नोटबंदी गैरव्यवस्थापन माजी पंतप्रधानांची जबाबदारी ?

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
24 Nov 2016 - 4:07 pm

माननीय मनमोहनसिंगजी,

मोदी सरकारने रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यन केल्या संबंधाने आपण आपले राज्यसभेतील टिकात्मक भाषण वाचनाचा योग आला. रु ५०० आणि रु १००० या नोटांचे निर्मुल्यनाच्या उद्दीष्टांबद्दल आपणास शंका नसल्याचे आपण म्हटले आहे. प्रश्न केवळ इंप्लीमेटॅशन (अमलबजावणी) मधील त्रुटींचा आहे या त्रुटी म्हणजे भलेमोठे गैरव्यवस्थापन आहे असे आपण आपल्या भाषणातून म्हटले आहे. दोन आठवडे कालावधीनंतरी ज्या प्रमाणात सामान्य जनतेस चलन उपलब्ध होणे अवघड जात आहे ते पाहता अमलबजावणी आणि व्यवस्थापनात त्रुटी शिल्लक राहील्या हे निश्चित.

जुने चलन बाद केल्यानंतर नवे चलन किती लागेल आणि नव्या चलनाच्या छपाईस किती वेळ लागेल इत्यादी गणिते इकॉनॉमीक सेक्रेटरी आणि रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर यांच्या बोटावर असणार त्या गणितात ते खूप चुकले असतील अशी संभावना कमी आहे. कॅश वाहून नेण्यास सुरक्षा रक्षकांसहीत सक्षम वाहने किती आहेत आणि १००च्या नोटांसाठी अधिक वाहने अधिक सुरक्षा रक्षक लागतील का ? एटीएमचे रि कॅलिब्रेशन करण्यासाठी अधिक अधिक इंजिनीअर्स आणि तंत्रज्ञांचा ताफा लागेल का ? डिजीटल तंत्रज्ञानाकडे किती ट्रँझॅक्शन्स वळवावे लागेल आणि सामान्य सजनेस डिजीटल तंत्रज्ञान डेबीट कार्ड इत्यादी वापराची जागरूकता अभियानाच्या गरजा काय असू शकतील ? या मुद्द्यांवर काम करण्यास सध्याचे सरकार कुठेतरी कमी पडले हे स्प्ष्ट दिसतच आहे. यातील डिजीटल तंत्रज्ञानाचा भाग अलिकडचा गेल्या दशकाभरातला याला काही क्षणासाठी बाजूला ठेऊ. जे गैरव्यवस्थापन आणि त्रुटी शिल्लक राहील्या त्याचे मोदी सरकारचे आणि सध्याच्या आरबीआयच्या गव्हर्नरांचे माप त्यांच्या पदरात नक्कीच टाकू.

माननीय मनमोहनसिंगजी, आपण ज्ञान आणि अनुभवाने या सर्वांपेक्षा ज्येष्ठ आहात आणि आपण महत्वाच्या प्रसंगी भारतीय अर्थव्यवस्थेस सावरुन धरण्यात मोठी कामगिरी बजावलीत त्या बद्दल आदरच आहे. आता आपण विरोधीपक्षात आहात, विरोधीपक्षात बसून दोष दिग्दर्शनाची जबाबदारीही (उत्तमपणे ?) निभावताय आणि विरोधीपक्ष जिवंत असल्याचे दिसते आहे हे पाहून बरेच वाटते पण प्रश्न राहतो तो नोटांचे निर्मुल्यन करून नवीन नोटा व्यवहारात उपलब्ध करुन देताना राहीलेल्या त्रुटींच्या जबाबदारींची चर्चा करताना मागील सरकारांची आणि आरबीआय मध्ये मागील काळात जे कामास होते त्यांची सुद्धा जबाबदारी निश्चीत करण्याचा.

