वैज्ञानिक दृष्टीकोण

सोहम कामत's picture
सोहम कामत in जे न देखे रवी...
7 Nov 2016 - 1:08 pm

चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती..
Video games मुळे होणारी मैदानी खेळांची अधोगती..

Robots मुळे माणूस स्वत:चे अवयव विसरलाय..
Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..

Whatsapp आणि Facebook मुळे मुक्तसंवादाला बसलय टाळं..
Computer वरील  प्रकाशामुळे जग दिसू लागलय काळं..

वाहनांच्या धुरामुळे Oxygen Traffic मध्ये अडकला..
Mileage Cars च्या अतिवापरामुळे Petrol चा भाव भडकला..

विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय..
मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय..

Television वरील बातम्यांमुळे झाले वर्तमानपत्रांचे निधन..
जहाजांऐवजी विमानच झाले Import-Export चे साधन..

Mechanical Engineers ची Degree शेवटी कारकूनांना दिली..
अखेर वैज्ञानिक नजरेने महाराष्ट्राची राजधानी हस्तगत केली..

कारखान्यातील धूर पाहून तर देवांनाही घाम फुटला..
Shahrukh च्या Entry मुळे दादा कोंडकेंचा लेंगा सुटला..

वैज्ञानिक दृष्टीकोणामुळे झाले आहे मानवी हृदयाचे इंधन..
या जन्मावर या जगण्यावर विज्ञानाचे बंधन..

विज्ञान आपल्यासाठी आहे आपण विज्ञानासाठी नाही..
समाजाची गरज मानवी विज्ञान यांत्रिक विज्ञान नाही..

चला तर मानवी विज्ञानाचा घेऊ आपण ध्यास..
यांत्रिक विज्ञानाच्या मर्यादेचा करूयात पुन्हा एकदा अभ्यास...

कविताविडंबनतंत्रराहणीविज्ञानशिक्षण

प्रतिक्रिया

कंजूस's picture

7 Nov 2016 - 1:19 pm | कंजूस

नानु गुरुजि?

कवि मानव's picture

7 Nov 2016 - 2:29 pm | कवि मानव

मस्त !!

Nitin Palkar's picture

7 Nov 2016 - 2:59 pm | Nitin Palkar

नक्की काय अपेक्षित...?

सतिश गावडे's picture

7 Nov 2016 - 4:45 pm | सतिश गावडे

तुमच्याकडून मिपावर धागा येणे अपेक्षित नव्हते. बेसिकमध्ये लोचा आहे तुमच्या.

मारवा's picture

7 Nov 2016 - 5:17 pm | मारवा

चला आज दाखवतो तुम्हा विज्ञानाची प्रगती..

यातला आवेश थक्क करणारा आहे.....
वेडात मराठे वीर दौडले सात....
सारखा आहे.

मारवा's picture

7 Nov 2016 - 5:25 pm | मारवा

Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..
विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय..

वरील दोन्ही ओळी अनाकलनीय अवघड आहेत पण समजण्यास सर्वात कठीण या दोन ओळी आहेत

विज्ञानाच्या भुतांनी मिळवला अध्यात्मिक देवांवर विजय..
मुंबईसारख्या मायानगरीमुळे झाला गावच्या निसर्गाचा पराजय..

यातील विज्ञानाच्या नेमक्या कोणत्या "भुतांनी" अध्यात्मिक देवांवर नेमका कसा विजय मिळवला ? व मुंबई आणि गावच्या निसर्गाचा संबंध तर फारच गुढ वाटला बुवा.
अर्थात जे न देखे रवी... या न्यायाने बरोबर असेलच. केवळ आस्वादत्मक समीक्षेच्या अंगाने थोडे स्पष्टीकरण दिले तर आम्हालाही काव्यानंद घेता येइल.
तोवर गुढ कवितेसारखा एक आगळा आनंद मिळतच आहे.

सोहम कामत's picture

7 Nov 2016 - 8:21 pm | सोहम कामत

असे म्हणायचे आहे की विज्ञानामुळे बहुतेक माणसांचा देवावरचा विश्वास नाहीसा होऊ लागला आहे. याच विषयाला थोडे विनोदी प्रकारे मांडले आहे.
आजकाल मुंबईसारख्या मायानगरीने सर्वांवर जादू केली आहे. गावच्या माणसांच्या मनात आता निसर्गाचे नाही तर तंत्रज्ञानाचे वेड आहे हे सर्वेक्षणामधून कळाले. गावचा निसर्ग संपवून तेथे Factories malls multiplexes असले पाहिजे असे त्यांना वाटते आणि तसेच हळूहळू होत चालले आहे त्यामूळे त्याचे वर्णन करताना कवितेत असे म्हटले आहे.

