गुलजार!

रुपी's picture
रुपी in जनातलं, मनातलं
19 Aug 2016 - 11:10 pm

महान कवी, गीतकार गुलजार यांचा १८ ऑगस्ट हा वाढदिवस! गुलजार यांच्या प्रतिभेबद्दल आणि शब्दप्रभूत्त्वाबद्दल मी काय लिहिणार? पण त्यांच्याबद्दल आधी धागा येऊन गेला की कसे याबद्दल माहिती नाही. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या गीतांबद्दल, त्यांच्या काही आठवणी प्रतिसादांमधूनही वाचायला मिळतील म्हणून हा धागा काढत आहे.

खरे तर माझ्या बालपणातली बरीच वर्षे मी फक्त त्याच काळातली गाणी ऐकणे, पाठ करणे यातच रमले होते. आईबाबांना जुन्या गाण्यांची आवड असली तरी ठराविकच गाणी ऐकण्यात आली. केबल तर आमच्याकडे नव्हतीच, रेडिओही फार काही चालू नसायचा. नगरच्या साहित्य संमेलनात गुलजार प्रमुख पाहुणे म्हणून आले होते - मला वाटते बहुतेक समारोपाच्या कार्यक्रमात. तेव्हाही मला त्यांच्या गाण्यांपेक्षा फक्त गुलजार हे खूप ख्यातनाम गीतकार म्हणूनच माहीत होते. त्यावेळी आम्हां मैत्रिणींमध्ये ऑटोग्राफ बूकचे चांगलेच फॅड आले होते. साहित्य संमेलनाच्या तीनही दिवशी आम्ही तिकडेच पडीक तर होतोच, पण साहित्यिक काय सांगत आहेत हे जाणून घेण्यापेक्षा त्या वहीत सही मिळवायचीच आम्हांला उत्सुकता असायची. मला आठवते त्याप्रमाणे समारोपाचा कार्यक्रम संपण्याआधीच गुलजारांना निघावे लागले. स्टेजच्या मागच्या बाजूने ते बाहेर पडत होते. कुठून कुठून वाट काढून, जोरात पळत जाऊन एकदाचे मी आणि मैत्रिणीने त्यांना गाठले आणि सही मागितली. बर्‍यापैकी वैतागून त्यांनी "I don't give it... I don't give it" असे म्हटले, आम्ही "प्लीज,प्लीज" म्हणत आहोत, ते "नो नो" म्हणत पुढे जात आहेत असा काही वेळ आम्ही त्यांचा पाठलाग केला. बघणार्‍यांनाही गंमत वाटत होती. शेवटी ते गाडीत बसून निघाले आणि सही नाहीच दिली. हिरमोड होऊन मी पुन्हा माझ्या जागी जाऊन बसले. त्या वयातले माझे तुटपुंजे ज्ञान आणि (अ)समज यांना अनुसरुन मी त्यांना "शिष्ट" लोकांच्या यादीत बसवून टाकले.

तर अशी ही माझी त्यांच्याबरोबरचे प्रत्यक्ष भेट. त्यानंतरही त्यांच्या गाण्यांपासून मी दूरच. म्हणजे, गाणी माहीत असली तरी फक्त ते गाण्यापुरतेच बोल माहीत करुन घ्यायचे. त्यातला अर्थ-बिर्थ समजून घ्यायचा काही प्रयत्न केला नाही. हळूहळू डायरीत गाणी लिहून काढणे, सिनेमाचे नाव, गायक, गायिका, त्यानंतर संगीतकार माहीत करुन ते लिहिणे हे सुरु झाले. पण एकंदरीत गाण्याच्या बोलांचा, अर्थाचा, त्यामागच्या घटना, प्रसंग आणि गीतकारांचा विचार असा बरीच वर्षे कधी केला नाही.

इंजिनीअरिंगला असताना गाणी जमा करण्याचा सपाटाच लावला होता आणि जुन्या सिनेमांतली गाणी सरसकट "ओल्डीज" म्हणून जमवण्यात यायची. पण पुढे लग्न झाल्यावर नवर्‍याकडे असलेली गाणी शोधताना एकदा गुलजारांची गाणी असलेले एक फोल्डर सापडले. गीतकाराच्या नावाने बनवलेले हे पहिलेच फोल्डर पाहिले आणि तेव्हा पहिल्यांदाच एका वेगळ्याच दृष्टीकोनातून ही गीते समजून घ्यायला सुरुवात केली, आणि मग मी हरखूनच गेले. नंतर परदेशात वर्षभर राहायची संधी मिळाली. तिथली लायब्ररी - त्यातले भारतीय भाषांमधले साहित्य सिनेमे गाणी यांचा संग्रह, घरच्या इंटरनेटचेही भारताच्या मानाने असलेले प्रचंड स्पीड आणि माझ्याकडे हाताशी वेळ असणे या गोष्टी माझ्या चांगल्याच पथ्यावर पडल्या. मग अशी जुनी वेगवेगळी गाणी, त्यांचे बोल समजून घेणे, त्यावर चर्चा करणे यात माझा बराच वेळ सत्कारणी लागला. नंतर ऑर्कुटवर त्या कम्युनिटीज असायच्या त्यात गुलजारांची जॉइन केली, मग इतर लोकांबरोबर त्याबद्दल चर्चा "जिहाले-मस्की" गाण्याचा अर्थ समजून घेतला होता, "एकसो सोलह चांद की रांते.." मागची कल्पना समजली होती. "नाम गुम जायेगा", "मेरा कुछ सामान" अशी कितीतरी गाणी किती वेळा ऐकली त्याची गणतीच नाही. मुलांना आता "टप टप टोपी टोपी" आणि "टकबक टकबक" शिकताना तर काय मजा येते! त्यांच्या गाण्यांबद्दल मी इथे वेगळं काय लिहिणार, या सगळ्या बाबतींत मला अजूनही फार काही गती नाही. पण गुलजारांबद्दल आणखी माहिती शोधताना, वाचताना, त्यांच्याबद्दलचा आदर वाढतच गेला. त्यांना मी "शिष्ट" म्हणून लावलेले लेबल किती बालिश होते आणि माझा राग किती पोकळ होता हेही समजून गेले.

