आनंदी आनंद गडे इकडे तिकडे अमेरिकेकडे
अखेर अमेरिकेची दुर्गा-हिलरी(आज्जी), अमेरिकेची ४५ वी आणि पहिली स्त्री प्रेसिडेंट झाली.
ही बातमी ऐकून बहुतांश जगाला आणि विशेषकरून अखील जगातल्या बहुतांश स्त्रीवर्गाला आनंद झाला असेल नाही का रे भाऊ?
तुला खरंच असं वाटतं? पण ते जाऊदे.कोकणीत एक म्हण आसां. "झंय गाव आसां थंय म्हारवड असतलोच."
हिलरी खरीच जीद्दीची स्त्री आहे असं तुला वाटतं कारे भाऊ?
म्हणूनच मी तिला दूर्गा म्हणतो ना रे? अरे,गेल्या ३०,४० वर्षात हिलरीने खूप त्रास भोगलेले आहेत.इथपर्यंत वर येताना तिला खूप अडथळे आणले गेले होते.अरे,गेल्या शंभर वर्षांपासून अमेरिकेत स्त्रीयांना निवडणूकीत मतदान करायला मिळू लागलं आहे.त्यासाठी पूर्वीच्या कित्येक स्त्रीयांनी आपल्या हक्कासाठी लढत दिली आहे.
मतदानाच्या पलिकडे जाऊन कित्येक स्त्रीयांनी निवडणूकीत भाग घेण्यासाठी लढत दिली आहे.तरीसुद्धा सिनेट किंवा कॉंग्रेसमधे म्हणावं तेव्हडं स्त्रीयांना प्रतिनिधीत्व मिळालेलं नाही.कारण स्त्रीयांची गळचेपी अजून चालूच आहे.ह्यावेळी हिलरीने मात्र तेही चालू देणार नाही असं दाखवून देऊन सरळ प्रेसिडेंटसाठी लढत दिली आहे.पण असं करताना अडथळा आणणार्या पुरूषांना,आणि काही स्त्रीयांनाही, त्यांच्याकडून होणार्या विरोधाना, दोन हात करून तिने बाजी मिळवली आहे.
हिलरी-आजी प्रेसिडेंट झाली म्हणजे काय झालं रे? ते थोडक्यात सांगशील का रे भाऊ?
अरे,थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी बरंच सांगावं लागेल.
देशाच्या नैतृत्वाची जबाबदारी तिची असणार.
देशाच्या कायद्यांचं पालन करून घेण्याची तिची जबाबदारी असणार.
हाताखाली काम करणारे प्रमुख अधिकारी नेमण्याचं तिच्या अधिकारत असणार.
क्षमादान,जीवदान देण्याचे तिचे अधिकार असणार.
जगातल्या इतर देशाबरोबर केली जाणारी राजनीति ति़चीच असणार.
तिच्याच सहीने कायदे पास होणार किंवा कायदा नाकरणं तिच करू शकते.
ती कायदे प्रस्तुत करू शकते.
कायदेतज्ञाबरोबर देशाचं बजेट तयार करू शकते.
पुढल्या चार वर्षाची देशाची आर्थीक परिस्थिती तिच्या धोरणावर अवलंबून असणार.
अमेरिकेच्या संरक्षणासाठी ती कमांडर -इन-चिफ झाली.याचा अर्थ असा की, सामर्थ्यवान हवाई-दल,पाय-दल,आणि वायु-दल ,ह्या तिनही शाखा आजीच्या हुकमती खाली असणार.देशाचं संरक्षण तिच्या हाती आहे हे उघडच आहे. असैनिक हुकमत तिची असणार. जरूरी लागल्यास जवळ जवळ चार हजार पाचशें न्युक्लीअर बॉम्बचा तिच्याच परवानगीने वापर होऊ शकतो.
अमेरिकेचा प्रेसिडेंट होणं सोपं आहे का रे भाऊ?
हे बघ,अमेरिकेच्या तीस कोटी लोकसंख्येतले जवळ जवळ दहाएक कोटी लोक निवडणूकीत भाग घेतात.निवडणूक कशी होते ते मी तुला मागे सांगीतलं आहेच.
हल्लीच्यादिवसात प्रत्येकाला निवडून येण्यासाठी जवळपास एक बिलीयन डॉलर्सची तयारी ठेवावी लागते. नंतर आपण कसे पैसे खर्च करू यावर आपलं यश बहुतांश अवलंबून असतं.तुलनेने ज्याच्या जवळ एव्हड्या पैशाची तरतुद नसेल त्याला लढत देणं जरा कठीण जातं.हे झालं थोडक्यात पैशाच्या तरतुदी बाबत.
