क्रिकेट - २

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
5 Jan 2017 - 2:11 pm

मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

11 Jun 2017 - 12:56 am | गामा पैलवान

मुक्तविहारी,

घ्या अजून घ्या ह्या पावसाळ्यात मॅचेस....

इथे इंग्लंडमध्ये पाऊस सदैव पडतो. त्यामुळे पावसाळा नामक वेगळा ऋतू नसतो. चालू मोसम त्यातल्यात्यात कमी पावसाचा आहे. त्यास उन्हाळा (=summer) म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 11:02 am | मुक्त विहारि

हे माहीत न्हवते....

पण मग प्रत्येक मॅचला २-३ दिवस राखीव का ठेवत नाहीत?

पुर्वी मॅचचा निकाल लागे पर्यंत क्रिकेट खेळले जायचे असे वाचनात आलेले आठवते.

त्याचे काय आहे, की एखादा गुणवंत विद्यार्थी अपघातामुळे एखादे वर्ष गमावून बसणे आणि केवळ पावसामुळे एखादा संघ स्पर्धे बाहेर जाणे, ह्यात फारसा फरक नाही. (बांगला देश जिंकला ह्याच्या दू:खा पेक्षा, बांगला देशापेक्षा उत्तम क्रिकेट खेळणारा संघ बाहेर गेला, ह्याचे दू:ख जास्त.)

बादवे,

इंग्लंडमध्ये पाऊस सदैव पडत असेल तर त्या देशात स्थाइक व्हायला मजा येईल.पावसाळी वातावरण फारच रोमँटिक.....

अवातंर विषय काढल्याबद्दल क्षमस्व.

प्रसाद_१९८२'s picture

11 Jun 2017 - 12:58 pm | प्रसाद_१९८२

आजची मॅच जर भारत हरला, तर नेट रनरेटच्या जोरावर तरी भारत उपांत्यफेरीत जायची काही शक्यता आहे का ?? कारण बलाढ्य साऊथ अफ्रिके समोर भारतीय संघाच्या विजयाची आशा तशी कमीच आहे.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2017 - 2:18 pm | श्रीगुरुजी

सर्वांचेच ३ गुण असल्याने आज भारत हरला तर भारताचे गुण दोनच राहतील व आफ्रिकेचे ४ गुण होतील. परंतु उद्याच्या लंका वि. पाकडे या सामन्याचा निकाल काहीही लागला (बरोबरी. अनिर्णित, निर्णायक), तरी किमान एका संघाचे किमान ३ गुण होतील. त्यामुळे आजचा पराभूत संघ आजच घरी जाणार.

गामा पैलवान's picture

11 Jun 2017 - 1:41 pm | गामा पैलवान

मुक्तविहारी,

राखीव दिवस न ठेवण्याचं कारण पैसा व अति क्रिकेट हे आहे. अति क्रिकेट हे देखील पैशासाठीच खेळलं जातं.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2017 - 2:23 pm | श्रीगुरुजी

आज प्रथम फलंदाजी करणारा संघ हरेल. मागील ४ सामन्यात असेच झाले आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज होणार.

आज भारताने केदार, जडेजा व बुमराह ऐवजी रहाणे, अश्विन व शमीला संघात घ्यावे.

प्रसाद_१९८२'s picture

11 Jun 2017 - 3:12 pm | प्रसाद_१९८२

विराट कोहलीने तुमचा प्रतिसाद वाचलेला दिसतोय, श्रीगुरुजी. :)
आज भारताने टॉस जिंकून, पहिले क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 7:44 pm | मुक्त विहारि

आता फलंदाज काय करतात ते बघू...

श्रीगुरुजी's picture

11 Jun 2017 - 8:13 pm | श्रीगुरुजी

भारत अगदी सहज जिंकतोय असं दिसतंय. आता उद्याच्या पाकडे वि. लंका सामन्यातून उपांत्य फेरीतील ४ था संघ ठरेल. बुधवारी १४ तारखेला इंग्लंड वि. श्रीलंका/पाकिस्तान व गुरूवारी १५ तारखेला बांगला वि. भारत/आफ्रिका यांच्यातील उपांत्य सामने होतील. एकंदरीत २०१३ प्रमाणे भारत वि. इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होईल.