काही वर्षांपूर्वी एकदा इथल्या भारतीय सामानाच्या दुकानातून बाहेर पडताना, माईक, कॅमेरा लावून एका ग्रुपमधले काहीजण येणार्‍या जाणार्‍या काही लोकांची मुलाखत घेत होते. चौकशी केल्यावर कळले की गुलजारांच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ बनवणार आहेत, आणि या मुलाखती त्यात असतील. मग नवर्‍यानेही मला प्रोत्साहित केले. मुलाखत घेणार्‍याला बहुतेक मी लहानपणी कशी होती ते माहीत असावे, कारण तो आम्हांला गुलजारांची ओळख सांगू लागला आणि त्यात फक्त "बिडी जलाईले", "कजरारे" याच गाण्यांबद्दल सांगू लागला. मग आम्ही त्याला आमच्याकडची जास्तीत जास्त माहिती त्या दोन मिनिटांत द्यायचा प्रयत्न केला. तोही प्रभावित झाला असेल. याचा व्हिडीओ १८ ऑगस्टला अमुकअमुक वेबसाईटवर टाकण्यात येईल अशी माहिती त्याने आम्हांला दिली. १८ तारखेला आठवणीने मी व्हिडिओ पाहायला लिंक उघडली. व्हिडीओ होता, पण इथल्या एका हिंदू मंदिराबाहेर घेतलेल्या मुलाखतींचा. त्यांनी दोन ठिकाणी मुलाखती घेतल्या होत्या, पण व्हिडिओ बहुतेक एकाच ठिकाणच्या मुलाखतींचा बनवला! गुलजारांचा विषय निघाला की ही आठवण येते आणि त्याचे हसूही येते.

त्या साहित्य संमेलनाला आता दोन दशके होत आली. आता कधी संधी मिळाली तर मी सही मागण्याआधी गुलजारांना नमस्कार करेन. कशीही असो, त्यांची प्रत्यक्ष भेट झाली याचा आनंद आहेच, आणि त्यांची जादू मनावर जी आहे ती कमी होण्याऐवजी वाढतच जात आहे. या असाधारण गीतकाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कलासाहित्यिकप्रकटनशुभेच्छाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

19 Aug 2016 - 11:37 pm | बहुगुणी

गुलज़ार यांच्या पंचाहत्तरीनिमित्त लिहिलेल्या धाग्याची आठवण झाली. गुलज़ार यांचं चित्रपटांतलं गीतलेखन तर आवडतंच, पण त्यांच्या कविता, शायरी (आणि दिग्दर्शन!) याही गोष्टी मनापासून आवडतात.

सध्या एक आवडती रचना, बाकी वेळ मिळेल तशी भर घालेन:

किताबें झाँकती हैं बंद अलमारी के शीशों से
बड़ी हसरत से ताकती हैं महीनो अब मुलाक़ातें नहीं होती
जो शामें उनकी सोहबत मे कटा करती थी
अब अक्सर गुज़र जाती हैं कंप्यूटर के पर्दो पर

बड़ी बेचैन रेहती हैं किताबें
उन्हे अब नींद मे चलने की आदत हो गयी है
जो क़दरें वो सुनाती थी के
जिनके सेल कभी मरते नहीं थे
वो क़दरें अब नज़र आती नहीं हैं घर मे
जो रिश्ते वो सुनाती थी वो सारे उधड़े उधड़े हैं

कोई सफ़हा* पलटता हूँ तो एक सिसकी सुनाई देती है
कई लफ्ज़ो के माइने गिर पड़े हैं
बिना पत्तो के सूखे तुंड लगते हैं वो सब अल्फ़ाज़
जिन पर अब कोई माइने नहीं उगते

ज़बान पर ज़ायेक़ा आता था जो सफ़हा* पलटने का
अब उंगली क्लिक करने से
बस एक च्छपकी गुज़रती है
बहुत कुछ तेह बा तेह खुलता चला जाता है पर्दो पर
किताबो से जो ज़ाती राब्ता था कट गया है

कभी सीने पर रख कर लेट जाते थे
कभी गोदी मे लेते थे
कभी घुटनो को अपनी रेहेल की सूरत बना कर
नीम* सजदे मे पढ़ा करते थे छुते थे जबीं* से
मगर वो जो किताबो से मिला करते थे
सूखे फूल और मेहके हुए रुक़्क़े *
किताबें मांगने, गिरने, उठाने के बहाने जो रिश्ते बंधते थे
अब उनका क्या होगा
वो शायद अब नहीं होगा!!

--------------------
नीम- आधा
जबीं- मत्था/ forehead
सफहा - पन्ना/ page
रुक़्क़े - पत्र/letters

बोका-ए-आझम's picture

19 Aug 2016 - 11:48 pm | बोका-ए-आझम

आणि लाखो लोकांचं आवडतं combination. या गीतकार-संगीतकार जोडीच्या तोडीचं ना त्याआधी काही झालं, ना त्यानंतर काही होईल. त्यांच्या नमकीन मधलं एक अप्रतिम आणि काहीसं अप्रसिद्ध गाणं मला गुलजारजींच्या कर्मयोगी व्यक्तिमत्वाचं निदर्शक वाटतं -

राह पे रहते है।
यादों मे बसर करते है॥
खुश रहो एहले वतन,
अब हम तो सफर करते है!

पिलीयन रायडर's picture

21 Aug 2016 - 3:51 am | पिलीयन रायडर

अत्यंत सुंदर गाणं आहे हे!!!

तसंच मला रेनकोट सिनेमात शुभा मुदगल ह्यांच्या आवाजातलं "पिया तोरा कैसा अभिमान" हे ही गाणं खुप आवडतं. ह्या गाण्यात कडव्यांच्या मध्ये गुलजार ह्यांच्या आवाजात काही ओळी आहेत.. जरुर ऐका..

