नमस्कार मंडळी.
व्यायामाच्या धाग्यावर उदंड प्रतिसाद झाल्याने "फिटनेस अॅप आणि गॅजेट्स" च्या वापराबद्दल नवीन धागा काढत आहे. गोड मानून घ्या. ;) (एस रावांनाही बरेचदा लिहितो लिहितो म्हणून सांगितले होते.)
सर्वप्रथम, आपण आपल्या आनंदासाठी व्यायाम / सायकलिंग करतो मग त्याचे असे रेकॉर्ड ठेवणे किंवा ट्रॅक ठेवणे अनेक जणांना पटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या मोठ्या राईड नंतर "आपले आत्तापर्यंत इतके इतके किमी झाले..!!" ही भावना जबरदस्त असते. अवर्णनीय..!!
अॅपसाठी आवश्यक गोष्टी -
या अॅपसाठी सर्वप्रथम आवश्यक गोष्ट म्हणजे भरपूर बॅटरी बॅकअप देणारा मोबाईल.
काही कारणाने बॅटरीने मान टाकली तर अॅपवर रेकॉर्ड झालेले राईडचे आकडे शिल्लक राहिलच याची कोणतीही खात्री देता येत नाही. बहुतांश वेळा बॅटरी संपपर्यंत ट्रॅक झालेले आकडे बॅटरी चार्ज केल्यानंतर दिसतात पण अनेक अॅप असेही असतात की ते आपली राईड सेव्ह करेपर्यंत राईडची माहिती त्यांच्याकडे कुठेही सेव्ह करत नाहीत, त्यामुळे बॅटरी गेली की अॅपही जाते आणि आकडेही जातात.
दुसरी आवश्यक गोष्ट म्हणजे इंटरनेट डेटा शिवाय GPS चालू आणि कनेक्टेड राहण्याचे फिचर असलेला फोन. कारण इंटरनेट डेटा खूप बॅटरी खातो आणि अॅपला बॅटरी पुरत नाही.
बाकी आवश्यक गोष्टी म्हणजे GPS, लोकेशन, अनेक वेगवेगळे सेन्सर्स वगैरे वगैरे.. हल्लीच्या सर्वच स्मार्टफोन मध्ये हे फीचर असतातच.
अॅप निवडताना..
सायकलिंग आणि रनिंगसाठी अॅप निवडताना "ऑटो पॉझ" वाले अॅपच शक्यतो वापरावे. अन्यथा ते अॅप दर थांब्याला चालू / बंद करावे लागते.
तर मी आत्तापर्यंत वापरलेली कांही अॅप येथे देत आहे, बाकी माहिती प्रतिसादांमध्ये मिळत जाईलच.
हे अॅप अगदी सुरूवातीला वापरले, पण यात ऑटो पॉझ नाहीये त्यामुळे मोठय राईडमध्ये पॉझ करणे आणि आठवणीने परत चालू करणे हे त्रासाचे काम होते. यात एलेव्हेशन ग्राफ मस्त निघतो. पण नंतर हे अॅप वापरणे बंद केले.
GPS Tracker Free - विंडोज फोन -
हे सध्या वापरत असलेले अॅप, एकदम भारी आहे आणि झकास ग्राफ निघतात. आपल्या वेगाचाही ग्राफ निघतो. मला सापडलेले सर्वात भारी अॅप समजायला हरकत नाही. ;)
पुढील प्रकारची माहिती या अॅप वर रेकॉर्ड होते.
Sports Tracker - अॅन्ड्रॉईड -
हे दुसर्या फोनवरील अॅप, हे पण चांगले आहे, विंडोजवरील GPS Tracker Free इतके चांगले नसले तरी चांगले अॅप आहे.
पायी चालण्यासाठी पेसर नामक एकच अॅप वापरायला सुरूवात केली आहे. तुम्ही इतर कोणते अॅप वापरत असाल तर जरूर माहिती द्या.