इंग्लंडने मर्यादित षटकांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण ७ वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला होता (विश्वचषक स्पर्धा १९७९, १९८७, १९९२; ट-२० स्पर्धा २०१०, २०१६; चॅम्पियन्स करंडक २००४, २०१३). परंतु फक्त एकदाच (ट-२० स्पर्धा २०१०) इंग्लंडला अंतिम फेरी जिंकता आली होती. यावेळी इंग्लंडचा संघ बलाढ्य आहे व स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. त्यामुळे बहुतेक यावेळची स्पर्धा इंग्लड जिंकण्याची खूपच शक्यता आहे.

या चँपियन्स करंडक स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत आलेल्या ४ पैकी ३ संघांना उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले आहे. बांगला व पाकिस्तान/श्रीलंका यांना यावेळी नशीबाची साथ मिळाली, परंतु न्यूझीलँड, आफ्रिका व मुख्य म्हणजे ऑस्ट्रेलिया कमनशीबी ठरले.

मुक्त विहारि's picture

11 Jun 2017 - 9:22 pm | मुक्त विहारि

मस्त

अभिजीत अवलिया's picture

11 Jun 2017 - 9:48 pm | अभिजीत अवलिया

भारत वि. पाकिस्तान होईल अंतिम सामना.

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 11:51 am | मुक्त विहारि

जाहीरातींचा महापूर..

एक वेळ आफ्रिका / ऑस्ट्रेलिया ला गृहीत धरता येईल. पण बांगलादेश सारख्या संघाला गृहीत धरून उपयोग नाही .. सध्या पाकिस्तान / लंके पेक्षा त्यांचा संघ चांगला खेळतोय .. त्यामुळे.. its not over till its over

अभिजीत अवलिया's picture

15 Jun 2017 - 8:33 pm | अभिजीत अवलिया

खरा होतोय बहुतेक माझा अंदाज :)

मस्त... तुमचे भविष्य खरे ठरले...

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2017 - 2:48 pm | श्रीगुरुजी

आजच्या पाकडे वि. लंका सामन्यात पाकड्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धावांचा पाठलाग करायचा असल्याने आजचा सामना पाकडे जिंकतील असं वाटतंय.

मुक्त विहारि's picture

12 Jun 2017 - 3:07 pm | मुक्त विहारि

पण जर मलिंगा चालला तर मात्र पाकड्यांचे कठीण आहे.

पाचव्या/सहाव्या बॉलरचा प्रॉब्लेम दोनी संघाना आहे.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2017 - 3:24 pm | श्रीगुरुजी

मलिंगा संपलेला आहे. मुळात यॉर्कर सोडला तर त्याच्या गोलंदाजीत कणभर दम नव्हता. स्विंग, टप्पा, रिव्हर्स स्विंग इ. गोष्टींचा त्याच्या गोलंदाजीत अभावच होता. तो तसा प्रेडिक्टेबल गोलंदाज होता. वयोमानानुसार त्याचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या यॉर्करमध्येही आता फारसा दम राहिलेला नाही. ज्याप्रमाणे किरॉन पोलार्ड कडे 'लॉंगऑफ/लाँगऑनला सरळ उचलून मारणे' हा एकच फटका आहे, त्याचप्रमाणे मलिंगाकडे यॉर्कर हा एकमेव चेंडू आहे आणि त्यातही आता फार काही शिल्लक नाही. त्यामुळेच मलिंगाला आता भरपूर मार पडतो.

श्रीगुरुजी's picture

12 Jun 2017 - 7:52 pm | श्रीगुरुजी

श्रीलंका ५० षटकांच्या आतच सर्वबाद २३६. श्रीलंका खरं तर चांगल्या अवस्थेत होते. दुसर्‍या पेयपानाच्या वेळी त्यांची धावसंख्या ३१ षटकांत ३ बाद १६१ अशी चांगली होती. डिकवेला व मॅथ्यूज हे दोघेही स्थिरावून वेगात खेळत होते. पेयपानानंतर केवळ ४ षटकांत श्रीलंकेची अवस्था ७ बाद १६७ इतकी वाईट झाली. त्यानंतर लकमल आणि गुणरत्नेने ४६ धावांची भागीदारी केली. तरीसुद्धा शेवटी २३६ धावांवर श्रीलंकेचा डाव आटोपला.