किसी मौसम का झोंका था,
जो इस दीवार पर लटकी हुइ तस्वीर तिरछी कर गया है
गये सावन में ये दीवारें यूँ सीली नहीं थीं
ना जाने इस दफा क्यूँ इनमे सीलन आ गयी है
दरारें पड़ गयी हैं और सीलन इस तरह बैठी है
जैसे खुश्क रुक्सारों पे गीले आसूं चलते हैं

ये बारिश गुनगुनाती थी इसी छत की मुंडेरों पर
ये बारिश गुनगुनाती थी इसी छत की मुंडेरों पर
ये घर कि खिड़कीयों के कांच पर उंगली से लिख जाती थी सन्देशे
देखती रहती है बैठी हुई अब, बंद रोशंदानों के पीछे से

दुपहरें ऐसी लगती हैं, जैसे बिना मोहरों के खाली खाने रखे हैं,
ना कोइ खेलने वाला है बाज़ी, और ना कोई चाल चलता है,

ना दिन होता है अब ना रात होती है, सभी कुछ रुक गया है,
वो क्या मौसम का झोंका था, जो इस दीवार पर लटकी हुइ तस्वीर तिरछी कर गया है

हरिहरनच्या आवाजात हेच गाण आहे, गुलजार ह्यांच्या कवितेशिवाय..

पिया तोरा कैसा अभिमान

सघन सावन लायी कदम बहार
मथुरा से डोली लाये चारों कहार
नहीं आये केसरिया बालम हमार
अंगना बड़ा सुनसान
पिया तोरा...

अपने नयन से नीर बहाये
अपनी जमुना ख़ुद आप ही बनावे
लाख बार उसमें ही नहाये
पूरा न होयी अस्नान
सूखे केस, रूखे बेस
मनवा बेजान
पिया तोरा...

बोल सखी काहे करी साचों सिंगार
ना पहिनब अब सना-कांच न हार
खाली चन्दन लगाओ अंग मा हमार
चन्दन गरल समान
पिया तोरा...

बोका-ए-आझम's picture

22 Aug 2016 - 2:31 pm | बोका-ए-आझम

धन्यवाद!

बहुगुणी's picture

20 Aug 2016 - 12:00 am | बहुगुणी

हा आणखी एक मिपावरचा धागा होता.

पद्मावति's picture

20 Aug 2016 - 12:02 am | पद्मावति

खूप सुंदर लेख. गुलझार साब _^_

या गीतकार-संगीतकार जोडीच्या तोडीचं ना त्याआधी काही झालं, ना त्यानंतर काही होईल.

..शतश: सहमत.

बहुगुणी's picture

20 Aug 2016 - 12:23 am | बहुगुणी
पद्मावति's picture

20 Aug 2016 - 12:41 am | पद्मावति

निशब्द!!!!!! केवळ आणि केवळ _^_

महासंग्राम's picture

23 Aug 2016 - 12:54 pm | महासंग्राम

अगदी खरंय निःशब्दच

बहुगुणी साहेब, दुव्यांसाठी आणि त्या रचनेसाठी धन्यवाद!

@बोका-ए-आझम, खरे आहे, त्या द्वयीला खरंच तोड नाही. पण मागच्या काही वर्षांतले त्यांचे आणि विशाल भारद्वाजचे काँबिनेशनही भन्नाट आहे.

यानिमित्ताने आणखी काही आठवणी, किस्से असतील तर जरुर लिहा. मला आठवताहेत ते लिहिते.

शाहरुखच्या "बिल्लू" चित्रपटाची तीन गाणी त्यांनी लिहिली. शाहरुखला एका गाण्यात "लव मेरा हिट हिट" अशी ओळ हवी होती आणि त्याने त्यांना तसा बराच आग्रह केला. पण गुलजार ते गुलजार. ते त्यांना नको ते नाही लिहिणार म्हणून मग त्यांनी नकार दिला आणि चित्रपट सोडून दिला. (ते गाणं नंतर बहुतेक नीरज श्रीधरने लिहिलं.)

"एक सौ सोलह चांद की रातें" यामागची कल्पना मला माहीत असलेली ती अशी. कालखंडाचा संदर्भ देताना ढोबळ देण्यापेक्षा विशिष्ट असा दिला की जास्त परिणामकारक ठरतो. म्हणजे, "मी मिपाची चार वर्षे सदस्य आहे" यापेक्षा "मी मिपाचे सदस्यत्व घेउन तीन वर्षे, ३६१ दिवस, ७ तास झाले" हे त्या व्यक्तीसाठी मिपा किती महत्त्वाचे आहे हे दर्शवते. "इजाजत" मध्ये माया नायकाबरोबर चार महिने असते. १२० दिवसांपैकी चार अमावस्या, म्हणून उरलेल्या ११६ "चांद की रातें". (त्या मुलाखत घेणार्‍याने मला सांगितले की गुलजारांनी नंतर कुठेतरी म्हटले की ११६ ऐवजी ११७ हवे होते. तसे का असावे ते मला माहीत नाही.)

रुपी ताई:

तुमच्या लेखाच्या निमित्ताने खूप दिवस अर्धवट राहिलेले, आणि ऐकायचे/पहायचे बाकी ठेवलेले, हे दोन दीर्घ व्हिडिओज या वीकांताला बघणार, संधी दिल्याबद्दल धन्यवाद!

यशोधरा's picture

20 Aug 2016 - 5:44 am | यशोधरा

वा, वा! मस्त धागा!

प्रीत-मोहर's picture

20 Aug 2016 - 6:40 am | प्रीत-मोहर

मस्त धागा आणि प्रतिक्रिया!! अौर भी आन दो

सविता००१'s picture

20 Aug 2016 - 6:55 am | सविता००१

रुपी, सुरेख धागा. त्याबरोबरच सुंदर प्रतिक्रियाही.
झकासच

यशोधरा's picture

20 Aug 2016 - 8:06 am | यशोधरा

दिल दर्द का टुकड़ा है
पत्थर की डली सी है
ये अँधा कुँवा है या
ये बंद गली सी है
ये छोटा सा लम्हा है
जो ख़त्म नहीं होता
मैं लाख जलाता हूँ
ये भस्म नहीं होता

*****
छोड़ आए हम वो गलियां ..

जहां तेरे पैरों के कँवल गिरा करते थे
हँसे तो दो गालों में भँवर पड़ा करते थे
तेरी कमर के बल पे नदी मुड़ा करती थी
हंसी को सुनके तेरी फ़सल पका करती थी
******
छोड़ आए हम वो गलियां..

