आपल्याला पण ह्याच जाहीराती खुप आवडतात... कालच लिहल्या होत्या पण.. न जाणे आई मध्ये काही गडबड झाली वर रिफ्रश झाली :(
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
युनियन बॅंकची लागणारी जाहिरातः
जाहिरात मस्त आहे.
ह्यात फक्त एक पटले नाही किंवा कळले नाही.
सकाळी निघताना तो मुलगा आपल्या वडिलांना भेटतही नाही का? म्हणजे त्याला माहितही नसते की वडिल घरी नाहीत असे?
सध्या नविन जाहिरात चालू आहे...बहुधा ५०-५० चीच असावी...कारण मी एकदाच बघितली होती...
एक मुलगा बस मध्ये एका बाईच्या शेजारी बसतो...(ती जागा 'स्त्रियांसाठी' असावी)...तर उभ्या असलेल्या बायका त्याला ओरडायला लागतात...
पण, तो ज्या बाईच्या शेजारी बसतो ती पटकन म्हणते, 'बैठने दो ना, जवान लडका बगल में बैठा है तो जलन हो रही है?'...तीचं टायमिंग, म्हणायची पद्धत ...लाजवाब!
दुसरी एक आयोडेक्स ची...
एक माणूस चाललेला असतो...तर रस्त्यात त्याला रू.५००/- पडलेले दिसतात्...काही क्षण तो तसाच उभा असलेला दाखवलाय्...मग तो तसाच वैतागून निघून जातो...(त्याला ती नोट घेताना वाकता येत नाही/नसतं)...
एकही संवाद नाहीये या जाहिरातीमध्ये...कमालीची सुंदर जाहिरात!
मॅक्स न्युयॉर्क लाईफ इन्शुरन्सः बायको घरात येते आणि नवर्याला हाक मारत असते. पण तिला तो कुठेच दिसत नसतो. ती सगळीकडे शोधते, शेवटी तिला तो टेरेस मधे आरामखुर्चीत अस्ताव्यस्त (पाठमोरा) पडलेला दिसतो. त्याचे दोन्ही हात लोंबकाळत असतात, चहाचा कप पडलेला असतो. ती घाबरुन त्याला हाका मारते पण तो तसाच पडलेला असतो. शेवटी ती त्याला हात लावते आणि तो एकदम इअर फोन काढुन तिच्याकडे बघतो. मग ती लटके चिडून हलके गुद्दे मारत त्याला मिठी मारते. शेवटचं वाक्य - "युअर पार्टनर फॉर लाईफ"---ही पण
आणखी एक...
काही वर्षापूर्वी बजाज कं ने हुडीबाबा नावाची कावासाकी-बजाज मॉडेल काढलं होतं...त्यावेळी "हुडीबाबा हुडीबाबा हुडीबाबा" असं म्हणत ते मोटार्सायकलस्वार जाताना दाखवले आहेत...
त्याच दरम्यान, एन्फिल्ड कं ने बुलेट ची जाहिरात काढली होती...त्यात बुलेट चालवणारे स्वार बुलेट चालवत जात असतात आणि इतर लोक "हुडीबाबा हुडीबाबा हुडीबाबा" च्या चालीवर "अरेबाबा अरेबाबा अरेबाबा" म्हणतात...
ज्यांना बुलेट चीज माहीत आहे, त्यांना ह्या जाहिरातीबाबत जास्त सांगण्यात काहीच हशील नाही...
त्यात बजाज च्या जाहिरातीची जी काही वाट लावली आहे ना...ती जाहिरात १-२ वेळाच दाखवली गेली
बुलेट च्या ह्या जाहिरातीत एक मोठा ट्रेलर-ट्रक दाखविला आहे. समोरुन येणा-या बुलेट च्या हेडलाईटच्या प्रकाश झोताने चालकाचे डोळे दिपून तो एकदम डावीकडे ट्रक वळवुन घेतो आणि बुलेट ला रस्ता मोकळा करुन देतो, आणि हे वाक्य ऐकू येते.
जब निकलती है बुलेट की सवारी रास्ता देती है दुनिया सारी
त्याकाळी मिळत असलेल्या बुलेट चा हेडलाईट बॅटरीवर चालायचा त्यामूळे बुलेटचा वेग कमी/जास्त असला तरी प्रकाश झोत अतिशय प्रखर राहत असे. तूलनेने त्या काळच्या इतर बाईक्सचा हेडलाईट मिणमिणत्या कंदिलाप्रमाणे वाटत असे. आजकाल सर्वच बाईक्स चे हेडलाईट हॅलोजन बल्बसह येतात त्यामूळे फारच प्रखर वाटतात. बुलेटमध्ये ही बरीच मॉडेल्स आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तर्हा.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
१. स्कुल चले हम....
