क्रिकेट - २

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in क्रिडा जगत
5 Jan 2017 - 2:11 pm

मिपाच्या नवीन आरेखनात क्रिकेटचा पहिला धागा अदृश्य झाला आहे. तो धागा शोधून त्यात प्रतिसाद लिहिला तरी मुख्य पानावर किंवा नंतरच्या पानांवर तो धागा दिसतच नाही. त्यामुळे हा नवीन धागा सुरू करीत आहे.

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

21 Jan 2018 - 8:53 pm | श्रीगुरुजी

लागोपाठ तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा पराभव करून ५ सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या दोन सामन्यात धावांचा यशस्वी पाठलाग केल्यानंतर तिसर्‍या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाला फक्त २८६ धावा करता आल्याने इंग्लंडने १६ धावांनी सामना जिंकला. इंग्लंडचे फलंदाज चांगलेच भरात आहेत. प्रत्येक सामन्यात किमान ३-४ फलंदाज चांगली कामगिरी करतात. जेसन रॉय, अ‍ॅलेक्स हेल्स, बेअरस्टो, जो रूट, जॉस बटलर, मॉर्गन इ. फलंदाज चांगली सांघिक फलंदाजी करीत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नर व स्मिथचा अपवाद वगळता इतर फलंदाज चांगली फलंदाजी करीत आहेत, परंत गोलंदाज मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना रोखण्यात अपयशी ठरले आहेत. मायदेशी खेळत असूनसुद्धा स्टार्क, कमिन्स इ. गोलंदाजांना फारसा सूर सापडलेला नाही.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 2:57 pm | श्रीगुरुजी

भारत वि. दक्षिण आफ्रिका हा तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू झाला. या सामन्यात भारत प्रथम फलंदाजी करीत आहे. नेहमीप्रमाणे भारताची दयनीय अवस्था आहे. सलामीचे मुरली विजय (७) व राहुल (०) बाद झाले असून आता धावसंख्या १९ षटकात २७/२ आहे. कोहलीने आतापर्यंत ३१ चेंडूत नाबाद ११ धावा केल्या असून पुजारा ४६ चेंडू खेळून अजूनही खाते उघडू शकलेला नाही.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 3:02 pm | श्रीगुरुजी

आजच्या सामन्यात रोहित शर्माऐवजी रहाणे व अश्विनऐवजी भुवनेश्वरला घेण्यात आले आहे. पंड्या व पार्थिव पटेलला संघात कायम ठेवण्यात आले आहे. या संघात भारताकडे ५ मध्यमगती गोलंदाज आहेत (भुवनेश्वर, शमी, इशांत शर्मा, बुमराह आणि पंड्या) आणि एकही फिरकी गोलंदाज नाही. भारतीय संघात एकही फिरकी गोलंदाज नसलेला हा बहुतेक पहिलाच कसोटी सामना असावा. तशीच वेळ आली तर मुरली विजयच्या कामचलाऊ फिरकीचा वापर करता येईल.

पुजारा अजूनही शून्यावरच आहे. त्याने तब्बल ५१ चेंडू खेळले आहेत.

विशुमित's picture

24 Jan 2018 - 4:02 pm | विशुमित

<<<पुजारा अजूनही शून्यावरच आहे. त्याने तब्बल ५१ चेंडू खेळले आहेत.>>
==>> तो खरी कसोटी खेळतोय असे प्रतीत होतंय.
चेंडू सोडून देणे किंवा फक्त टोलवणे हे सहनशक्तीचे चांगले प्रदर्शन आहे.
आता न्याहारीची वेळ आहे. ताजेतवाने झाल्यावर स्कोर कार्ड हलते राहील अशी अपेक्षा करतो.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 5:23 pm | श्रीगुरुजी

त्याने बहुतेक धावबाद होण्याचा धसका घेतलाय. पण आता बरा खेळतोय (११२ चेडूंमध्ये नाबाद २१).

आताच कोहली ५४ वर गेला. ९७/३.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 7:21 pm | श्रीगुरुजी

भारताची रडकथा सुरूच आहे. १४४/७.

यष्टीरक्शकाकडे झेल देऊन ५ खेळाडू बाद झाले आहेत.

गामा पैलवान's picture

24 Jan 2018 - 9:17 pm | गामा पैलवान

भारत नाहीये हो. बक्की म्हणा.

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 10:41 pm | श्रीगुरुजी
श्रीगुरुजी's picture

24 Jan 2018 - 9:24 pm | श्रीगुरुजी

भारताचा पहिला डाव जेमतेम १८७ धावांत संपला. कोहली (५४), पुजारा (५०) आणि भुवनेश्वर (३०) वगळता बाकी सर्व फलंदाज पूर्ण अपयशी ठरले. पंड्या आणि शमी अत्यंत बेजबाबदार फटका मारून बाद झाले. कोहली नशीबवान ठरला. त्याचे दोन सोपे झेल सुटले. परंतु अर्धशतकानंतर तो लगेच बाद झाला. रहाणे सुद्धा यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला होता. परंतु फिलँडरचा पाय रेषेच्या जेमतेम १ सेंटिमीटर पुढे असल्याने तो नोबॉल ठरून रहाणे वाचला. अर्थात तो काही वेळात लगेच बाद झाला. यष्टीरक्षक क्विंटन डीकॉकने एकूण ५ झेल घेतले. रहाणेचा सुद्धा झेल त्याच्या नावावर लागला असता. एकंदरीत रहाणेने निराशा केली. बहुतेक अपेक्षांचे दडपण त्याच्यावर आले असावे. पंड्या कसोटी खेळण्यास योग्य नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ५ मध्यमगती गोलंदाज खेळविण्यापेक्षा पंड्याऐवजी जडेजा योग्य ठरला असता.

