क्रिकेट - २

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
5 Jan 2017 - 2:11 pm

मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2022 - 3:35 pm | श्रीगुरुजी

आज आशिया करंडक स्पर्धेत सायंकाळी ७:३० वाजता भारत-पाकिस्तान सामना आहे.

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2022 - 8:56 pm | श्रीगुरुजी

भारत १४०/५ (१६)

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2022 - 9:35 pm | श्रीगुरुजी

भारत १८१/७ (२०)
पाकडे ११/० (२)

धर्मराजमुटके's picture

4 Sep 2022 - 11:01 pm | धर्मराजमुटके

पाकडे :)
शब्दश्रेय - बाळासाहेब ठाकरे ? की अजून कोणी ?

श्रीगुरुजी's picture

4 Sep 2022 - 11:30 pm | श्रीगुरुजी

भारत हरला

अरेरे,पाकड्याकडून हरवले जाणे फार क्लेश दायक :(

जेम्स वांड's picture

5 Sep 2022 - 7:36 am | जेम्स वांड

का हार जीत सुरू असणारच,

पण पाकिस्तान सोबत हरलो हा शब्द/ वाक्यप्रयोग वाचला की एक अलग जळजळ होते.

Fire 3

श्रीगुरुजी's picture

5 Sep 2022 - 9:49 am | श्रीगुरुजी

कालच्या सामन्यातील पराभव संशयास्पद वाटतो.

पहिली ३ षटके उत्कृष्ट गोलंदाजी केलेल्या भुवीने शेवटचे षटक वाईट टाकून १९ धावा देणे आश्चर्यकारक आहे. यात त्याने २ वाईड टाकले व यॉर्कर तर विसरलाच होता. अगदी शेवटच्या २ चेंडूत २ धावा हव्या असताना अर्षदीपने यॉर्कर न टाकता सोपा फुल्टॉस टाकणे पटले नाही. ३० यार्ड वर्तुळाच्या आत अर्षदीपने इतका सोपा झेल सोडणे संतापजनक होते. १८ व्या षटकांत बिष्णोईने सुद्धा २ वाईड टाकले.

सुजित जाधव's picture

5 Sep 2022 - 9:57 am | सुजित जाधव

दडपणाखाली अश्या चुका होत असतात. आणि त्यात भारत पाकिस्तान सामना असेल तर दोन्ही संघाच्या खेळाडूंवर प्रचंड दडपण असते. कितीही मोठा खेळाडू असला तरीही अश्या सामण्यांत त्याच्याकडून छोट्या मोठ्या चुका होतच असतात...

सुजित जाधव's picture

5 Sep 2022 - 9:51 am | सुजित जाधव

संघ निवड करताना अनेक चुका केल्या आपण त्याचाच फटका बसला. ५-६ सामन्यांच्या मालिकेसाठी संघात फक्त ३ जलदगती गोलंदाज घेऊन कसे चालेल. जलदगती गोलंदाजाला दुखापत होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. भिश्र्नोई/हूडा यांच्याऐवजी दीपक चहर किंवा शार्दुल ठाकूर यांचा समावेश करायला हवा होता. आणखी एक, रिषभ पंत टी -२० साठी निरूपयोगी खेळाडू आहे. ५० पेक्षा जास्त सामने खेळून सुध्दा त्याची सरासरी २३ तर स्ट्राईक रेट १२६ आहे. दुसरीकडे श्रेयस अय्यर सारख्या सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या फलंदाजाला १५ मध्ये पण स्थान भेटत नाहीये.

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2022 - 2:43 pm | श्रीगुरुजी

आजपासून ऑस्ट्रेलियात ८ वी ट-२० विश्वचषक स्पर्धा सुरू झाली आहे. यापूर्वीच्या ७ स्पर्धेत विंडीज २ वेळा व भारत, श्रीलंका, पाकिस्तान, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एकदा विजेते झाले होते. तसेच श्रीलंका व इंग्लंड प्रत्येकी २ वेळा आणि पाकिस्तान, भारत, ऑस्ट्रेलिया प्रत्येकी एकदा उपविजेते झाले होते.

