मला आवडलेल्या दूरदर्शन संचावरील जाहिराती.

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
26 Sep 2008 - 6:02 pm

नमस्कार मिपाकर्स,

बहुतेक लोकांच्या घरी दुरदर्शन संच सतत चालु असतोच, त्यामुळे सतत जाहिराती नक्कीच जाता येता कानावर , डोळ्यावर पडतात. त्याला वेळ काढुन बसावे लागत नाही. आणि एखादे गाणे जसे आपल्या तोंडात बसावे तशी एखाद्या जाहिरातीचे वाक्य आपल्या तोंडात बसते. तर मी आज अशाच कोणत्या जाहिराती मिपाकरांना आवडतात हे जाणुन घ्यायला आले आहे.

मला मिन्टॉस - दिमाक की बत्ती जला दे !
अमुल - द टेस्ट ऑफ इंडिया
तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते.

ह्या जाहिराती मला आवडतात, आणि ती जाहिरात कानावर पडल्यावर पाऊले आपोआप दुरदर्शन संचाकडे वळतात. :)

तुम्हाला कोणत्या जाहिरात आवडतात हे आम्हाला सांगा.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

ऋचा's picture

26 Sep 2008 - 6:08 pm | ऋचा

खुप पुर्वी "दुध दुध" असायची.
अमुल ची "क्या बात है जिंदगी मे" म्हणत ती एक मुलगी नाचत क्रिकेट च्या ग्राउंडवर येते ती....
अजुन अहेत आठवतील तश्या लिहिन :)

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

गणपा's picture

26 Sep 2008 - 7:07 pm | गणपा

मला वाटत "क्या बात है जिंदगी मे" ही डेअरी मिल्क ची ऍड होती.
विस्मरणात गेलेल्या बर्‍याच जुन्या आवडत्या जाहिराती होत्या , त्यापैकी एक म्हणजे
बजाज ची, "हमारा बजाज , बुलंद भारतकी बुलंद तस्विर (तस्बिर)"
(कधिच बजाज ची सवारी न केलेला) गणपा.

टारझन's picture

27 Sep 2008 - 11:08 am | टारझन

ज्यावेळी सीबीझी नवीन आली ती ऍड. दोन पोरं मस्त रोड नी चाललेली असतात सिबीझी घेउन अन् त्यांनाच बर नेमक्या लै भारी पोरी लिफ्ट मागतात :( , आपल्याला सीबीझी अन् त्या पोरी जाम आवाल्ड्या होत्या :)
बाकी मग 'मिले सुर मेरा तुम्हारा' आणि सर्व फेमस लोक्स हातात मशाल घेउन पळतात ती ऍड फार जुनी ती ऍड.
प्रिती झिंटाची लिरीलची ऍड पाहून कुछ कुछ होत असे :)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

मनस्वी's picture

26 Sep 2008 - 6:11 pm | मनस्वी

देअर इस समथिंग मनी कान्ट बाय.. फॉर एव्हरीथिंग एल्स.. मास्टर कार्ड.
नीना कुलकर्णीचे एक्सप्रेशन्स १ नंबर!

आठवतील तशा ऍड करीन :)

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

संदीप चित्रे's picture

26 Sep 2008 - 8:03 pm | संदीप चित्रे

मास्टर कार्डची ही ओळ मला खूपच आवडते :)

मिंटी's picture

26 Sep 2008 - 6:37 pm | मिंटी

हॅप्पी डेंट व्हाईट ची एक खुप सुंदर ऍड लागते त्यात दिव्याच्या एवजी सगळी कडे माणसं हॅप्पी डेंट व्हाईट खाऊन त्याचा प्रकाश तयार करतात असं दाखवलं आहे....ती पण फार मस्त आहे ऍड.

अजुन आठवतील तश्या टाकेन....

आनंदयात्री's picture

26 Sep 2008 - 6:39 pm | आनंदयात्री

आम्हाला अमुल ब्रँडच्या जाहिराती आवडतात.
काही जास्त आवडतात, पण आजकाल त्यात माकडे वैगेरे असतात, पुर्वीच्या छान होत्या त्यांच्या जाहिराती ;)

झकासराव's picture

26 Sep 2008 - 6:45 pm | झकासराव

वर लिहिलेल्या सर्वच जाहिराती मस्त होत्या.
मला आवडायच्याच.
सर्फ एक्सेलच्या दाग अच्छे है वाल्या जाहिराती देखील मस्त होत्या. (शाळकरी भाउ बहिणीची खास होती एकदम) :)
पण आजकाल त्यात माकडे वैगेरे असतात, पुर्वीच्या छान होत्या त्यांच्या जाहिराती>>>>>>>>
माकडे असुनदेखील ती जाहीरात आवडणारी काही माणस आहेत बरं.
माकड यायच्या आधी त्याच प्रॉडक्टची एक जाहीरात होती. ती पाहुन त्या मॉडेलचे अनेक फॅन झाले होते. ;)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

डोमकावळा's picture

27 Sep 2008 - 3:53 pm | डोमकावळा

म्हणजे ये तो बडा .... वाल्या का ;)
असो...
मला आवडणार्‍यांपैकी १ जाहिरात म्हणजे मारुतीची.
एक छोटा सरदार गाडी घेऊन खेळत असतो. खूप वेळ खेळल्यानंतर मोठा सरदार (त्याचे वडील) त्याला थांबायला सांगतात आणि तो एकदम निरागसपणे म्हणतो "की करा पापा, पेट्रोल खतम ही नही होता" :)

ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.