भुवीने आफ्रिकेच्या मार्करॅमला झटपट बाद करून थोडासा दिला. दिवसाखेर आफ्रिकेने १ बाद ६ धावा केल्या आहेत. सामन्याच्या संपूर्ण काळात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाचा अंदाज आहे. आफ्रिकेला ४ थ्या डावात फलंदाजी करायची असल्याने भारताला सुद्धा संधी आहे.

श्रीगुरुजी's picture

25 Jan 2018 - 10:49 pm | श्रीगुरुजी

तिसरा कसोटी सामना दुसर्‍या दिवसाखेर रंगतदार अवस्थेत आहे. काल भारताचा डाव १८७ धावांवर संपला होता व आफ्रिका १ बाद ६ होती. आज खेळ सुरू झाल्यानंतर डीन एल्गर लगेचच यष्टीरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. परंतु नंतर आलेल्या आमला व नाईट वॉचमन रबाडाने अत्यंत टिच्चून फलंदाजी केली. रबाडा खालच्या फळीतील खेळाडू असून सुद्धा वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर कसे खेळायचे याचा आदर्श त्याने घालून दिला. ऑफस्टंपबाहेरील चेंडू तो अगदी सहज सोडून देत होता. फक्त यष्टीवर आलेलेच चेंडू तो बॅटने खेळत होता व खराब चेंडूंवर त्याने चौकार वसूल केले. बराच वेळ भारतीय गोलंदाजांना निराश केल्यानंतर उपाहाराला काही मिनिटे असताना तो ३० धावांवर बाद झाला. त्यासाठी तो तब्बल ८४ चेंडू खेळला व त्यात ६ चौकार मारले. उपाहाराला आफ्रिकेची धावसंख्या ३ बाद ८२ होती. उपाहारानंतर भारतीय गोलंदाजांना सूर सापडला व बळी मिळायला सुरूवात झाली. शेवटी भारताने आफ्रिकेला १९४ धावातच रोखले. तळाच्या फिलँडरनेही त्रास देऊन ३५ धावा केल्या व आमला ६१ वर बाद झाला. बुमराहने ५ व भुवनेश्वरने ३ बळी घेतले.

आफ्रिकेला फक्त ७ धावांचे आधिक्य मिळाले. सलग पाचव्या डावात भारतीय गोलंदाजांनी प्रतिपक्षाचे सर्व १० फलंदाज बाद केले. दुसर्‍या डावात राहुलऐवजी पटेल सलामीला आला आणि थोड्याच वेळात तंबूत परतला. तिसर्‍या क्रमांकावर पुजाराऐवजी राहुल आला. राहुल व मुरली विजयने दिवसाचा उर्वरीत खेळून काढला. दिवसाखेर भारत १ बाद ४९ या अवस्थेत आहे. भारताकडे ४२ धावांचे आधिक्य आहे व अजून ३ दिवस बाकी आहेत. आफ्रिकेला ४ थ्या डावात फलंदाजी करावी लागणार आहे. भारताने जर २५०+ धावांचे लक्ष्य ठेवले, तर भारत सामना जिंकू शकतो.

गामा पैलवान's picture

26 Jan 2018 - 1:00 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

भारताने जर २५०+ धावांचे लक्ष्य ठेवले, तर भारत सामना जिंकू शकतो.

सहमत. आजून ३ दिवसांचा खेळ बाकी आहे. मला वाटतं की जर बक्कीने दीड दिवस वा २५०+ ची आघाडी जे उशिराने होईल तिथवर मजल मारली तर दाफ्रिकेस चौथ्या डावात तेव्हढ्या धावा करणं अवघड होऊन बसेल.

आ.न.,
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2018 - 2:35 pm | श्रीगुरुजी

तिसरा कसोटी सामना अत्यंत निर्णायक अवस्थेत आहे. सामन्याचे २ दिवस शिल्लक असून आफ्रिकेला ४ थ्या डावात विजयासाठी २४१ धावांची गरज असून तिसर्‍या दिवसाखेर ते १ बाद १७ धावसंख्येवर आहेत. खेळपट्टीवरील बाऊन्स खूप विषम आहे. एखादा चेंडू अचानक जास्त उसळत आहे. काल मुरली विजयला उसळत्या चेंडूचा दोन वेळा प्रसाद मिळाला. रहाणेला देखील दोन वेळा चेंडू लागला. आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना बुमराहचा खेळपट्टीच्या जवळपास मध्यावर टाकलेला चेंडू वेगाने उसळून डीन एल्गरच्या कपाळावर जोरात लागला. हेल्मेटवरील जाळीमुळे तो वाचला. तो बाऊन्सर खरोखर नास्टी या प्रकारातला होता. ३ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फिल ह्युज एका अशाच चेंडूवर जायबंदी होऊन त्यातच त्याचे निधन झाले होते. काल एकूण ३ वेळा पंचांनी खेळपट्टीविषयी चर्चा केली. सामना रद्द होतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु आज खेळ पुढे सुरू करायचे ठरले आहे.