निवडणुकीच्या प्रचाराची रचना आखावी लागते.त्यासाठी पैसे दिलेले आणि व्हालेंटीअर्स असलेले असे दोन प्रकारचे लोक जमवावे लागतात.५० राज्यात त्यांची योग्य
विभागणी आणि आखणी करावी लागते.
मिडीयाकडून आणि अन्य तर्हेने, एकमेकाच्या पर्सनल कुचाळक्या काढून एकमेकाचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न होतो.शिवाय टीव्हीवर राज्या-राज्यात जाहिराती देऊन प्रचार करावा लागतो.अशावेळी निगेटीव्ह आणि पॉझीटीव्ह जाहिराती देऊन बाजी मारावी लागते.
दोन वर्ष अगोदर पासून ह्या सर्व गोष्टीची तयारी करावी लागते.आणि योग्ययोग्य वेळी योग्य गोष्टींचा वापर करावा लागतो.थोडक्यात हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नसते हे मात्र नक्कीच.
हिलरी प्रत्यक्ष प्रेसिडेंट केव्हा पासून होणार. रे,भाऊ?
सांगतो.नवीन वर्षाच्या-२००१७च्या जानेवारी २० ला शपथ विधी होणार. प्रे.ओबामा आपला कारभार, शपथ विधी संभारंभात सुप्रिम कोर्टच्या मुख्य जज्जाच्या हजेरीतहिलरीने शपथ घेतल्यानंतर, तिला सुपूर्द करणार. आणि त्यादिवसापासून हिलरी- नवी प्रेसिडेंट, आपला कारभार संभाळणार.
सहाजीक एक प्रश्न उद्भवतो ह्या निवडणूकीचा आपल्या भारताला काय फायदा?असं मी तुला विचारलं तर तुझ्याकडे उत्तर आहे कारे भाऊ?
मागे एकदा एका कोणाला तरी तुझ्या ह्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर दिलं होतं असं मला आठवतं.असो.
त्याचं असं आहे,मला तरी वाटतं की,आपण भारतीयांनी असा प्रश्न म्हणजेच "आपल्याला काय फायदा?"
असं पूर्वी सारखं आशाळभुत होऊन त्या उद्दशाने विचारलं तर ते विचारणं आता नव्या परिस्थितीत सोडून दिलं पाहिजे.
चिनचे लोक विचारतात असा प्रश्न?नाही.कारण त्यांना अमेरिकेकडून आशा नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे,
आपल्याकडे भारतात
१२५ कोटीची जनसंपती आहे.
अतिशय शूर सैनीक संरक्षणासाठी दिवस रात्र जागृत आहेत.
लढाई झाल्यास लढाईसाठी लागणीरी सामुग्री आपण आपल्या देशात बनवतो.
आपल्याकडे हजार नसले तरी शंभर एक न्युक्लीअर बॉम्ब आहेत.आणि आपण ते स्वतः बनवू शकतो.
आपण निरनीराळ्या पल्ल्याची क्षेपण अस्त्रे बनवतो.
बोटी बनवतो,पाण्बुड्या बनवतो.
स्वत:साठी देशात अन्न उत्पादन करतो.
आपले शास्त्रज्ञ,डॉक्टर,इंनजीनीयर,इतर देशात नाव कमवून आहेत.
आणखी कितीतरी गोष्टी सांगता येतील.पण जाऊ दे.
अरे,भाऊ तू मला गंमत सांगणार असं म्हणाला होतास ती सांग की रे भाऊ?
अरे,गंमत म्हणजे त्याचं काय झालं,ही क्लिंटन मंडळी मी गेली २६ वर्षं ओळखतो.ओळखतो म्हणजे समजलं ना? अरे टीव्हीवर पाहून पेपरात वाचून असं मला म्हणायचं आहे.
ह्या ८ नोव्हेंबरच्या रात्री मी बिलला सफेद सदरा धोतर आणि डोक्यावर सफेद टोपी (गांधी टोपी रे) घालून आणि हिलरीला हिरवंगार लुगडं नेसून डोक्यावरून पदर घेऊन,खणाची चोळी घालून, हे जोडपं गणपतीबाप्पासमोर हात जोडून नतमस्तक होऊन प्रार्थाना करीत होतं.सांगत होतं,
"बाप्पा,आम्ही खूप कष्ट घेतले,पाण्यासारखा पैसा खर्च केला,अनेकांच्या आळांना तोंड दिलं आमच्या ह्या कष्टाला फळ दे"
हे द्दष्य बघून मी स्वपनात आहे अशी माझी खात्री होऊन माझे डोळे चोळून पहात होतो.आणि खरंच मी स्वप्नात होतो हे मला कळलं.