२ वेळा विश्वविजेता असलेले विंडीज यावेळी स्पर्धैसाठी पात्र ठरले नाहीत.

या स्पर्धेत एकूण १२ संघांची २ गटात विभागणी केली आहे.

आजचा उद्घाटनाचा सामना ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यात सुरू असून न्यूझीलंडने २०२/३ (२०) धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया १९/१ (३) आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Oct 2022 - 3:55 pm | श्रीगुरुजी

ऑस्ट्रेलिया १११/१० (१७.१)

न्यूझीलंड २०११ नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरूद्ध जिंकले.

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2022 - 8:29 am | श्रीगुरुजी

आझ दुपारी १:३० पासून भारत-पाकडे सामना आहे. या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची बरीच शक्यता आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2022 - 2:49 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तान १०२/५ (१४.४)

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2022 - 4:38 pm | श्रीगुरुजी

पाकिस्तान १५९/८ (२०)

भारत ७७/४ (१२.२)

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2022 - 5:30 pm | श्रीगुरुजी

अत्यंत नाट्यमय सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारत जिंकला. विराट ८२* (५३).

कानडाऊ योगेशु's picture

23 Oct 2022 - 5:33 pm | कानडाऊ योगेशु

विराट योग्य वेळी फॉर्मात आला

प्रसाद_१९८२'s picture

23 Oct 2022 - 5:37 pm | प्रसाद_१९८२

अतिशय अटीतटीचा सामना झाला. पाहायला मजा आली मॅच !

कानडाऊ योगेशु's picture

23 Oct 2022 - 5:40 pm | कानडाऊ योगेशु

प्रेजेंस ऑफ माईंड जबरदस्त होता आपला

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2022 - 6:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मजा आली. कुठे ते पन्नास धावात चार बाद आणि मग, थेट शेवटच्या षटकात सामना कधी पाकिस्तानकडे तर कधी भारताकडे झुकला. नोब बॉल पडणे, त्यावर विकेट पडणे, बाईजचे तीन धावा घेणे. दिनेश कार्तिकचं स्टंपिंग होणे. अश्विनने वाईड बॉल सोडणे आणि मग एक धाव हवी असतांना, क्षेत्ररक्षकांनी घेरुन टाकलेले असतांना चेंडुला उंचावून मारुन विजयी धाव घेणे. कमकुवत -हदयाच्या माणसाने सामना न पाहिला असेल तर उत्तमच म्हणावे लागेल.

मजा आली. विजयी संघाचं. विराट, हार्दिक पांड्याचं अभिनंदन. दिवाळीचं गिफ्ट मस्त होतं धन्यवाद.

-दिलीप बिरुटे

वाह! खुप खुप दिवसांनी क्रिकेट सामना पाहिला.विराटने विजय अक्षरशः खेचून आणला.धोनीची आठवण आली.चला दिवाळीच्या भारतीयांना लक्ष्य गाठून लक्ष लक्ष शुभेच्छा मिळाल्या :)

श्रीगुरुजी's picture

23 Oct 2022 - 8:21 pm | श्रीगुरुजी

२० व्या षटकातील नाट्य . . . विजयासाठी १६ धावा हव्यात आणि पंड्या खेळतोय. महंमद नवाझ फिरकी गोलंदाजी टाकतोय.

पहिला चेंडू पंड्या चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागून कव्हरच्या दिशेने उंच उडून बाबर आझम सोपा झेल घेतो. ३७ चेंडूत ४० धावा करून १३ षटकांत विराटबरोबर ११२ धावांची भागीदारी करून पंड्या बाद.

५ चेंडूत १६ हव्या. कार्तिक आलाय.

दुसरा चेंडू कार्तिक १ धाव घेतो. आता ४ चेंडूत १५ हव्या.

तिसरा चेंडू विराट चेंडू मारून जोरात धावत २ धावा घेतो. ३ चेंडूत १३ हव्या.

चौथा चेंडू विराटचा षटकार. परंतु कंबरेच्या वर फुलटॉस चेंडू असल्याने नोबॉल, नोबॉलची एक अतिरिक्त धाव व फ्री हिट. ३ चेंडूत ६ हव्या.

