इमोटीकॉन(Emoticon) / ईमोजी(Emoji)

उल्का's picture
उल्का in जनातलं, मनातलं
19 Oct 2016 - 11:09 pm

काल रात्री माझ्या आत्येबहीणीशी चॅट करताना मी ईमोजी परिवारात नव्यानेच सामील झालेली एक ईमोजी वापरली. आणि काहीही शब्दात न लिहिता तिला माझ्या भावना कळल्या. Do pictures speak more than words? Sometimes… Yes… Definitely. आणि ह्याच्या सर्रास वापरामागे खरं तर शोधामागे हाच तर खरा उद्देश्य आहे. जणू लेखक वाचकाला सांगत असतो कि तू वाचताना ते कोणत्या भावनेने वाचावेस. नाही का?

मग काय आहे हा प्रकार आणि नक्की कधी सुरु झाला म्हणून आंतरजालीय शोध घेतला आणि लक्षात आलं की ईमोजी आणि इमोटीकॉन हे दोन भिन्न प्रकार आहेत. हे दोन्ही एकमेकांशी संलग्न असले तरीही. ईमोजी हे इमोटीकॉनचे सुधारित/विस्तारित रूप आहे.

इमोटीकॉनचा शोध Scott Fahlman यांनी १९ सप्टेंबर १९८२ साली लावला. कोणती गोष्ट विनोदाने घ्यावी आणि कोणती गंभीरतेने घ्यावी ह्या विचाराने हे दोन चेहरे (हो चेहरेच) समोर आले. त्याआधीही अनेकांनी वेगवेगळे सुचवलेले प्रकार तितकेसे पुढे आले नाहीत. इमोटीकॉन म्हणजे शाब्दिक चिन्हांची भाषा. Emoticon हा शब्द Portmanteau शब्द आहे. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांनी बनलेला एक शब्द. Emoticon म्हणजे Emotional Icon. हे इमोटीकॉन आडवे वाचायचे असतात. दोन डोळे [:], नाक [-] व तोंड [) किंवा (]. हळू हळू यात इतर अनेक भावना वाढत गेल्या आणि आता तर त्यांची एक फौज आपल्या दिमतीला कायम हजर असते.

ईमोजी हा प्रकार जपान मध्ये NTT Docomo ह्या मोबाईल ऑपरेटर कंपनीतील Shigetaka Kurita ह्यांनी १९९८-९९ मध्ये निर्माण केला. ईमोजी म्हणजे चित्ररूपी चिन्हांची भाषा. हवामान भाकीत काही चिन्हांनी समजावले जाते त्यावरून त्यांना हे सुचले. सुरुवातीला इमोजीचा वापर फक्त जपान मध्येच होत होता. २०१० पासून Unicode मुळे जपान बाहेर याचा वापर सुरु झाला. आणि आता सर्रासपणे होतो आहे. आता तर आपण लिहिलेले इमोटीकॉन सुद्धा आपल्याला ईमोजी रुपात दिसत असतात.

हल्ली इमोजींचा वापर अगदी सढळहस्ते होत असतो. पण वापरताना खबरदारी घेणे आवश्यक असते. प्रत्येक फोन, ऑपरेटिंग सिस्टिम अथवा ब्राउजर यांचे स्वत:चे परिमाणित इमोजी असतात. तेव्हा प्रत्येक वेळी ही चिन्हांची भाषा योग्य ठरेलच असे नाही. तेव्हा त्यांचा वापर अचूकपणे, संयमाने करायला हवा.

इतकं सगळं लिहिल्यावर इमोटीकॉन/ईमोजी तो बनती है. :-)

– उल्का कडले

वावरमाहिती

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

19 Oct 2016 - 11:12 pm | टवाळ कार्टा

:)

एस's picture

19 Oct 2016 - 11:37 pm | एस
एस's picture

19 Oct 2016 - 11:37 pm | एस
एस's picture

19 Oct 2016 - 11:39 pm | एस

:):D:P

हे इमोजी प्रकाशित होतील की नाही माहीत नाही.

नाही झाले.

Error
The website encountered an unexpected error. Please try again later.

पद्मावति's picture

19 Oct 2016 - 11:50 pm | पद्मावति

मस्तं.

उल्का's picture

20 Oct 2016 - 7:51 am | उल्का

:-) _/\_

अत्रुप्त आत्मा's picture

20 Oct 2016 - 8:23 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/smile/feeling-good-smiley-emoticon.png

बाजीप्रभू's picture

20 Oct 2016 - 8:37 am | बाजीप्रभू

वापर अचूकपणे, संयमाने करायला हवा.

हे खूप महत्वाचं, मागच्याच आठवड्यात आमच्या शाळेच्या ग्रुपवर एकाच्या स्टेटमेंटला दुसर्याने "फक यू" चं मधल्या बोटाचं इमोजी वापरून ऑफलाईन झाला. सगळ्यांनी धुव-धुव धुतला... थॊड्यावेळाने पर्सनल कॉल केले तेव्हा कळलं कि त्या पठ्ठयाला त्या इमोजीचा अर्थच माहित नव्हता. मग माफीनामा जाहीर करतांना कळलं कि त्याला खरंतर "स्टेटमेंटला" अनुमोदन द्यायचं होतं.

लेखक वाचकाला सांगत असतो कि तू वाचताना ते कोणत्या भावनेने वाचावेस.

याची नेहमीच सरमिसळ होते. समोरच्याने गमतीत घ्यावं कि मी गमतीत लिहितोय एकूण एकच.

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2016 - 9:21 am | टवाळ कार्टा

ते अप युअर्स साठी आहे :D

बाजीप्रभू's picture

20 Oct 2016 - 9:58 am | बाजीप्रभू

सर्वदूर वापर मी म्हणतोय त्यासाठीच होतो,
आत्ताच मागच्या महिन्यात फिलिपाईनच्या प्रेसिडंटने युरोपियन युनियनला जाहीरपणे "बोट" दाखवून मोकळा झाला.
-

टवाळ कार्टा's picture

20 Oct 2016 - 10:10 am | टवाळ कार्टा

खिक्क, फिलिपिनो गंडल्यात