जहाँ तेरी एड़ी से धूप उड़ा करती थी
सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है
लटों से उलझी लिपटी रात एक हुआ करती थी
कभी कभी तकिये पे वो भी मिला करती है

छोड़ आए हम वो गलियां...
*******

यशोधरा's picture

20 Aug 2016 - 8:16 am | यशोधरा

रुपी, ह्या धाग्यामुळे खूप सुरेख गाणी आठवतायत, उदाहरणार्थ -

आजकल पाँव जमींपर..

जब भी थामा है तेरा हाथ तो देखा है
लोग कहते हैं के बस हाथ की रेखा है
हमने देखा है दो तक़दीरों को जुड़ते हुए..
************

आकाश के उस पार भी आकाश हैं
आकाश पे बहते समय की तरह
बहते रहो जैसे बहे ये हवा
आकाश के उस पार भी आकाश हैं

झरते रहो बादल झरे जिस तरह
दरिया मुडे पैरों तले जिस तरह
सागर में भी गिर के कभी खाली न हो
आकाश के उस पार भी ..
*******

एक बार वक़्त से, लमहा गिरा कहीं
वहाँ दास्तां मिली
लमहा कहीं नहीं
थोड़ा सा हँसाके
थोड़ा सा रुलाके
पल ये भी जाने वाला हैं
**********

कभी चाँद की तरह टपकी, कभी राह में पड़ी पाई
अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी
कभी चींक की तरह खनकी, कभी जेब से निकल आई
अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी

कभी चेहरे पे जड़ी देखी, कहीं मोड़ पे खड़ी देखी
शीशे के मरतबानों में, दुकान पे पड़ी देखी
चौकन्नी सी ज़िंदगी, ये ज़िंदगी ...

तमगे लगाके मिलते है, मासूमियत सी खिलती है
कभी फूल हाथ में लेकर, शाख़ों पे बैठी हिलती है
अट्ठन्नीसी ज़िंदगी, ये ज़िंदगी ...
********

अजून खूप लिहू शकेन... थोड्या वेळाने.. :)

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 8:23 am | किसन शिंदे

अतिशय आवडत्या व्यक्तीमत्वांपैकी एक म्हणजे गुलजार! लेख आवडला तुमचा, फार छान लिहिलंय

उडन खटोला's picture

20 Aug 2016 - 9:35 am | उडन खटोला

बड़े दिनोंके के बाद ख़ुशी मिली
जल्दी में थी, रुकी नही
असं काहीसं लिहिणारे गुलजार नेहमीच आवडतात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2016 - 9:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुलजार आवडतात. आपला अनुभव आवडला. लिहित राहा.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !!!!

-दिलीप बिरुटे

बोका-ए-आझम's picture

20 Aug 2016 - 11:04 am | बोका-ए-आझम

- चित्रपट: खामोशी, गायक आणि संगीत: हेमंतकुमार

तुम पुकार लो
तुम्हारा इंतजार है।
ख्वाब चुन रहे है
रात बेकरार है।
तुम्हारा इंतजार है
तुम पुकार लो!

होठ पे लिये हुए
दिल की बात हम।
जागते रहेंगे और
कितनी रात हम।
मुख्तसरसी बात है
तुमसे प्यार है॥
तुम्हारा इंतजार है
तुम पुकार लो!!

दिल बहल तो जाएगा
इस खयालसे।
हाल मिल गया तुम्हारा
अपने हाल से।
रात ये करार की बेकरार है॥
तुम्हारा इंतजार है
तुम पुकार लो!!

आणि हे - चित्रपट -जीवा, संगीत: आर.डी.बर्मन,
गायक - आशा भोसले आणि अमितकुमार
- पडद्यावर मंदाकिनी आणि संजय दत्त असल्यामुळे डोळे मिटून ऐकलं तरी चालेल.

रोज रोज आंखो तले
एकही सपना चले
रातभर काजल जले
आंखोमे जिस तरह ख्वाब का दिया जले!

जबसे तुम्हारे नाम की मिसरी होंठ लगायी है।
मीठासा गम है और मीठीसी तनहाई है॥

आंखोपर जबसे तुमने ये जुल्फ गिरा दी है।
बेचारे से कुछ ख्वाबोंकी नींद उडा दी है ॥

छोटीसी दिलकी उलझन है, ये सुलझा दो तुम।
जीना तो सीखा है मरके, मरना सीखा दो तुम॥

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2016 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हो सेठ...!

>>>>>>> आंखोपर जबसे तुमने ये जुल्फ गिरा दी है।
बेचारे से कुछ ख्वाबोंकी नींद उडा दी है ॥

पैकीच्या पैकी गुण दिले.
-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

20 Aug 2016 - 1:46 pm | स्वाती दिनेश

गुलजार नेहमीच आवडते राहिले आहेत,
लेख छानच!
स्वाती

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Aug 2016 - 1:49 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मला काहीच बोलायचे नाही. देवाबद्दल फार बोलायचे नसते.
आमचे एक मित्र आहेत त्यांनी गुलजारांच्या वाढदिवसासाठी एक छोटीसी नज्म लिहीली आहे.

सुना है, तेरे जुबाँसे निकला
हर लफ्ज
नज्म बन जाता है
इक बार मेरा नाम पुकार
ए लफ्ज-ए-मौला
.
.
मै नज्म बनना चाहता हूँ

- प्राजक्त देशमुख

बोका-ए-आझम's picture

22 Aug 2016 - 2:55 pm | बोका-ए-आझम

चित्रपट - घर, संगीत: आर.डी.बर्मन, गायक: किशोर, लता

आपकी आंखोमे कुछ
महके हुए से राज है।
आपसे भी खूबसूरत
आपके अंदाज है॥

लब हिले तो मोगरे के
फूल खिलते है कहीं
आपकी आंखों मे क्या
साहिल भी मिलते है नहीं
आपकी खामोशीयांही आपकी आवाज है ॥

आपकी बातोंमे फिर
कोई शरारत तो नही
बेवजह तारीफ करना
आपकी आदत तो नही
आपकी बदमाशियों के ये नये अंदाज है॥

आणि

चित्रपट - आंधी, संगीत: आर.डी.बर्मन, गायक - किशोर, लता.

इस मोडसे जाते है
कुछ सुस्त कदम रस्ते
कुछ तेज कदम राहें

पत्थर की हवेली को
शीशे के घरोंदो मे
तिनकों के नशेमन तक
इस मोड से जाते है!

