पिंडी ते ब्रह्मांडी उर्फ भुदरगड ते लेहमन

शेखस्पिअर's picture
शेखस्पिअर in जनातलं, मनातलं
29 Sep 2008 - 1:25 pm

आमच्या घरामागे कोणे एके काळी एक 'भुदरगड' नावाची पतसंस्था होती...
आमच्या शहरातील काही बडी प्रस्थं आणि मान्यवर त्या 'पतसंस्था' नावाच्या 'दुकानाशी' बांधून होते.
त्या सगळ्यांच्या 'पुण्याई'मुळे बरेच छोटे छोटे गरजू गुंतवणूकदार गोळा झाले.
आणि पतसंस्थेला प्रचंड बरकत आली.
मग काय धडाधड कर्ज वाटप सुरु झाले..सगळीकडे कसा आणंदी आणंद झाला.
पण एके दिवशी एकाएकी बातमी आली की पतसंस्था बुडाली.
मग काय ..लोकांचे थवेच्या थवे ,झुंडीच्या झुंडी,जथ्थेच्या जथ्थे 'दुकानासमोर' आल्या..
पुरुषांच्या शिव्या,, बायकांचे करवादणे,,याचा एकच हलकल्लॉळ झाला..

आमच्या ओळखीतले किमान १००-१५० जण असे होते की त्यांचे सुमारे रु.१०,००० - २,००,०००
तिथे अडकले होते.त्यात आमचे काही नातेवाईकही होते..त्यानंतर बरेच दिवस तेवढा एकच विषय सर्वमुखी होता.
काही लोकांनी मारही खाल्ला..काही जणांनी काव्यात्म न्याय करून 'दुकानातील' दिसतील त्या वस्तू
उचलून नेल्या..
तस्मात लोकहो ,कुठलाही पदार्थ हा सूक्ष्म कणांचा असतो..हे ध्यानात असू द्या..
आर्थिक गुंतवणूक हा एक निष्काम कर्मयोग आहे..

इतिहासअर्थकारणविचार

प्रतिक्रिया

कुंदन's picture

29 Sep 2008 - 1:31 pm | कुंदन

अशा बर्‍याच पतसंस्था डुबल्यात. संचालकांनीच स्वतः तसेच नातेवाईकांना लाखो रुपयांची कर्जे दिलीत , ज्या कर्जांची परत फेड कधीच होत नाही. सर्व सामान्य नागरीक जास्त व्याजाच्या आशेने या पतसंस्था मध्ये पैसे ठेव म्हणुन ठेवतो आणि लुबाडला जातो.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

29 Sep 2008 - 2:25 pm | घाशीराम कोतवाल १.२

अशा बर्‍याच पतसंस्था डुबल्यात. संचालकांनीच स्वतः तसेच नातेवाईकांना लाखो रुपयांची कर्जे दिलीत , ज्या कर्जांची परत फेड कधीच होत नाही. सर्व सामान्य नागरीक जास्त व्याजाच्या आशेने या पतसंस्था मध्ये पैसे ठेव म्हणुन ठेवतो आणि लुबाडला जातो. त्यासाठीच अण्णा हजारे आंदोलन करत आहेत

श्री's picture

29 Sep 2008 - 4:46 pm | श्री

भुदरगड ही पतसंस्था कोकणात माझ्या मते कणकवली ला होती.

विसोबा खेचर's picture

29 Sep 2008 - 11:26 pm | विसोबा खेचर

मलाही पुसटसे आठवते, नक्की माहिती नाही. आमचे पांडुरंग कांबळी नावाचे दोस्त त्याचे बहुधा विश्वस्त होते..

तात्या.