माननीय मनमोहनसिंगजी, भारतातील काळ्या पैशाचा रोग अती जूना आहे आणि चलन न्रिर्मुल्यन हा त्यावरील एक महत्वाचा उपाय आहे हे आपल्यापेक्षा अधिक चांगले कुणास ठाऊक असेल ? मोदी सरकारने चलन निर्मुल्यन आत्ताच करावे एवढी इमर्जन्सी आत्ता होती किंवा नव्हती हा कदाचित वादाचा विषय असेल याचा निकाल काळाच्या ओघात इतिहास देईलच पण इकॉनॉमीक इमर्जन्सी विवीध कारणाने जगातल्या कोणत्याही देशा च्या कोणत्याही सरकार समोर येऊ शकतात याची आपणास कल्पना नसेल असेही संभवत नाही. असे चलन निर्मुल्यन अचानक करावे लागले तर ऐनवेळेची पळापळ नको म्हणून त्यासाठी काय पुर्वतयारी असावयास हव्यात आणि त्या किमान प्रमाणावर प्रत्येक सरकारने केलेल्या असावयास हव्यात की नको ?

माननीय मनमोहनसिंगजी, आपण १९७० -७६ असा दीर्घकाळ भारत सरकारच्या सल्लागारपदांच्या विवीध पदांवर काम केलेले आहे, १९८२ ते ८५ आरबीआयचे गव्हर्नर होता, चलन निर्मुल्यनाच्यावेळी काय स्वरुपाची यंत्रणा लागते त्याचा तुम्हाला तेव्हा आढावा घेण्याची संधी येऊन गेली असेल, १९८५ ते १९८७ या कालावधीत नियोजन आयोगाचे उपाध्यक्षपद आपण भूषवले आहे त्या कालावधीत आवश्यक यंत्रणेसाठी लागणार्‍या तरतूदी करून ठेवण्याची आपणाकडे संधी होती, १९९१ ते १९९६ तब्बल पाच वर्षे आपण अर्थमंत्री पद सांभाळले आणि २००४ ते २०१४ एवढा मोठा काळ पंतप्रधानपद सांभाळले ज्या काळात यंत्रणेच्या गरजा तपासणे, आर्थिक आणि व्यवस्थापन विषयक नियोजनाची तयारी करुन ठेवणे आपणास निश्चित शक्य असावे किमानपक्षी आता आल्या आहेत तशा अडचणी येऊ शकतात याची आपण कुठे तरी नोंद करून ठेवलेली असणे अभिप्रेत असावे आणि म्हणून जे काही गैरव्यवस्थापन झाले आहे त्यात मोदी सरकारच्या सोबतच नैतीक जबाबदारीचे हक्कदार म्हणून अंशतः तरी आपल्याकडे का पाहू नये ?

आम्ही सामान्य नागरीक सत्ताधारी अथवा विरोधीपक्षात नाही आहोत टिका करावयाची म्हणून टिका यात रस नाही. भारतासाठी अण्वस्त्र सज्जतेसाठी पुर्वाश्रमीच्या काँग्रस सरकारांनी परिश्रम घेऊन ठेवले आणि निर्णय घेण्याच्या वेळी भाजपा सरकार होते आम्ही क्रेडीट दोन्ही पक्षाच्या सरकारांना दिले. जी व्यवस्थापन विषयक पुर्वतयारीत अण्वस्त्र आणि कदाचित इतरही अजून बर्‍याच गोष्टीत काँग्रेस सरकारांनी आणि आपण केली असेलही त्या बद्दल नावे ठेवण्याचा उद्देश नाही, पण चलन निर्मुल्यनासाठीच्या पुर्व तयारीच्या सहभागात आपण आणि काँग्रेस कुठे कमी पडली नाही ना ही सामान्य नागरीक म्हणून आलेली शंका आहे.