किट्टु's picture

26 Sep 2008 - 6:42 pm | किट्टु

मला 'धारा' वालि एड खुप आवड्ते.

"जाना तो है, पर २०-२५ साल बाद" स्वीट छोटा मुलगा.;)

--किट्टु

सागर's picture

26 Sep 2008 - 8:34 pm | सागर

ही जाहीरात आप्ली एक्दम फेवरेट :)

सुहास's picture

27 Mar 2009 - 11:52 pm | सुहास

हीच ती जाहीरात...

http://www.youtube.com/watch?v=PbV5Y5KJCUs

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Sep 2008 - 6:42 pm | ब्रिटिश टिंग्या

धारा ऑईलची ऍड होती.......मस्त होती!

>>तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते.
अक्षय कुमार अन् कोकाकोला? :O
आमीर खान असावा :?

>>तसेच थंडा मतलब कोका कोला ही अक्षय कुमारची जाहिरात ही आवडते.
अक्षय कुमार अन् कोकाकोला?
>>>आमीर खान असावा
टिंग्या
बरोबर रे
आमीर खान ची जाहिरात होती.

(अवांतर : काही खरे नाही नटांची नावे ही मी हल्ली विसरत आहे. )

दिप्ती's picture

29 Sep 2008 - 2:46 pm | दिप्ती

अक्षय कुमार थम्स अप च्या जाहिरातीत होता. कोक ची जाहिरात आमीर खानची होती.

फार फार दिवसापुर्वी......

मला हमारा बजाज (दूरदर्शन).... & फिनोलेक्स ने आणले पाणी (पुणे आकाशवाणि).....आवडत होते.

उद्धवराज

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Sep 2008 - 7:06 pm | ब्रिटिश टिंग्या

घराला घरपण देणारी माणसं......

डिएसकेंची जाहिरात होती!
आमच्या धुण्या-भांड्याच्या बाईला खुप आवडायच त्यातलं गाणं......ती सगळं काम सोडुन ती ही जाहिराय ऐकायची अन् मग कामाला जायची ;)

रेवती's picture

27 Sep 2008 - 5:31 am | रेवती

मजेशीर दिसतीये कामवाली बाई!

रेवती

भडकमकर मास्तर's picture

26 Sep 2008 - 11:55 pm | भडकमकर मास्तर

फिनोलेक्स ने आणले पाणी (पुणे आकाशवाणि).....

रिजिड पीव्हीसी फिनोलेक्स पाईप
अजोड अमोल दर्जेदार
मळे बहरतील हिरवेगार
फिनोलेक्स पाईप सेल्फ -फिट पाईप
फिनोलेक्स ने आणले पाणी
शेतं पिकली सोन्यावाणी
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

लक्ष्मीकान्त's picture

26 Sep 2008 - 7:08 pm | लक्ष्मीकान्त

फेविकोल च्या सर्वच जाहीराती खुप आवडतात.
उदा.

एक लहान मुलगा सारखा पळुन जात असतो, त्यचि आई त्याला फेवीकोल च्या रिकाम्या डब्यावर बसवते.
मग तो चीटकल्यासारखा बसुन रहतो ती जाहीरात ,
फेविकोलच्या रिकाम्या डब्यात दिलेले कोम्ब्डीचे आण्डे फूटत नाही,

एकापेक्शा एक मस्त आहेत.

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Sep 2008 - 7:11 pm | ब्रिटिश टिंग्या

पकडे रहना......छोडना नही! ;)

नंदन's picture

26 Sep 2008 - 8:40 pm | नंदन

एक सध्या पाहिलेली म्हणजे, राजस्थानात ४०-५० लोकांना घेऊन जाणारा एक छोटा टेंपो - ज्याच्या पाठीमागे फेविकॉलची ऍड आहे.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Sep 2008 - 8:42 pm | ब्रिटिश टिंग्या

नवीन लग्न झालेलं जोडपं अन् कत्रीनाबाई यांची! :)

प्रियाली's picture

26 Sep 2008 - 7:40 pm | प्रियाली

टारगेटची जाहीरात जी बीटल्सच्या (व्हाय) यू से गुडबाय ऍण्ड आय से हलो या प्रसिद्ध गाण्यावरून आहे ती अतिशय सुंदर आहे. प्रामुख्याने काळा, पांढरा, राखाडी आणि लाल रंग वापरून तयार केलेल्या अतिशय आकर्षक जाहीराती आहेत. ती लागली की हातातील सर्व काम सोडून त्यातील गोष्टी बघत रहाव्याशा वाटतात. प्रत्यक्षात टारगेटमधील माल वॉलमार्टाच्या पेक्षा किंचित बरा असतो असे माझे मत असले तरी. :)

जोनास ब्रदर्सना घेऊन केलेली एक इथे मिळाली. http://www.youtube.com/watch?v=3o4wJ40-t9Q पण ही मला आवडणारी नाही, लेकीला आवडणारी.

सुनील's picture

26 Sep 2008 - 7:44 pm | सुनील

रंगलेल्या चर्चेत मिठाचा खडा घातल्यासारखे वाटेल पण तरीही ...

मला वाटते, दूरदर्शन हे इतर अनेक वाहिनींपैकी (ज्याला मराठीत चॅनेल म्हणतात!) एक. सरकारी पण तरीही वाहिनीच. तेव्हा तुम्हाला त्या विशिष्ठ वाहिनीवरील जाहिरातींवर चर्चा अपेक्षित आहे की दूरचित्रवाणी संचावर दिसणार्‍या कोणत्याही वाहिनीवरील?