गंमत apart,
आपण ह्या अमेरिकन दुर्गेला, हिलरी आजीला सुयश चिंतुया.
मग इतकं करूनसुद्धा हे असं कसं झालं रे भाऊ?
अरे,मी तुला म्हणालो होतो ना?
"होणारे न चुके जरी तया येई ब्रम्हदेव आडवा!"
कुठल्याही घटने बाबत हे पालुपद लक्षात ठेव.मग ती अमेरिकन निवडणुक असो,भारतातली निवडणूक असो किंवा भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच असो.
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)
प्रतिक्रिया
14 Nov 2016 - 7:59 am | चित्रगुप्त
दुर्गाज्जी वास-हिंग-तन च्या सडकांवरून माईक हातात घेऊन खालील गाणे म्हणत फिरत आहेत म्हणे:
ज़ुबाँ पे दर्द भरी दास्ताँ चली आई
बहार आने से पहले खिज़ाँ चली आई
खुशी की चाह में मैं ने उठाये रंज बड़े
मेरा नसीब की मेरे क़दम जहाँ भी पड़े
ये बदनसीबी मेरी भी वहाँ चली आई
ज़ुबाँ पे दर्द भरी दास्ताँ चली आई
उदास रात है वीरान दिल की महफ़िल है
न हमसफ़र है कोई और न कोई मंज़िल है
ये ज़िंदगी मुझे लेकर कहाँ चली आई
ज़ुबाँ पे दर्द भरी दास्ताँ चली आई....
14 Nov 2016 - 8:06 am | माझीही शॅम्पेन
सामंत काका लवकर जागे व्हा , स्वप्न रंजन करून काही उपयोग होणार नाही :)
आता मिसेस ओबामा पुढील निवडणुकीत उतरतील तेंव्हा साठी ह्यातलं बराच कमी येईल
14 Nov 2016 - 10:35 am | पिवळा डांबिस
बुडाली हिलरी ती पाजी,
अम्रिकस्थान बळावले
लिब्रलांचा क्षयो झाला,
आनंदवनभुवनी!
धत्ताड तत्तड, धत्ताड तत्ताड!!
वाजवा रे वाजवा!!!!!
14 Nov 2016 - 10:41 am | गॅरी ट्रुमन
२००८ मध्ये प्रायमरीमध्ये ओबामांपेक्षा जास्त मते मिळूनही ओबामांपेक्षा कमी डेलिगेट मिळाल्यामुळे त्यांना अध्यक्षपदासाठीची उमेदवारी मिळू शकली नाही.२०१६ मध्ये प्रत्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मते मिळूनही इलेक्टोरल कॉलेजमध्ये मते कमी मिळाल्यामुळे त्यांना अध्यक्षपद परत एकदा हुलकावणी देणार आहे.
हिलरींबरोबर २००८ मध्ये झाले काहीसे तसेच १९६८ मध्ये रिपब्लिकन पक्षात रॉनाल्ड रेगन यांच्याबरोबर झाले होते. रिचर्ड निक्सन यांना उमेदवारी मिळू नये म्हणून रॉनाल्ड रेगन आणि नेल्सन रॉकफेलर यांनी एकत्र यायचे ठरविले होते पण दोघांमध्ये अध्यक्षपदासाठी कोणाला उमेदवारी मिळावी यावरून मतभेद झाले आणि दोघांचे भांडण आणि तिसर्याचा लाभ या न्यायाने उमेदवारी मिळाली रिचर्ड निक्सन यांना. पुढे १९७६ मध्ये ऱोनाल्ड रेगन यांना परत एकदा प्रायमरीमध्ये अपयश आले.तरीही त्यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. पुढे १९८० मध्ये त्यांनाच उमेदवारी मिळाली आणि १९८१ ते १९८९ या काळात ते अमेरिकेचे अत्यंत लोकप्रिय अध्यक्ष होते.
पण वय हिलरींच्या बाजूने नाही. १९६८ मध्ये प्रायमरीमध्ये अपयश आले तेव्हा रेगन ५७ वर्षांचे होते तर २००८ मध्ये हिलरी ६१ वर्षांच्या होत्या. रेगन अध्यक्षपदावर निवडून गेले त्यावेळी त्यांचे वय होते ६९ वर्षे. हिलरींचे आताचे वयही तितकेच आहे. पण फरक हा की त्यांचा पराभव झाला आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकदा पराभव झालेल्या उमेदवाराला शक्यतो परत उमेदवारी मिळत नाही. अपवाद थॉमस ड्युई, अडलाई स्टिव्हनसन आणि रिचर्ड निक्सनचा. थॉमस ड्युईचा १९४४ मध्ये फ्रॅन्कलीन रूझवेल्ट यांनी पराभव केला तरी १९४८ मध्ये त्यांना रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळाली आणि त्यांचा परत हॅरी ट्रुमन यांनी पराभव केला.अडलाई स्टिव्हनसनचा १९५२ मध्ये आयसेनहॉवरनी पराभव केला तरी १९५६ मध्ये त्यांना परत उमेदवारी मिळाली. तर रिचर्ड निक्सनचा १९६० मध्ये जॉन केनेडींनी पराभव केला तरी परत १९६८ मध्ये त्यांना उमेदवारी मिळाली. हिलरींना against all odds २०२० मध्ये परत प्रयत्न करावे लागतील आणि तोपर्यंत त्यांचे वय ७३ वर्षे झाले असेल आणि ते त्यांच्यासाठी फारसे अनुकूल नसेल.