पाकड्यांविरूद्ध २३६ हे लक्ष्य फारसे वाईट नाही. टीच्चून गोलंदाजी व चांगले क्षेत्ररक्षण केले तर श्रीलंका जिंकू शकते. पण श्रीलंका जिंकण्याची शक्यता आता बरीच कमी आहे. पाकड्यांनी या क्षणाला ६.३ षटकांत नाबाद २९ धावा केल्या आहेत.

त्यामुळे आता बुधवारी पाकडे वि. इंग्लंड व गुरूवारी बांगला वि. भारत हे उपांत्य फेरीचे सामने होतील. बांगला वि. पाकडे असा अंतिम फेरीचा सामना झाला तर मात्र आपले सर्वांचेच दुर्दैव.

२०१९ मध्ये इंग्लंडमध्येच याच काळात १२ वी विश्वचषक स्पर्धा आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत फक्त १५ सामने खेळले जातात. विश्वकरंडक स्पर्धेत ४९ सामने खेळले जातात. त्यावेळीही पावसाने असाच दगा दिला तर संपूर्ण स्पर्धेचा बेरंग होईल.

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2017 - 2:31 pm | श्रीगुरुजी

काल श्रीलंकन्स मूर्खासारखे हरले. २३६ इतकी कमी धावसंख्या असूनसुद्धा पाकड्यांची ७ बाद १६२ इतकी वाईट अवस्था झाली होती. परंतु नंतर अत्यंत गचाळ क्षेत्ररक्षणामुळे ते हरले. मलिंगाच्या गोलंदाजीवर थिसारा परेराने मिडऑनला सर्फराजचा अत्यंत सोपा झेल सोडला व तोच सामन्याचा निर्णायक क्षण ठरला. झेल सोडल्यानंतर कधी नव्हे तो मलिंगा अतिशय संतापलेला दिसला. मलिंगाच्याच पुढच्याच षटकात सर्फराजचा अजून एक काहीसा अवघड झेल सुटला. त्याच बरोबर एका विनाकारण केलेल्या ओव्हरथ्रोच्या ४अतिरिक्त धावा पाकड्यांना मिळाल्या. अजून एका चेंडूवर यष्टीरक्षकाला चेंडू नीट पकडता न आल्याने त्याच्या पायाला लागून ४ लेगबाईज मिळाल्या. लंकेकडे एकही फिरकी गोलंदाज का नव्हता हे समजले नाही. एकंदरीत गोलंदाजांनी लंकेला विजयासमीप नेऊन ठेवले होते. परंतु अत्यंत खराब क्षेत्ररक्षणामुळे लंकेला हरावे लागले.

कालच लिहिल्याप्रमाणे मलिंगाच्या गोलंदाजीत आता दम राहिलेला नाही. त्याचा वेग खूप कमी झाला आहे व त्याचे यॉर्करसुद्धा आता पडत नाहीत. ३-४ वर्षांपूर्वीचा मलिंगा काल असता तर त्याने यॉर्कर टाकून तळाच्या फलंदाजांचा त्रिफळा उद्धस्त करून सामना जिंकून दिला असता.

उद्या इंग्लंड वि. पाकडे व परवा भारत वि. बांगला हे उपांत्य फेरीचे सामने आहेत. पाकडे व बांगला अनपेक्षितरित्या उपांत्य फेरीत आले आहेत. अंतिम फेरी भारत वि. इंग्लंड किंवा भारत वि. पाकडे किंवा इंग्लंड वि. बांगला किंवा पाकडे वि. बांगला अशी होईल. या शक्यतांमध्ये भारत वि. इंग्लंड हाच अंतिम फेरीचा सामना होण्याची शक्यता सर्वाधिक आहे तर पाकडे वि. बांगला असा सामना होण्याची शक्यता सर्वात कमी आहे. जर अंतिम फेरीत पाकडे व बांगला आले तर तो सामना बघण्याची गरजच नाही.

सतिश गावडे's picture

13 Jun 2017 - 3:07 pm | सतिश गावडे

जर अंतिम फेरीत पाकडे व बांगला आले तर तो सामना बघण्याची गरजच नाही.

असं का बरं?

श्रीगुरुजी's picture

13 Jun 2017 - 3:15 pm | श्रीगुरुजी

कारण दोन्ही संघ/देश अजिबात आवडत नाहीत.