आणि दुसरे म्हणजे शीर्षकाची वाक्यरचना!

मला आवडलेल्या दुरदर्शनवरील जाहिराती.
दूरदर्शन की दूरचित्रवाणी हा वाद तूर्तास बाजूला ठेऊ. पण माझ्या मते हे वाक्य असे हवे होते -

दूरदर्शनवरील मला आवडलेल्या जाहिराती.

असो, मी आटोपते घेतो. चर्चा चालू दे...

(पुढे येणार्‍या गतीरोधकाची वाट पाहणारा) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Sep 2008 - 7:46 pm | ब्रिटिश टिंग्या

भावना पोहचल्याशी मतलब! :)

अहो, मौजमजा अन् विरंगुळा सदरात शीर्षक गौण असतं ;)

सुनील's picture

26 Sep 2008 - 7:50 pm | सुनील

भावना पोहचल्याशी मतलब!

आता ही भावना कोण? आणि ती कुठेशी पोचलीय?

असो, आम्ही आटोपते घेतले होतेच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ब्रिटिश टिंग्या's picture

26 Sep 2008 - 7:54 pm | ब्रिटिश टिंग्या

:)

मोहन's picture

29 Sep 2008 - 3:19 pm | मोहन

सध्या जाहिराबाजी चाललेली आहे. प्रमुख कार्यक्रमां दरम्यानच्या जाहिरातींचा दर ५ लाख रु. प्रती १० सें असा असतो. वर शाहरूख वगैरे मंडळींचा मेहताना (?). हे सर्व तुमच्या - आमच्या सारख्यां कडून सामानांच्या किंमती वाढवून दामदुप्पट वसुल केला जातो. कित्येकदा नसलेले गुण / फायदे दाखवून लोकांची दिशाभूल करतात. याला आपल्या कडे काही धरबंध नाही. लहान मुले/गृहिणी/अर्धशिक्षीत वर्गाला पध्दतशीरपणे "टारगेट" केले जाते.
जाहीरातींचा माहिती उपलब्ध करुन देण्याचा मुख्य उद्देश मागे पडून नफेखोरीचा झाला आहे.

(जाहिरातींमुळे त्रस्थ झालेला)
मोहन

शितल's picture

26 Sep 2008 - 7:48 pm | शितल

सुनिल भै,
मा़झे मराठी जरा कच्चे आहे असे मी मानते. त्यामुळे समजुन घ्यावे ही अपेक्षा.
पण आमच्या भावना मिपाकरापर्यत पोहोचल्या हेच खुप आहे.
धन्यवाद !

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 8:00 pm | लिखाळ

मला क्या आज सोमवार है ? ही जाहिरात आवडायची.
कायम आवडणारी म्हणजे सोनाली बेंद्रेची निरमाची. हुस्न परी असे गाणे असलेली.
फेविकॉलच्या जाहिराती सुद्धा छान असतात.
जिलेबी ? असे विचारणारी सुद्धा आठवणीत राहलेली.
बाकी बर्‍याच आहेत. आठवतील तश्या लिहिन.

अवांतर : मिपाकर्स हा शब्द कसा तयार झाला ! मी दोन तीन जागी वाचला. 'नमस्कार मिपाकर' हे अनेकांना उद्देशुन संबोधन असताना त्याला इंग्रजी अनेकवचनाचा प्रत्यय !

--लिखाळ.

संदीप चित्रे's picture

26 Sep 2008 - 8:08 pm | संदीप चित्रे

काय सुरेख जाहिरात होती ती (जरी लौकिक अर्थाने प्रॉडक्ट विकण्यासाठी नव्हती)
’भटियार’ राग तेव्हापासून आवडायला लागला.
---
तसेच ’बजे सरगम’ आणि ’मिले सूर मेरा तुम्हारा’ :)

प्राजु's picture

26 Sep 2008 - 8:15 pm | प्राजु

१. खूप पूर्वी लागयाची ती... ललिताजी वाली ऍड.... बहुतेक सर्फ ची होती.
२. स्कूल चले हम..... राष्ट्रीय साक्षरता मिशन च्या सगळ्याच आवडायच्या..
३. दूध है वंडरफूल पी सकते है रोज ग्लास फुल्ल
४. क्यु.. है ना पापा बुद्धू.. वाली जॉन्सन एण्ड जॉन्सन वाली..
५. क्लिनिक प्लस ची चुलबुली ची.....
बर्‍याच आहेत तूर्तास इतक्याच..

(सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेधुन्द मनाची लहर's picture

27 Sep 2008 - 4:26 pm | बेधुन्द मनाची लहर

ललिताजी म्हन्जे तीच ना गं....
आइये आइये ललिताजी , लिजिए आपका सब सामान....
ये नहि वो....
पर आपतो हमेशा मेंह्गी वालि टिकिया.....
लेति थि ...अगर वहि मेंहगि दामों वालि क्वालिटि , सफेदि कम दामों मे मिले तो कोइ ये क्युं ले....
मान गये...
किसे?
आपकि बार कि नजर ऑर निरमा सुपर्.....दोनों को...

पुनम...
देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.

झकासराव's picture

27 Sep 2008 - 4:35 pm | झकासराव

नाही........
ते आईये आईये दिपिकाजी अस होत. :)
दिपिका रामायणात सीतेची भुमिका केलेली अभिनेत्री.