हिलरींच्या नशिबात अध्यक्षपद नाही हेच दिसते.
14 Nov 2016 - 11:21 am | गॅरी ट्रुमन
या निमित्ताने हिलरी-ओबामा आणि समर्थकांचा रडीचा डाव उघड झालेला दिसत आहे.
मान्य आहे की हिलरींना पॉप्युलर व्होटमध्ये ट्रम्पपेक्षा जास्त मते आहेत.पण अमेरिकेतील इलेक्टोरल कॉलेज पध्दतीप्रमाणे ट्रम्प निवडून आले आहेत आणि ती पूर्णपणे घटनात्मक पध्दत आहे हे कसे नाकारता येईल? तरीही अनेक शहरांमध्ये हिलरी समर्थकांचा रडीचा डाव सुरू झाला आहे. ट्रम्पविरोधी निदर्शने सुरू आहेत. F*** ट्रम्प इत्यादी आरोळ्या सुरू आहेत. काही ठिकाणी अमेरिकेचे झेंडेही जाळले गेले. कॅलिफॉर्नियात तर काही ठिकाणी राज्याने अमेरिकेतून फुटून बाहेर पडावे अशा पध्दतीची बेजबाबदार भाषाही वापरली जात आहे.देशातले सरकार आवडत नाही म्हणून देशाचेच तुकडे व्हावेत अशी इच्छा ठेवायची असे प्रकार करणारी कन्हैय्याची पिल्लावळ भारतात आहेच. हे अमेरिकेतले मिनी कन्हैय्या म्हणायचे का?
जर का हिलरी विजयी झाल्या असत्या आणि त्याविरूध्द ट्रम्प समर्थक रस्त्यावर उतरले असते F*** हिलरी अशी भाषा वापरली असती तर जगातील यच्चयावत पुरोगाम्यांनी बघा ट्रम्प समर्थकांना पराभव पचवता आलेला नाही, यांना लोकशाहीच मान्य नाही इत्यादी इत्यादी 'वाढत्या असहिष्णुतेची' अमेरिकन आवृत्ती पुढे आणली असती.
अमेरिकेत जी पध्दत निवडणुकांसाठी वापरली जाते त्या पध्दतीतून ट्रम्प विजयी झाले आहेत. मग विषय संपला. तो निकाल एखाद्याला कितीही आवडला नसेल तरी तो मान्य केला पाहिजे. लोकशाहीचा अर्थच तो आहे.ट्रम्प निवडून आल्यामुळे वाटोळे होईल असे कितीही वाटले तरी ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आले आहेत हे नाकारून चालायचेच नाही.
आता नवी टूम निघाली आहे चेन्ज.ऑर्ग वर इलेक्टोरल कॉलेजच्या सदस्यांना ट्रम्पच्या विरोधात मत द्या असे आवाहन केले जात आहे आणि तीसेक लाख लोकांनी त्यावर सह्याही केल्या आहेत.२००० साली अल्बर्ट गोर समर्थकांनीही हा प्रकार करायचा प्रयत्न केला होता (त्यावेळी इंटरनेट आजच्या इतके पुढारलेले नसल्यामूळे त्यावेळी उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून). निदान त्यावेळी जॉर्ज डब्ल्यू बुशनी आपल्या गव्हर्नर भावाच्या मदतीने फ्लॉरीडामधील निवडणुकीत गैरप्रकार करून (डेमॉक्रॅटिक पक्षाचे पारंपारिक समर्थक असलेल्या कृष्णवर्णीय मतदारांची नावे मतदारयादीतून गायब करणे वगैरे) फ्लॉरीडा हे राज्य आणि म्हणून अध्यक्षपद जिंकले होते असे म्हणायला वाव तरी होता.त्यामुळे अल्बर्ट गोर समर्थकांच्या मागणीला थोडा तरी आधार होता.पण यावेळी मात्र ट्रम्पनी असे काही गैरव्यवहार केले आहेत असे काही ऐकिवात नाही.ते जर वैध मार्गाने निवडून गेले असतील तर त्या निवडणुकीला विरोध का?