फिटबिट किंवा फिटनेस बँड बद्दल व्यायामाच्या धाग्यात चर्चा झाली आहेच, येथेही ती चर्चा सुरू ठेवता येईल.
प्रतिक्रिया
11 Nov 2016 - 9:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
ऑफलाईन जीपीएस चालू ठेवणारा फोन नाही बहुदा आमचा (मोटो जी प्रथम पिढी) त्यामुळे, ऍप इंस्टॉल करायची इच्छाही अपूर्णच राहणार असे दिसते. असो!
11 Nov 2016 - 10:00 pm | मोदक
अजुन थ्री नॉट थ्री वापरताय होय..?
:D
12 Nov 2016 - 10:28 pm | कैलासवासी सोन्याबापु
आता काय ब्रे बोलावे, भाऊंनी पाकच इज्जत काढली!. =))
होय महाराजा. तितकासा गेजेट सेवी नाही मी. मोबाईल पार कचरा होउस्तोवर वापरतो आजही. मोटो जी प्रथम पिढी करता काही उपयुक्त एप असले तर नक्की कळवा आमचा एखाद इंचाचा घसारा तुम्हाला खुपश्या दुआ देऊन जाईल.
12 Nov 2016 - 12:32 am | स्पार्टाकस
आयफोन ६ प्लस आणि अॅपल वॉच. (अजून ७ घेतलेला नाही)
त्यात बिल्ट इन अॅक्टीव्हीटी आणि वर्कआऊट अॅप्स आहेत त्या खूप चांगल्या आहेत. कदाचित मला त्याची सवय झाली आहे म्हणूनही असेल.
12 Nov 2016 - 5:06 am | बेकार तरुण
अॅपल ६, रनकीपर आणि फिट्बीट ब्लेझ वापरतो
रनकीपर बरेच अचुक नोंदी करतो, फिट्बीट अधुन मधुन गंडत असतो
12 Nov 2016 - 7:05 am | एस
या धाग्यासाठी आभार. कृपया अँड्रॉइडसाठीच्या अॅपची माहिती द्यावी. विशेषतः दूरच्या अंतरासाठी सायकलस्वार कोणते अॅप वापरतात आणि त्यामुळे मोबाईलची बॅटरी उतरत नाही का याबद्दल कुतूहल आहे.
दुसरे म्हणजे फिटनेस बँड्स आणि अशा अॅपचा समन्वय कसा साधतात. फिटनेस बँड्सची गरज खरंच असते का. सायकलिंग कॉम्पुटर म्हणून काही वाचले होते. ते काय असते. इ. प्रश्नांवर काही लिहिल्यास मदत होईल.
12 Nov 2016 - 8:21 am | खटपट्या
एस हेल्थ वापरतो. एप चालू बन्द करावे लागत नाही. आपली हालचाल अचूक टीपते. चालणे आणि धावण्यासाठी उत्तम.
13 Nov 2016 - 9:48 am | अरिंजय
मी स्ट्रावाची मोफत आवृत्ती वापरतो. स्ट्रावा हे अँड्रॉईड अॅप आहे. हे सायकलींग व रनिंग दोन्ही साठी वापरता येते. तुमची राईड यावर अशी दिसते
याशिवाय आपण मित्रांना फॉलो करुन त्यांच्या राईड्स बघु शकतो व त्यांच्या राईड्स वर कमेन्ट्स देखील करु शकतो.
माझ्याकडे अडिच वर्षांपुर्वीचा कार्बन कंपनीचा ४.२.२ अँड्रॉईड चा हातसंच आहे. त्यावर हे अॅप व्यवस्थित चालते. जिपीएस बोंबलण्याची अगदी क्वचित १-२ उदाहरणे आहेत. बाकी अॅप मस्त.याला बॅटरी देखील कमी लागते.