धन्यवाद..

कंजूस's picture

8 Nov 2016 - 2:20 pm | कंजूस

आशय कळला सोहम. आम्हीही गटांगळ्यान खात आहोत पण यावर कविता सुचली तुम्हाला!!
मर्ढेकरांची कविता आठवली " पिपात मेल्या उंदराला" उद्देशून लिहिलेली. इकडे असा एक आइडीपण आहे.

आदूबाळ's picture

7 Nov 2016 - 5:36 pm | आदूबाळ

Machines च्या वाढत्या किंमतींमुळे रुपयाचा भाव घसरलाय..

हे कसं काय?

Mileage Cars

म्हणजे नक्की काय?

जहाजांऐवजी विमानच झाले Import-Export चे साधन..

मला पामराला वाटत होतं की जहाजंच इंपोर्ट एक्सपोर्टची मुख्य साधनं आहेत.

Maritime transport is essential to the world’s economy as over 90% of the world’s trade is carried by sea and it is, by far, the most cost-effective way to move en masse goods and raw materials around the world. (इथून)

समाजाची गरज मानवी विज्ञान

हे मानवी विज्ञान काय प्रकर्ण आहे? "ह्यूमॅनिटीज" किंवा सामाजिक शास्त्रं का? तसं असेल तर माझा तुम्हाला फुल पाठिंबा. च्यायला हे फिजिकल सायन्सेसवाले लोक लैच माजून र्‍हायलेत.

च्यायला हे फिजिकल सायन्सेसवाले लोक लैच माजून र्‍हायलेत.

मराठी मुलांच्या नोकरीचा प्रश्न आहे पोटापाण्याचा प्रश्न आहे.

शब्दबम्बाळ's picture

7 Nov 2016 - 6:09 pm | शब्दबम्बाळ

बायकोने आपल्या वैज्ञानिक नवऱ्याला त्याच्या फोन मधले मेसेज बघून "वैज्ञानिक, दृष्टी कोण?" असा 'प्रेमाचा' प्रश्न केला आहे. त्यामुळे आणीबाणीच्या परिस्थितीची योग्य प्रकारे हाताळणी करण्यासाठी त्याने अत्यंत गूढ अशा भाषेत विज्ञान कुठे कुठे आहे हे तिला सांगितले आहे(जे कळण्याची शक्यता शून्य आहे!) आणि आता त्याला साक्षात्कार झाला आहे कि मानवी विज्ञान हेच श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करायला त्याला 'दृष्टी'ची गरज आहे!

मग यावरून तुम्ही facebook whatsapp चा अतिवापर, cars च्या अतिवापराने आणि पेट्रोल च्या वाढलेल्या किमतीमुळे होणारी त्याची चिडचिड(गावाकडून मुंबई म्हणजे काय चेष्टा कि काय!), भारतात नद्यांमधून अजूनही किफायतशीर वाहतूक सुरु न झाल्याचे दुःख, या सगळ्या इंधनात जळणारे त्याचे हृदय या सगळ्याचा संबंध लावू शकता!

अर्थात हा फक्त एक दृष्टिकोन झाला हि बहुआयामी रचना आहे त्यामुळे अनेक अर्थ निघू शकतात! :) (कृ. ह.घ्या.)

प्राची अश्विनी's picture

7 Nov 2016 - 6:54 pm | प्राची अश्विनी

"Shahrukh च्या Entry मुळे दादा कोंडकेंचा लेंगा सुटला..
;);)

गामा पैलवान's picture

7 Nov 2016 - 10:36 pm | गामा पैलवान

वाचक तरी काय मेले नतद्रष्ट आहेत. यमक बघायचं सोडून कसलेसे आस्वाद घेत बसलेत.

-गा.पै.

बुर्झ्वा लोकांनाच प्रश्न पडतेत को$हम म्हणून इथे तर सो$हम उत्तरेचआहेत.

कामत सर आगे बढो हम तुम्हारे साथ है संघटना व विज्ञानाची काशी हीच आमची झाशी या संघटनेच्या "नवलेखनाचा बोल भंडारा" या अनियतकालकातून साभार.

संदीप डांगे's picture

8 Nov 2016 - 2:45 pm | संदीप डांगे

अ‍ॅम आय मिसिंग समथिंग हीअर..??

सोहम कामत's picture

9 Nov 2016 - 11:35 pm | सोहम कामत

धन्यवाद..

जव्हेरगंज's picture

11 Nov 2016 - 12:24 am | जव्हेरगंज

एकसे एक प्रतिसाद!!!

_/\_