आपापले जग.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
1 Oct 2008 - 10:45 pm

मिपावरच्या कोठेतरी गर्भप्रतिबंधित गोळ्या आणि गरबाच्या पार्श्वभूमीवर हे लेखन करत आहे.

काल्पनिक वाटले तर तो माझ्या लेखनाचा दोष समजावा.

ज्याचे मन तरल आहे त्याने हे वाचण्याचे शक्यतो टाळावे.

आता विषय प्रवेश.

२५/३० वर्षापूर्वीचा प्रसंग.

स्थळ १५००० वस्तीच्या गावातील मित्रांशी गप्पा.

अनेक विषयानंतर खालील चर्चेचा प्रसंग.

माझा मित्र, अरे आपल्या अमूक अमूक चे लग्न ठरले होते ते माहित आहे ना?
मी : हो, माहित आहे.
तो : अरे त्याचा काडीमोड झाला.
मी : असे कसे? काहीकाळापूर्वीच त्याचे आमंत्रण पाहिले होते. पण मनाची तयारी करत, माझा प्रश्न : का बरे असे झाले?
मित्र : ( थोडे छद्मी हास्य करत) अरे, ती गंमत आहे, मी परत नेटाने : अरे सांग तरी,
मित्र : अरे, त्याच्या लग्नानंतर पहिल्या रात्री त्यांचा आमोद - प्रमोद चालू होता, प्रणय क्रीडा चालू होती. ( मी ह्म्मम). मग?
मित्र : या मूर्खाने तिला विचारले की कोण मूर्खच विचारु शकेल?
मी ( अधीरतेने) काय ते?
मित्र : त्याने आपल्या बायकोला विचारले की असा आनंद कधी मिळाला होता काय?
मी : मित्रा, हा काय चर्चेचा विषय आहे?
मित्र : ऐकतर, त्या मुलीने नकळतच उत्तर दिले, की हो एकदा असा आनंद घेतला आहे.
मी : अरेरे, खरेच मूर्ख आहे हा, पण प्रश्न याने विचारला आणि तिनेही नको ते उत्तर दिले.
मित्र : याने लगेच विवाह विच्छेदाचा निर्णय घेतला.

( माझे मत : मी या घटनेवर बराच विचारमग्न झालो. बर्‍याच दिवस विचार केल्यानंतर माझे असे मत झाले की खेड्यात एकांत मिळत असतो, त्यामूळे अश्या घटना घडत असाव्यात. दुसरे म्हणजे खेड्याचे वातावरण तसे मोकळेच असते त्यामूळे क्वचित असा प्रमाद घडत असावा. तरीपण समाजाचे अश्या घटनावर बरेच नियंत्रण असते. असो. मला बरेच दिवस एक संसार उद्धस्त झाला याचे वाईट वाटत होते.)

प्रसंग दुसरा, अंदाजे २ वर्षापूर्वी,

बस मध्ये प्रवास करत असताना शेजारी अंदाजे ३० वर्षाची सुंदर मुलगी बसली. विरंगुळा म्हणून गप्पाटप्पा मारतांना समजले की ती नोकरी करत आहे आणि अविवाहित आहे. मी सहजच विचारले, की सुंदर आहे, सुशिक्षित आहे, मग अजून लग्न का बरे नाही केले? आजकाल तर इतर शहरातले आपल्या मुली चांगल्या संगणक तज्ज्ञाना देत असतात, तु तर येथलीच आहे?

तिचे उत्तर ऐकुन मी चाटच पडलो, तीचे उत्तर होते, की खरे सांगुना लग्न करायला अथवा त्यावर विचार करायला मला वेळच मिळाला नाही. माझे आयुष्य इतके गतिमान आहे यावर विचार करायला वेळच मिळाला नाही. साध्या मुलीना महाविद्यालयीन शिक्षण संपले की लग्नाचे विचार मनात घोळू लागतात. या मुलीने जणु आपल्या विचारावर, भावनेवर विजयच मिळविला. आज ठिक आहे, उद्या वय संपले म्हणजे काय होईल?

पहिल्या आणि दुसर्‍या प्रसंगाचा विचार माझ्या मनात नेहमीच होत असतो. पहिल्या मुलीने नकळतच घात करुन घेतला तर शहरी मुलीने योग्य वेळी निसर्गाची साद न ऐकण्यात आपला घात करुन घेतला.

कधीकधी असे वाटते की दुसरी मुलीने लग्न केले तरी तिच्या मनात भावनेचा ओलावा, तरलता असणार नाही आणि तिला आपल्या जीवनाचा कधी आनंद घेता येणार नाही.

प्रसंग तिसरा म्हणजे आजचा,

मिपावरच्या लेखावर अनेक प्रतिक्रिया. समाजात गुप्तपणे अनेक गोष्टी घडत असतात. पण त्याचा उघड स्विकार मला आक्षेर्पाह वाटतो.