विषय निघालाच आहे तर १९९१ ते १९९६ या काळात आपण जाचक आयातकर अत्यंत वेगाने कमी करत नेले याचा आयात वस्तु विकणारा एक सामान्य विक्रीप्रतिनिधी म्हणून मी आठवण जतन केली आहे त्या काळात अर्थमंत्र्यांचे बजेट भाषण सुट्टी टाकून ऐकत असे आणि नंतर वाचत असे त्याच कालावधीत वस्तुंच्या उत्पादनावरील कर आपल्या सरकारने त्याच प्रमाणात का कमी केले नाहीत भारतात निर्मित वस्तु पेक्षा आयात वस्तु स्वस्त होऊ देण्या मागील आपली भूमिका आजतागायात मला व्यक्तीशः समाधानकारकपणे उलगडलेली नाही.

आम्ही सामान्य नागरीक आपल्या ज्ञान आणि अनुभवाएवढी उंची गाठू शकत नाही मनात शंका येणे स्वाभाविक असते या शंकांसाठी आपल्याकडे निश्चित उत्तरे असतील. मिसळपावसारख्या संस्थळावर तेही मराठीतून उत्तरे देणे आपणास शक्य असणार नाही त्यामुळे माझेच लेखन बरोबर असा माझा कोणताही अट्टाहास नाही चुक भूल देणे घेणे.

माननीय मनमोहन सिंगजी, एकुण मनाला सलणारी हि शंका शिल्लक आहे, आपल्या टिकेतील गैरव्यवस्थापनाचे माप अंशतःतरी आपल्याही पदरात पडत नाही का?

आभार

आपला आदर करणारा भारताचा एक सामान्य नागरीक

अर्थकारणअर्थव्यवहारराजकारणविचारप्रतिक्रियामत

प्रतिक्रिया

गामा पैलवान's picture

29 Nov 2016 - 9:43 pm | गामा पैलवान

संदीप डांगे,

विमानफाटा समजावून सांगतो.

विमानात चढणाऱ्यांनी जर तपासणी करायचं नाकारलं तर विमानात चढू देत नाहीत. मात्र त्यांनी आपापला वेगळा मार्ग (रस्ता, जलमार्ग, इत्यादि) चोखाळायला हरकत नाही. त्याचप्रमाणे ज्यांना पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटांत व्यवहार करायचा आहे त्यांनी आपापला वेगळा मार्ग शोधावा.

आ.न.,
-गा.पै.

Gk's picture

21 Sep 2020 - 1:53 pm | Gk

मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये १.१ लाख कोटी मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामधून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये दोन हजार रुयांच्या नोटांचे एकूण मुल्य ५.४ लाख कोटींपर्यंत कमी झाले आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या ६.५ लाख कोटी रुपये मुल्यांच्या नोटा चलनात होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. दोन हजारच्या नोट्यांच्या उलट ५०० रुपयांच्या नोटा या ४ लाख कोटींनी वाढल्याचे दिसत आहे. २०१८-२९ मध्ये १०.७ लाख कोटींच्या ५०० च्या नोटा चलनात असताना २०१९-२० साली हे मूल्य १४.७ लाख कोटींपर्यंत पोहचले. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली नव्हती असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे. तसचे बीएरबीएनएमपीएलने (भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड) आणि एसपीएमसीआयएलने (सिक्युरिटी प्रिटींग अॅण्ड मिटिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया) कोणताही अतिरिक्त पुरवठा केलेला नाही असंही या अहवालात म्हटलं आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/more-than-rs-1-lakh-crore-wort...

Gk's picture

21 Sep 2020 - 1:57 pm | Gk

https://www.loksatta.com/desh-videsh-news/demonetised-notes-of-rs-4-cror...

नोटबंदीमुळे कालबाह्य झालेल्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बाळगणाऱ्या दोघांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. गोध्रा भागात ही कारवाई करण्यात आलेली असून, अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ कोटी ७६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली.

