सावळ्याच्या प्रेमात
पडली राधा बाबरी
काळ्या रंगात रंगुनी
यमुनाही झाली काळी.
द्वारकेचा राजा आला
सुदामच्या द्वारी
काळी लक्ष्मी झाली
जनखात्यात पांढरी.
यमुनेच्या काठी
अवसेच्या राती
स्वार्थाच्या बाजारी
मैत्री अशी रंगली.
द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम = गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या काठावर आहे.
प्रतिक्रिया
10 Dec 2016 - 5:32 am | चित्रगुप्त
सुंदर, सुटसुटीत, समयोचित, सुगम कविता.
पडली राधा "बाबरी" "बावरी" ??