काल ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या ४ थ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडची अवस्था एकवेळ ५ बाद ८ इतकी भीषण होती. परंतु नंतर काहीसा डाव सावरून इंग्लंडने ५० षटकात १९६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने झगडून ७ गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार करून सामना जिंकला. १९८३ च्या विश्वचषकात झिंबाब्वेविरूद्ध भारत एकवेळ ५ बात १७ अशा अवस्थेत होता. परंतु नंतर कपिलदेवने बदाबदा मारून १५० चेंडूत १७५ धावा करून भारताला ६० षटकात २६६ अशा सुस्थितीत पोचवून नंतर सामना जिंकला होता.

विशुमित's picture

27 Jan 2018 - 6:02 pm | विशुमित

भारतीय संघ सामना गमावतोय बहुतेक. ११० चा आकडा क्रॉस करून आफ्रिकेची फक्त एकच विकेट गेली आहे.
एक स्पिनर पाहिजे होता हे तुमच्या मताशी सहमत.
हार्दिक ने आताशी बॉलिंग टाकायला घेतली आहे. नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी त्याला ह्या कसोटी संघात घेतले आहे हे समजत नाही.

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2018 - 6:53 pm | श्रीगुरुजी

१३५/३

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2018 - 8:10 pm | श्रीगुरुजी

१५७/६

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2018 - 10:16 pm | श्रीगुरुजी

शेवटी ६३ धावांनी जिंकलो.

श्रीगुरुजी's picture

28 Jan 2018 - 11:11 pm | श्रीगुरुजी

भारताने काल झगडून तिसरा कसोटी सामना जिंकला. खूपच रोमांचक सामना झाला. चौथ्या दिवशी १७/१ अशा धावसंख्येवरून आफ्रिकेने खेळ सुरू केल्यानंतर पहिल्या तीन दिवसांप्रमाणे झटपट फलंदाज बाद होतील ही अपेक्षा होती. परंतु डीन एल्गर आणि आमला यांनी अतिशय टिच्चून खेळ करून भारतीय गोलंदाजांची निराशा केली. १ बाद ५ वरून त्यांनी धावसंख्या तब्बल १२४ पर्यंत नेल्यानंतर आता आफ्रिका सहज सामना जिंकणार असे वाटून निराश झालो. चौथ्या दिवशी खेळपट्टीने अचानक स्वरूप बदलून फलंदाजांना मदत करायला सुरूवात केली.

उपाहारानंतर एक तासानंतर सुद्धा फलंदाज अगदी सहज खेळत होते. १२४/१ अशी धावसंख्या असताना इशांत शर्माचा पायावर आलेला एक चेंडू आमलाने लेगसाईडला खेळला. परंतु त्याला तो जमिनीवर ठेवता आला नाही. किंचित जमिनीच्या वर असलेला चेंडू शॉर्ट मिडविकेटला उभ्या असलेल्या पंड्याने उजव्या बाजूला खूप खाली अतिशय चपळाईने झेल घेतला. त्या अत्यंत उत्कृष्ट झेलामुळे आमला बाद झाला व सामन्याचा तोच टर्निंग पॉईंट ठरला. नंतर आलेला डी व्हिलिअर्स लगेचच स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला आणि आफ्रिकेची गळती सुरू झाली. पुढच्या सर्व फलंदाजांनी जेमतेम हजेरी लावली. एल्गरने एका बाजूने एकट्याने किल्ला लढवित नाबाद ८६ धावा केल्या. परंतु आफ्रिकेचा डाव १७७ मध्ये संपून भारताने ६३ धावांनी विजय मिळविला. भारताने आफ्रिकेत जिंकलेला हा तिसरा कसोटी सामना.

- ही मालिका अतिशय उत्कृष्ट झाली. संपूर्ण मालिकेवर मध्यमगती गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले. दोन्ही संघांनी एकूण १२ डाव फलंदाजी केली. दुसर्‍या कसोटीत आफ्रिकेने पहिल्या डावात केलेल्या ३३५ धावा या संपूर्ण मालिकेतील एका डावातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.

- संपूर्ण मालिकेत फक्त १ शतक नोंदविले गेले. कोहलीने दुसर्‍या कसोटीतील पहिल्या डावात केलेल्या १५३ धावा हे मालिकेतील एकमेव शतक.

- संपूर्ण मालिकेतील १२ डावात दोन्ही संघातील सर्व फलंदाजांनी मिळून फक्त १३ अर्धशतके केली व केवळ १ शतक झाले. आफ्रिकेतर्फे आमलाने ३, डीन एल्गरने २, फाफडूने २, डीव्हिलर्सने २ व मार्करॅमने १ अर्धशतक केले. भारतातर्फे कोहलीने १ शतक व १ अर्धशतक केले आणि पंड्या व पुजाराने प्रत्येकी १ अर्धशतक केले. ३ कसोटी सामन्यातील एकूण ६ डावात भारतीय फलंदाजांना फक्त ३ अर्धशतके व फक्त १ शतक करता आले यावरून या मालिकेतील गोलंदाजांच्या वर्चस्वाची कल्पना येईल.