आंधी की तरह उडकर
एक राह गुजरती है।
शरमाती हुई कोई
कदमों से उतरती है॥
इन रेशमी राहों मे
एक राह तो वो होगी
तुमतक जो पहुंचती है
इस मोड से जाती है ॥

इक दूर से आती है
पास आके पलटती है।
इक राह अकेली सी
रूकती है ना चलती है॥
ये सोचते बैठी हूं
इक राह तो वो होगी
तुमतक जो पहुंचती है
इस मोड से जाते है॥

राजाभाउ's picture

22 Aug 2016 - 3:24 pm | राजाभाउ

मस्त हो साहेब. लय भारी

राजाभाउ's picture

22 Aug 2016 - 3:18 pm | राजाभाउ

मस्त धागा या निमित्ताने बर्याच गाण्यांचे बोल बसल्या बसल्याच मि़ळुन गेले. आन दो.

सानझरी's picture

22 Aug 2016 - 5:13 pm | सानझरी

Gulzar

Gulzar

रुपी's picture

23 Aug 2016 - 12:16 am | रुपी

खूप छान छान रचना या निमित्ताने वाचायला मिळत आहेत. पिरा, रेनकोट सिनेमा पाहिली होता, पण गाण्याकडे फार लक्ष गेले नाही. आत पुन्हा ऐकेन. माझे बर्‍याचदा सिनेमा पाहताना असे होते खरे.. "नैना ठग लेंगे" हे गाणंही असंच केव्हातरी एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकल्यावर फारच आवडलं.

पिलीयन रायडर's picture

23 Aug 2016 - 1:22 am | पिलीयन रायडर

रेनकोटची सगळीच गाणी अप्रतिम आहेत!!!

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 1:16 am | संदीप डांगे

गुलजार. एक अ प्र ति म फाईन आर्टीस्ट आहे. रोजच्या जगण्यातल्या वस्तू, घटना हा माणूस असा काही दाखवतो की ऐकनारा बदलून जातो. एका जगाच्या ऐवजी दुसरेच जग दिसू लागते, गुलजारचे जग.

आज नाशिकहून नारायणगावांस येतांना रस्त्यात पाऊस लागला, डोंगरघाटावरुन गाडी वळणे घेत असतांना अचानक प्ले लिस्टमधलं गाणं लागलं. सत्या चित्रपटातलं, गीला गीला पानी, पानी सुरिला पानी. आसमान छलका है.... गाडी दोन मिनिटं बाजूला घेतली. मी पहिल्यांदाच हे गाणं इतकं मन लावून ऐकलं. गाण्यातला पाऊस, बाहेरचा पाऊस, मग जीवाच्या आत सुरु झाला पाऊस. अप्रतिम अनुभव.

असंच करतो हा माणूस. नेहमी, न चुकता, प्रत्येकदा. गाणं ऐकूनच तुम्हाला कळतं, हे गुलजारच! गायक, संगितकार, सगळे नंतर. आधी गुलजार मनाच्या कानाकोपर्‍यात भरुन गेलेले असतात. सगळं उलटपुलट करुन...!

खासियत, काठिण्यपातळी. फाईन आर्टिस्ट सोपे थोडी ना समजायला. समजलं की तुम्हाला असा काही आनंद होतो की गांजा ची किक!.. "चड्डी पेहनके फूल खिला है." मुले देवाघरची फुले, आणि फुल चड्डी घालून... म्हणजेच मूल हो लाहानगं!

"आंखे भी कमाल करती है, पर्सनलसे सवाल करती है, पलको को उठातीभी नही, परदेका खयाल करती है." म्हणजे फक्त कहर.

"हजार राहें मुडके देखी, कहींसे कोई सदा न आई" हे गाणं माझे तिन्ही आवडीच्या लोकांचा अर्क आहे. किशोर, खय्याम, गुलजार. इतकं इन्टेन्स गाणं, किमान हजार दा तरी ऐकलं असेल. अगदी साधं सोपं, जीवाला घरे पाडनारं, "जहांसे तुम मोड मुड गये थे, ये मोड अब भी वहीं पडे है," त्यावर लता म्हणते "हम अपने पैरोंमे जाने कितने भंवर लपेटे खडे हुये है" ह्या गाण्याचा इतका परिणाम झालाय की स्वप्नातही बायकोशी भांडण करुन दूर होण्याचा विचार करु शकत नाही. ;)

गुलजारसाहेबांच्या विजुलायजेशनबद्दल तर एक कलाकार म्हणून मी कायम नतमस्तक होत आलोय, "यार मिसाल-ए-आस चले, पाँव के तले फ़िरदौस चले, कभी डाल-डाल, कभी पात-पात, मैं हवा पे ढूँढूँ उसके निशाँ", "कभी नीले आसमां पे, चलो घुमने चलें हम, कोई अब्र् मिल गया तो, जमीं पे बरस लें हम, तेरी बाली हिल गयी है, कभी शब चमक उठी है, कभी शाम खिल गयी है"

असं बरंच काय काय आहे. गुलजार माझ्यासाठी समुद्र आहे, थांग लागत नाही, किनार्‍यावर धावून धावून दमून जाल. हा माणूस सहज सुनामी घेउन येउन तुम्हाला वाहवत घेऊन जातो. तुम्ही तुम्ही राहत नाही. गुलजारच्या जगातले एक थेंब असता. बूंद. बूंदोमें रख्खा पानी. आसमान छलका है, आसमां भर गया, भर गया.....

तुषार काळभोर's picture

23 Aug 2016 - 7:00 am | तुषार काळभोर

दिल से च्या सगळ्याच गाण्यांचे शब्द गुरफटवून टाकणारे आहेत.
छैय्या छैय्या
सतरंगी
दिल से
जियां जले
.

तेच माचीसचं.
चप्पा चप्पा चरखा चले...
एक एक ओळ काळजात हलकेच उतरणारी... पण घुसणारी नाही. गुलजार यांचे शब्द घुसखोरी नाही करत. ते हृदयाचा, मनाचा, मेंदूचा हळुवार पणे असा ताबा घेतात कि आपल्यालाच कळत नाही.
.