अभिजीत अवलिया's picture

13 Jun 2017 - 6:57 pm | अभिजीत अवलिया

आवड आपली आपली. मला तरी पाकिस्तानचे जलदगती गोलंदाज फार आवडतात. १९९२ साली विश्वचषकाच्या वेळी जेव्हा टी.व्ही. घेतला तेव्हा इम्रान खानला पहिला. इम्रान खान असू दे वा वासिम अक्रम, वकार युनूस, आकिब जावेद असू दे किंवा हल्लीच्या पिढीतले शोएब, सामी किंवा आत्ताचा आमिर. जलदगती गोलंदाजी किती सुंदर आणि भेदक असू शकते हे पाकिस्तानच्या गोलंदाजांना पाहून कळले. वेस्ट इंडिजचा पण दबदबा होता म्हणा पण वॉल्श आणि अँब्रोज निवृत्त झाले आणि आणि तो तोफखाना साध्या लवंगी फटाकडीमध्ये कधी बदलला कळले पण नाही. नाहीतर आमचे आयुष्य कुरुविला, दोड्डा गणेश, हरविंदर सिंग, सलील अंकोला, टिनू योहानन सारखे गोलंदाज बघण्यातच गेले असते. त्यातल्या त्यात आमचा जवागल श्रीनाथ आणि प्रसाद बरे होते म्हणा. पण आपल्या वेगाने समोरच्या फलंदाजाच्या मनात धडकी बसवावी असा एकतरी बॉलर आपल्याकडे व्हायला हवा होता.

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2017 - 6:36 pm | श्रीगुरुजी

पाकड्यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून इंग्लंडला फक्त २११ धावांत रोखले. इंग्लंडची सुद्धा गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे सामना रंगतदार होईल.

श्रीगुरुजी's picture

14 Jun 2017 - 8:09 pm | श्रीगुरुजी

इंग्लंडचे गोलंदाज चांगली गोलंदाजी करून सुरवातीलाच २-३ बळी मिळवून पाकड्यांवर दडपण आणतील असे वाटले होते. परंतु पाकड्यांनी चांगली फलंदाजी करून आतापर्यंत प्रतिषटक जवळपास ६ च्या गतीने धावा करून १५ षटकात ८८ धावा केल्या आहेत. एकंदरीत पाकडे विजयाच्या मार्गावर आहेत.

या स्पर्धेत बहुतेक सर्व सामन्यांचे निकाल मनाविरूद्ध लागले आहेत. जे देश जिंकू नयेत अशी तीव्र इच्छा होती तेच देश जिंकताना दिसतात आणि जे देश जिंकावेत असे तीव्रतेने वाटत होते ते हरताना दिसताहेत.

आजच्या सामन्यावरून अशी भीति वातत आहे की रविवारी कदाचित पाकडे वि. बांगला असा अंतिम सामना नशिबी येईल.

आपल्या नशीबाच्या भागाची फळे........कुठे, कशी आणि कधी भोगायला लागतील, काही सांगता येत नाही.

पण बहूदा "भारत-पाकिस्तान" अशीच फायनल मॅच होईल.

बरीच आर्थिक गणिते "भारत-पाकिस्तान" ह्या मॅच मध्ये होतात.

तेजस आठवले's picture

14 Jun 2017 - 9:40 pm | तेजस आठवले

बरीच आर्थिक गणिते "भारत-पाकिस्तान" ह्या मॅच मध्ये होतात.
+१

ज्या पद्धतीने श्रीलंका पाकिस्तान विरुद्ध हरला त्यावरून "कर्ता करविता तो आहे " बाकी सगळे निमित्तमात्र !

मुक्त विहारि's picture

14 Jun 2017 - 9:45 pm | मुक्त विहारि

+ १

मुक्त विहारि's picture

14 Jun 2017 - 9:46 pm | मुक्त विहारि

पाकडे जिंकले

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2017 - 2:53 pm | श्रीगुरुजी

काल पाकड्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. विशेषतः पाकड्यांच्या मध्यमगती गोलंदाजांनी सातत्याने लेगस्टंपच्या दिशेने यॉर्करचा मारा करून इंग्लंडच्या कोणत्याही फलंदाजाला चेंडू उचलून मारायला संधीच दिली नाही. बेन स्टोक्स सारख्या फटकेबाजाला ६४ चेंडू खेळून एकही चौकार/षटकार न मारता जेमतेम ३२ धावाच करता आल्या यावरून गोलंदाजांच्या अचूकतेची कल्पना येते.