कालपरवाच इंटरनेटवर एक चित्र बघितले. त्यात लिहिले होते की ज्या देशाने (अमेरिकेने) इतर देशांमध्ये लोकशाही नाही म्हणून त्या देशांवर बॉम्बिंग केले होते त्याच देशातील लोक लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अध्यक्षांना नाकारत आहेत :)
या सगळ्या गदारोळात ओबामा आणि हिलरी या दोघांनीही निदर्शने करणार्यांना निदर्शने बंद करा आणि निमूटपणे लोकशाही मार्गाने आलेला निकाल मान्य करा असे आवाहन केले आहे असेही कुठे वाचलेले नाही. तसे त्यांनी केले असेल तर उत्तमच. पण अजून तरी तसे काही त्यांनी केले आहे असे दिसत नाही.
२०१५ च्या प्रजासत्ताक दिनाला भारतात ओबामांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.आणि जाताजाता 'भारताने सहिष्णुतेचा अंगीकार करावा' अशा प्रकारचे unsolicited लेक्चर ओबामा झोडून गेलेच होते.आता तुमची सहिष्णुता कूठे गेली मिस्टर प्रेसिडेंट? आणि असेच लोक लोकशाही, अमेरिकन मूल्ये, परमताचा आदर वगैरे उच्चभ्रू गोष्टी बडबडताना दिसतात!!
असो.
14 Nov 2016 - 12:37 pm | मराठी कथालेखक
अतिशय योग्य लिहिलंय आपण
अमेरिकेत लोकशाहीवर असे डाग उडणं नक्कीच योग्य नाही. यामुळे जगातील अनेक देशांचा /नेत्यांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होवू शकतो.
अमिरेकन नागरिकांनी ट्रम्पना शांतपणे काम करु द्यावे. जर त्यांचे काही निर्णय अयोग्य वाटले तर सनदशीर्/कायदेशीर मार्गांनी त्या 'निर्णयांस वा धोरणास' विरोध करावा , ट्रम्प या व्यक्तीला विरोध करु नये.
14 Nov 2016 - 3:32 pm | श्रीगुरुजी
जानेवारी २०१४ मध्ये क्वचितच तोंड उघडणार्या मनमोहन सिंगांनी चक्क पत्रकार परीषद घेऊन "मोदी पंतप्रधान होणे देशासाठी अत्यंत घातक ठरेल" अशी भविष्यवाणी वर्तविली होती.
मे २०१४ मध्ये मोदी निवडून येणार हे नक्की झाल्यावर "मला मोदी पंतप्रधान असलेल्या देशात रहावेसे वाटणार नाही" असे खेदजनक उद्गार यू आर अनंतमूर्ती यांनी काढले होते.
तत्कालीन एफटीआयआयचे अध्यक्ष मिर्झा यांनी मोदींविरूद्ध सह्यांची मोहीम सुरू केली होती.
जून २०१३ मध्ये भाजपने मोदींना प्रचारप्रमुख नेमल्यानंतर रागारागाने नितीशकुमारांनी भाजपबरोबर १७ वर्षे सुरू असलेली युती तोडली होती. सप्टेंबर २०१५ पासून देशातील असंतुष्ट निधर्मांधांनी "मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशात असहिष्णुता वाढली आहे" असा कांगावा करून पुरस्कार परत करायला सुरूवात केली होती.
आता ट्रंप निवडून आल्यावर अमेरिकेत देखील साधारणपणे असेच सुरू झाले आहे.
14 Nov 2016 - 11:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
चपखल प्रतिसाद ! जगभरातले राजकारणी इथून तिथून सारखेच...
अमेरिकेत जी पध्दत निवडणुकांसाठी वापरली जाते त्या पध्दतीतून ट्रम्प विजयी झाले आहेत. मग विषय संपला. तो निकाल एखाद्याला कितीही आवडला नसेल तरी तो मान्य केला पाहिजे. लोकशाहीचा अर्थच तो आहे.ट्रम्प निवडून आल्यामुळे वाटोळे होईल असे कितीही वाटले तरी ट्रम्प अध्यक्षपदी निवडून आले आहेत हे नाकारून चालायचेच नाही.
हे भारतात घडले आहे आणि अजून चाललेच आहे.
२०१५ च्या प्रजासत्ताक दिनाला भारतात ओबामांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते.आणि जाताजाता 'भारताने सहिष्णुतेचा अंगीकार करावा' अशा प्रकारचे unsolicited लेक्चर ओबामा झोडून गेलेच होते.आता तुमची सहिष्णुता कूठे गेली मिस्टर प्रेसिडेंट? आणि असेच लोक लोकशाही, अमेरिकन मूल्ये, परमताचा आदर वगैरे उच्चभ्रू गोष्टी बडबडताना दिसतात!!