- तिसर्‍या कसोटीत भारताने एकही फिरकी गोलंदाज न खेळविता तब्बल ५ मध्यमगती गोलंदाज खेळविले. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच फिरकी गोलंदाजांविना भारत खेळला असावा.

- भारताने सर्व ६ डावात प्रतिपक्षाच्या सर्व १० फलंदाजांना बाद केले. हा देखील विक्रम असावा.

- भारतातर्फे शमीने मालिकेत एकूण १५ बळी घेतले. आफ्रिकेतर्फे रबाडा व फिलँडरने देखील प्रत्येकी १५ बळी घेतले.

- मालिकेत कोहलीने सर्वाधिक २८६ धावा केल्या. त्याखालोखाल डीव्हिलर्सने व एल्गरने प्रत्येकी २१५ धावा केल्या.

काहीच्या चुकीच्या संघ निवडीमुळे भारताला पहिले दोन्ही कसोटी सामने गमवावे लागले. रहाणेला पहिल्या दोन सामन्यात न खेळविणे भारताला महाग पडले. दुसर्‍या सामन्यात भुवनेश्वरला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय अनाकलनीय होता. उमेश यादव व जडेजाला एकही सामना खेळविला नाही. मुरली विजय, राहुल, धवन, रोहीत शर्मा, पार्थिव पटेल आणि पंड्या संपूर्ण मालिकेत एखादा अपवाद वगळता पूर्ण अपयशी ठरले. पंड्या व रोहितकडे कसोटी सामन्याचे टेंपरामेंट नाही असे दिसत आहे.

एकंदरीत खूप छान मालिका झाली. खूप चांगले क्रिकेट बघायला मिळाले. आता १ फेब्रुवारीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत ६ एकदिवसीय सामने व ३ ट-२० सामने खेळले जातील.

दुसरीकडे आज इंग्लंडने ५ व्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पुन्हा एकदा पराभव करून मालिका ४-१ अशी जिंकली. इंग्लंडच्या २५९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव भक्कम स्थितीतून २४७ धावांवर संपला.

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2018 - 3:32 pm | श्रीगुरुजी

आज दुपारी ४:३० पासून द. आफ्रिका व भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना डर्बन येथे खेळला जाणार आहे. दुपारी काही वेळ पाऊस येण्याची शक्यता आहे. भारताने यापूर्वी आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या २८ पैकी फक्त ५ सामने जिंकले आहेत. डर्बनमध्ये आजतगायत भारत जिंकलेला नाही.

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2018 - 8:26 pm | श्रीगुरुजी

आफ्रिकेने ५० षटकात २६९/८ धावा केल्या. फाफडूने ११२ चेंडूत १२० धावा केल्या. फाफडू व्यतिरिक्त डी कॉक (३४), मॉरिस (३७) आणि फेहलुकवायो (२७) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. भारतीय गोलंदाजांनी चांंगली गोलंदाजी केली. कुपदीप यादवने १० षटकात केवळ ३४ धावा देऊन ३ बळी घेतले. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाची सरासरी धावसंख्या २९५ इतकी आहे. त्या तुलनेत २६९ हे सोपे आव्हान आहे.

२६९ हा आकडा भारतासाठी शुभ नाही. त्यामुळे पाल चुकचुकते आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2018 - 4:58 pm | श्रीगुरुजी

पहिला एकदिवसीय सामना भारताने २७ चेडू व ६ गडी राखून अगदी सहज जिंकला.

उद्या सकाळी ६:३० पासून भारत वि. ऑस्ट्रेलिया यांच्यात १९ वर्षाखालील संघांच्या विश्वचषकातील अंतिम सामना आहे.

विशुमित's picture

2 Feb 2018 - 5:30 pm | विशुमित

शुभ अशुभ चा काही परिणाम झालेल्या दिसत नाही. मेहनत केली तर सर्व काही मिळू शकते हे दिसून आले.
विराट मस्त खेळला यात वादच नाही पण राहणे च्या शॉट्स ने डोळ्याचे पारणे फेडले.

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2018 - 10:57 am | श्रीगुरुजी

AUS19 - सर्वबाद २१६

IND19 - २३/० (४)

गामा पैलवान's picture

3 Feb 2018 - 1:31 pm | गामा पैलवान

जितबो रे!

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

3 Feb 2018 - 3:03 pm | श्रीगुरुजी

मस्त जिंकले. या संघातून २०१९ च्या विश्वचषकासाठी २-३ चांगले खेळाडू मिळावेत.

