देशासाठी त्यागाची भावना ठेवून कर्तव्यावर असलेले देशातील अनेक जवान शहिद होत असतात. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. 21 ऑक्टोबर 1959 रोजी पोलीस दलातील 10 शिपाई लडाख हद्दीत भारत आणि तिबेट सिमेवर ,16 हजार फुट उंचीवर दोन हजार पाचशे मैलाच्या हॉटस्प्रिंग या सिमेवर बर्फाच्छादीत , अत्यंत निर्जन कडाक्याच्या थंडीत गस्त घालीत असताना धोकादायक पध्दतीने दबा धरुन बसलेल्या चिनी सैनिकाच्या हल्ल्यात शहिद झाले होते .
या दिवसाची आठवण राहावी तसेच देशामध्ये आतंकी हल्ल्यात ,नक्षलवादी कार्यवाहीत, समाजकंटक व हिंसक कृत्ये करणा-या कडून कर्तव्यावर असलेल्या शहीद जवानाच्या स्मृतीला उजाळा देण्यात येतो. आपल्या मातृभुमीचे संरक्षण करण्यासाठी राष्ट्र निष्ठा ठेवून अनेक जवान शहीद होत असतात त्यांना देशातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस मुख्यालयी कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात येते .
यावर्षी १ सप्टेंबर २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ दरम्यान संपूर्ण भारतातील विविध संरक्षण दलातील एकूण ४१३ जवान आपले कर्तव्य बजावत असतांना धारातिर्थी पडले आहेत . या सर्वांच्या नावाचे वाचन होऊन त्यांना पोलीसांनी हवेमध्ये तीन राऊंड फैरी झाडून मानवंदना दिली.
प्रतिक्रिया
21 Oct 2016 - 11:38 pm | एस
हुतात्म्यांना अभिवादन.
21 Oct 2016 - 11:38 pm | एस
हुतात्म्यांना अभिवादन!
21 Oct 2016 - 11:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
हुतात्म्यांना अनेकवार अभिवादन !
21 Oct 2016 - 11:49 pm | चांदणे संदीप
भारतीय सीमेवर देशासाठी प्राणार्पण केलेल्या त्या असंख्य वीरांना माझे हे काव्यपुष्प समर्पित! __/\__
नाही निजलो म्लान होऊनी
मातृभूमीच्या दिठीत
रूजूनी पुन्हा अंकुरण्या आलो
मरणाच्या मी मिठीत!
- संदीप चांदणे (२१/१०/२०१६)
22 Oct 2016 - 4:02 pm | तुषार काळभोर
_/\_
22 Oct 2016 - 3:06 pm | नाखु
अभिवादन
22 Oct 2016 - 3:15 pm | कैलासवासी सोन्याबापु
हा आम्हा पोलीसवाल्यांचा दिवस! चला कोणाला तरी आठवला ह्यातच समाधान वाटले! हॉट स्प्रिंगची प्रत्येक अर्धसैनिक बलातील अधिकारी, जवानांच्या मनात वेगळीच प्रतिमा असते, तसेच दरवर्षी ऑल इंडिया पोलीस कमेमोरेशन डे म्हणजेच २१ ऑक्टोबर रोजी भारतातील गृहमंत्रालया अंतर्गत येणाऱ्या तमाम सशस्त्र, निशस्त्र पोलीस दलातील निवडलेले निवडक दहा पोलीस अधिकारी आपापल्या फोर्सचा झेंडा (उदाहरणार्थ आयटीबीपी, सीआरपीएफ, बीएसएफ, सीआईसेफ इत्यादी) घेऊन आपापल्या फोर्सचे प्रतिनिधी म्हणुन हॉट स्प्रिंग इथे श्रद्धांजली वाहायला एक खडतर ट्रेक करून जातात, अश्या दसत्यात निवड होणे अतिशय जास्त बहुमानाचे मानले जाते अन अतिशय वरिष्ठ, शौर्यपदक प्राप्त, डेकोरेटेड अधिकारी ह्या हॉमेज ट्रेक करता निवडले जात असतात.