15 Nov 2016 - 12:31 pm | मोदक
स्ट्रावा वापरायला सुरूवात केली आहे. भारी अॅप आहे.
14 Nov 2016 - 9:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
स्राव्हा बंद कसे करायचे हो रनिंग झाल्यावर?? काय सुधारना ते टाकलं डिलिट करून
14 Nov 2016 - 10:53 pm | मोदक
रेकॉर्ड राईडच्या बटणा शेजारी एक झेंडा आहे, लालपिवळा. त्यावर क्लिक करा आणि ऍक्टिव्हिटी सेव्ह करा
स्ट्रावा भारी आहे, अर्थात आम्हाला खुद्द प्रशांत मालकांनी स्ट्रावा कसे वापरावे याचे धडे दिल्याने अनेक खाचाखोचा कळाल्या.
14 Nov 2016 - 9:50 pm | आदूबाळ
मोदकाचं फिटनेसवेड असंच सुरू राहिलं तर त्याचा आयडी बदलून सुरळीची वडी करावा लागेल.
14 Nov 2016 - 11:18 pm | कैलासवासी सोन्याबापु
ठ्ठो महालोल हहपुवा
14 Nov 2016 - 11:51 pm | मोदक
वजन काय कमी होत नाय राव :(
15 Nov 2016 - 2:05 pm | आनंदराव
जिभेवर नियंत्रण आवश्यक आहे. (खाण्याच्या बाबतीत)
15 Nov 2016 - 4:49 pm | बाळ सप्रे
(खाण्याच्या बाबतीत)
हे खास लिहिण्यामागचे प्रयोजन?? ;-)
15 Nov 2016 - 10:21 am | प्रकाश घाटपांडे
मॉर्निंग वॉकला चांगले अॅप कोणते?
15 Nov 2016 - 12:31 pm | मोदक
मी पेसर नामक एक अॅप वापरतो आहे. पण ते मठ्ठ अॅप माझ्या सायकलिंग दरम्यानच्या वेळेतले कांही अंतर मोजत आहे.
म्हणजे काल ५७ किमी सायकलिंग केले आणि फार चालणे झाले नाही तर हे अॅप बरोब्बर राईडच्या वेळेत १२ किमी चालणे झाले असे असे दाखवत आहे.
तुम्ही सायकलिंग करत नसलात तर एकदम चांगले अॅप आहे
15 Nov 2016 - 1:45 pm | वरुण मोहिते
सगळ्यासाठी उपयुक्त . अर्थात मी कधीच सिरिअसली वापरला नाही आहे .
15 Nov 2016 - 2:52 pm | पाटीलभाऊ
GPS Tracker Free हे अँप वापरून पाहिले. चांगले आहे पण त्यात मध्ये पॉझ(Pause ) नाही करता येत. परत सुरुवातीपासून मोजायला सुरुवात करत ते बेन.
15 Nov 2016 - 8:06 pm | मोदक
दोन "GPS Tracker Free" आहेत.. मी दिलेली लिंक बघा. त्यात ऑटो पॉझ आहे म्हणण्यापेक्षा राईड टाईम वेगळा मोजला जातो.
15 Nov 2016 - 7:54 pm | त्रिवेणी
मी हे अॅप वापरते.पण आॅटो पाॅज नाही याच्यात.
21 Nov 2016 - 5:32 pm | साधा मुलगा
हे रनकिपर आहे असे वाटते.
मी पण हेच वापरतो. GPS चा मात्र यात प्रॉब्लेम वाटतो चांगली रेंज असून सुद्धा. google मॅप्स वर योग्य लोकेशन दाखवतं पण यात येत नाही. आणि हो ऑटो pause नाही यात.