कजरारे हे गाणं असं आहे की या जगातलं असून पण या जगाबाहेरचं वाटतं. हे गाणं ऐकायच्या/पहायच्या आधी जर वाचायला मिळालं असतं तर गाणं पाहताना डोळ्यांना अमिताभ आणि ऐश्वर्या दिसले पण नसते(अभिषेक तर असा प दिसत नाही त्या दोघांत)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Aug 2016 - 9:38 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुंदर प्रतिसाद...
__/\__!!

महासंग्राम's picture

23 Aug 2016 - 1:59 pm | महासंग्राम


गुलजार माझ्यासाठी समुद्र आहे, थांग लागत नाही

अगदी अगदी मनातलं बोललात साहेब __/\__

किसन शिंदे's picture

23 Aug 2016 - 3:18 pm | किसन शिंदे

लय भारी प्रतिसाद डांगेअण्णा

त्यांची त्रिवेणी नेहमीच भुरळ घालत आलेली आहे.

मैं रहता इस तरफ़ हूँ यार की दीवार के लेकिन
मेरा साया अभी दीवार के उस पार गिरता है

बड़ी कच्ची सरहद एक अपने जिस्मों -जां की है

समीरसूर's picture

23 Aug 2016 - 10:00 am | समीरसूर

छान लेख!

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2016 - 12:47 pm | बोका-ए-आझम

चित्रपट - मौसम, संगीत: मदनमोहन, गायक - लता, भूपिंदर सिंग/ भूपिंदर सिंग (solo)

दिल ढूंढता है फिर वही
फुरसत के रात दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए ॥

जाडों की नर्म धूप और
आंगन मे लेट कर।
आंखो पे खीचकर तेरे दामन के साये को
औंधे पडे रहे कभी करवट लिये हुए॥
दिल ढूंढता है....

या गर्मीयों की रात को
पुरवाईयां चले।
ठंडी सफेद चादरोंमे जागें देर तक
तारों को देखते रहे छतपर पडे हुए॥
दिल ढूंढता है....

बर्फीली सर्दीयों मे
किसीभी पहाड पर।
वादी मे गूंजती हुई खामोशीयां सुने
आंखोमे भीगे भीगे से लम्हे लिये हुए॥
दिल ढूंढता है....

आणि

चित्रपट - घरोंदा, संगीत:जयदेव,गायक - भूपिंदर आणि रूना लैला.

दो दीवाने शहरमें
रात मे या दोपहरमें
आबोदाना ढूंढते है
एक आशियाना ढूंढते है॥

इन भूलभुलैया गलियों मे
अपना कही एक घर होगा।
अंबर पे खुलेगी खिडकीयां
खिडकी पे खुला अंबर होगा।
अस्मानी रंग के आंखोंमे
बसने का बहाना ढूंढते है॥

जब तारे जमींपर चलते है
आकाश जमीं हो जाता है।
उस रात नही फिर घर जाता
ये चांद यही सो जाता है।
पलभर के लिए इन आंखोमे
हम एक जमाना ढूंढते है॥

पैसा's picture

23 Aug 2016 - 1:08 pm | पैसा

खूपदा वेगवेगळ्या मनस्थितीत गुलजार यांची गाणी अरे, अगदी आपल्या मनातलं आहे अशी स्पर्शून जातात. त्यामुळे आपलीशी वाटतात!

अनिरुद्ध प्रभू's picture

23 Aug 2016 - 3:48 pm | अनिरुद्ध प्रभू

बस जिंदगी गुलझार है....

त्यांची लिबास या चित्रपटात त्यांचच एक अप्रतिम गीत आहे.....

ख़ामोश सा अफ़साना पानी से लिखा होता
न तुम ने कहा होता, न हम ने सुना होता

दिल्ल की बात न पूछ, दिल तो आता रहेगा
दिल बहकता रहा है, दिल बहकता रहेगा
दिल को हम ने कुछ समझाया होता
ख़ामोश सा अफ़साना ...

सहमे से रहते हैं, जब ये दिन ढलता है
एक दिया बुझता है, एक दिया जल्ता है
तुम ने कोई तो दीप जलाया होता
ख़ामोश सा अफ़साना ...

इतने साहिल ढूँढे, कोई न सामने आया
जब मँझधार में डूबे, साहिल थामने आया
तुम ने साहिल को पहले बिछाया होता
ख़ामोश सा अफ़साना ...

(गुलझार भक्त)
अनिरुद्ध

अनुप ढेरे's picture

23 Aug 2016 - 4:12 pm | अनुप ढेरे

https://www.bobhata.com/entertainment/gulzar-celebrating-82th-birthday-419

इथे फार छान सिलेक्षन आहे गुलजारच्या गाण्यांच! गुरू मधलं गाणं आहे एक तिथे 'जागे है मन कहीं' पहिल्यांदाच ऐकलं. छान आहे ते गाणं!

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 4:20 pm | संदीप डांगे

सुंदर लिंक, फक्त ते गाणं, "जागे है देर तक, हमे कुछ देर सोने दो," असे आहे,
गुरु चित्रपटातलं माझ्या सर्वात आवडीचं गाणं आहे. दुसरं मय्या, मय्या. 'हे गुलजारच' अशी फिलींग देणारे शब्द ह्या गाण्यात आहेत.

अनुप ढेरे's picture

23 Aug 2016 - 4:26 pm | अनुप ढेरे

लेख रामदासकाकांनी लिहिला आहे बहुधा.

मैत्र's picture

23 Aug 2016 - 9:42 pm | मैत्र

काय धागा.. इतक्या दिवसांनी मिपावर आल्याचं सार्थक झालं.
एक एक प्रतिसाद लेखांच्या दर्जाचे आहेत. बोकोबांचा लेख अप्रतिम. संदीप डांगेंचा पावसातला अनुभव मस्तच..
मिपाशी माझा सूर जुळला तो या पहिल्या लेखाने

बोकोबा - समान आवड असलेली व्यक्ती भेटल्यावर जो आनंद होतो तो तुमच्या आवडत्या गुलजार गीतांची यादी बघून झाला. काही वर्षांपूर्वी त्यांची सही घेण्याची संधी मिळाली तेव्हा "तुम पुकार लो" या गाण्याच्या पानावर घेतली होती..
दिल ढूंढता है फिर वही, इस मोड से जाते है, आपकी आंखोमें कुछ, एक अकेला इस शहरमें..
मेरा कुछ सामान.. हा एक मास्टरपीस.. केवळ अशक्य..

