नो...आय डोंट..!! -२

अनिरुद्ध प्रभू's picture
अनिरुद्ध प्रभू in जनातलं, मनातलं
7 Oct 2016 - 4:40 pm

जवळपास संध्याकाळचे पाच वाजत आले होते. नेहा लगबगीनं तिचं घर असलेल्या बिल्डिंगचे जिने चढत होती. फार काही मजल्यांची बिल्डिंग नव्हती ती पण ऐसपैस होती हे नक्की. मुळात ते सरकारी क्वार्टर्स होतं. नेहाचे बाबा सरकारी नोकरीत असल्याने त्यानां तिथे राहायला खोली मिळाली होती. इनमीन चार मजल्यांची इमारत होती ती पण जुन्या वळणाची. त्यामुळे लिफ्ट असण्याचा प्रश्नच नव्हता. जि काय ये-जा करायची आहे ती याच जिन्यावरणं करायची. नेहाचं घर सगळ्यात वर, चौथ्या मजल्यावर होतं. त्या मजल्यावर नेहाची फॅमिली एकटीच राहत असे.
नेहा भराभर पावलं टाकत होती, जिने चढत होती. अखेर पोचली एकदाची.....दम लागला होता खर तरं. जरा वेळ ती त्या समोरच्या दरवाज्यासमोर थांबली. दम तर लागला होताच पण मनाची तयारी सुद्धा करत असावी बहुदा. मनातले विचार आणि ह्रदयातली धडधड ही सगळी ताकद हाततल्या त्या एका बोटात एकवटुन तिनं दारावरची बेल वाजवली एकदाची. दरवाजा निनादनं उघडला.
निनाद.....नेहाचा धाकटा भाउ आणि घरातलं शेंडेफळ. जेमतेम २०-२१ वर्षांचं.

"ये गं.....आई, ताई आली गं..."

निनादची आरोळी एकाच वेळी नेहा आणि आई दोघांशीही संवाद साधत आत, स्वयंपाकघरात काहितरी करण्यात व्यस्त असलेल्या आईपर्यंत पोचली.

" अरेच्चा, आलिस तु....आत्तासे फक्त पाच वाजलेत."

मनगटावरच्या घडयाळाकडे बघत नेहाचे बाबा म्हणाले.

" हो ना!! नाही म्हटलं उत्सुकता सहन झाली नसणार तिला...."

कसलेसे हात त्या कमेरेकडे साडीत खोचलेल्या नॅपकिनला पुसत, स्वयंपाकघरातुन भारेत येत असलेली आई सुद्धा बाबांबरोबर संवादात सामील झाली.
या सगळ्या संवादामधे नेहा तिच्या पायतली सँडल काढुन बाबांच्या समोर, बैठक व्यवस्थेच्या मधोमध उभि राहिली.
अतिशय शांतपणे आणि धाडसानं तिनं म्हटलं,

" आई-बाबा, मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. ......" नेहा.

" हो पण नंतर, आधी पाहुण्यांना येउन जाउदेत, मग बोलु ना निवांत, काय हो?"

आईने बाबांकडे पाहत म्हणाली आणि बाबांनीही मानेनेच सहमती दर्शवली.

" नाही. मला बोलायचय आणि तेही आत्ताच..!! आई-बाबा मला हे लग्न नाही करायचयं इंफॅक्ट मला लग्नचं नाही करायचयं आणि दुसरं सत्य म्हणजे मी कुठल्याच पुरुषाशी लग्न करुन सुखी नाही होउ शकत...."
नेहा एका फटक्यात सगळं म्हणाली.

" वेड लागलयं का तुला? ह्म्म समीरशी नाही हे चल एकवेळ मान्य केलं तरीही कुठल्याच पुरुषाशी नाही हे कसं शक्य आहे? कुणाबरोबर तरी तु नक्कीच सुखी राहशिल ना?" बाबा थेट नेहाला म्हणाले.

आईला जवळ्पास शॉकच बसला होता. आतापर्यंत बर्‍याच मुलांना नेहानं नाही म्हट्लं होतं आणि हा अजुन एक.. नक्के काय चाललयं हे तिल कळतं नव्हतं.

नेहानं फार आढेवेडे घेता सरळ आणि स्पष्ट शब्दात सांगितलं.....

" नो आय डोन्ट .....जस्ट....जस्ट बिकझ आय अ‍ॅम....आय अ‍ॅम लेस्बिअन........!!!"

(समाप्त)

-©अनिरुद्ध दिलीप प्रभू

कथा

प्रतिक्रिया

सोंड्या's picture

7 Oct 2016 - 5:18 pm | सोंड्या

आधिच sex ratio घटत चाललाय. त्यात मुली अशा लेस्बियन व्हया लागल्या तर आमचं बॅचलर पोरांच कल्याण हाये मग.
हे आसं काहीबाही वाचलंकी इंडिकेटर लागतेत पोरायचे

संजय पाटिल's picture

8 Oct 2016 - 3:18 pm | संजय पाटिल

आय अ‍ॅम लेस्बिअन........!!!"

हो; पण ... जाउदे!

चांगली कथा. अजून फुलवायला हवी होती असे वाटले.