(मूळ कविता, त्यातल्या कल्पना सुरेख आहेत. उगाच टैमपास म्हणून हे विडम्बन. अजून बरे होऊ शकले असते..)
नाक गळतंय माझं
तसं ते नेहमीच गळतं
पण पाऊस आला की
येतात जोराच्या
दोन चार शिंका
अन नाक येते
कफही होतो जरासा
नाक गळतंय माझं
रुमाल ओलागिच्च झालाय
केंव्हाचं तुंबलंय
वाट पाहतेय निचरा होण्याची
हाताशी व्हिक्स आहेच
पण विकोरील मिळेना..
जौदे ,निचरेल ... आपोआप
नाक गळतंय माझं
दोन्ही हातांनी
शिंका थांबवतेय
पण त्याचाही कंटाळा आलाय
छताकडे बघून
थोपवायचा प्रयत्न चाललाय
नाक गळतंचै माझं
आज सकाळी
काल दुपारी
परवाच्या रात्रीही
डॉक्टरकडे जाऊनही
औषधे घेऊनही ..
तसंही नाक गळतंच माझं
थोड्या वाऱ्याने
थोडया पावसाने
जराश्या धुळीने
कधी जाग्रणाने
वा कुणाच्या शिंकण्याने
नाक गळतंय माझं
नाक गळतंय माझं
अन तो म्हणतोय 'कुछ लेती क्यूँ नाही?'
- खेडूत
२७/१२/२०१६
प्रतिक्रिया
28 Dec 2016 - 12:46 pm | रुपी
हा हा.. भारीच!
28 Dec 2016 - 12:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
मूळ कविता आणि विडंबन दोन्ही आवडली
पैजारबुवा,
28 Dec 2016 - 1:03 pm | हतोळकरांचा प्रसाद
मस्तच हो! :)
28 Dec 2016 - 8:38 pm | माम्लेदारचा पन्खा
लै भारी.....गच्च झाल्यासारखं वाटलं....ख्या ख्या ख्या....!
28 Dec 2016 - 10:16 pm | वन्दना सपकाल
मस्त कविता
1 Jan 2017 - 11:03 am | अत्रुप्त आत्मा
ह्या ह्या हुक्क!