श्रीगुरुजी's picture

4 Feb 2018 - 7:48 pm | श्रीगुरुजी

भारताने आज खेळला द. आफ्रिकेविरूद्धचा दुसरा एकदिवसीय सामना अगदी सहज जिंकून २-० अशी आघाडी घेतली. डी व्हिलिअर्स, फाफ डू आणि डेल स्टेनच्या अनुपस्थितीत खेळणार्‍या आफ्रिकेचा डाव फक्त ११८ धावात संपल्यावर भारताने फक्त एक गडी गमावून निर्धारीत लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. चहलने ५ व कुलदीप यादवने ३ बळी घेतले. आफ्रिकेचे फलंदाज फिरकीसमोर पूर्णपणे चाचपडत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेलेल्या इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिका ०-४ अशी गमाविली परंतु एकदिवसीय सामन्यांची मालिका ४-१ अशी मोठ्या फरकाने जिंकली. आफ्रिकेच्या दौर्‍यावर असलेल्या भारताने कसोटी मालिका १-२ अशी गमाविली परंतु पहिले दोन्ही एकदिवसीय सामने जिंकले आहेत.

राखीव खेळाडू's picture

5 Feb 2018 - 12:57 pm | राखीव खेळाडू

#SAvsIND - #ODISeries, #ODI02 - #Inning01

Outstanding work by Men in Blue.. After winning the toss and skipper electing to bowl first, they started decently in Power play but after spinners from both the end started operating it was similar output like last game..

South Africa playing without ABD was 75% of their capacity and in addition to that last match centurion and Skipper Faf also ruled out from this game due to injury.

Though they have balanced unit batsmen were not having any clue against spinning duo of India... These 2 are not just picking wickets but making sure run rate is also on lower side.. Usually we have seen spinners especially wristy one goes for plenty and take wickets but these 2 are doing absolutely right things and result is outstanding... Today Yazuvendra Chahal took 5 wickets and gave away just 22 runs in 8 overs which was supported by Kuldeep Yadav who too 3 wickets.. Home team bundled out on just 118 runs in 32.2 overs..

119 runs to win for visitors and looks like they will take a lead of 2-0 in this 6 match ODI series.

श्रीगुरुजी's picture

7 Mar 2018 - 7:28 pm | श्रीगुरुजी

क्रिकेटच्या इतिहासात आज एक जबरदस्त एकदिवसीय सामना पार पडला.

न्यूझीलँडच्या दौर्‍यावर असलेल्या इंग्लडविरूद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ५० षटकांत ३३५/९ असा धावांचा डोंगर रचला. त्यात बेअरस्टो (१०६ चेंडूत १३८) आणि जो रूट (१०१ चेंडूत १०२) यांचा प्रमुख वाटा होता. ३३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलँडची सुरूवात अत्यंत वाईट झाली. कॉलिन मुन्रो व त्यापाठोपाठ गप्टिल लवकर बाद झाल्याने २.४ षटकांत २ बाद ४ अशी किवींची वाईट अवस्था झाली. परंतु नंतर केन विल्यमसन् व रॉस टेलरने डाव सावरला. त्यांनी वेगाने धावा करण्यास सुरूवात केली. परंतु १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विल्यमनसन् ४८ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला (८६/३). त्यानंतर टेलरला साथ देण्यास लॅथम आला व दोघांनी जोरदार मारायला सुरूवात केली. ४२ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लॅथम ६७ चेंडूत ७१ धावा करून बाद झाला (२७३/४). टेलर व लॅथमने १५५ चेंडूत १८७ धावांची वेगवान भागीदारी करून किवीजना सुस्थितीत नेले. नंतर फटकेबाज ग्रँडहोम आला. त्यानेही वेगवान धावा करून टेलरला साथ दिली व १२ चेंडूत २३ धावा केल्या. शेवटी ४९.३ षटकात ५ बाद ३३९ धावा करून किवीजने सामना जिंकला. सामनावीर टेलरने १७ चौकार व ६ षटकारांच्या सहाय्याने १४७ चेंडूत नाबाद १८१ धावा केल्या.

http://www.espncricinfo.com/series/10883/scorecard/1115778/new-zealand-v...

उद्या ८ मार्चला टेलरचा ३४ वा वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला टेलरने स्वतःला व असंख्य क्रिकेटप्रेमींना जबरदस्त भेट दिली.

या सामन्यामुळे बरोबर ७ वर्षांपूर्वी ८ मार्च २०११ या दिवशी २०११ मधील विश्वचषक स्पर्धेतील कँडी येथे खेळला गेलेला पाकिस्तान वि. न्यूझीलँड हा सामना आठवला. या सामन्यात न्यूझीलँडची प्रथम फलंदाजी होती. न्यूझीलँडची सुरूवात तशी संथ होती. ४६ वे षटक संपले तेव्हा न्यूझीलँडची धावसंख्या ६ बाद २१० इतकीच होती. टेलर ७६ (१११) व नुकताच आलेला जेकब ओराम ० (१) खेळपट्टीवर होते.

नंतर अक्षरशः झंझावात सुरू झाला. पुढील ४ षटकांत न्यूझीलँडने २८, १५, ३० व १९ अशा एकूण ९२ धावा चोपल्या. त्यात ६ चौकार व ९ षटकारांचा समावेश होता. त्या २४ चेंडूतील १३ चेंडू टेलर खेळला व त्याने फक्त १३ चेंडूत ५५ धावा चोपल्या. ओरामने ८ चेंडूत २५ धावा व कायल मिल्सने ३ चेंडूत ७ धावा केल्या. टेलर १२४ चेंडूत १३१ धावा करून नाबाद राहिला. ५० षटकांत किवीजने ३०२/७ अशी चांगली धावसंख्या गाठली. नंतर पाकिस्तानचा डाव १९२ मध्ये संपवून किवीजने तब्बल ११० धावांनी विजय मिळविला.