15 Nov 2016 - 8:07 pm | माझीही शॅम्पेन
गॅझेट्स आणि ऍप बद्दल म्हणायचं तर फिटबीट सर्ज विथ HR (फिटबीट सिरीज मधील टॉप मॉडेल) आणि फिटबीट ऍप वापरतो जवळपास सर्व गरज पूर्ण होतात (लॉन्ग रनिंग करत असल्याने पेशल गरजा असतात)
बाकी चालण्या / किंवा पाळण्यासाठी पेडोमीटर नावाचं एक फुकट ऍप आहे प्रत्येक चांगला स्मार्ट फोन स्वतःचे फिटनेस ऍप घेऊन येतोच त्यामुळे ढिगाने ऍप आहेत
15 Nov 2016 - 8:25 pm | कविता१९७८
अॅप किंवा फीटनेस बेल्ट वापरल्याने वजन कमी होतं की चालल्याने, मोबाईलला लहान मुलांच्या झोळीत घालुन झोका दिला कि अॅप किंवा फिटनेस बेल्ट मधे आपोआप १०-२० के स्टेप्स चालल्याचा आकडा दिसेल.
15 Nov 2016 - 8:55 pm | माझीही शॅम्पेन
वजन कशाने कमी होईल हे ब्रह्मदेव सुद्धा नक्की सांगू शकणार आंही :) तरी पण जितक्या कॅलरी घेतल्या त्यापेक्षा जास्त खर्च (बर्न ) केल्या तरच वजन कमी होऊ शकते
आणि इथेच फिटनेस ऍप आणि गॅझेट्स आपल्याला आरसा दाखवतात कि आपण किती कॅलरी कश्या खर्च करतोय (म्हणजेच फक्त आरश्यात बघून कोणी सुंदर होत नाही तसेच )
15 Nov 2016 - 9:39 pm | कविता१९७८
अच्छा
15 Nov 2016 - 8:32 pm | आजानुकर्ण
अँड्रॉईडवर असाल तर गूगल फिट बेस्ट
https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.fi...
जाहिराती वगैरे नाहीत. बॅटरीचा वापरही अतिशय कमी. गूगल अकाऊंटशी कनेक्टेड आहे त्यामुळे हिस्टरी जात नाही.
15 Nov 2016 - 10:38 pm | प्रसाद भागवत १९८७
walkmate चांगले अँप्लिकेशन आहे
20 Nov 2016 - 9:25 pm | विंजिनेर
माय लेटेस्ट टॉय - छातीवर लावायचा हार्ट रेट मॉनीटर - वाहू टिकर-एक्स. तसे बाजारात अनेक हार्ट रेट मॉनीटर उपल्ब्ध आहेत - जसे मनगटावर लावायचे घड्याळे (फीटबीट एचार) पण अचूक मोजमाप हवे असेल तर चेस्ट स्ट्रॅप मॉनीटरला पर्याय नाही.
चित्र-श्रेयः आंतरजाल
20 Nov 2016 - 10:23 pm | माझीही शॅम्पेन
छातीला व्यायाम करताना सतत HR मॉनिटर लावणं अतिशय त्रासदायक आहे त्यापेक्षा मनगटी गॅझेट्स खूप सुटसुटीत आणि दिवसभर सहज लावता येतात
म्हणून गॅझेट घेताना विथ HR असलेलीच घ्या , नंतर फारफार बर पडत
21 Nov 2016 - 1:18 am | विंजिनेर
@माशॅ, तुमचा प्रतीसादातील सरसकटीकरण चूक आहे. आज काल बाजारात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फिटनेस गॅजेट्स आहेत की खरेदी करताना भंजाळून जायला होतं त्यामूळे तुमची गल्लत होणे साहजिक आहे. असो.
