मिशी

शितल's picture
शितल in जनातलं, मनातलं
24 Sep 2008 - 5:01 pm

नमस्कार मंडळी,

तुम्ही आता विचार करत असाल मिशी ह्यावर काही लिहीण्याजोगे आहे का ? पण चला जाता जाता वाचु या.

“ मुछे हो तो नथ्थुलाल जैसी वरना ना हो ! ” हा डायलॊग तर सर्वांना परिचयाचा असेलच.

तर मिशी हा काही पुरूषांचा अभिमानाचा, सौंदर्याचा विषय आहे. मिशीमुळे रूबाबदार पणा वाढतो असे काहींजणांना वाटते, मिशी शिवाय पुरूषाला शोभा नाही असे ही उदगार ऐकले आहेत.
दाढीचा तसा माना शी संबध नाही जसा मिशीचा आहे, का बरे असे असेल कोणी सांगु शकेल का? काही व्यक्तीचित्र डोळ्या समोर आणल्यावर त्यांना मिशी शिवाय आपण डॊळ्या समोर आणुच शकत नाही, गावाकडे सरपंच असलेले पाटील डोळ्या समोर उभे करा काय चित्र तयार होते ,तर धोतर, फेटा, आणि पिळ मारलेली मिशी असेच ना, तसेच, शिकारी म्हंटल्यावर डोळ्या समोर चित्र येते त्याची हॆट, दोन नळ्याची बंदुक, आणि त्याची तलवार कट मिशी हो ना, मिशी शिवाय शिकारी रंगवु शकत नाही, हिटलर आणि चार्ली चॊपलीन या दोघांच्यात त्याची मिशी ही त्याच्या व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग होती. मिशी शिवाय त्या दोघांचे ही चेहरे आपण नजरे समोर आणु शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आहेत. माझ्या पाहण्यात आलेली दोन उदाहरणे मी देत आहे.

एक महिन्या पुर्वी आम्ही बोस्टनला व्हेल वॊचिंगला गेलो होतो तेव्हा बोटी माझ्या शेजारी एक गृहस्थ बसले होते त्यांचे अंदाजे वय ६५ ते ७० वर्षाच्या आसपासचे असावे असा अंदाज बांधला. त्यांना पाहिल्यावरच त्यांच्या चेह-यावरील मिशीने दाद मिळवली नाही तर नवलच, अगदी तलवार कट मिशी राखली होती त्यांनी, आणि त्या मिशीच्या प्रेमात असावेत बहुधा ते त्याच्या हातात एक छोटासा ब्रश होता तो ब्रश काही कळुन ही येत नव्हता, एखाद्या स्त्रीने हातात छोटासा रुमाल कसा धरावा तसा ते तो ब्रश बाळगुन होते, आणि दर ३/४ मि. ते त्याच्या मिशीवरून तो ब्रश फिरवीत असत, तो असा प्रकारे फिरवत की समजुन ही येत नसे, फक्त मिशीवरून हात फिरवीत आहेत असे वाटे, मिशीची दोन्ही टोके व्यवस्थीत आहेत का ते तपासुन पहात असे.

मी ही नजरेना त्यांना मिशी छान आहे अशी दाद दिली आणि त्यांनी परत मिशीवरून ब्रश फिरवतपण हसत ती स्विकारली. मला ते अजोबा काही वेगळे रसायन वाटले, कदाचित ते नेव्ही, आर्मी किंवा एअर फोर्स मध्ये चांगले अधिकारी असतील असे उगाच वाटुन गेले.

अजुन एक मजेशिर किस्सा, मी आणि माझी मैत्रीण कार पार्किंगच्या येथे आपापल्या पतीदेवांची वाट पहात थांबलो होतो, समोर एक माणुस ज्याच्या डोक्यावर एक ही केस नव्हता (टकला )तो आपला स्वत:च्या कारच्या आरशात पुन्हा पुन्हा पाहुन मिशी विंचरत होता, आम्हा दोघींना हसु आले, अरे डोक्यावर ना एक केस आणि मिशीला किती जपतो असे आमचे उदगार निघाले, आमच्या हसणाने त्याचे लक्ष आमच्याकडे गेल्यावर तो ओशाळला असावा लगेच त्याने कार काडुन तेथुन धुम ठोकली.