हमने देखी है इन आंखोकी महकती खुशबू.. मला काय आवडतं / भावतं ते या प्रतिमा.

नवीन मध्ये साथिया - अतिशय वेगळ्या प्रतिमा. अनपेक्षित चित्रदर्शी उपमा देणे..
बर्फ़ गिरी हो वादी में और हँसी तेरी गूँजे
ऊन में लिपटी सिमटी हुई बात करे धुआँ निकले
गरम गरम उजला धुआँ, नरम नरम उजला धुआँ

अतिशय वेगळा उदास विचार पण पुन्हा अशाच प्रतिमा -
दिन खाली खाली बर्तन है, और रात है जैसे अंधा कुआं

किंवा असं प्रत्ययकारी वर्णन -
ठंडी सफेद चादरोंमे जागें देर तक
तारों को देखते रहे छतपर पडे हुए

अनेकदा हे ऐकल्यावर मला त्या आठवणी येतात. जणू त्या गार चादरी जाणवतात..

थका थका सूरज जब
नदी से होकर निकलेगा
हरी हरी काई पे
पांव पडा तो फिसलेगा

बादलों से काट काट के कागजों पे नाम जोडना.. ये मुझे क्या हो गया.

अतीव दु:ख लिहावं तर गुलजार..

आज बिछडे है.. कल का डर भी नहीं
जिंदगी इतनी मुख्तसर भी नही..

जख्म दिखते नहीं अभी लेकीन
ठंडे होंगे तो दर्द निकलेगा
तैश उतरेगा वक्त का जब भी
चेहरा अन्दर से जर्द निकलेगा

कल जो आयेगा जाने क्या होगा
बीत जाए जो कल नहीं आते
वक्त की शाख तोड़ने वालों
टूटी शाखों पे फल नहीं आते

युग आते हैं और युग जाए
छोटी छोटी यादों के पल नहीं जाए ...

काय आणि किती आठवावं, अनुभवावं..

गुलजार आयुष्यात आठवण म्हणून कायम राहिले जेव्हा एका मैत्रीणीने माझी अवस्था पाहून मला सांगितलं की अरे बाबा आवडते रे तुला ती.. जा जाऊन सांग तिला..
"मुख्तसर सी बात है.. तुमसे प्यार है..
तुम्हारा इंतजार है.. तुम पुकार लो"..

संदीप डांगे's picture

23 Aug 2016 - 9:53 pm | संदीप डांगे

वाह वाह वाह! उत्कट! गुलजारच्या बाबतीत आपण सारे समदु:खीच ;)

बोका-ए-आझम's picture

23 Aug 2016 - 10:42 pm | बोका-ए-आझम

माझी गुलजारजींशी एका मुलाखतीच्या निमित्ताने भेट झाली होती. अतिशय ऋजू व्यक्तिमत्त्व. मी त्यांना ' गोली मार भेजे मे ' हे कसं सुचलं हे विचारलं तेव्हा त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं - Characters are like moulds. We have to become them to feel their pulse. उनकी ये नब्ज जानने की मै कोशिश करता हूं!

अरे वा! त्या मुलाखतीबद्दल आणखी वाचायला आवडेल.

अर्थात बोकेशांनी लिहावेच+१११

गुलजार यांच हिंदीतले (सिनेमासाठी) पहिलं वहिलं गीत "मोरा गोरा अंग लै ले " हे असावं जाणकारांनी प्रकाश टाकावा.

दूरदर्शनवरील ल्हान मुलांच्या कार्टूनची शीर्षक गीतेही अशीच मनमोहक आणि गमतीशीर कल्प्नांनी युक्त होती.
का कुणास ठाऊक पण गुलजार याम्नी दूर्दर्शनवर एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते.

मेरे अपने-आंधी-कोशीश-परिचय पाहून माझ्या मते "हमलोग-बुनियाद" सारखी दीर्घमालीका दिग्दर्शन करण्याचा वकूब आणि योग्यता गुलजार यांची नक्कीच आहे.

त्यांना पुन्हा एक्दा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

गुलजार भक्त नाखु.

"मोरा गोरा अंग लै ले " - खरे तर या गीताचा उल्लेख मी लेखात / प्रतिसादात करणार होते, पण लिहिण्याआधी आणखी माहिती शोधली तेव्हा काही ठिकाणी ते त्यांचे पहिले गीत नसल्याचा उल्लेख सापडला.
इथे लिहिल्याप्रमाणे "काबुलीवाला"मधले "गंगा आये कहा से" हे त्यांनी लिहिलेले पहिले गीत. दुसर्‍या एका दुव्यावर लिहिले आहे त्याप्रमाणे त्यांनी आधी दुसर्‍या गीतकारांच्या काही गाण्यांचे अंतरे लिहिले, पण त्यांच्या स्वतःच्या मते त्यांनी त्या गीतांना फक्त "हात लावला".
बंदिनीच्या वेळी मूळ गीतकार शैलेंद्र यांचे एस.डी.बर्मन यांच्याबरोबर काही मतभेद झाल्यामुळे गुलझार यांना बिमलदांनी एक गीत लिहायला सांगितले, तेव्हा त्यांनी "मोरा गोरा अंग" लिहिले, पुढे शैलेंद्र परत आले.
मी जाणकार नाही, पण अशा आशयाचे आणखी आधीही वाचनात आले आहे.

फाळणीवर आधारीत "पिंजर"मधली गीते त्यांनी लिहिली आहेत.

पद्मावति's picture

26 Aug 2016 - 12:15 am | पद्मावति

आहा.....पिंजर.
काय सुंदर गाणी. चरखा चलाती माँ, मार उडारी, सीता को देखे ......अप्रतिम शब्द.

या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय सुंदर आहे. "चरखा चलाती" आणि आणखी एक गाणे अमृता प्रीतम यांचे आहे, बाकीची गुलगारांची आहेत.