2020 मध्ये गुजरातेत जुन्या नोटा सापडल्या

4 दिन तो गुजारो गुजरात मे

बाप्पू's picture

21 Sep 2020 - 8:07 pm | बाप्पू

गुजरात वर लय लक्ष मोगाभाऊ तुमचे.. आणि गुजराती माणसाबद्दल तर लय म्हणजे लय च प्रेम. :) :)

असो. पण नोटबंदी हा निर्णय चांगला होता हे माझे मत अजूनही आहे.. पण तरीही तो फ्लॉप झाला आणि चुकिचा होता किंबहुना चुकीच्या पद्धतीने राबवला गेला या तुमच्या मताशी देखील मी सहमतच आहे. सुरवातीला काळा पैसा, आतंकवाद, बनावट चलन अश्या बड्या बड्या बाता मरून झाल्यावर अंगाशी येतंय असं दिसायला लागले.. मग डिजिटल इंडिया चा प्रसार सुरु झाला.. नंतर अमुक अमुक लाख. कंपन्या बंद पडल्या..... हे म्हणायला लागले..

आता कुठेही नोटबंदीचा पुसटसा उल्लेख देखील केला जात नाही यातच त्यांच्या योजनेचा फोलपणा दिसून येतो.

Gk's picture

21 Sep 2020 - 9:12 pm | Gk

नोटांबंदी म्हणजे कबिराचा दोहा झाला.

बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना,
मुझसे बुरा न कोय।

नोटबंदी करके सारे भारत का , काँग्रेस का काला पैसा ढुंढ रहे थे , लेकीन सबसे जादा काळा पैसा गुजरात सेही आया था

२४ सप्तेम्बर २०२०

गुज्रातेत पुन्हा जुन्या नोटा घावल्या

चार दिन तो गुजारो गुजरात मे

https://www.loksatta.com/desh-videsh-news/gujarat-ats-seizes-demonetised...

Gk's picture

26 Sep 2020 - 8:56 pm | Gk

नोटांबंदी म्हणजे कबिराचा दोहा झाला.

बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना,
मुझसे बुरा न कोय।

काळा पैसा जो देखन मैं चला,
काळा पैसा न मिलिया कोय,
जो गुजरात खोजा आपना,
मुझसे काळा न कोय।

सुबोध खरे's picture

28 Sep 2020 - 10:05 am | सुबोध खरे

तुम्हाला गुजरातची कावीळ झाली आहे का?

जिथे पाहावं तेंव्हा गुजरात बद्दल खडे फोडताय?

श्री मोदींनी गुजरात सोडून ६ वर्षे होऊन गेली.

Gk's picture

28 Sep 2020 - 2:42 pm | Gk

नेहरूंनी भूलोक सोडून 55 वर्षे होऊन गेलीत

सुबोध खरे's picture

28 Sep 2020 - 6:27 pm | सुबोध खरे

माणूस आणि प्रदेश यात गल्लत करू नये एवढे मूलभूत विचार आपण करत नाही?

हिटलर जग सोडून गेल्याला ६५ वर्षे झाली.

म्हणून त्यावरून कुणी "जर्मनी देशा" बद्दल उणे दुणे काढत बसत नाही.

पराकोटीचा द्वेष असला कि विचारसरणी दूषित होते याचे हे उत्तम उदाहरण आहे

बाप्पू's picture

28 Sep 2020 - 10:39 pm | बाप्पू

सहमत.. एक गुजराती माणूस जितका गुजरात वर लक्ष देत नसेल तितके खांग्रेसी आणि मोगाभाऊ देतायेत.. गुजरात म्हणजे भारतातील एक राज्य नसून ते मोदींचें प्रायव्हेट राज्य आहे कि काय असे वाटू लागलेय यांच्यामुळे..

याचं न्यायाने मग रायबरेली वर लक्ष दया कि ओ मोगाभाऊ.. हां??

गुजरात देखील भारताचाच हिस्सा आहे , कुणीही काहीही कितीही वेळा लिहू शकतो

तुम्हीही 370 वर लिहा, बिहारचा माणूस मुंबईवर लिहिल, लोकशाहीने स्वातंत्र्य दिले आहे,

लिहायचा अधिकार दडपून तुम्हाला देश पुन्हा पारतंत्र्यात घालायचा आहे का ?

बाप्पू's picture

29 Sep 2020 - 9:14 am | बाप्पू

नावडतीचे मीठ आळणी...
एवढेच म्हणून मी शांत बसतो.