असेच मी माहेरी रहायला गेले होते, तेव्हा माझा भावाने ऒफिस मधुन येताना त्याची मिशी कापुन घरी आला, आणि गपचुप येऊन सोप्यावर बसला, माझ्या लेकाने त्याला पाहिले आणि येऊन आम्हाला सांगत होता मामा काय करून आला बघ, आम्हाला कळले नाही, आम्ही जाऊन भावाकडे पाहिले तर त्याने मिशी न्हाव्याला दान केली होती, आणि माझ्या लेकाला त्याची मिशी कोठे गेली हा मोठा प्रश्न पडला होता, तो घरातल्या सगळ्यांना हाताला धरून भावाजवळ घेऊन दाखवत होता, आणि स्वत: माझ्या भावा जवळ जाऊन जाऊन त्याचा चेहरा वाकुन पाहुन येत होता. माझ्या भावाला मग त्याने चार दिवस मिशी कोठे गेले ह्यावरून अनेक प्रश्न विचारून भेडसावले.

तुम्हाला ही काही किस्से माहित असल्यास जरूर आम्हाला सांगा.

समाजअनुभव

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2008 - 5:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"फक्त पुरूषांनाच असणारी मिशी स्त्रीलिंगी का असेल?" असा प्रश्न अनेकदा मनात येतो. (तेच दाढीच्या संदर्भातही)

विनायक प्रभू's picture

24 Sep 2008 - 6:05 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
हा शोध कधी लागला अदिती. मी फक्त बद्दल बोलतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2008 - 7:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काका, तुम्ही फारच कोड्यात बोलता! जरा म्या पामराला समजेल असं बोला ना, प्लीज!

प्रियाली's picture

24 Sep 2008 - 7:59 pm | प्रियाली

काका, तुम्ही फारच कोड्यात बोलता! जरा म्या पामराला समजेल असं बोला ना, प्लीज!

लेकिन दुरुस्त आयी| =))
ह. घ्या.

आपली
(क्रिप्टिकची क्रिप्टोनाईट) प्रियाली

अवलिया's picture

24 Sep 2008 - 8:03 pm | अवलिया

आकाश धुंडाळत फिरणारी मिशीत अडकली हो..........

विनायक प्रभू's picture

24 Sep 2008 - 8:48 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
आताच आलेल्या बातमी नुसार मिशा आणि दाढी ही फक्त पुरषांची मक्तेदारी राहिलेली नाही. ह्याला कारण वेगवेगळी प्रदुषणे. फक्त स्त्रियांसाठी सलुन ची वाढ्ती संख्या लक्षात घ्या. येत्या काही वर्षात ही समस्या आणखीन वाढणार आहे. प्रदुषणाने झालेले सुक्ष्म जनुकिय बदल.

लिखाळ's picture

24 Sep 2008 - 8:54 pm | लिखाळ

हार्मोनच्या बदलांमुळे स्त्रियांना उत्तरवयात असे होउ शकते टेस्तॅस्टेरोन हा पुरूषांत मोठ्या प्रमाणावर असलेला हार्मोन दाढी-मिश्या-हात-पायावरचे केस नियंत्रित करतो म्हणूनच भरघोस दाढी-मिश्या भरपूर टेस्टॅस्टेरॉन आणि ओघाने भरपूर पौरूष दाखवतात. (सर्व ऐकिव माहिती).
हार्मोनल इंबॅलन्स हा वाढते ताण-तणाव, प्रौषण, बदलेले जीवनमान, अयोग्य दिनक्रम इत्यादिने होत असावा. असो.
मिस्किल मजेदार लेखात हे भलतेच आले.
--लिखाळ.

विनायक प्रभू's picture

24 Sep 2008 - 9:00 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
असावा नाही आहे. ह्यावर अवलंबुन असणारे काही ट्रिलियन डॉलरस ने वाढ्णार आहेत.

