वेळ ही निराळी
भाग दोन
ती एक रात्र.
त्या एका रात्रीत सर्व काही चेंज झालं..
सर्व काही..
ती वेळ अशी होती की तेव्हा नाती बदलली..
ती वेळ निराळी होती..
पुजा गोरे..
ती मुलगी जी कधीतरी केवल वर जीव ओवाळून टाकायची,तीच पुजा अजय सोबत होती आज.दुपारचं जेवण सुमोने बाहेरून मागवून घेतल.जेवून झाल्यावर पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या.
पण माझा गप्पा मारायचा बिलकुल मूड नव्हता.
एकतर ती पुजा अजयला एवढ्या चिटकून बसली होती..
केवल कसा काय शांत होता देव जाणे..
"ओय कऊ मौनव्रत घेतल की काय."
आता या सुमोला कस सांगू की मी का शांत आहे ते.
तेवढ्यात कोणीतरी बेल वाजवली.
सुमो उठणारच होता मी थांबवल त्याला ..बसून बसून पायात मुंग्या आल्यासारख वाटतं होत.
दरवाजा उघडला तर समोर जवळपास पन्नाशी ओलांडलेले काका होते.
ते कोण असावेत याचा विचार करत मी दरवाजा वरच उभी होती तर मागून
सुमो आला..
"As-salamu alaykumअब्दुल अंकल"
" alaykum as-salamबेटे"
"अंदर आइए ना"
सुमो आणि ते काका आत गेले.
मी दरवाजा लावून मग आत गेली.
"अंकल..ये सब मेरे दोस्त है..
Gyz हे अब्दुल काका..
आमच्या घरात काम करतात..
लेकीन अंकल मैने बोला था ना की कुछ दिन आपको छुट्टी."
"हा बेटा..
मै तो बस मेरी बेटी निकाह तय हुआ है..
और वोभी अगले हफ्ते..
अपने इन सब दोस्त के साथ आ जाना"
हे अब्दुल काका स्वतःच्या मुलीच्या लग्नाला आम्हाला पण निमंत्रण देऊन गेले.
थोडा वेळ बसून.चहा पिऊन...मग ते गेले..
थोडा वेळ निकाह ला जायचं की नाही यावर चर्चा करून शेवटी जायचं अस ठरलं..
बाहेर मस्त पाऊस पडत होता..
म्हणूनच सर्वांना चहाची तलफ आली.
सलोनी आणि सुयोग दा,करण आणि ऐश्वर्या हे कपल्स एकमेकांसोबतच बिझी ..
पुजा तर अजयला सोडतच नव्हती.
त्यामुळे चहा बनवायला मीच उठली.
किचन मध्ये कुठे काय ते सांगायला सुमो पण किचनमध्ये आला.
"सुमो दूध फ्रिज मध्ये आहे ना??"
"हा..वेट मी देतो काढून.."
तोपर्यंत मी चहाचं आधण ठेवलं.
"कऊ ठिक आहेस ना?"
"हमम"
"काय हमम..खर सांग यार..
तब्येत ठिक वाटत नाही तर सांग तस."
"हो..जरा डोक दुखतय..बस.."
"मग तू जा बाहेर. मी करतो चहा."
"नको रे..करतेय ना मी..
तुच जा बाहेर..
प्रश्न विचारून मला पिडतोय.."
चहाची एक ट्रे सुमोने घेतली आणि दुसरी मी..
पण बाहेर बघते तर पुजा आणि अजय गायब.
"अजय...
ओह हो..
पुजा सोबत टेरेस वर.??"
दुष्यंतचं हे वाक्य ऐकून अस वाटतं होत की चहाचा ट्रे त्याच्या डोक्यावर मारावा.
अजु आणि पुजा दोघे पण पूर्ण भिजलेले होते..
"अबे..
काहीही बोलू नको..
तुम्ही आपापल्या gf सोबत लाईव नाहीतर मोबाईल वर बिझी..
म्हणून. जरा टेरेस वर गेलो..
पावसात भिजलो.."
स्वतःचे भिजलेले केस पुसत अजु बोलला..
पुजा चेंज करायला आत निघून गेली..
अजु पण त्याच्या रुम मध्ये गेला..
माझा मूड पुन्हा खराब झाला..
रात्री जेवुन झाल्यावर सर्व पुन्हा गप्पा मारायला बसले..
मी माझ्या रुम मध्ये जात होती तर दिपने मला पुन्हा बसवलं.
सुमो अचानक उभा राहिला आणि बोलला
"चला एक गेम खेळूया..
प्रत्येकाने कोणत्याही एका व्यक्ती बद्दल जे तुम्हाला वाटतं ते लिहायचं पण कोणी लिहलं ते सस्पेन्स राहणार.."
सुमोच्या डोक्यात कुठून काय येईल सांगता येत नाही..
कोणाला कोणाबद्दल काय वाटत असणार हे जाणून घ्यायचं होत सो सर्व तयार झाले..
सर्वांनी चिठ्या केल्या..
त्या चिठ्या एकत्र केल्या..
आणि पहिली चिठ्ठी उचलली स्वप्निलने ..
आणि पहिलच नाव माझं..
"डियर कऊ..
आय नो तू मला फक्त फ्रेंड मानतेस..
बट I ve feelings for u.."
कोणी लिहिल..का लिहिल..
माहित नाही..
पण त्या पॉईंटला मी शॉक झाली होती..
हा भाग लहान झाला माहित आहे...
पण ही कथा लिहत असताना दिप सोबत भांडण झालं..
जेव्हा एक.क्लोज फ्रेंड लांब जातो ते पण कारण नसताना तेव्हा त्रास होतो...
त्याने धरलेला अबोला कधी संपणार माहीत नाही तोपर्यंत या कथेत तरी मैत्री कायम राहील..
प्रतिक्रिया
21 Oct 2016 - 3:47 pm | गिरिजा देशपांडे
वाचतेय, पुभाप्र
26 Oct 2016 - 3:23 pm | अमरप्रेम
चालू ठेवा.. वाचतोय...
26 Oct 2016 - 3:35 pm | जयन्त बा शिम्पि
अक्षरावरुन ओळखता येईल ना ? मग सस्पेंस कसं राहील ?
27 Oct 2016 - 8:47 pm | कऊ
तेव्हा पटकन click नाही झालं हो.पण ज्याने लिहिल तो नंतर स्वतः पुढे आला...
समजेल पुढील भागात