८ मार्च २०११ ला आपल्या २७ व्या वाढदिवसाच्याच दिवशी जबरदस्त कामगिरी केली होती. आज आपल्या ३४ व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याने त्यापेक्षाही मोठी कामगिरी केली.

http://www.espncricinfo.com/series/8039/scorecard/433581/New-Zealand-vs-...

श्रीगुरुजी's picture

26 Apr 2018 - 10:40 pm | श्रीगुरुजी

www.loksatta.com/krida-news/here-is-complete-schedule-of-indian-team-in-...

अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या २०१९ क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक आज आयसीसीने जाहीर केलं आहे. आगामी वर्षात इंग्लंडमध्ये हा विश्वचषक खेळवला जाणार आहे. बुधवारी ESPNCricinfo या संकेतस्थळावर विश्वचषकाचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं होतं. मात्र आयसीसीने आज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक जाहीर करत क्रीडा रसिकांच्या उत्सुकतेला पूर्णविराम दिला आहे,
या स्पर्धेत भारताचा सलामीचा सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे, तर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भारत १६ जुनला मैदानात उतरणार आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेतले सामने हे रॉबिन-राऊंड पद्धतीने खेळवले जाणार आहे. या प्रकारात प्रत्येक संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्याविरोधात एक सामना खेळणार आहे. यानंतर सर्वोत्तम ४ संघ उपांत्य फेरीत दाखल होणार आहेत.
२०१९ विश्वचषकाचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे –
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ जून
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ९ जून
भारत विरुद्ध न्यूझीलंड – १३ जून
भारत विरुद्ध पाकिस्तान – १६ जून
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – २२ जून
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – २७ जून
भारत विरुद्ध इंग्लंड – ३० जून
भारत विरुद्ध बांगलादेश – २ जुलै

ही स्पर्धा १९९२ च्या स्पर्धेप्रमाणे खेळली जाईल. दोन मुख्य फरक म्हणजे यावेळी ९ ऐवजी १० संघ असतील आणि झिंबाब्वेऐवजी अफगाणिस्तान खेळेल व बांगलादेश हा अधिकचा संघ असेल.

अजून एक महत्त्वाची घडामोड म्हणजे भारतात २०२१ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी टी-२० वर्ल्डकप आयोजित करण्याचा निर्णय आज आयसीसीने घेतला असून या निर्णयाने चॅम्पियन्स ट्रॉफीलाही अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

२०२१ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी न खेळवता त्याजागी १६ संघांमध्ये टी-२० वर्ल्डकप खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयसीसी ने गेल्या महिन्याभरात काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे सर्व आयसीसी मेंबर्सना आंतरराष्ट्रीय टी २० चा दर्जा देणे! येत्या १ जुलै पासून सर्व महिला संघ तर १ जानेवारीपासून सर्व पुरुष संघांचे टी२० सामने आता आंतराष्ट्रीय गणले जातील. म्हणजे सर्व १०४ देशांना आता एकमेकांविरूद्ध खेळता येईल.

थोडक्यात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार्‍या देशांची संख्या आता १२-१६ न रहाता १०४ होईल.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_International_Cricket_Council_memb...

गामा पैलवान's picture

18 Jun 2018 - 9:49 pm | गामा पैलवान

पहिली कसोटी विंडीज ने दिमाखात जिंकल्यावर दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेस सूर गवसला आहे. शेवटल्या दिवशी विंडीजला सुमारे नव्वदेक षटकांत २९६ चं लक्ष्य गाठायचं आहे. सध्या उपाहारावेळी ३ बाद ५५ धावसंख्या असून रोस्टन चेस तंबूत जखमी आहे. २४१ धावा ७ गडी व ६९ षटके व पावसाचा मागमूसही नाही, अशी स्थिती आहे. श्रीलंका सहज जिंकू शकते. विंडीजला ३.५ च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. चौथ्या डावांत चिवट फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला क्रेग ब्रेथवेट आजूनही खेळतोय.

-गा.पै.

गामा पैलवान's picture

18 Jun 2018 - 10:58 pm | गामा पैलवान

रोस्टन चेस बाद झालेला आहे. तंबूत जखमी शई होप आहे. तो परत आला असून ४ बाद ६९ धावसंख्या आहे. विंडीजला सामना वाचवायच्या मागे लागलं पाहिजे असं दिसतंय.

चुकीबद्दल क्षमस्व.

-गा.पै.

नॉटिंगमच्या एक दिवसीय सामन्यात इंग्लंड पहिल्या डावात ४८१/६. थोड्या निष्काळजीपणामुळे बली गेले. अन्यथा ५०० मारलेच होते.

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

7 Feb 2021 - 11:49 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड -भारत मालिकेसाठी वेगळा धागा असल्याने इतर सामन्यांसाठी हा धागा जागा करतोय.

आज विंडीज-बांगलादेश यांच्यात बांगलादेशात सुरू असलेला दुसरा कसोटी सामना अत्यंत रोमहर्षक अवस्थेत संपला व त्यात विंडीजने विजय मिळविला.