विनायक प्रभू's picture

24 Sep 2008 - 9:02 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
व्यवसाय शब्द राहिला.

अवलिया's picture

24 Sep 2008 - 8:00 pm | अवलिया

फक्त पुरूषांनाच असणारी मिशी स्त्रीलिंगी का असेल?

आम्ही काही स्त्रियांना मिशा पाहिल्या आहेत. त्या मिशांचे लिंग काय असते हो?

विनायक प्रभू's picture

24 Sep 2008 - 8:33 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
नाना अगदी बरोबर बोल्लात.

मनस्वी's picture

24 Sep 2008 - 8:02 pm | मनस्वी

फक्त स्त्रियांना असणारा अंबाडा पुल्लिंगी असतो.
:)

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2008 - 8:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फक्त स्त्रियांना असणारा अंबाडा पुल्लिंगी असतो.

प्वाईंट आहे! :-D

विजुभाऊ's picture

24 Sep 2008 - 5:10 pm | विजुभाऊ

"आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते"

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

मनिष's picture

24 Sep 2008 - 5:17 pm | मनिष

मेट्रो-सेक्सुअल पुरूष फारसे मिशी ठेवत नाहित, तर रेट्रो-सेक्सुअल पुरूष मिशी म्हणजे रुबाब वर विश्वास ठेवतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Sep 2008 - 7:42 am | llपुण्याचे पेशवेll

मेट्रो-सेक्सुअल व रेट्रो-सेक्सुअल या दोहोंमधला फरक स्पष्ट करून सांगावा म्या पामरासाठी. प्लीज!
(मिशीवाला)
पुण्याचे पेशवे

साधारणपणे, मोठ्या शहरात राहणार्‍या आपल्या कपड्याविषयी, दिसण्याविषयी जागरुक असणार्‍या पुरुषाला मेट्रो-सेक्स्युअल मॅन म्हणतात तर ह्याच्या उलट असणार्‍यास रेट्रो-सेक्स्युअल मॅन. वाचा -

http://www.urbandictionary.com/define.php?term=metrosexual - A retrosexual is the opposite of a metrosexual. He ia a man who spends as little time and money as possible on his appearance.

आमच्या पी. जी. च्या वेळेस यु.पी/बिहार आणि उत्तरेकडील लहान गावातून आलेले बरेच मित्र होते, त्यातील एकाबरोबरचा माझा संवाद -

तो - तुम लोग मुछें क्यों नही रखता बे?
मी - तुम क्यों रखते हो?
तो - मुछें तो मर्दानगी की निशानी है!
मी - जिनको अपनी मरदानगी पे शक होता है, उनको शायद बाहरी निशानियों की जरुरत पडती है! :)
तो - अबे सालें! @^#%^$%##
मी - खी...खी...खी! =))

पुर्वीच्या तुलनेत आज मिशी ठेवणारे कमी दिसतात. अर्थात लहान गावात/खेड्यात अजूनही नीलकांत म्हणतो त्याप्रमाणे विचार आहेत! लगानच्या वेळेस आमिर खान म्हणूनच (जुना काल आणि मागासलेले गाव) भुवनला मिशी हवी म्हनत होता, पण शेवटी त्याला ते रुप पसंद पडेना, म्हणून मग बिनमिशीचा चिकना भुवन!

मला वाटते आपल्याला जे आवडते, जे सूट होते तसे करावे - जसा जॅकी श्रॉफ मिशीशिवाय विचित्र दिसतो तर देव-आनंद मिशांमधे!

(क्लीन शेव्हन) मनिष

इनोबा म्हणे's picture

24 Sep 2008 - 5:23 pm | इनोबा म्हणे

किस्से आवडले
मिपाकरांचे काही किस्से असतील तर वाचायला आवडेल.

"आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हंटले असते"
आणि 'परी'ला असत्या तर काय म्हटले असते हो भाऊ?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Sep 2008 - 5:27 pm | ब्रिटिश टिंग्या

हे असले विनोद जुने झाले भौ!