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल's picture

26 Sep 2008 - 8:19 pm | शितल

मला पॉण्डच्या सगळ्या जाहिराती आवडतात.
तसेच खुप पुर्वी मोहन गोखले ची हमदर्द् का टॉनिक सिन्कारा असे काही तरी असायची
मला त्यावेळे हे कळायचे नाही की हा एवढा काटकुळा कसा हे टॉनिक पिल्यावर खिडकीची ग्लास फोडुन येतो. :(

देवदत्त's picture

28 Sep 2008 - 6:05 pm | देवदत्त

पहिल्या जाहिरातीत मोहन गोखले,
दुसर्‍यांदा पुन्हा बनविली त्यात जावेद जाफरी

१. वॉशिंग पावडर 'निरमा' ....
२. घराला कोणते पत्रे बसवावेत हेच कळत नाही..... अरे एस्बेस्टॉस सिमेंट पत्रे बसव......
३. मिले सुर मेरा तुम्हारा तर अप्रतिमच....

३. मिस चमको ... (ही जाहिरात मात्र या विषयातली नाही... पण दीप्ती नवल आपल्याला ह्या जाहीरातीसाठी आवडते...चित्रपट आठवत नाही ??? )

(जुन्या काळच्या दूरदर्शनचा प्रेमी) सागर

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 8:53 pm | लिखाळ

>३. मिस चमको ... (ही जाहिरात मात्र या विषयातली नाही... पण दीप्ती नवल आपल्याला ह्या जाहीरातीसाठी आवडते...चित्रपट आठवत नाही ??? ><
चश्म ए बद्दुर

शाल्मली's picture

26 Sep 2008 - 8:53 pm | शाल्मली

मला सर्फ का एरियल (?)ची 'दाग.. ढुंढते रह जाओगे..'ही आसावरी जोशीची जाहिरात फार आवडायची.
आणि फेविकॉलच्या पण सगळ्या जाहिराती छान असायच्या.
--शाल्मली.

देवदत्त's picture

26 Sep 2008 - 9:38 pm | देवदत्त

मी ही ह्यावर लिहिणारच होतो. लिहिल्याबद्दल शितलला धन्यवाद :)

माझ्या आवडत्या जाहिराती:
छू लो सितारो को अब दूर नहीं है मंजील - कॅडबरी ५ स्टार
कुछ खास हैं जिंदगी में - डेअरी मिल्क
फेविकॉल च्या सर्व
There are somethings, money can't buy. For everything else, there is Mastercard. -मास्टरकार्ड
चुटकी में चिपकाए - मासेमारीवाली जाहिरात - फेविक्विक
'जलेबी' वाली मुलाची जाहिरात- धारा
एक बूंद आपकी किस्मत बदल सकती है - एम सील.
अरे यह दिवार टूटती क्यूं नही है - अंबुजा सिमेंट
अंबुजा सिमेंट वाल्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या धर्तीवर जाहिरात बनवायला पाहिजे होती असे मला वाटत होते. पण बहुधा एक मोठी दु:खद घटना म्हणून त्यांनी त्यावर जाहिरात बनविली नसेल असेही वाटते.

आजकाल दाखवत असलेली
नजर को क्या चाहिये, ख्वाब थोडे ज्यादा -> मॅक्स न्यूयॉर्क जीवन वीमा. मस्त वाटते ही जाहिरात एकदम.

आणखी जशा आठवतील तशा....

फारतर नेने's picture

26 Sep 2008 - 10:12 pm | फारतर नेने

पान पसंद
शादि और तुमसे, कभी नहि.

बजाज बल्बस और ट्युब्ज
जब मै छोटा लडका था,
बडि शरारत करता था,
मेरी चोरी पकडी जाती.

अब मै बिलकुल बुढा हूं,
गोली खाके जिता हूं,
लेकिन आज भी घर के अंदर....
(पुढचे आठवत नाहि...)

बी-टेक्स
ओये...ओये..
खुजली करने वाले...
बी-टेक्स लगा ले...
ओये...ओये..

लाईफबॉय
लाईफबॉय है जहां,
तंदुरुस्ती है वहां....लाईफबॉय

ग्राईप वॉटर
(लहान मुलाच्या रडण्याचा आवाज)
अजि: अग्...काय झाल...
मुलगी: बाळ रडत होत...
आजि: ग्राईप वॉटर दे त्याला...तु लहान असताना मी हि तुला हेच देत होते....

पणजि: अग्...काय झाल...
अजि: बाळ रडत होत...
पणजि: ग्राईप वॉटर दे त्याला...तु लहान असताना मी हि तुला हेच देत होते....

खापरपणजि: अग्...काय झाल...
पणजि: बाळ रडत होत...
खापरपणजि: ग्राईप वॉटर दे त्याला...तु लहान असताना मी हि तुला हेच देत होते....

आणि हे असच continue...

सुपरफास्ट
फारतर नेने

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Sep 2008 - 10:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला हल्लीची कुठल्याश्या कंपनीच्या सी.एफ.एल. दिव्यांची जाहिरात आवडते, परेश रावलमुळे. त्यात तो म्हणतो, "सू थयूं?, सेव्हींग!"

(जळ्ळं मला जाहिरात आवडतानापण "वीज वाचवा" टाईपची जाहिरात आवडते)

मनीषा's picture

27 Sep 2008 - 12:07 am | मनीषा

व्हिसा कार्डची आहे ही

माईन्ड एन्ड बॉडी , हार्ट एन्ड सोल
मुझ में शक्ती हैं अनमोल !!!