आज बांगलाविरूद्ध भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत प्रथम क्षेत्ररक्षण करणारा संघच बहुसंख्य सामन्यात जिंकला आहे. परंतु स्पर्धेतील १३ पैकी १० सामन्यात माझ्या मनाविरूद्ध निकाल लागल्याने आजच्या सामन्याविषयी मी कोणतेही भाकित करू इच्छित नाही.

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2017 - 2:55 pm | श्रीगुरुजी

पाऊस येत असल्याने नाणेफेक होऊन सुद्धा सामना वेळेवर सुरू होण्याची शक्यता नाही. जर सामना पावसामुळे रद्द झाला किंवा अनिर्णित अवस्थेत संपला तर प्राथमिक फेरीत भारताची निव्वळ धावगती व गुण बांगलापेक्षा जास्त असल्याने भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल.

अनन्त्_यात्री's picture

15 Jun 2017 - 3:05 pm | अनन्त्_यात्री

.. चा॓गला दोरख॑ड पायजे.

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2017 - 3:40 pm | श्रीगुरुजी

बांगला ७ षटकांत ३१/२

श्रीगुरुजी's picture

15 Jun 2017 - 8:06 pm | श्रीगुरुजी

बांगला २६४/७. भारत १६ षटकांत ९९/१.

मुक्त विहारि's picture

15 Jun 2017 - 9:56 pm | मुक्त विहारि

भारत जिंकला

तुषार काळभोर's picture

18 Jun 2017 - 6:05 pm | तुषार काळभोर

आयसीसी प्रमुख, स्टार प्रमुख, पेप्सी प्रमुख सर्व जण एकत्र बसून अंतिम सामना बघताहेत.
That explains...

धर्मराजमुटके's picture

18 Jun 2017 - 11:04 pm | धर्मराजमुटके

भंगारेस्ट सामना ऑफ इन माय होल लाईफ !
हार्दिकने खरे तर जाडेजाला बॅटने हाणला पाहिजे होता !
हार्दिक आणि भुवनेश्वर च्या जिद्दिची तारीफ केली पाहिजे. सगळे हाराकिरी करत असताना यांनी अनुक्रमे फलंदाजी आणि गोलंदाजीचा आनंद दिला.

धर्मराजमुटके's picture

18 Jun 2017 - 11:06 pm | धर्मराजमुटके

टायपो झाला आहे पहिल्या वाक्यात. वाचक राग समजुन घेतील.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2017 - 2:43 pm | श्रीगुरुजी

रविवारी १८ जून रोजी ओव्हल मैदानावर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून दारूण पराभव झाला. १७ जून पासून कालपर्यंत बराच वेळ मिपा बंद असल्याने किंवा नीट चालत नसल्याने सामन्याआधी किंवा सामन्यानंतर सामन्याविषयी काहीच लिहिता आले नाही. आता इतक्या उशीरा ३ दिवसानंतर सामन्याविषयी काहीही लिहिण्यात अर्थ नाही.

असो. कालच कुंबळेने भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहली व इतर काही खेळाडूंचे व कुंबळेचे पटत नव्हते असे मागील महिन्यापासून वृत्त येत होतेच. कुंबळेला प्रशिक्षक पदाची मुदतवाढ देण्याऐवजी प्रशिक्षक पदासाठी नव्याने अर्ज मागविले गेले तेव्हाच कुंबळेला घालविण्याची तयारी अधिकृतरित्या सुरू झाली होती. आता त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भारताचा प्रशिक्षक होण्याची रवी शास्त्रीला तीव्र इच्छा होती. कोहलीला देखील तोच हवा होता कारण पोलिटिकली करेक्ट वागून कोणाशी वाकड्यात न जाता आपला मतलब साधून घेण्यात शास्त्री वाकबगार आहे. तो कधी समालोचक असतो तर कधी संघाचा व्यवस्थापक असतो. आता कदाचित तो प्रशिक्षकही होईल. तो कायमच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा नीलाक्षपुत्र राहिलेला आहे कारण तो मंडळाच्या विरूद्ध कधीही जात नाही. कुंबळेच्या तुलनेत शास्त्रीची कारकीर्द अतिसामान्य आहे. कुंबळे हा अत्यंत प्रामाणिक व मेहनती खेळाडू म्हणून ओळखला जातो. तो कोणत्याही वादात कधीही अडकलेला नाही. सभ्य खेळाडूंची कर्नाटकची परंपरा आहे. कुंबळेच्या पूर्वी गुंडाप्पा विश्वनाथ, चंद्रशेखर भागवत, इरापल्ली प्रसन्ना इ. कर्नाटकचे खेळाडू नको इतके सभ्य होते. कुंबळेसुद्धा त्याच परंपरेतला आहे. आपल्या कडक कार्यपद्धतीवर कोहली व इतर काही खेळाडू नाराज आहेत हे लक्षात आल्यानंतर तो सभ्यपणे स्वत:हूनच बाहेर पडला आहे.