+१००
15 Nov 2016 - 7:01 am | साहना
> कॅलिफॉर्नियात तर काही ठिकाणी राज्याने अमेरिकेतून फुटून बाहेर पडावे अशा पध्दतीची बेजबाबदार भाषाही वापरली जात आहे.देशातले सरकार आवडत नाही म्हणून देशाचेच तुकडे व्हावेत अशी इच्छा ठेवायची असे प्रकार करणारी कन्हैय्याची पिल्लावळ भारतात आहेच. हे अमेरिकेतले मिनी कन्हैय्या म्हणायचे का?
भारताची आणि अमेरिकेची तुलना इथे होऊ शकत नाही. दोन्ही देशांची स्थापना वेगळ्या पद्धतीने झाली. इथे टेक्निकल मुद्यावर कॉंट्रोव्हर्सी असली तरी भारतांत "महाराष्ट्र वेगळा देश करावा" ह्या मुद्यावर तुम्ही संस्था उभारली तर तुम्हाला देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक होऊ शकते पण अमेरिकेत तशी चळवळ उभारण्याची संपूर्ण मुभा आहे. पूर्वीपासून अनेक conservative आणि libertarian ग्रुप्स जवळ जवळ प्रत्येक राज्यांत अशी चळवळ चालवत आहेत. लिबरल मीडियाला कदाचित पहिल्यांदाच लिबरल बाजूने अशी चळवळ पाहायला मिळत आहे. टेक्सास सारख्या राज्यांत तर ह्या चळवळींना फार जोर आहे. २०१२ च्या निकाला नंतर टेक्सस च्या लोकांनी खालील पिटिशन श्वेतभुवनाला सादर केले होते
https://en.wikipedia.org/wiki/2012_state_petitions_for_secession
https://en.wikipedia.org/wiki/Texas_secession_movements
एखाद्या राज्याला वेगळे होण्याची मुभा आहे का हा मुद्दा अनेकदा फार चर्चेत राहिला असून सुप्रीम कोर्टच्या निकाला प्रमाणे तसा एकतर्फी निर्णय घेण्याची मुभा कुठल्याही राज्याला नाही म्हणून टेक्सास ला वेगळे होण्याची परवानगी सुप्रीम कोर्टने नाकारली तरी सुद्धा हा निर्णय वादग्रस्त मानला जातो. काही conservative लोकांच्या मते राज्यांना वेगळे होण्याची मुभा असायला पाहिजे. लिबरल लोकांनी ह्याचा नेहमीच कडाडून विरोध केला आहे. Libertarian लोकांनी नेहमीच वेगळे होण्याचा चळवळींचे स्वागत केले आहे.
कॅलिफोर्नियाला वेगळा देश बनविण्याची जी मागणी आहे ती नवीन नसून फार जुनी आहे. कॅलिफोर्निया नॅशनल पार्टी नावाची पार्टी ह्याच मुद्यावर स्थानिक संस्थांच्या निवडणुका काही वर्षा पासून लढवत आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Secession_in_the_United_States
15 Nov 2016 - 10:14 am | गॅरी ट्रुमन
धन्यवाद. हे माहित नव्हते.
इतर मुद्द्यांविषयी तुमचे मत काय?
15 Nov 2016 - 3:04 pm | श्रीगुरुजी
१९९० च्या दशकात अमेरिकेतील काशीराम (लुईस फराक्खान) याने लाँग मार्च काढून टेक्ससला वेगळे मुस्लिम राज्य घोषित करण्याची मागणी केली होती. लुईस फराक्खान धर्मांतरीत आफ्रिकन होता. अमेरिकेत मुस्लिमांवर अन्याय होतो असा जगभरातील इतर मुस्लिमांप्रमाणे कांगावा करून तो टेक्सस वेगळे मुस्लिम राज्य म्हणून घोषित करण्याची मागणी बरेच दिवस करीत होता. काही वर्षांनंतर त्याने ही मागणी सोडून दिली.
16 Nov 2016 - 9:07 pm | बोका-ए-आझम
याच्या सत्यतेबद्दल अाणि तुमच्या अभ्यासाबद्दल शंका नाही पण हे वाचून आश्चर्य वाटले. काँझर्वेटिव्ह लोकांच्या समजल्या जाणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरी रद्द केल्याच्या मुद्द्यावर दक्षिणेतली राज्ये बाहेर पडली आणि त्यांनी Confederate States of America स्थापन केलं. तेव्हा लिंकनच्याच रिपब्लिकन पक्षाने यादवी युद्ध झालं तरी बेहत्तर पण देशाचे या मुद्द्यावर तुकडे होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन या राज्यांना परत संघराज्यात आणलं. आणि तेच Conservatives राज्यांच्या right to secede ला पाठिंबा देतात?