आणि एका छोट्या मुलीला पक्षी विकत घेउन देणारा फॉरिनर

There are something, which money can' buy
for everything else... there is mastercard.

शैलेन्द्र's picture

27 Sep 2008 - 12:40 am | शैलेन्द्र

"बजाज बल्बस और ट्युब्ज
जब मै छोटा लडका था,
बडि शरारत करता था,
मेरी चोरी पकडी जाती.

अब मै बिलकुल बुढा हूं,
गोली खाके जिता हूं,
लेकिन आज भी घर के अंदर....
(पुढचे आठवत नाहि...)"

रोशनी देता बजाज........

अजुन एक..

बजाज कॅलिबरचि..

ए चलने वाले राह मे रुकना ना हार के..

प्राजु's picture

27 Sep 2008 - 12:42 am | प्राजु

एल आय सीच्या ऍड मधील त्याची पंच लाईन
"जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी"... खूप आवडते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 8:46 am | विसोबा खेचर

मला सर्फवाल्या ललिताजीची आणि बजाजच्या स्कूटरच्या "बुलंद भारत की बुलंद तसबीर, हमारा बजाज.." ह्या दोन जाहिराती खूप आवडल्या होत्या...

अवांतर - सर्फवाली ललिताजी म्हणजे कविता चौधरी नावाची एक उत्कृष्ट अभिनेत्री. उडान या फार पूर्वी आलेल्या मालिकेत तिने अप्रतीम काम केलं होतं!

तात्या.

ऊघडा तिचे डोळे .... मुक्त करा तिला पाहुद्या जगाकडे अश्या आशयाचि ... लहान मुलीचि होती... तोंडाला चिकट्पट्टि लावलेली ..

फार आशयपुर्ण होती...

नाद खुळा...

सुचेल तसं's picture

27 Sep 2008 - 10:03 am | सुचेल तसं

१) आजकाल युनियन बॅंकची लागणारी जाहिरातः मुलाला दुसर्‍या दिवशी पहाटे परदेशी जायचं असतं आणि वडील त्याला काळजीने सगळं घेतलय का, विमानतळावर कसा जाणार हे विचारत असतात. त्यावर तो मी जाईन व्यवस्थित, तुम्ही काळजी करु नका असं फाडकन सांगून विषय संपवतो. दुसरर्‍या दिवशी पहाटे निघताना त्याला रस्त्यावर पटकन कुठलचं वाहन दिसत नाही. तो आणि त्याची आई थोडे टेन्स होतात. तेवढ्यात एक टॅक्सी येते, जवळ आल्यावर तो तिला थांबवतो आणि पाहतो तर त्याचे वडीलच ती टॅक्सी कुठुनतरी घेऊन आलेले असतात. ते त्याला म्हणतात की अरे एवढ्या पहाटे इथे टॅक्सी मिळत नाही म्हणून मी घेऊन आलो. लगेच मुलगा वडलांच्या पाया पडतो आणि टॅक्सीमधे बसतो. शेवटचं वाक्य तर क्लासच - "आपके सपने सिर्फ आपके नही होते"...

२) आयसीआय प्रुडेन्शिअलची जाहिरातः बायको नवर्‍याला विम्याच्या कागदपत्रांवर सही करायला सांगते. त्यावर तो की मी मेल्यावर पैसे कशाला असं काहीतरी म्हणतो. बायको म्हणते की आपल्या लहान मुलीच्या शिक्षणाचा खर्च ह्यातून होईल आणि मग तुम्हीच टेन्शन-फ्री आणि त्यामुळे बरीच वर्ष जगाल. "इसलिये अपनी लंबी उमर के लिए साईन किजीए". ह्या जाहिरातीतील नवरा-बायकोचे एक्स्प्रेशन्स क्लासच!!!

३) एचएसबीसी बॅंकच्या दोन्ही जाहिराती: अ) मुलगी नवीन फॅशन म्हणून एक फाटकी जीन्स दुकानातून घेऊन येते आणि पलंगावर टाकून आंघोळीला जाते. तेवढ्यात तिची आई येते आणि ती जीन्स फाटलेली पाहून ती शिवायला लागते. ब) एक अळी मुलीच्या (का तिच्या आईच्या ते नाही आठवत) अंगावर चढते. ती घाबरुन आरडाओरडा करायला लागते. तेवढ्यात तिचा भाऊ येतो आणि त्या अळीला प्रेमाने उचलून बरणीतल्या रोपट्यावर सोडतो. ह्या दोन्ही जाहिरातीच्या शेवटी - "डिफ्रंट पीपल, डिफ्रंट व्ह्युज"

४) मॅक्स न्युयॉर्क लाईफ इन्शुरन्सः बायको घरात येते आणि नवर्‍याला हाक मारत असते. पण तिला तो कुठेच दिसत नसतो. ती सगळीकडे शोधते, शेवटी तिला तो टेरेस मधे आरामखुर्चीत अस्ताव्यस्त (पाठमोरा) पडलेला दिसतो. त्याचे दोन्ही हात लोंबकाळत असतात, चहाचा कप पडलेला असतो. ती घाबरुन त्याला हाका मारते पण तो तसाच पडलेला असतो. शेवटी ती त्याला हात लावते आणि तो एकदम इअर फोन काढुन तिच्याकडे बघतो. मग ती लटके चिडून हलके गुद्दे मारत त्याला मिठी मारते. शेवटचं वाक्य - "युअर पार्टनर फॉर लाईफ"

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

जैनाचं कार्ट's picture

27 Sep 2008 - 10:24 am | जैनाचं कार्ट (not verified)

आपल्याला पण ह्याच जाहीराती खुप आवडतात... कालच लिहल्या होत्या पण.. न जाणे आई मध्ये काही गडबड झाली वर रिफ्रश झाली :(

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

देवदत्त's picture

28 Sep 2008 - 8:50 pm | देवदत्त

युनियन बॅंकची लागणारी जाहिरातः
जाहिरात मस्त आहे.
ह्यात फक्त एक पटले नाही किंवा कळले नाही.
सकाळी निघताना तो मुलगा आपल्या वडिलांना भेटतही नाही का? म्हणजे त्याला माहितही नसते की वडिल घरी नाहीत असे?

