और क्या एहेदे वफा होते हैं । लोग मिलते हैं जुदा होते है। और क्या......... एहेदे वफा होते हैं ।
पंचम (आर डी बर्मन), आनंद बक्षी ,आशाताई(सोलो) आणि सुरेश वाडकर(सोलो) यांच्या प्रतिभेनी सजलेली एक मास्टरपीस संगीतकृती !
चांगुलपणा , चांगुलपणा म्हणजे काय? लोक एकत्र येतात आणि विभक्त होतात , जणू एकत्र येण्यातच विभक्त होण्याची बीजे रोवलेली असतात. जीवनात भेटणारे साठी केव्हा तरी विभक्त होतातच.
जवळच्या व्यक्तीला त्रास देऊन आणि रडवूनच सुख मिळते काय? प्रेम विसरण्याची जणू जगाला सवयच असते.
प्रेमातील उद्विग्नता व्यक्त करण्याचा एक प्रयत्न !
हे गीत राज खोसला यांच्या सनी (१९८४) या चित्रपटातील.
एक सुंदर हळुवार कथा......
एक विवाहित उद्योगपती नि:संतान असल्यामुळे लग्नात खुश नसतो . मग तो एका गणिकेकडे आकर्षित होतो.
हि गणिका त्याच्यापासून गर्भवती राहते. पण ही बाब त्या नायकाच्या पत्नीपासून लपत नाही. मग असूया आणि अहंकाराने पछाडलेली ही पत्नी गणिकेपासून तिचे बाळ हिरावून घेऊन त्याला वाढवते.
तोपर्यंत नायकाचे अपघाती निधन झालेले असते. हा मुलगा मोठा झाल्यावर मग एका नर्तिकेच्या प्रेमात पडतो ज्याला ती ( नायकाची पत्नी) विरोध करते, पण तो मुलगा विरोधाला न जुमानता,त्या नर्तिकेशिवाय कोणालाही आपली पत्नी बनवायला तयार नसतो, कर्मधर्मसंयोगाने ती मुलगी त्या गणिकेची भाची असते.
हे कळून सुद्धा मग ती (पत्नी) आपला विरोध संपवून लग्नाला परवानगी देते. असा सुखांत !
या कथेतील पात्रे सर्वानी अतिशय सुंदर उभी केली आहेत. नायकाच्या भूमिकेत धर्मेंद्र जी , गणिका शर्मिला टागोर आणि नायकाची पत्नी वहिदा रहेमान तसेच तो मुलगा सनी देओल आणि त्याची प्रेमिका अमृता सिंह.
सर्वानी आपापल्या भूमिका चोख पार पाडल्या. विशेष म्हणजे ग्रे शेड ची भूमिका वहिदाजींनी सुंदर वठवली आहे, धर्मेंद्र आणि सनी यांच्या पात्रांची दृष्टादृष्ट होत नाही.
राज खोसला यांचे दिग्दर्शन कौशल्य अप्रतिम! हे गाणे म्हणजे चित्रपटकथेचा अर्कच जणू !
हेच गाणे सुरेश वाडकर (सोलो) यांनीही तितक्याच समर्थपणे गायिले आहे. मिपाकर याचा जरूर आस्वाद देतील अशी खात्री आहे, हे गाणे येथे देत आहे.
और क्या एहेदे वफा होते हैं। ।।धृ ।।
लोग मिलते हैं जुदा होते है।
कब बिछड जाए हमसफर ही तो हैं !
कब बदल जाए एक नजर ही तो हैं
जान ओ दिल जिसपे फिदा होते हैं ।
और क्या एहेदे वफा होते हैं।
बात निकली थी इस जमाने की ।
जिसको आदत हैं भूल जाने की ।
आप क्यू हमसे खफा होते हैं ।
और क्या एहेदे वफा होते हैं।
जब रुला लेते हैं जीभर के हमे ।
जब सता लेते हैं जीभर के हमे ।
तब कही खुश वो जरा होते हैं ।
और क्या एहेदे वफा होते हैं।
प्रतिक्रिया
11 Aug 2016 - 3:36 pm | पद्मावति
खूप मस्तं लिहिलंय!
याच चित्रपटातील जाने क्या बात है, नींद नही आती बड़ी लंबी रात है..हे गाणं सुद्धा सुरेख आहे.
13 Aug 2016 - 1:40 am | चांदणे संदीप
प्र-प्र-प्र-प्रचंड आवडतं गाणं आहे हे!रादर मी लेखाच शीर्षक वाचल तेव्हाच ठरवल होत की, आपल्या प्रतिसादात "जाने क्या बात है" या गाण्याचा उल्लेख करायचा. आणि, इथे ऑलरेडी पहिल्याच प्रतिसादात नेमक तेच! :)
और क्या ऐहद-ए-वफा - हेही गाणं उत्तमच आहे! शान्तिप्रियजी छान लेख, अजून येऊद्या!
Sandy
16 Aug 2016 - 11:42 am | शान्तिप्रिय
धन्यवाद सन्दीप.
आपल्या सर्वान्च्या प्रतिसादांमुळेच थोडे फार लिहायला बळ येते.
11 Aug 2016 - 3:37 pm | शान्तिप्रिय
धन्यवाद पद्मावती! :)
11 Aug 2016 - 3:38 pm | यशोधरा
अतिशय आवडतं गाणं. धन्यवाद इथे दिल्याबद्दल.
11 Aug 2016 - 8:20 pm | गामा पैलवान
शान्तिप्रिय,
परीक्षण वाचून राहवलं नाही म्हणून लगेच तूनळी वर जाऊन गाणं बघितलं. त्यात या ठिकाणी ( https://youtu.be/7fch8JZjKqE?t=2m15s ) धर्मेंद्र दाखवलाय. पण तो तर मृत आहे ना?
आ.न.,
-गा.पै.
11 Aug 2016 - 9:33 pm | शान्तिप्रिय
आशाताईंचे सोलो गान्यावेळी
तो जीवन्त असतो
नन्तर सुरेश्जीन्च्या
सोलोवेळी
तो म्रुत असतो
11 Aug 2016 - 11:23 pm | पैसा
गाणे सुंदर आहेच.
12 Aug 2016 - 1:34 pm | बाबा योगिराज
सुंदर परीक्षण. आता सिनेमा बघण्याचा प्रयत्न करणार.
असेच चांगल्या कलाकृतीं बद्दल लेख येऊ द्या.
बाबा योगीराज.
12 Aug 2016 - 1:38 pm | अत्रुप्त आत्मा
लेखन आवडलं.
12 Aug 2016 - 8:27 pm | दुर्गविहारी
याच चित्रपटातील अजुन एक सुन्दर गाणे-
जाने क्या बात है,
निन्द नही आती
बडी लम्बी रात है