पद्मावति's picture

26 Aug 2016 - 12:30 am | पद्मावति

या चित्रपटाबद्दल सर्वच अतिशय सुंदर आहे

..खरंय रूपी. या चित्रपटात उर्मिला मातॉंडकर ने सुद्धा वागण्या-बोलण्याचा पंजाबी लहेजा मस्तं उचललाय. चरखा हे गाणं अमृता प्रीतम यांचे आहे हे माहीत नव्हतं मला. सुंदर गाणं.
हाथ छूटे भी तो...हे सुद्धा गुलज़ारांचे आहे का? ते तर माझं ऑल टाइम फेव गाणं आहे..

पिशी अबोली's picture

24 Aug 2016 - 9:36 am | पिशी अबोली

लेख तर भारीच, आणि प्रतिसाद सुद्धा भारी!

वेदांत's picture

24 Aug 2016 - 9:47 am | वेदांत

मस्त...
जग घूमेया थारे जैसा ना कोई ...............

अंतु बर्वा's picture

25 Aug 2016 - 1:02 am | अंतु बर्वा

छान लेख. आम्हीसुद्धा गुलझार साहेबांचे फॅन... जुण्या गाण्यांबद्दल वर बरच काही आलयं. माझी थोडी भर नवीन गाण्यांमधुन..
कमीने चित्रपटातलं, टायटल:
क्या करे जिंदगी इसको हम जो मिले, इसकी जां खा गये रात दिन के गिलें
कभी जिंदगीसे मागा, पिंजरे में चांद ला दो
किंवा
इश्किया मधलं, दिल तो बच्चा है जी असो
नाहीतर हैदर मधलं झेलम (किस से पूछे कब तक सहते जाना है, अंधी रात का हाथ पकडकर कब तक चलते जाना है)
किंवा ओमकारा मधलं नमक इस्क का असो, गुलजारच लिहू जाणे...

माधुरी विनायक's picture

25 Aug 2016 - 3:17 pm | माधुरी विनायक

गुलजार माझेही प्रचंड आवडते कवी..
कतरा, कतरा माझं विशेष आवडतं...

कतरा कतरा मिलती है
कतरा कतरा जीने दो
ज़िंदगी है, बहने दो
प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो

तुमने तो आकाश बिछाया
मेरे नंगे पैरों में ज़मीन है
देखे तो तुम्हारी आरज़ू है
शायद ऐसे ज़िन्दगी हसीन है
आरज़ू में बहने दो
प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो

कल भी तो कुछ ऐसा ही हुआ था
नींद में थी तुमने जब छुआ था
गिरते गिरते बाहों में बची मैं
सपने पे पाँव पड़ गया था
सपनों में रहने दो
प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो...

वाचताना सुद्धा आशाचा आवाज ऐकू आला!

सानझरी's picture

25 Aug 2016 - 5:13 pm | सानझरी

पाके भी तुम्हारी आरज़ू है
शायद ऐसे ज़िन्दगी हसीं है

या गाण्यातले हे माझे सगळ्यात आवडते बोल. दुरुस्त केल्या शिवाय रहावलं नाही. आणि हे आणखी एक कडवं

हलके हलके कोहरे के धुए में
शायद आसमां तक आ गयी हूँ
तेरी दो निगहों के सहारे
देखो तो कहाँ तक आ गयी हूँ
कोहरे में बहने दो..
प्यासी हूँ मैं प्यासी रहने दो
रहने दो ना...

माधुरी विनायक's picture

27 Aug 2016 - 8:57 pm | माधुरी विनायक

आणि योग्य ओळी दिल्याबद्दल आभार...
गुलजार खरंच वेड लावतात...
मासूम मध्ये तुझसे नाराज नही जिंदगी लिहिणारे गुलजार त्याच चित्रपटात हुजुर इस कदर भी सारखं गाणंही देतात... दोन्ही गाणी आवडती, हे वेगळं सांगायला नको ना...

अगदी खरं.. जीने के लिये सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे.. मुस्कुरायें तो, मुस्कुराने कर्ज उतारने होंगे... हे असं गुलजारच लिहू जाणे. त्यांची ही आणखी एक सुंदर कविता..

आदतें भी अजीब होती हैं

साँस लेना भी कैसी आदत है
जीये जाना भी क्या रवायत है
कोई आहट नहीं बदन में कहीं
कोई साया नहीं है आँखों में
पाँव बेहिस हैं, चलते जाते हैं
इक सफ़र है जो बहता रहता है
कितने बरसों से, कितनी सदियों से
जिये जाते हैं, जिये जाते हैं

आदतें भी अजीब होती हैं..

वेगळ्याच वातावरणात नेणारं गीत आहे. गूढ, गहन, गंभीर शब्द. अवाक करणारं संगीत. खिळवून ठेवणारं नृत्य. लता, आशा आणि स्वतः संगीतकार डाॅ.भूपेन हजारिका या तिघांनीही गायलेलं आहे पण मला वैयक्तिकरीत्या आशाजींनी गायलेलं आवडतं. मी जास्त काही लिहित नाही. प्रत्यक्षच पाहा.

https://youtu.be/kyIqnKT9ciY

संदीप डांगे's picture

25 Aug 2016 - 8:39 pm | संदीप डांगे

ओहोहो.. आज जीव घ्यायचा दिवस आहे का?

बहुगुणी's picture

26 Aug 2016 - 1:33 am | बहुगुणी

नादखुळा:

एखादी मालीका किमान फाळणीवरील्/सम्कालीन विषयावर करायला पाहिजे होती असे राहून राहून वाटते.

फाळणीवर आधारित मालिका गुलज़ारांनी दिग्दर्शित करावी या इच्छेला +१.

त्यांनी दूरदर्शनसाठी दिग्दर्शित केलेल्या 'किरदार' या कथामालिकेतील 'शिकोड़' (मूळं) ही पश्चिम बंगाल आणि पूर्व पाकिस्तान यांत रहाणार्‍या मित्रांची कथा आठवली. खास गुल़ज़ार टच!

जव्हेरगंज's picture

27 Aug 2016 - 12:09 am | जव्हेरगंज

अरे आओ ना, की जां गयी
जहां गया, सो जाओ
अरे आओ ना, के थक गयी
है ज़िन्दगी, सो जाओ

ना श्याम ना सवेरा, अँधेरा ही अँधेरा
है रूहों का बसेरा, सो जाओ

-हैदर

पिलीयन रायडर's picture

27 Aug 2016 - 1:07 am | पिलीयन रायडर

हे तर एक नंबर आहे!!