केवळ_विशेष's picture

27 Sep 2008 - 10:16 am | केवळ_विशेष

सध्या नविन जाहिरात चालू आहे...बहुधा ५०-५० चीच असावी...कारण मी एकदाच बघितली होती...

एक मुलगा बस मध्ये एका बाईच्या शेजारी बसतो...(ती जागा 'स्त्रियांसाठी' असावी)...तर उभ्या असलेल्या बायका त्याला ओरडायला लागतात...

पण, तो ज्या बाईच्या शेजारी बसतो ती पटकन म्हणते, 'बैठने दो ना, जवान लडका बगल में बैठा है तो जलन हो रही है?'...तीचं टायमिंग, म्हणायची पद्धत ...लाजवाब!

दुसरी एक आयोडेक्स ची...

एक माणूस चाललेला असतो...तर रस्त्यात त्याला रू.५००/- पडलेले दिसतात्...काही क्षण तो तसाच उभा असलेला दाखवलाय्...मग तो तसाच वैतागून निघून जातो...(त्याला ती नोट घेताना वाकता येत नाही/नसतं)...
एकही संवाद नाहीये या जाहिरातीमध्ये...कमालीची सुंदर जाहिरात!

केवळ_विशेष's picture

27 Sep 2008 - 10:35 am | केवळ_विशेष

मॅक्स न्युयॉर्क लाईफ इन्शुरन्सः बायको घरात येते आणि नवर्‍याला हाक मारत असते. पण तिला तो कुठेच दिसत नसतो. ती सगळीकडे शोधते, शेवटी तिला तो टेरेस मधे आरामखुर्चीत अस्ताव्यस्त (पाठमोरा) पडलेला दिसतो. त्याचे दोन्ही हात लोंबकाळत असतात, चहाचा कप पडलेला असतो. ती घाबरुन त्याला हाका मारते पण तो तसाच पडलेला असतो. शेवटी ती त्याला हात लावते आणि तो एकदम इअर फोन काढुन तिच्याकडे बघतो. मग ती लटके चिडून हलके गुद्दे मारत त्याला मिठी मारते. शेवटचं वाक्य - "युअर पार्टनर फॉर लाईफ"---ही पण

आणखी एक...

काही वर्षापूर्वी बजाज कं ने हुडीबाबा नावाची कावासाकी-बजाज मॉडेल काढलं होतं...त्यावेळी "हुडीबाबा हुडीबाबा हुडीबाबा" असं म्हणत ते मोटार्सायकलस्वार जाताना दाखवले आहेत...
त्याच दरम्यान, एन्फिल्ड कं ने बुलेट ची जाहिरात काढली होती...त्यात बुलेट चालवणारे स्वार बुलेट चालवत जात असतात आणि इतर लोक "हुडीबाबा हुडीबाबा हुडीबाबा" च्या चालीवर "अरेबाबा अरेबाबा अरेबाबा" म्हणतात...

ज्यांना बुलेट चीज माहीत आहे, त्यांना ह्या जाहिरातीबाबत जास्त सांगण्यात काहीच हशील नाही...

त्यात बजाज च्या जाहिरातीची जी काही वाट लावली आहे ना...ती जाहिरात १-२ वेळाच दाखवली गेली

बुलेट च्या ह्या जाहिरातीत एक मोठा ट्रेलर-ट्रक दाखविला आहे. समोरुन येणा-या बुलेट च्या हेडलाईटच्या प्रकाश झोताने चालकाचे डोळे दिपून तो एकदम डावीकडे ट्रक वळवुन घेतो आणि बुलेट ला रस्ता मोकळा करुन देतो, आणि हे वाक्य ऐकू येते.

जब निकलती है बुलेट की सवारी रास्ता देती है दुनिया सारी

त्याकाळी मिळत असलेल्या बुलेट चा हेडलाईट बॅटरीवर चालायचा त्यामूळे बुलेटचा वेग कमी/जास्त असला तरी प्रकाश झोत अतिशय प्रखर राहत असे. तूलनेने त्या काळच्या इतर बाईक्सचा हेडलाईट मिणमिणत्या कंदिलाप्रमाणे वाटत असे. आजकाल सर्वच बाईक्स चे हेडलाईट हॅलोजन बल्बसह येतात त्यामूळे फारच प्रखर वाटतात. बुलेटमध्ये ही बरीच मॉडेल्स आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तर्‍हा.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

बेधुन्द मनाची लहर's picture

27 Sep 2008 - 10:37 am | बेधुन्द मनाची लहर

१. स्कुल चले हम....
२. अमुल द टेस्ट ओफ इंडिया....
३. हमारा बजाज... (खुप लहान होते मी तेंव्हा... आम्ही मोठ्याने म्हनायचो)
४. कोकोनट बिस्किट चि होती एक, एक पुढारी नारळ फोड्त असतात आनि त्यातुन बिस्किट निघतात...
५. दुध दुध ....पि सकते हो रोज ग्लास फुल्ल...
६. सकु दोन चहा टाक बरं....मगदुम चहा...(कोल्हापुर आकाशवाणी)
या आनि अशा बर्याच जुन्या जाहिरति छान होत्या.....