निसर्ग हा असाच अनिवार करत असतो, प्रत्येक वेळेस त्याचे आवाहन ऐकलेच पाहिजे असे नाही. शेवटी चौकट आपणच आपली आखुन घेतली पाहिजे.

कधी कधी नकळतच मनाचा बांध तुटतो, तेंव्हा मनुष्य स्खलनशील आहे आणि लगेच आपल्याला काहीतरी बंधनात बांधुन घ्यायला हवे. शेवटी आपापला सारासार विचार आणि विवेक आपल्याच करायचा असतो, हेच खरे.

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

वाटाड्या...'s picture

1 Oct 2008 - 10:57 pm | वाटाड्या...

कलंत्री साहेब..

"पण त्याचा उघड स्विकार मला आक्षेर्पाह वाटतो." इथेच तर सगळी गेम आहे. आज काल जो हे स्वीकारतो तो पुढारलेला वगैरे ठरतो आणि जो स्वीकारत नाही किंवा कुठ्लीच प्रतिक्रिया देत नाहे तो 'बाबू' कॅटॅगिरीमधे असतो. पश्चिमी देशांच्या नको त्या गोष्टींची मोहिनी आहे ही. त्याचे भयंकर परिणाम समोर येतील तेव्हा आवरायला दोन हात कमी पडतील याची अजिबात चिंता नाही.

अश्या संबंधामधुन निर्माण झालेली नाती कशी असतात ह्या वर एक प्रकाश टाकण्याचा विचार करतोय..लवकरच....

सर्किट's picture

1 Oct 2008 - 11:03 pm | सर्किट (not verified)

लेखाचे शीर्षक आहे "आपापले जग" !

मग,

पण त्याचा उघड स्विकार मला आक्षेर्पाह वाटतो.

मग स्वतः नका करू उघड स्वीकार ! पण इतरांनी उघड स्वीकार केला, तर आक्षेप कशाला ?

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

मग स्वतः नका करू उघड स्वीकार ! पण इतरांनी उघड स्वीकार केला, तर आक्षेप कशाला ?
आणि असा स्वीकार करणे, अशी काही एक गोष्ट असते हे खुलेपणाने स्वीकारणे = पाश्चात्त्य देशांची मोहिनी म्हणणे हे तर निव्वळ हास्यास्पद!
(वस्तुनिष्ठ)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

2 Oct 2008 - 7:52 am | पिवळा डांबिस

बेलाशी (आणि अफकोर्स, सर्किटशी) सहमत!
ज्यांना हे उघडपणे स्वीकार करता येणार नाहि त्यांच्या मताचा आदर आहे....
पण इतरांनी जर हे उघडपणे स्वीकार केले तर त्याला "पाश्चात्य देशांची मोहिनी" म्हणणे हे अस्वीकारनीय!!!

नेमका संदेश मला सांगता आला नाही असे मान्य करावे लागेल.

स्री पुरुष या मध्ये जे काही असे होते आणि त्याला विवाहाची, संस्कृतीची अथवा जे काही म्हणा त्याची चौकट नसेल तर त्याचा सर्वात जास्त तोटा, परीणाम स्त्रींयानाच सोसावा लागतो.

जे मी पहिल्या उदाहरणात सांगितले होतेच.

इतरत्र दुसरीकडे चाललेल्या चर्चेप्रमाणे अश्या नवरात्रीच्या गरब्याच्या वातावरणाचा आनंद दोघेही घेत असतील आणि त्यात काळजी नाही घेतली तर मुलीना जास्त त्रास होतो ते लक्षात आले असेलच.

त्यामुळे आपण परत एकदा स्त्रीयांच्या सुरक्षितचेच्या बाजुने विचार करुन आपले मत बनवावे इतकेच मी सांगु शकतो.

एकलव्य's picture

2 Oct 2008 - 7:45 am | एकलव्य

... काही ना काही तरी चुकले आहे असे वाटणे म्हणजे विकृती आहे असे मला वाटते.

दोघीही सुखी असाव्यात!!( हे वरच्या प्रसंगाशी "रिलेटिव्हली" आहे... नाहीतर जगी सर्व सुखी असा कोण आहे आहेच :))

कलंत्री's picture

2 Oct 2008 - 8:21 am | कलंत्री

आपण चुकीच्या शब्दाचा प्रयोग वापरला आहे असे म्हणावेसे वाटते. माझ्या आकलनाप्रमाणे आपल्या मनात तसा म्हणण्याचा हेतु नसावा.

माझ्या विचारांना फार तर बुर्ज्वा, प्रतिगामी, बुरसट इत्यादी विषेशन लावता येतील.

असो

एकलव्य's picture

2 Oct 2008 - 8:29 am | एकलव्य

खटकत असेल तर वगळतो. त्यावर छल करण्याचा मानस नाही. त्या दोन्ही मुलींचे वर्तन मला प्रकृतीला धरून वाटते. थोडा विचार करावात ही विनंती!

स्नेहपूर्वक - एकलव्य