२. अमुल द टेस्ट ओफ इंडिया....
३. हमारा बजाज... (खुप लहान होते मी तेंव्हा... आम्ही मोठ्याने म्हनायचो)
४. कोकोनट बिस्किट चि होती एक, एक पुढारी नारळ फोड्त असतात आनि त्यातुन बिस्किट निघतात...
५. दुध दुध ....पि सकते हो रोज ग्लास फुल्ल...
६. सकु दोन चहा टाक बरं....मगदुम चहा...(कोल्हापुर आकाशवाणी)
या आनि अशा बर्याच जुन्या जाहिरति छान होत्या.....
पुनम...
देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.
वर दिलेल्या बर्याच जाहीराती मला फार आवडतात. पण नेहमीच लक्षात राहीलेली जाहीरात म्हणजे, 'एशियन पेंट्स' ची कुठलाही संवाद नसलेली एक जाहीरात. त्यात पडद्यावर रंगांचे पट्टे बदलत जातात आणि त्याखाली फक्त वेगवेगळ्या देशांची नावं येतात.
आणि सर्वात शेवटी येते 'एशियन पेंट्स' ची पंचलाईन: 'अ कलर कॅन चेंज युवर वर्ल्ड'!
स्रुजनशीलतेचा एक अप्रतिम अविष्कार!!
मुशाफिर.
फिल्म डिव्हीजनची ही ऍड मला फार आवडायची:--
http://in.youtube.com/watch?v=9pN6CXLjlzU
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
८ पी एम व्हिस्कीची जाहिरातही अप्रतिम होती. बॉर्डरवरती दोन सै॑न्ये तयारीत उभी असतात व त्या॑चे सेनापतीही रागा-रागाने रोखून पाहात असतात ती. त्यातला लठ्ठ म्हणजे 'ऑफिस ऑफिस फेम मनोज पाहवा. दुसर्याचे नाव ठाऊक नाही. त्याच अभिनेत्याच्या फेविक्विकची (फिशि॑गची) व एरिकसन मोबाईलची जाहिरातपण अफलातून होती.
शिवाय मिले सूर, देस राग, पूरब से सूर्य इ तर सदाबहारच आहेत. मिले सूर बहुतेक अशोक पत्की॑नी बनविले होते.
लेसान्सी का तत्सम नावाचा एक साबण होता. त्याची जाहीरात होती.
'राहूल मैने कहा था ना पानी चला जायेगा'
मस्त जाहीरात होती ही ..
तसेच आय लव्ह यू रसना वाल्या देखील सगळ्या जाहीराती आवडायच्या.
पुण्याचे पेशवे
HDFC pension Plan ची जाहिरात -सचिन खेडेकर ची
ओर ना सर झुकाके जियो......HDFC pension Plan
जिन्दगि के साथ भि जिन्दगि के बाद भि
आण्खि एक जाहिरात यायचि
मेरा बेटा है ना......(मुलगी Doctor असते)
'जाहिरात' ह्या विषयावर एक कार्यशाळेसारखा कार्यक्रम टीव्हीवर चालायचा. मला वाटते आलेक पदमसी चालवायचा.
त्यात त्यांनी सांगितले होते, 'ज्या जाहिरातींमुळे तपशील विसरले गेले तरी हरकत नाही पण 'प्रॉडक्ट' लक्षात राहते ती जाहिरात चांगली. अनेकदा जाहिरात फार ह्यूमरस होते, दर्शकाला तात्काळ आवडते पण तीचे तपशील लक्षात राहून जर 'प्रॉडक्ट' विसरले जात असेल तर काय उपयोग अशा जाहिरातीचा?'
कॅडबरी डेअरी मिल्क ची जाहिरात ह्या दृष्टीने चांगली म्हणता येईल.
'अमूल' दूधाची जाहिरातही एक उत्कृष्ट नमुना आहे. त्या जाहिरातीचे आणखीन एक वैशिष्ट असे की लहान मुलांच्या भावविश्वात त्यांनी गाय न दाखवता एक खेळकर वासरू दाखवले आहे.