पुनम...
देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.

मुशाफिर's picture

27 Sep 2008 - 10:44 am | मुशाफिर

वर दिलेल्या बर्‍याच जाहीराती मला फार आवडतात. पण नेहमीच लक्षात राहीलेली जाहीरात म्हणजे, 'एशियन पेंट्स' ची कुठलाही संवाद नसलेली एक जाहीरात. त्यात पडद्यावर रंगांचे पट्टे बदलत जातात आणि त्याखाली फक्त वेगवेगळ्या देशांची नावं येतात.

आणि सर्वात शेवटी येते 'एशियन पेंट्स' ची पंचलाईन: 'अ कलर कॅन चेंज युवर वर्ल्ड'!

स्रुजनशीलतेचा एक अप्रतिम अविष्कार!!

मुशाफिर.

केवळ_विशेष's picture

27 Sep 2008 - 11:20 am | केवळ_विशेष

यांचं बर्‍याच दिवसांनी दर्शन झालं मोटोरोलाच्या जाहिरातीत्...छान वाटला त्यांचा कम बॅक...

मदनबाण's picture

27 Sep 2008 - 12:22 pm | मदनबाण

फिल्म डिव्हीजनची ही ऍड मला फार आवडायची:--
http://in.youtube.com/watch?v=9pN6CXLjlzU

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

घाशीराम कोतवाल १.२'s picture

27 Sep 2008 - 2:58 pm | घाशीराम कोतवाल १.२

ह्या भावनाबाई कोण?
नवीन

भावना पोहचल्याशी मतलब!

आता ही भावना कोण? आणि ती कुठेशी पोचलीय?
भावना माझी मैत्रीन होति आता नाहि आहे
म्हनजे भांडन झाल आहे

डॉ.प्रसाद दाढे's picture

28 Sep 2008 - 9:34 pm | डॉ.प्रसाद दाढे

८ पी एम व्हिस्कीची जाहिरातही अप्रतिम होती. बॉर्डरवरती दोन सै॑न्ये तयारीत उभी असतात व त्या॑चे सेनापतीही रागा-रागाने रोखून पाहात असतात ती. त्यातला लठ्ठ म्हणजे 'ऑफिस ऑफिस फेम मनोज पाहवा. दुसर्‍याचे नाव ठाऊक नाही. त्याच अभिनेत्याच्या फेविक्विकची (फिशि॑गची) व एरिकसन मोबाईलची जाहिरातपण अफलातून होती.
शिवाय मिले सूर, देस राग, पूरब से सूर्य इ तर सदाबहारच आहेत. मिले सूर बहुतेक अशोक पत्की॑नी बनविले होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Sep 2008 - 9:17 am | llपुण्याचे पेशवेll

लेसान्सी का तत्सम नावाचा एक साबण होता. त्याची जाहीरात होती.
'राहूल मैने कहा था ना पानी चला जायेगा'
मस्त जाहीरात होती ही ..
तसेच आय लव्ह यू रसना वाल्या देखील सगळ्या जाहीराती आवडायच्या.
पुण्याचे पेशवे

वल्लरी's picture

29 Sep 2008 - 2:18 pm | वल्लरी

HDFC pension Plan ची जाहिरात -सचिन खेडेकर ची
ओर ना सर झुकाके जियो......HDFC pension Plan
जिन्दगि के साथ भि जिन्दगि के बाद भि

आण्खि एक जाहिरात यायचि
मेरा बेटा है ना......(मुलगी Doctor असते)

प्रभाकर पेठकर's picture

29 Sep 2008 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर

'जाहिरात' ह्या विषयावर एक कार्यशाळेसारखा कार्यक्रम टीव्हीवर चालायचा. मला वाटते आलेक पदमसी चालवायचा.
त्यात त्यांनी सांगितले होते, 'ज्या जाहिरातींमुळे तपशील विसरले गेले तरी हरकत नाही पण 'प्रॉडक्ट' लक्षात राहते ती जाहिरात चांगली. अनेकदा जाहिरात फार ह्यूमरस होते, दर्शकाला तात्काळ आवडते पण तीचे तपशील लक्षात राहून जर 'प्रॉडक्ट' विसरले जात असेल तर काय उपयोग अशा जाहिरातीचा?'
कॅडबरी डेअरी मिल्क ची जाहिरात ह्या दृष्टीने चांगली म्हणता येईल.
'अमूल' दूधाची जाहिरातही एक उत्कृष्ट नमुना आहे. त्या जाहिरातीचे आणखीन एक वैशिष्ट असे की लहान मुलांच्या भावविश्वात त्यांनी गाय न दाखवता एक खेळकर वासरू दाखवले आहे.
'लेज्' वेफर्स च्या जाहिरातीत एक छोटा मुलगा लेज् वेफर्स चे गुणगान शेजारी बसलेल्या एका मध्यमवयीन, राकट पोलीस ऑफिसर जवळ करीत असतो. शेवटी तो पोलीस ऑफिसर चव पाहण्यासाठी त्याच्या पुढे हात पसरून वेफर्स मागतो तर त्याला तो मुलगा सांगतो,' मम्मी कहती है अनजान आदमीसे बात नही करनी चाहीए|' ती जाहिरातही मस्त होती.