विंडीजने या मालिकेत जवळपास संपूर्ण नवीन संघ खेळविला आहे कारण त्यांचे बहुसंख्य नियमित खेळाडू इतरत्र खेळण्यात व्यग्र आहेत. बांगलाने प्रथम फलंदाजी करून ४३० धावा केल्यानंतर विंडीजचा पहिला डाव २५९ धावांवर संपला. बांगलाने चौथ्या दिवशी दुसरा डाव २२३/८ वर घोषित करून विजयासाठी ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले. अननुभवी विंडीजसाठी हे लक्ष्य अशक्यप्राय होते. दुसऱ्या डावात विंडीजची अवस्था ५९/३ अशी होऊन दिवसाखेर ११०/३ वर खेळ संपला. पाचव्या दिवशी बॉनेर व कायल मेयर्स यांनी डाव पुढे सुरू केला व भक्कम भागीदारी सुरू झाली. या दोघांचाही हा पदार्पणाचा सामना होता. चौथ्या गड्यासाठी तब्बल २१६ धावांची भागीदारी करून बॉनेर ८६ धावांवर बाद झाला तेव्हा मेयर्सचे शतक पूर्ण होऊन गेले होते. नंतर आलेला ब्लॅकवूड सुद्धा लगेच बाद झाला तेव्हा धावसंख्या २९२/५ होती व सुमारे २७ षटके शिल्लक होती. नंतर आलेल्या जॉशुआ डिसिल्वाने एक बाजू लावून धरली व मेयर्सने मारामारी सुरू केली. दोघांनी वतकी भागीदारी केली त्यात डिसिल्वाचा वाटा फक्त २० धावांचा होता. शेवटी विंडीजने ३९५/७ करून अशक्यप्राय सामना जिंकला. ३१० चेंडूत २० चौकार व ७ षटकार मारून २१० धावांवर मेयर्स नाबाद राहिला. पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या डावात द्विशतक करणारा हा पहिलाच फलंदाज.

दुसरीकडे पाकडे-आफ्रिका यांच्यातील पाकिस्तानमध्ये सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत आहे. पहिल्या डावात २७२ धावा करणाऱ्या पाकला आफ्रिकेने २०१ धावा करून उत्तर दिले. चौथ्या दिवशी पाकचा दुसरा डाव २९८ धावांवर संपल्यानंतर दिवसाखेर आफ्रिकेने १२७/१ अशी धावसंख्या केली आहे. विजयासाठी अजून २४३ धावा हव्या आहेत.

श्रीगुरुजी's picture

8 Feb 2021 - 5:08 pm | श्रीगुरुजी

आफ्रिकेने निराशा केली. २४१/३ वरून सर्वबाद २७४ झाल्याने सामना हरले.

श्रीगुरुजी's picture

12 Feb 2021 - 2:51 pm | श्रीगुरुजी

बांगलादेशात विंडीजविरूद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात विंडीजने सर्वबाद ४०९ धावा केल्या. बांगलादेश ६३/२ पर्यंत पोहोचलाय. पहिला कसोटी सामना विंडीजने जिंकला आहे.

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2021 - 8:50 pm | श्रीगुरुजी

बांगला २१३ सर्वबाद. विंडीज १७ धावांनी विजयी. मालिकेतील दोन्ही सामने विंडीजच्या नवोदित संघाने जिंकले. माजोरड्या बांगल्यांना त्यांच्याच देशात विंडीजच्या नवोदितांनी धूळ चारल्याचा अत्यानंद झालाय.

गामा पैलवान's picture

15 Feb 2021 - 3:22 am | गामा पैलवान

मलाही विंडीज जिंकायला हवं होतं. शेवटी ते झालं व मी आनंदलो.
-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

17 Feb 2021 - 11:20 pm | श्रीगुरुजी

दोन महत्त्वाच्या घडामोडी -

३६ वर्षीय फाफ डू प्लेसिने कसोटी क्रिकेट प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. २०१२-१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत पदार्पण करताना ऑस्ट्रेलियातील आपल्या पहिल्या कसोटी सामन्यात ७८ व नाबाद ११० धावा करून आफ्रिकेचा पराभव वाचविल्याने त्याला सामनावीर पुरस्कार मिळाला होता. नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान विरूद्ध कसोटी मालिकेत तो सर्व ४ डावात अपयशी होता. शेवटी त्याने निवृत्ती स्वीकारली.

आफ्रिकेच्याच क्विंटन डी कॉकने मानसिक अस्वास्थ्यामुळे २०२१ मधील आयपीएल मधून माघार घेतली आहे. आफ्रिकन क्रिकेट मंडळाने त्याला काही काळ रजा दिली आहे. खरं तर २०२० मधील आयपीएल मध्ये तो चांगला खेळला होता. परंतु नुकत्याच संपलेल्या पाकिस्तान विरूद्ध कसोटी मालिकेत तो सर्व ४ डावात अपयशी होता.

श्रीगुरुजी's picture

3 Jun 2021 - 8:04 pm | श्रीगुरुजी

इंग्लंड वि. न्यूझीलंड मालिकेतील लॉर्ड्स येथील प्रथम कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉन्वेने पदार्पणाच्या डावात द्विशतक केले.

