चेहरा पाहून माझ्या हसण्यावर
माझा मीच घातला चटकन आवर
मी रागावलो नसतो अजीबात तुझ्यावर
का नाही सांगीतलास तुझ्या मनातला विचार
मला ते ऐकायला आवडलं असतं
तुझं मनही मोकळं झालं असतं
तुला सोडायला मी बसस्टॉपवर आले
तू खिडकी जवळ बसला होतास
लाजून माझ्याकडे बघत नव्हतास
कंडक्टरने बेल दिली
तू माझ्याकडे मान वळवून
बाय बाय म्हणालास
आणखी एकदोनदा मान वळवून
माझ्याकडे बघीतलं असतंस
तर ते मला आवडलं असतं
पसंती नापसंतीचे सोपास्कार झाले
चांगला मुहूर्त पाहून आपले लग्न ठरले
लग्न झाले आणि मी तुझ्या घरी आले
मी बंगल्यातून आले अन तुझ्या चाळीत रमले
हनीमुन आपण घरीच केला
बाहेर जायला परवडत नाही
असं म्हटलं होतं मी तुला
तुझा निरागस,तृत्प चेहरा
सगळं सांगून गेलं मला
काहीही म्हणाली असतीस
तर मला आवडलं असतं
त्या रात्री कपातून दुध घेऊन आलीस
मी तुझ्या जवळ आलो आणि
तू मला लागलीच म्हणालीस
आधी तो दीवा मालवा
आणि मी दीवा मालवला
आपलं मिलन झालं
मी सुखावले होते
अन तू घोरत पडला होतास
तू दीवा मालवला नसतास
तरी ते मला आवडलं असतं
मी तुझ्या अंगावर पांघरूण घातलं
अन मला विश्वाचं रहस्य कळलं
पहाटे जागा होऊन तू
मला जागवून म्हणालास
पांघरूण नसतं घातलंस
तर ते मला आवडलं असतं
मी तुझ्या कानात तेव्हा पुटपूटलो होतो
मी तुझं मलमली तारूण्य
माझ्या अंगावर पांघरलं असतं
आणि तुझ्या मोकळ्या केसात
मला गुंतवून घेतलं असतं
तू कुस वळवलीस आणि
तोंडातल्या तोंडात पुटपूटलीस
तुम्ही सर्व पुरूष एक सारखे
तू न पुपूटता सांगीतलं असतंस
तरी ते मला आवडलं असतं
स्त्री ही क्षणाची पत्नी
अन अनंत काळाची माता
हे त्याच वेळी मला कळलं
तू मला म्हणालीस पण
प्यार से भी ज़रूरी कई काम हैं
प्यार सब कुछ नहीं ज़िंदगी के लिए
माझी आई तुला जाच करायची
तू मला कधीही हे भासवलं नाहीस
तुम्ही सर्व बायका एक सारख्या
उद्या माझ्या सुनेला तू तेच करणार
असं म्हणून तुला नाराज करायला
मला मुळीच आवडलं नसतं
प्रेम विवाहात आणि जुळवलेल्या लग्नात
वेगवेगळं असतं प्रचंड थ्रील
जुळवलेल्या लग्नात अनोळखी
व्यक्तीला आपसलंसं करून
घेण्यात निराळच असतं फिल
संसार सुखी होण्यासाठी नक्कीच
समजदारीचं असावं लागतं डील
सांगावं लागतं अगदी स्पष्ट
काहींना असलं लग्न वाटतं इष्ट
आणि म्हणून अशीच ही असते
अशा लग्नाची ऐकीव गोष्ट
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
9 Jan 2017 - 2:42 pm | एस
छान आहे संवाद!