चौथा चेंडू - फ्री हिट वाईड चेंडू व १ अतिरिक्त धाव. ३ चेंडूत ५ हव्या.

पुन्हा एकदा चौथा चेंडू - फ्री हिट कोहलीचा त्रिफळा उडून चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जातो. फ्री हिट असल्याने बाद नाही. कोहली व कार्तिक वेगात पळून ३ धावा घेतात. २ चेंडूत २ हव्या.

पाचवा चेंडू कार्तिक यष्टिचित बाद. अजून एक ट्विस्ट. १ चेंडूत २ हव्या. अश्विन आलाय.

सहावा चेंडूअजून एक वाईड. दोन्ही संघांची धावसंख्या समान. १ चेंडूत १ धाव हवी.

पुन्हा एकदा सहावा चेंडू सर्व क्षेत्ररक्षक जवळ आहेत. अश्विन सरळ मिडऑफच्या वरून उचलून मारतो व पळून धाव पूर्ण करतो.

चित्तथरारक सामन्यात शेवटच्या चेंडूवर भारत विजयी!

छान झाला सामना. फार अटीतटीची लढत. बर्याच दिवसानी असा रोचक सामना पाहण्यास मिळाला. जिंकल्यावर इतक्या जरात किंचाळलो की नातू जागा झाला.

श्रीगुरुजी's picture

27 Oct 2022 - 8:14 pm | श्रीगुरुजी

झिंबाब्वेचा पाकड्यांवर केवळ १ धावेने विजय.

झिंबाब्वे १३० (८)
पाकडे १२९/७ (२०)

पाकड्यांचा सलग दुसरा पराभव.

प्रसाद_१९८२'s picture

28 Oct 2022 - 11:00 am | प्रसाद_१९८२

पाकिस्तान सेमी फायनल मधे जाण्याची आता किती शक्यता आहे?

श्रीगुरुजी's picture

28 Oct 2022 - 11:10 am | श्रीगुरुजी

उर्वरीत सर्व ३ सामने जिंकले तरी शक्यता बरीच कमी आहे.

पाकिस्तानचे ० गुण असून अजून बांगला, नेदरलँड्स व आफ्रिकेबरोबरचे सामने शिल्लक आहेत. आफ्रिकेचे ३ गुण असून अजून भारत, पाकिस्तान व नेदरलँड्स यांच्याबरोबरील सामने शिल्लक आहेत.

पाकिस्तान-आफ्रिका हा सामना उपांत्य फेरीत जाण्यासाठी निर्णायक ठरेल असं दिसतंय.

प्रसाद_१९८२'s picture

29 Oct 2022 - 11:04 am | प्रसाद_१९८२

धन्यवाद !
अर्थात आता पाकिस्तानला सर्व सामने जिंकावे लागतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2022 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झिंबाब्वेचा अनुभव कमी होता. पूर्वीच्या टीम सारखी यांची दहशत नाही.पण, कालचा गेलेला सामना झिंबाब्वेने खेचून आणला. भारताच्या सामन्यातल्या विजयाची पुनारावृत्ती करण्याची संधी पाकिस्तानला होती पण पाकिस्तानचा अनुभव कमी पडला. आपणही भारतासारखा विजय खेचून आणु असा अविर्भाव खड्ड्यात घेऊन गेला. पाकिस्तान हरल्याचा आनंद झाला.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2022 - 12:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झिंबाब्वे आणि बांग्लादेशचा सामना कोणी पाहिला असेल तर सामन्याची मजा समजली असेल. शेवटच्या चेंडूत झिंबाब्वेला एका चेंडूत पाच धावा पाहिज्या होत्या. शेवटच्या चेंडूवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात फलंदाज स्टंपींग झाला. बांग्लादेश जिंकला म्हणून खेळाडूंनी आनंद व्यक्त केला. झिंबाब्वे हरले म्हणून दु;खी झाले. खेळाडु ग्राउंड बाहेर गेले आणि चेंडू स्टंपवर जाण्याअगोदर कीपरने चेंडू कलेक्ट केला म्हणून नो बॉल दिल्या गेला. बाहेर गेलेले खेळाडू मैदानात परतले . एक चेंडू फ्रि हीट आणि चार धावा विजयासाठी. पण झिंबाब्वेच्या खेळाडूला विजयी फटका मारता आला नाही. बांग्लादेश विजयी झाले. संधी मिळूनही झिंबाब्वेचा पराभव झाला. मजा आली. येडा मॅच. =))