रच्याकने टेक्सास हा १८१२ च्या अमेरिका - मेक्सिको युद्धापर्यंत मेक्सिकोचा भाग होता. त्यामुळे तिथल्या लोकांना इंग्लिशभाषिक अमेरिकेपेक्षा स्पॅनिशभाषिक मेक्सिकन्स जवळचे वाटत असतील, किंवा स्वतंत्र देश असावं असं वाटत असेल.
14 Nov 2016 - 12:52 pm | प्रसाद गोडबोले
सामंत काका , तुम्ही म्हणाजे "तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म श्रीकृष्णा " असे म्हणायची वेळ आणलीत =))))
ह.घ्या.
असो !
नुकतेच फेबु वर मी २०१६ अमेरिका इलेक्शनची तुलना १९७० पाकिस्तान इलेक्शनशी केली. १९७० मध्ये मजिबुर कचकुन बहुमताने पाकिस्तानात निवडुन आला होता पण त्याला कडाडुन विरोध झाला, इव्हन सरर्कार स्थापन करायला बोलावलेही नाही ( बहुतेक बंगाली असल्याने ) . मग काय सिव्हील डिस ओबिडीयन्स अन बंगाल्यांची कत्तल अन राडा , शेवटी १९७२ मध्ये बांग्ला देश स्वतंत्र केला गेला !
आता अमेरिकेतही असलेच काहीसं चाललंय , (तुमच्या लेखी कदाच्जित महिषासुर असलेले) ट्रम्प बहुमताने निवडुन आलेले आहेत ! अन हुच्च लेफ्ट लिबरल लोकं अजुनही विरोध करताहेत , कॅलिफोर्निया स्वतंत्र करायचा गफ्फा चालु आहेत !
बघुया आता काय होते ते !
लय मजा येणार !!
14 Nov 2016 - 1:55 pm | बोका-ए-आझम
तांत्रिक मुद्द्यावर हरलेल्या आहेत. त्यांना लोकांची मतं (popular votes) जास्तच मिळालेली आहेत. जर त्या जिंकल्या असत्या तर याचा अर्थ स्त्रीपुरुष समानता साधली गेली असती असं मला अजिबात वाटत नाही. खरीखुरी समानता म्हणजे जिकडे उमेदवाराच्या जात/लिंग/वर्ण यांनी काहीही फरक पडत नाही अशी परिस्थिती. रच्याकने २००८ मध्ये सारा पॅलिन उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरल्यावर स्त्रियांवर अन्याय झाला नव्हता का? हीच ती डोक्यात जाणारी डावी फालतूगिरी!
14 Nov 2016 - 2:12 pm | गॅरी ट्रुमन
अरे हो. हा मुद्दा विसरायलाच झाला होता. तो लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
बाकी अध्यक्षीय निवडणुकांबरोबरच झालेल्या हाऊस आणि सिनेटच्या निवडणुकांमध्येही रिपब्लिकन पक्षाचाच विजय झाला आहे. हिलरींना स्त्री-विरोधी मानसिकतेतून लोकांनी मते दिली नाहीत हे जरी गृहित धरले तरी मग या हाऊस आणि सिनेटच्या निवडणुकांमध्येही सगळीकडे स्त्रियाच उभ्या होत्या का? ओबामांच्या ८ वर्षांच्या कारकिर्दीनंतर लोकांना बदल हवा होता असे का म्हणू नये?
हिलरींचा पराभव झाल्यापासून या पुरोगामी लोकांना फारच उत आला आहे.त्यातून हिलरींचा पराभव म्हणजे स्त्रियांवर अन्याय आणि हिलरींना विरोध करणारे सगळे स्त्रिविरोधी इत्यादी इत्यादी बुडबुडे सोडले जात आहेत. असल्या लोकांना पुरते फाट्यावर मारायला हवे.
15 Nov 2016 - 7:10 am | साहना
ट्रम्पच्या बायकोचा विषय येतो तेंव्हा ह्या लोकांचा स्त्रीविषयक आदर कुठे शेण खायला जातो हे समजत नाही. मिशेल ओबामा प्रमाणे मेलेनिया विशेष बुद्धिवान किंवा बोलकी नसली तरी हिलरी प्रमाणे लोकांचा जीव काही तिने घेतलेला नाही. न्यू यॉर्क पोस्ट ने जे काही पब्लिश केले त्याला ट्रम्प ने दिलेला प्रतिसाद अगदी चांगला वाटला.
https://reason.com/blog/2016/07/31/trump-campaign-right-on-melania-nude-pic
14 Nov 2016 - 2:14 pm | नाखु
सार
"आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते"
मोकावाला नाखु
14 Nov 2016 - 2:14 pm | यशोधरा
काका, आर यू सिरियस? ट्रंप आणि हिलरी म्हणजे दोघांपैकी कोण जास्त बेकार असली लढत होती ह्यावेळी.