१८ जून पासून भारत वि. न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामने स्पर्धेतील अंतिम फेरीचा कसोटी सामना होणार आहे. गरज भासल्यास सामना ६ व्या दिवशी सुद्धा खेळविला जाईल.

सौंदाळा's picture

10 Jun 2021 - 8:22 pm | सौंदाळा

सामन्याची वाट बघत आहे,
संघ काय असेल याची खुपच उत्सुकता आहे.
११ खेळाडूंमधे शार्दुल, सिराज, अक्षर, विहारी, शुभमन गिल हे ऑस्ट्रेलियातले हिरो असतील का उमेश, जडेजा/अश्विन, इशांत असतील.
रोहित शर्मा आणि पंत नक्कीच असतील.
इशांत आणि उमेश नसेल (नसावेत) असे वाटतय.

चावटमेला's picture

10 Jun 2021 - 8:11 pm | चावटमेला

पदार्पणातच द्विशतक ठोकणारा शेवटचा खेळाडू बहुतेक मॅथ्यू सिनक्लेअर होता. तो पण न्यूझिलंड चा च

श्रीगुरुजी's picture

10 Jun 2021 - 8:22 pm | श्रीगुरुजी

हो. शिखर धवनला २०१२ मध्ये पदापर्णात द्विशतकाची संधी होती. परंतु तो १८७ वर बाद झाला होता.

श्रीगुरुजी's picture

10 Jul 2021 - 1:13 pm | श्रीगुरुजी

https://twitter.com/anandmahindra/status/1413692543326375938?ref_src=tws...

Absolutely stunning catch by Harleen Deol. No words to describe.

गामा पैलवान's picture

10 Jul 2021 - 1:23 pm | गामा पैलवान

अफलातून झेल आहे. झेल पकडतांना तोल सांभाळण्यासाठी क्षेत्ररक्षकास सीमारेषेबाहेर पाउल ठेवावं लागतं. अशा वेळेस चेंडू परत हवेत उडवून, सीमापार जाऊन, शिस्तीत मैदानात परतून झेल पकडणे म्हणजे समयसूचकतेची कसोटीच. असे झेल पूर्वीही लोकांनी पकडले आहेत. पण हा झेल खास वाटतो कारण परतीचा झेल पकडतांना चेंडू हरलीनच्या अजिबात आवाक्यात नव्हता. त्यासाठी तिला हवेत झेप घ्यावी लागली, जी अतिशय खडतर आहे.

हरलीनचं अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

-गा.पै.

श्रीगुरुजी's picture

10 Jul 2021 - 2:22 pm | श्रीगुरुजी

शिखा पांडेच्या १९ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हरमनप्रीत कौरने शिवरचा अत्यंत प्रेक्षणीय झेल घेतला. नंतर ५ व्या चेंडूवर हरलीन देवलने ऍमी जोन्सचा अत्यंत अविश्वसनीय झेल घेतला. थक्क करणारे हे दोन्ही झेल पहा.

https://twitter.com/BCCIWomen/status/1413602435256422404?ref_src=twsrc%5...

त्याच षटकातल्या ६ व्या चेंडूवर यष्टीरक्षक रिचा घोषने धोनीच्या पद्धतीने डंकलीला क्षणार्धात यष्टीचित केले.

दुर्दैवाने काल या सामन्यात भारताचा पराभव झाला.

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2021 - 10:05 pm | श्रीगुरुजी

भारताचा इंग्लंड दौरा -

आजपासून पहिला कसोटी सामना सुरू झाला आहे. आज पहिल्या दिवशी इंग्लंड सर्वबाद १८३. रूटने ६४ धावा केल्या. ४ फलंदाज शून्यावर बाद. बुमराहने ४, शमीने ३, ठाकूरने २ व सिराजने १ फलंदाज बाद केला.

सौंदाळा's picture

4 Aug 2021 - 10:44 pm | सौंदाळा

उत्कृष्ट जलदगती गोलंदाजी
अगदी हाच संघ जागतिक कसोटी मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी पाहिजे होता (जडेजा ऐवजी अक्षर पटेल पाहिजे होता आजच्या सामन्यात) असे तेव्हा पण म्हटलो होतो.
असो
आता फलंदाजी कशी होतेय बघू

श्रीगुरुजी's picture

4 Aug 2021 - 11:22 pm | श्रीगुरुजी

दिवसाखेर भारत २१/०

सौंदाळा's picture

6 Aug 2021 - 6:29 pm | सौंदाळा

तिसरा दिवस - लंच ब्रेक
भारत १९१/५ - ८ धावांची आघाडी
राहुल ७७ नाबाद, जडेजा २७ नाबाद
राहुलने अचानक मिळालेल्या संधीचा पुर्ण फायदा घेतला

श्रीगुरुजी's picture

6 Aug 2021 - 8:29 pm | श्रीगुरुजी

भारत सर्वबाद २७८. भारताला ९५ धावांची आघाडी. ३९ वर्षीय इंद्रसेन आजोबांनी ४ फलंदाज बाद केले तर ऑली रॉबिन्सनने ५ खेळाडू बाद केले.