Gk's picture

29 Sep 2020 - 11:00 am | Gk

मला गुजरात नावडण्यासारखे काही नाही

उलट , आमचे एच आय व्ही चे 14 दिवसाचे ट्रेनिंग अहमदाबादला झाले आहे

आणि अजून एक 30 दिवसाचा कोर्सही तिथेच झाला आहे

दुसऱ्या कोणत्याच राज्यात मी इतके फिरलेलो नाही

सुबोध खरे's picture

29 Sep 2020 - 11:49 am | सुबोध खरे

मग गुजरातचं नाव आलं तरी तुमचं गळू का ठसठसतं?

Gk's picture

29 Sep 2020 - 12:43 pm | Gk

तुम्हालाच काहीतरी प्रॉब्लेम आहे

वायनाडला पूर आला , लाखनौला पेपर फुटला, मुंबईत सुशांत मेला, दिल्लीला केजरीवाल जिंकला

लोक काही न काही लिहितच असतात

गुजरातेत काळ्या नोटा सापडल्या म्हणून कुणी लिहिले तर तुमची टोळी माझ्या मागे का लागली समजत नाही

सुबोध खरे's picture

29 Sep 2020 - 7:45 pm | सुबोध खरे

तुम्ही गुजरात मध्येच काही सापडले कि लगेच इथे टाकता एवढे न कळण्या एवढे मिपाकर मूर्ख नाहीत.

चौकस२१२'s picture

29 Sep 2020 - 2:36 pm | चौकस२१२

मोदींवर गुजराथी असा शिक्का मारला कि मग मराठी mate मिळवणे सोपे हा भ्रम आणि इतर काही मुद्दा उरला नाही कि मोदी शहा ना "गुजराथी बनिये" ठरवून ते देश खायला उठलेत असा कांगावा करायला हि लोकं मोकळे ..
उद्या मोदी आणि शहा जर ब्राहमण असते तर मग " मनुवाद आला, पगडी नको पागोटे वैगरे आरडाओरड केली असती याच लोकांनी
मूळ गळू का होण्याचा आणि
ठसठसण्याच कारण hech कि "भाजप सत्तेत येतंच कसं?"
मोदींच्या समर्थकांनां सुद्धा "मोदीही चुकू शकतील" हे मान्य आहे पण या सर्व "उदारमतवाद्यांना" मोदी आणि भाजप प्रतेय्क बाबतीत चुकतंच या एकाच गोष्टीवर विश्वास आहे मग त्यांनी किती हि चांगलं काम केलं तरी

Gk's picture

29 Sep 2020 - 3:05 pm | Gk

आमचे प्रतिसाद वाचून कुणी कुणाlaa मत देत नाही.

भाजपा , सेना, काँग्रेस व रावा ह्यांना महाराष्ट्रात महाराष्ट्रातील लोकांनी मते दिली आहेत , त्यामुळे ह्यात गुजराती , मराठी असेही काही नाही

Gk's picture

2 Oct 2020 - 12:43 pm | Gk

केंद्र सरकारनं चार वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. चलनात असलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी केंद्र सरकारनं ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्या असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहलावातून ही माहिती मिळाली आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-most-fake-currency-in-the-...

सुबोध खरे's picture

2 Oct 2020 - 12:52 pm | सुबोध खरे

यात धक्कादायक काय आहे?

चोर काही मूर्ख नसतात. खोटी नोट तयार करायची तर ते १० रुपयाची कशाला करतील?

२ हजारांचीच करणार.

एवढे सुद्धा समजू नये का तुम्हाला?

Gk's picture

2 Oct 2020 - 4:47 pm | Gk

आणि मग मोदीजी नोटेत चिप बसवणार होते , त्याचे काय झाले ?

सुबोध खरे's picture

2 Oct 2020 - 8:08 pm | सुबोध खरे

मोदीजी नोटेत चिप बसवणार होते

असं कोण म्हणालं होतं?