शितल's picture

29 Sep 2008 - 4:24 pm | शितल

ही एक मस्त जाहिरात आहे.

गावातील सगळे लोक एकमेकांना केवळ नं. ने ओळखतात.
अभिषेक बच्चनची - सर जी क्या आयडिया है !
ह्या वाक्या नंतर त्याने मानेला दिलेला झटका अगदी सही आहे.

विचारी मना's picture

16 Oct 2008 - 9:28 pm | विचारी मना

अहो हच का छोट रीचार्ज............इरफान खान ने ती जाहीरात सर्वकालीन सर्वोत्तम करून ठेवली आहे

संदीप चित्रे's picture

17 Oct 2008 - 1:13 am | संदीप चित्रे

झी टीव्ही / सोनी टीव्हीवर वगैरे इथे दिसणार्‍या दोन कंपनींच्या जाहिराती मस्त आहेत.

एक म्हणजे 'न्यू यॉर्क लाईफ' ही इन्सुरन्स कंपनी (एकदम टचिंग वगैरे असतात ह्यांच्या जाहिराती)

आणि दुसरी कंपनी म्हणजे नेशनवाईड इन्शुरन्स. त्यांच्या ह्या जाहिराती नक्की बघा --
नेशनवाईड इन्शुरन्स १ :)

नेशनवाईड इन्शुरन्स २ :)

मृगनयनी's picture

20 Oct 2008 - 11:16 am | मृगनयनी

"युनियन बँक"

१ छोटी मुलगी आपला तुटलेला दात हातात घेऊन म्हणते, ""दादा.... माजा दात तू ऊऊऊऊऊऊ ट ला....""...
मग दादा तिची समजुत घालण्यासाठी तिला सांगतो, की आपण हा दात पुरुन टाकु, म्ह्णजे सोन्याचा दात उगवेल....
ती छोटी खूप आश्चर्यचकित होऊन म्हणते, "सोन्याचा दात!!!!"

मग ती छोटी जणु तुटलेल्या दातांच्या शोधालाच लागते. शाळेत मुलांच्या मारामारीत तुटलेला दात एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवते. टेबलवरची अख्खी कवळी उचलते. "स्केलेटन" च्या ही तोंडातले दात ओढायचा गुपचूप प्रयत्न करते........
आणि शेवटी जेवढे मिळतील तेवढे दात पुरण्यासाठी माती उकरत असते.... इतक्यात तिचा दादा तिथे येउन तिला विचारतो, की ती काय करतेय....
तेव्हा तिचं उत्तर खरोखर खूप छान असतं, "मी खूप सारे सोन्याचे दात उगवतेय.... तुझ्या रेसिंग कार साठी"

तिच्या दादाला तिच्या बद्दल वाटणारं कौतुक आणि प्रेम खूपच सुंदरपणे एक्स्प्रेस झालंय..!

देवदत्त's picture

27 Mar 2009 - 9:46 pm | देवदत्त

सध्या चालू असलेली एअरटेलची लहान मुलाची जाहिरात मला खूप आवडते. त्याबाबत माझे मत इथे पहावे :)

प्राची's picture

27 Mar 2009 - 10:55 pm | प्राची

ही जाहिरात मलापण खूप आवडते.तो मुलगा जामच क्युट आहे.
Johnson & Johnson च्या सगळ्या जाहिराती खूप छान असतात.छोटी-छोटी निरागस बाळं,त्यांचे भाव....अप्रतिम. 8> 8> 8>

शितल's picture

27 Mar 2009 - 11:56 pm | शितल

>>>Johnson & Johnson च्या सगळ्या जाहिराती खूप छान असतात.छोटी-छोटी निरागस बाळं,त्यांचे भाव....अप्रतिम.
१०१% सहमत. :)

देवदत्त's picture

28 Mar 2009 - 11:29 pm | देवदत्त

दुवा लिहिण्यात काहीतरी अडचण आली बहुधा. पुन्हा तोच दुवा देत आहे.

उदय ४२'s picture

27 Mar 2009 - 10:01 pm | उदय ४२

आई आई गं..कंटाळ्ले मी या केसाला
अगं प्रकाशचं माक्याचं तेल का वापरत नाहीस?
त्यामुळं केस गळायचे तर थांबतातच पण डोकं शांत राहून झोपही छान लागते.
२)वज्रदंती वज्रदंती वीको वज्रदंती....

(मिसळीतला रस्सा भूरकणारा)

सुहास's picture

27 Mar 2009 - 11:47 pm | सुहास

हि धारा ची जाहीरात खूप मस्त आहे... मला अजुनी आवडते..

http://www.youtube.com/watch?v=PbV5Y5KJCUs

सुहास..

पर्नल नेने मराठे's picture

28 Mar 2009 - 9:59 am | पर्नल नेने मराठे

मी लहान होते तेव्हा प्रेस्ति़ज कुकर चि जाहिरात लागत असे. नविन लग्न झालेले जोद्पे दुकानात जाते,
अनि बायको नवरयाला कुकर घ्यायला लाव्ते. मला तेवा असे वाते कि माझे लग्न कधि होतेय एक्दचे =))

चुचु

चिरोटा's picture

28 Mar 2009 - 11:12 am | चिरोटा

८०च्या मध्यातली 'आय लव यु रसना' ची जाहिरात मस्त असायची. त्या लहान मुलीच्या वाढदिवसाला बरिच मुले आलेली असतात्.आणि तिची आई सर्वाना रसना देते.