-दिलीप बिरुटे

झिम्बाब्वे - पाक आणि झिबाब्वे - बांगला दोन्ही match खूप भारी झाल्या..

आज main bowler पुर्ण ओव्हर टाकू न शकणे.. आणी केलेल्या असंख्य मिसफिल्ड मुळे झिम्बाब्वे हारली..

जिंकली असती तर आणखीन मज्जा आली असती...

कानडाऊ योगेशु's picture

30 Oct 2022 - 2:18 pm | कानडाऊ योगेशु

चेंडू स्टंपवर जाण्याअगोदर कीपरने चेंडू कलेक्ट केला म्हणून नो बॉल दिल्या गेला.

भारत पाक मॅच मध्ये ही दिनेश कार्तिक ला स्टंप आऊट करताना चेंडु विकेटच्या अगोदर पकडला गेला होता रिझवान कडुन पण बहुदा कार्तिकने तो बॉल खेळला होता ( पॅडला लागला होता बहुतेक) म्हणुन तो नोबॉल धरला गेला नाही.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2022 - 1:36 pm | श्रीगुरुजी

झिंबाब्वे-बांगडे सामना खूपच रोमांचक झाला. दुर्दैवाने झिंबाब्वे थोडक्यात हरले.

आता नेदरलँड्स-पाकडे सामना सुरू आहे. नेदरलँड्स ५३/३ (१३).

दुपारी ४:३० वाजता भारत-आफ्रिका सामना आहे.

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2022 - 5:04 pm | श्रीगुरुजी

भारत-आफ्रिका

भारत ४१/३ (७)

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2022 - 5:15 pm | श्रीगुरुजी

भारत-आफ्रिका

भारत ५१/५ (९)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2022 - 5:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज भारताची सुरुवात बेक्कार झाली. 'भारत जोड़ो यात्रे' प्रमाणे एकट्या सूर्याने 'धावा यात्रा' भारताच्या खात्यात जोडल्या. सतरा षटकात ११५ धावा झाल्या आहेत ६ बाद आहेत. राहिलेल्या षटकात किती धावा होतात ते पाहावे लागेल. पण धावसंख्या पाहता ही सन्मानजनक धावसंख्या नाही.

विजयाची शक्यता. ८ % वाटते.

- दिलीप बिरुटे

चौकस२१२'s picture

31 Oct 2022 - 9:42 am | चौकस२१२

'भारत जोड़ो यात्रे' प्रमाणे एकट्या सूर्याने 'धावा यात्रा'
"रागा" म्हणे सूर्य कि काय!
इथेही राजकीय संधर्भ !
धन्य आहे

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2022 - 5:57 pm | श्रीगुरुजी

१२४/६ (१८)

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2022 - 8:04 pm | श्रीगुरुजी

जिंकले आफ्रिका

श्रीगुरुजी's picture

30 Oct 2022 - 8:40 pm | श्रीगुरुजी

लुंगीने भारतीय फलंदाजांचे धोतर सोडले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Oct 2022 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला फोक्लीचा भारतीय संघ आयपीएल मधे फार गांभीर्याने खेळतो, अशी टीका कायम होते. आजचा सामना जिंकू असे काहीही भारतीय खेळाडूत काहीही नव्हते, असे माझे व्यक्तिगत मत आहे. आता विराट कडून सोपा झेल, जो हातात होता आणि सुटला. धावबाद करायची एक सोपी संधी रोहीत कड़े होती त्यामुळे मॅच गेलाच पण आपला स्कोर काही दिव्य नव्हता. अश्विनचे चेंडू वळत नाहीत, त्याला का घेतात हे मला अजुन कळले नाही. सामना हरलो. विषय संपला.