श्रीगुरुजी's picture

21 Jun 2017 - 2:45 pm | श्रीगुरुजी

कुंबळेला अशा वाईट पद्धतीने बाहेर जावे लागल्याबद्दल गावसकरने तीव्र शब्दात टीका केली आहे.

http://www.loksatta.com/krida-news/anil-kumble-resigned-sunil-gavaskar-a...

कोहलीचे म्हणणे ऐकून न घेताच कुंबळेची पाठराखण करण्यासाठी मीडिया अशा प्रकारे भरमिस्ट बातम्या कशा काय देऊ शकतात? वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया वर तर बोलायलाच नको.

मागच्या वर्षी भारतीय संघाचा उंच होत चाललेला आलेखाचे बरेचशे श्रेय विराट कोहली आणि त्याच्या टीम मेट्स ला जाते. कुंबळेचा त्यातील योगदान माध्यमात चर्चिलेला दिसलं नव्हता. मग आताच माध्यमांना कुंबळे विषयी एवढा पुळका का आला असावा.
मला मान्य आहे की कोहली थोडा आक्रमक आणि फटकाळ आहे. हा त्याचा व्यक्ती दोष असू शकतो पण त्याचा फायदा पण झाला आहे. कुंबळे शिस्त आणि अनुशासन च्या नावाखाली क्रिकेट संघ चालवण्या ऐवजी शाळा चालवत असावा असं माझे मत आहे.

http://www.loksatta.com/krida-news/indian-caption-virat-kohli-change-the...

श्रीगुरुजी's picture

3 Jul 2017 - 11:21 pm | श्रीगुरुजी

काल वेस्ट इंडिजने भारताला एकदिवसीय सामन्यात हरविले. मागील एक महिन्यात भारताला तळाच्या तीन संघांकडून पराभव पत्करावा लागला आहे (७ व्या क्रमांकावरीर श्रीलंका, ८ व्या क्रमांकावरील पाकडे व ९ व्या क्रमांकावरील विंडिज). या तीनही सामन्यात कोहली पूर्ण अपयशी ठरला होता.

गामा पैलवान's picture

4 Jul 2017 - 5:42 pm | गामा पैलवान

विशुमित व श्रीगुरुजी,

माझ्या मते भारत पाक सामन्यात भारताने जाणूनबुजून हार पत्करली आहे. पाकी क्रिकेटास संजीवनी देण्यासाठी पाकने एखादी स्पर्धा जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा प्रतिस्पर्धी भारत असेल तर दुधांत साखरंच जणू.

यावरून लक्ष हटवण्यासाठी कोहली विरुद्ध कुंबळे हा वाद नाहक रंगवण्यात येत आहे. कुंबळेसारखा माणूस निकालनिश्चितीसाठी सोयीस्कर नाही. भारत खरोखरीच कमजोर खेळला हे दाखवण्यासाठी जणू परवाचा सामना अवघ्या १९० चं लक्ष्य असूनही हरण्यात आला. धोनीची महामंद खेळी (=सुपरस्लो इनिंग) याचसाठी होती.

आ.न.,
-गा.पै.

विशुमित's picture

4 Jul 2017 - 5:57 pm | विशुमित

कोणती ही अधिकृत आणि खात्रीलायक माहिती नसताना एखाद्याच्या निष्ठेवर शंका व्यक्त करणे कसे काय जमते बुवा लोकांना.
कालच्या सामन्यानंतर धोनीच्या डोळ्यात तरळले पाणी त्याच्या निष्ठे बाबत बरेच काही सांगून गेले.