14 Nov 2016 - 8:41 pm | Ram ram
I love Trump and hate hillary
15 Nov 2016 - 10:35 am | गॅरी ट्रुमन
या निवडणुकांमध्ये जवळपास सगळ्या शहरांमधून हिलरींना जोरदार विजय मिळाला आहे तर जवळपास सगळ्या ग्रामीण आणि निमशहरी भागांमधून ट्रम्पना विजय मिळाला आहे.हा कल ट्रम्पनी जिंकलेल्या तसेच हिलरींनी जिंकलेल्या अशा दोन्ही राज्यांमधून बघायला मिळत आहे.उदाहरणार्थ ट्रम्पनी ओहायो राज्य जिंकले.पण त्यातील सिनसिनॅटी,कोलंबस, डेटन, टोलिडो यासारख्या शहरांमध्ये हिलरींचा विजय झाला तर इतर भागांमधून ट्रम्पचा विजय झाला.हा कल टेक्सससारख्या रिपब्लिकनांच्या बालेकिल्ल्यातही बघायला मिळत आहे.अपेक्षेप्रमाणे ट्रम्पनी हे राज्य जिंकले पण हिलरींनी ह्यूस्टन, ऑस्टीन, डॅलस, सॅन अॅन्टोनिओ इत्यादी शहरी भागांमधून विजय मिळवला तर लहान ठिकाणे आणि ग्रामीण भागातून ट्रम्पनी विजय मिळवला.
भारतात निवडणुकांमध्ये "रूरल-अर्बन डिव्हाईड" बघायला मिळते अशी ओरड पुरोगामी नेहमी करत असत. (२०१४ नंतर हे प्रमाण जरा कमी झाले आहे). अगदी तशीच "रूरल-अर्बन डिव्हाईड" अमेरिकेत बघायला मिळाली आहे (कदाचित यापूर्वीही बघायला मिळाली असेल. पूर्वीच्या निवडणुकांचे माहित नाही). त्याविषयी काही ओरड झाल्याचे ऐकिवात नाही. कदाचित याचे कारण शहरांमधून पुरोगाम्यांना अपेक्षित असलेल्या उमेदवाराचा विजय झाला हे असावे :) पुरोगामी नेहमी म्हणतात की भारतात मुंबई, दिल्ली, बंगलोर इत्यादी महानगरे सोडून इतरही भाग आहेत पण अमेरिकेतही न्यू यॉर्क, शिकागो, लॉस अॅन्जेलिस, सॅन फ्रॅन्सिस्को, अटलांटा इत्यादी महानगरे सोडून इतर भागही आहेत याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतो.
15 Nov 2016 - 10:51 am | अनुप ढेरे
हा प्रकार नवा नसून जुनाच आहे. इथेच कुठेतरी बरंच आधी वाचल्याप्रमाणे(बहुधा नंदनने लिहिलेलं), निवड्णुका महानगरी किंवा ग्रामीण मतदारांवर ठरत नसून सब-अर्बन/ उपनगरी मतदारांवर ठरतात. कारण ते लोक स्विंग मतदार असतात.
15 Nov 2016 - 1:35 pm | पुंबा
मला याचा अर्थ असा दिसतो कि अमेरिकन पोटार्थी, गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय, ग्रामीण निमशहरी लोक हे ideology नावाच्या religion च्या आहारी गेलेले नाहीत. त्यांना फुकाच्या तत्वांपेक्षा रोजच्या जगण्यामारण्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीत अधिक स्वारस्य आहे. हे अमेरिकन लोकशाहीचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे. भारतात 2014 च्या निवडणुकीनंतर हाच ट्रेंड दिसत आहे. लोकशाही अशीच अधिकाधिक सेक्युलर(ideology हा धर्म या अर्थाने) होत जावो.
15 Nov 2016 - 7:17 pm | गामा पैलवान
श्रीकृष्ण सामंत,
तुम्ही हिलरीच्या प्रेमात पडला आहात काय? नाय म्हणजे, त्याचं काये की तिच्या प्रेमात पडायला हरकत नाही. फक्त ती आता या जगात नाहीये. जी हिलरी म्हणून खपवताहेत ती तेरेसा बार्नवेल आहे.
आ.न.,
-गा.पै.