अॅक्टीविटी ट्रॅकर तुम्ही म्हणताय तसं "दिवसभर" वापरून "अॅक्टिवीटी"चा डेटा गोळा करायला उपयोगी आहेत. म्हणून दीर्घ काळ आरामदायी वापर हा महत्वाचा निकष असतो. मनगटी घड्याळात एलीडीने मोजलेला हार्ट रेट "बराचसा" बरोबर असतो (१०-१५ बीपीम इकडे तिकडे). थोडक्यात मनगटी अॅक्टिवीटी ट्रॅकरमधे तुम्ही अचूकतेपेक्षा आरामादायीपणाला जास्त महत्व देत असता. अरे हो, शिवाय ते मनगटी गॅजेटस वापरून तुमचा कूलनेस फ्याक्टर आणि फ्याशन सेन्स वाढतो बर्का. काही जणासाठी हा बराच मह्त्वाचा निकष असतो :)
हार्ट रेट मॉनिटर अंमळ वायला - हा वापरून तुमचं ट्रेनिंग डोळसपणे (efficiency) सुधारता येतं त्यामुळे अचूक मोजमापाला जास्त महत्व असतं. शिवाय तुम्ही हे गॅजेट "दिवसभर" वापरणं अपेक्षित नसतं. असो विस्तारभयास्त्व इथेच थांबतो. पुढे मागे या विषयावर एखादी जिल्बी पाडीन.
शेवटी काय, कुठलेही गॅजेट हे "मीन्स टू अॅन एंड" आहे. - अंतीम लक्ष नव्हे हे ध्यानात ठेवून, आपल्या बजेटचा विचार करून, गरजा लक्षात घेऊन खरेदी करायचे की नाही हे आपण ठरवावे.
21 Nov 2016 - 12:19 pm | माझीही शॅम्पेन
दोन्ही प्रकार वापरून पाहण्याऱ्या कमीत कमी ३० लोकांशी बोलून हे माझं मत मांडलं आहे , ह्यातलं एक तर नेहमी छातीला बँड लावून माझ्या बरोबर पळतो , हे सरसकटीकरण अजिबात नाही , एखादा जर नवीन गॅझेट घेत असेल तर दोन्ही बाजू माहिती असलेल्या बऱ्या :)
आणि
आखिर कहेना क्या चाहते हो भाई !!
अजून सविस्तर लिहा , काही हरकत नाही आमचं ज्ञान वाढेल:)
21 Nov 2016 - 7:58 pm | अमर विश्वास
@माशॅ,
छातीला लावायचा HR मॉनिटर हा छातीचे ठोके अचूक मोजतो . याउलट मनगटात वापरायच्या फिटनेस बँड ची अचूकता कमी असते .
त्यामुळे जर तुम्हाला दिवसभराच्या ऍक्टिव्हिटीचा डेटा गोळा करायचा असेल तर फिटनेस बँड उत्तम.
पण High intensity Training सारख्या ऍक्टिव्हिटी करताना, ज्यात आपली क्षमता जास्तीतजास्त वापरायचा प्रयत्न करतो (Stretch to the limit) तेंव्हा heart rate मोजण्याची अचूकता महत्वाची असते. त्यावेळी छातीला लावायचा HR मॉनिटरला पर्याय नाही.
त्यामुळे प्रत्येकाने आपल्या गरजेप्रमाणे ठरवावे
21 Nov 2016 - 8:22 pm | माझीही शॅम्पेन
मी फक्त माझा स्वतःचा अनुभव शेयर केला ,
मी कित्येक वेळेला मनगटी गॅझेट आणि अतिरिक्त (बाहेरून) हार्ट मॉनिटरची तुलना केली आहे मला कधीच २-३ % जास्त फरक आढळला नाही.
ढोबळ मानाने (२२० - AGE ) कुठलयही परिस्थितीत ह्या पेक्षा हार्ट रेट कधीच गेला नाही पाहिजे !
सोय - किंमत - प्रायोरिटी (मराठी शब्द ? ) हे ज्याचं त्यानं ठरवावं हेच उत्तम :)
21 Nov 2016 - 8:23 pm | माझीही शॅम्पेन
तुमचं म्हणणं १००% मान्य आहे , हे पहिले वाक्य चोप्य पस्ते करायचं राहून गेलं