कुंबळेची तळी उचलण्यासाठी ह्या नवीन दमाच्या खेळाडूंचे खच्चीकरण करणे नाही आवडले.

दशानन's picture

4 Jul 2017 - 6:12 pm | दशानन

सहमत!

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2017 - 2:47 pm | श्रीगुरुजी

तो सामना अजिबात फिक्स नव्हता.

अर्थात कुंबळेची तळी उचलण्याचा व सामना फिक्स आहे असे आरोप करण्याचा काहीही संबंध नाही.

श्रीगुरुजी's picture

5 Jul 2017 - 2:41 pm | श्रीगुरुजी

माझ्या मते भारत पाक सामन्यात भारताने जाणूनबुजून हार पत्करली आहे.

हे कोणी सांगितलं?

पाकी क्रिकेटास संजीवनी देण्यासाठी पाकने एखादी स्पर्धा जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा प्रतिस्पर्धी भारत असेल तर दुधांत साखरंच जणू.

पाकी क्रिकेटला संजीवनी हवी आहे हे कोणी सांगितलं? कशासाठी पाकी क्रिकेटला संजीवनी हवी आहे? पाकिस्तानमध्ये जानेवारी २००९ पासून (झिंबाब्वेच्या ३ एकदिवसीय सामन्यांचा अपवाद वगळता) कोणत्याही देशाच्या संघाने पाऊल ठेवलेले नाही. जरी या विजयामुळे पाकी क्रिकेटला संजीवनी मिळाली असे क्षणभर गृहित धरले तरी पाकिस्तानमध्ये कोणताही संघ पाऊल ठेवत नसल्याने या संजीवनीचा शष्प फायदा नाही.

यावरून लक्ष हटवण्यासाठी कोहली विरुद्ध कुंबळे हा वाद नाहक रंगवण्यात येत आहे. कुंबळेसारखा माणूस निकालनिश्चितीसाठी सोयीस्कर नाही. भारत खरोखरीच कमजोर खेळला हे दाखवण्यासाठी जणू परवाचा सामना अवघ्या १९० चं लक्ष्य असूनही हरण्यात आला. धोनीची महामंद खेळी (=सुपरस्लो इनिंग) याचसाठी होती.

कोहली-कुंबळे हा वाद पूर्ण वेगळा आहे. कोहली डोक्याने भडकू व उर्मट आहे. कुंबळे जुन्या पिढीतला सभ्य खेळाडू आहे. कुंबळे व कोहली ही दोन टोके आहेत. अशा माणसांचे एकमेकांशी जमणे अवघड आहे. कुंबळे कर्नाटकचा खेळाडू होता. भारतीय क्रिकेटचा इतिहास पाहिला तर कर्नाटकचे बरेचसे खेळाडू अत्यंत सभ्य व शांत होते (उदा. गुंडाप्पा विश्वनाथ, द्रविड, चंद्रशेखर, प्रसन्ना, कुंबळे इ.). अशा स्वभावाचे खेळाडू वागणुकीत आक्रमकता दाखवित नाहीत. त्यामुळेच कर्नाटकचा कोणताही खेळाडू दीर्घकाळ भारताचा कर्णधार होऊ शकला नाही. गुंडाप्पा विश्वनाथ फक्त २ कसोटी सामन्यात कर्णधार होता. कुंबळे जेमतेम १ वर्ष कर्णधार होता. द्रविड जेमतेम ५-६ महिने कर्णधारपदावर टिकला. कोहलीसारख्या आक्रमक खेळाडूसमोर कुंबळेचे फारसे चालू शकले नाही. कोहलीला कुंबळेची शिस्त नको आहे. त्यामुळे त्याने आपल्या पूर्वसुरींप्रमाणे स्वतःहून बाजूला व्हायचा निर्णय घेतला.