'लेज्' वेफर्स च्या जाहिरातीत एक छोटा मुलगा लेज् वेफर्स चे गुणगान शेजारी बसलेल्या एका मध्यमवयीन, राकट पोलीस ऑफिसर जवळ करीत असतो. शेवटी तो पोलीस ऑफिसर चव पाहण्यासाठी त्याच्या पुढे हात पसरून वेफर्स मागतो तर त्याला तो मुलगा सांगतो,' मम्मी कहती है अनजान आदमीसे बात नही करनी चाहीए|' ती जाहिरातही मस्त होती.
ही एक मस्त जाहिरात आहे.
गावातील सगळे लोक एकमेकांना केवळ नं. ने ओळखतात.
अभिषेक बच्चनची - सर जी क्या आयडिया है !
ह्या वाक्या नंतर त्याने मानेला दिलेला झटका अगदी सही आहे.
झी टीव्ही / सोनी टीव्हीवर वगैरे इथे दिसणार्या दोन कंपनींच्या जाहिराती मस्त आहेत.
एक म्हणजे 'न्यू यॉर्क लाईफ' ही इन्सुरन्स कंपनी (एकदम टचिंग वगैरे असतात ह्यांच्या जाहिराती)
आणि दुसरी कंपनी म्हणजे नेशनवाईड इन्शुरन्स. त्यांच्या ह्या जाहिराती नक्की बघा --
नेशनवाईड इन्शुरन्स १ :)
नेशनवाईड इन्शुरन्स २ :)
"युनियन बँक"
१ छोटी मुलगी आपला तुटलेला दात हातात घेऊन म्हणते, ""दादा.... माजा दात तू ऊऊऊऊऊऊ ट ला....""...
मग दादा तिची समजुत घालण्यासाठी तिला सांगतो, की आपण हा दात पुरुन टाकु, म्ह्णजे सोन्याचा दात उगवेल....
ती छोटी खूप आश्चर्यचकित होऊन म्हणते, "सोन्याचा दात!!!!"
मग ती छोटी जणु तुटलेल्या दातांच्या शोधालाच लागते. शाळेत मुलांच्या मारामारीत तुटलेला दात एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवते. टेबलवरची अख्खी कवळी उचलते. "स्केलेटन" च्या ही तोंडातले दात ओढायचा गुपचूप प्रयत्न करते........
आणि शेवटी जेवढे मिळतील तेवढे दात पुरण्यासाठी माती उकरत असते.... इतक्यात तिचा दादा तिथे येउन तिला विचारतो, की ती काय करतेय....
तेव्हा तिचं उत्तर खरोखर खूप छान असतं, "मी खूप सारे सोन्याचे दात उगवतेय.... तुझ्या रेसिंग कार साठी"
तिच्या दादाला तिच्या बद्दल वाटणारं कौतुक आणि प्रेम खूपच सुंदरपणे एक्स्प्रेस झालंय..!
ही जाहिरात मलापण खूप आवडते.तो मुलगा जामच क्युट आहे.
Johnson & Johnson च्या सगळ्या जाहिराती खूप छान असतात.छोटी-छोटी निरागस बाळं,त्यांचे भाव....अप्रतिम. 8> 8> 8>
आई आई गं..कंटाळ्ले मी या केसाला
अगं प्रकाशचं माक्याचं तेल का वापरत नाहीस?
त्यामुळं केस गळायचे तर थांबतातच पण डोकं शांत राहून झोपही छान लागते.
२)वज्रदंती वज्रदंती वीको वज्रदंती....
(मिसळीतला रस्सा भूरकणारा)
मी लहान होते तेव्हा प्रेस्ति़ज कुकर चि जाहिरात लागत असे. नविन लग्न झालेले जोद्पे दुकानात जाते,
अनि बायको नवरयाला कुकर घ्यायला लाव्ते. मला तेवा असे वाते कि माझे लग्न कधि होतेय एक्दचे =))
चुचु
प्रतिक्रिया
सेम पींच !
युनियन
५०-५०...
बरोबर
जब निकलती है बुलेट की सवारी रास्ता देती है दुनिया सारी
१. स्कुल
एक लक्षवेधी जाहीरात......
सतीश पुळेकर...अवांतर
यूट्यूबवर पहा
फिल्म
भावना पोहचल्याशी मतलब!
८ पी एम
लेसान्सी..
HDFC pension Plan
जाहिराती...
आयडिया
हच ...............
अमेरिकेतल्या भारतीय जाहिराती
सोन्याचा दात?!?!
मम्मी ने मुझे डांटा...
ही जाहिरात
>>>Johnson & Johnson
दुवा
हि पहा आणखी एक
धारा
मी लहान
आय लव यु रसना