-दिलीप बिरुटे

श्रीगुरुजी's picture

2 Nov 2022 - 11:18 pm | श्रीगुरुजी

आज पुन्हा एकदा रोमहर्षक सामन्यात भारताने बांगलादेशाला हरवून उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास नक्की केला.

रोहीत शर्मा व कार्तिक सातत्याने अपयशी ठरताहेत. भुवनेश्वर सुद्धा फार चांगली कामगिरी करू शकलेला नाही.

प्रसाद_१९८२'s picture

4 Nov 2022 - 7:08 pm | प्रसाद_१९८२

भारत झिंबाव्वे विरुद्ध हरला व पाकिस्तान बांग्लादेश सोबतची मॅच जिंकला तर रनरेटच्या जोरावर, पाकिस्तान सेमी फाईनल मधे जाण्याची कितपत शक्यता आहे ? कारण टेबलवर पहिल्या क्रमांकावर असूनही भारताचा रनरेट पाकिस्तानपेक्षा कमी आहे.

श्रीगुरुजी's picture

4 Nov 2022 - 10:56 pm | श्रीगुरुजी

तर पाकिस्तान १००% उपांत्य फेरीत जाईल व उपांत्य फेरीतील दुसरा संघ आफ्रिका असेल.

प्रसाद_१९८२'s picture

5 Nov 2022 - 11:17 am | प्रसाद_१९८२

ऑस्ट्रेलिया-अफगाणीस्तान मॅच मधे, आफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाला चांगलीच टक्कर दिली. आफगाण विकेट किपरने मार्शची कॅच सोडली नसती तर ऑस्ट्रेलियाचा स्कोर आणखी कमी झाला असता व अफगाणीस्तानाला जिंकण्याची चांगली संधी मिळाली असती.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2022 - 1:18 pm | श्रीगुरुजी

आज लंका-इंग्लंड सामना १:३० वाजता आहे.

इंग्लंड जिंकले तर सरस निव्वळ धावगतीमुळे इंग्लंड आत व ऑस्ट्रेलिया बाहेर. इंग्लंड हरले किंवा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला तर ऑस्ट्रेलिया आत इंग्लंड बाहेर.

श्रीगुरुजी's picture

5 Nov 2022 - 6:26 pm | श्रीगुरुजी

इंग्लंडने लंकेला हरविल्याने न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या तिघांचेही समान ७ गुण झाले. सरस निव्वळ धावगतीमुळे न्यूझीलंड व इंग्लंडने उपांत्य फेरीत प्रवेश केला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला स्वतःच्या देशातच बाद फेरीत प्रवेश मिळविता आला नाही.

श्रीगुरुजी's picture

6 Nov 2022 - 9:47 am | श्रीगुरुजी

विश्वचषक स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल आज लागला.

नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १५८/४ धावा केल्या. आफ्रिकेला २० षटकांत फक्त १४५/८ धावा करता आल्या. या पराभवामुळे आफ्रिकेची उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची आशा उद्ध्वस्त झाली व परीणामी भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश नक्की झाला. नेदरलँड्सच्या गोलंदाजांनी अत्यंत उत्कृष्ट गोलंदाजी केली व क्षेत्ररक्षकांनी अत्यंत अविश्वसनीय ३ झेल घेतल्याने नेदरलँड्स जिंकले.

आज पाकडे-बांगडे सामना जो जिंकेल तो संघ उपांत्य फेरीत जाईल.

गणेशा's picture

6 Nov 2022 - 9:58 am | गणेशा

हो.

आणि पाकिस्तान ला आयते दार ओपन झाले सेमी चे.

तरीही backing बांगला, hope shanto will make ५०+ score.

गणेशा's picture

6 Nov 2022 - 10:39 am | गणेशा

Shanto ने ५० केले अपेक्षे प्रमाणे...

पण shakib ला खुप चुकीचे out दिले..
Third umpire कडून अशी चूक अपेक्षित नव्हती..
Clearly mess this is