रवी शास्त्री हा एकदम वेगळा आहे. तो कायम पोलिटिकली करेक्ट भूमिका घेतो. तो भारतीय संघात असताना सुद्धा संघाला विजयी करण्याऐवजी कूर्मगतीने फलंदाजी करून स्वतः बाद न होता स्वतःच्या धावा कशा वाढतील यासाठी प्रयत्नशील असायचा. वेगवेगळ्या लोकांशी कसे जमवून घ्यायचे ही कला त्याच्याकडे आहे. म्हणूनच तो गेली अनेक वर्षे समालोचक, संघ व्यवस्थापक इ. भूमिकेतून संघाशी संबंधित आहे. भारताच्या प्रशिक्षक पदासाठी तो पूर्वीपासूनच प्रयत्न करीत आहे. त्याने कोहली व संघातील इतरांशी जमवून घेतले आहे. स्वतः फारसा थोर खेळाडू नसला तरी सर्वांशी जमवून घ्यायचे चातुर्य त्याच्याकडे असल्याने कोहलीला तो हवा आहे.

मुळात चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम सामना फिक्स वगैरे नव्हताच. कोहलीच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती ज्यात भारत अंतिम फेरीत पोहोचला होता. आपल्या नेतृत्वाखालील पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा कोहली जाणूनबुजून हरणे शक्य नाही. त्या सामन्यात पूर्ण नवीन खेळपट्टी वापरण्यात आली होती व ती एकदम सपाट होती. त्यावर भरपूर धावा होणे अपेक्षित होते. त्यामुळे भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करावयास हवी होती. परंतु त्या स्पर्धेतील १४ पैकी १० सामने धावांचा पाठलाग करणार्‍या संघाने जिंकले होते. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण करणे हा तसा चुकीचा निर्णय नव्हता. परंतु सपाट खेळपट्टीचा पुरेपूर फायदा पाकड्यांनी उठवून धावांचा डोंगर रचला. बुमराची गोलंदाजी पूर्ण फसली होती. नशीबही बुमराच्या विरूद्ध होते. भारतीय गोलंदाज सपाट खेळपट्टीवर पूर्ण अपयशी ठरले. जेव्हा भारताची फलंदाजी सुरू झाली तेव्हा धावांचे प्रचंड दडपण त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. पाकड्यांनी गोलंदाजी चांगली केली. शेवटी भारत हरला. तो सामना फिक्स वगैरे नसून पाकिस्तान खूप चांगला खेळल्यामुळे भारत हरला.

तो सामना फिक्स होता असे निष्कर्ष काढणार्‍यांचे हसू येते. २०११ मधील पाकड्यांविरूद्धचा उपांत्य फेरीतला सामना भारताने जिंकल्यावर तो फिक्स होता असे निष्कर्ष काही जणांनी काढले होते तर २०१७ मध्ये सामना हरल्यावर तसेच निष्कर्ष काढले जात आहेत. म्हणजे सामना जिंकला तरी फिक्स आणि हरला तरी फिक्स!

परवाचा विंडीजविरूद्धचा सामना तसाच होता. ती खेळपट्टी फलंदाजीसाठी खूप अवघड होती. त्यामुळेच दोन्ही संघांचे फलंदाज धावांसाठी झगडत होते. आवश्यक धावगती फक्त ३.८ असल्याने रहाणे (९१ चेंडूत ६० धावा) व धोनी (११४ चेंडूत ५४ धावा) हे खूप संथ खेळले असे मला वाटत नाही. चेंडू फार उसळत नसल्याने व टप्पा पडल्यावर संथ गतीने येत असल्याने भारतीय फलंदाजांचे फटके चुकून झेल उडत होते. सामना फिक्स वगैरे अजिबात नव्हता.

विशुमित's picture

5 Jul 2017 - 4:52 pm | विशुमित

+1

गामा पैलवान's picture

4 Jul 2017 - 6:47 pm | गामा पैलवान
श्रीगुरुजी's picture

5 Jul 2017 - 2:45 pm | श्रीगुरुजी

चेन्नई सुपरकिंग्जचा मालकच सामने फिक्स करीत होता. धोनीचा फिक्सिंगशी संबंध नव्हता. परंतु त्याला फिक्सिंगची माहिती असण्याची दाट शक्यता आहे. परंतु मनमोहन सिंगांप्रमाणे तो गप्प राहिला. मुळात आयपीएल हा एक व्यावसायिक तमाशा आहे. ते अधिकृत क्रिकेट नाही. व्यावसायिक तमाशामध्ये कोणत्याही मार्गाने नफा कमाविणे हा एकच हेतू असतो व त्यासाठी कोणतेही मार्ग क्षम्य असतात.