- टिंग्या

टारझन's picture

24 Sep 2008 - 7:45 pm | टारझन

हे असले विनोद जुने झाले भौ!
दे टोला =)) =))

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

नेहा ..'s picture

24 Sep 2008 - 6:09 pm | नेहा ..

छान लेख

मनस्वी's picture

25 Sep 2008 - 9:21 am | मनस्वी

मजेशीर लेख आहे. छान लिहिलंएस शितल.

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

नीलकांत's picture

24 Sep 2008 - 7:59 pm | नीलकांत

मिशी म्हणजे कसं मर्दाची शान असते !
जिसको मुछ नहीं उसको कुछ नहीं... !

असे एक ना अनेक डायलॉग्स मी माझ्या गावच्या मित्रांकडून ऐकले आहेत. कारण एवढंच की मी माझी मिशी काढली. आणि त्याचे दु:ख माझ्या मित्रांना झाले.

"काऊन काडली बे मिशी?" - मित्र
"तिले त्रास होत होता" - मी

असं म्हटलं की मित्र शिव्या देऊन निघुन जायचा.

यावेळी घरी गेल्यावर मित्राच्या कटींगच्या दुकानात गेलो. दाढी करतांना मिशी काढूच का? असं त्यानं ३ वेळा विचारलं. आणि काढतांना सुध्दा नापसंती दर्शक 'चक -चक' आवाज काढत होता मी हसत होतो.

ज्या दिवशी निवड झाली त्या दिवशी सुध्दा मित्रांच्या प्रतिक्रिया होत्या की पहिले मिशी वाढंव. बिनामिशीचा कुठे फौजदार असतो का?

असा माझ्याशी मिशीचा प्रवास निगडीत आहे.

- नीलकांत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Sep 2008 - 8:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी मिशी ठेवायचा. मग एक दिवस अचानक मिशी काढून टाकली आणि समोर उभा राहिला. मला त्याचे ते रूप अजिबात आवडलं नाही, मग चार दिवस त्याच्याशी बोलले नाही. पाचव्या दिवशी, स्वतः चहा बनवायचा कंटाळा आला म्हणून मान्य केलं. आता आहे तसाच बरा वाटतो.

पण माझ्या बॉयफ्रेंडनी (अभिर, आताचा नवरा) मिशी काढली तेव्हा तो "काका"वरून एकदम स्वतःच्या वयाएवढा दिसायला लागला. त्यामुळे तो तसा जास्त आवडला.

प्रियाली's picture

24 Sep 2008 - 8:13 pm | प्रियाली

आताचा नवरा???????????

विनोद कर पण जरा हलकेच कर ;) आताचा नवरा नाही.... नाहीतर उद्याचा कोणी वेगळा का? असं विचारायचे कोणीतरी.

फक्त त्यावेळी बॉयफ्रेंड, आता नवरा पुरेसे आहे. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Sep 2008 - 1:55 pm | बिपिन कार्यकर्ते

तुने मेरे मुंह की बात छीन ली.... मेरेकू बी वईच लगा...

बिपिन.

शितल's picture

24 Sep 2008 - 8:12 pm | शितल

नीलकांत
छान प्रतिसाद,
बिनमिशीचा फौजदार असतो पण तो रूबाबदार दिसत नाही. :)

मी ही माझ्या लग्नाच्या वेळी मुलाला मिशी हवी अशी ही अपेक्षा ठेवली होती. :)
माझा नवरा मला अनेक वेळा म्हणतो मी मिशी काढुन टाकतो, मी त्याला मिशी काढलास तर खबरदार अशी धमकी देते. ;)

अभि's picture

25 Sep 2008 - 2:36 pm | अभि

"तिले त्रास होत होता" - मी
तिले म्हणजे कोणाला,मिशीला?

ऊपट्सुम्भ's picture

24 Sep 2008 - 8:02 pm | ऊपट्सुम्भ

फारच छान !
आगदि दाढी मिशितुन हसु फुटले ! !

धनंजय's picture

24 Sep 2008 - 8:18 pm | धनंजय

मिश्किल लेखन आवडले, शितल!

प्रियाली's picture

24 Sep 2008 - 8:22 pm | प्रियाली

बाकीचे किस्सेही मस्त.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2008 - 8:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिश्किल लेखन आवडले.
बाकीचे किस्सेही मस्त.

स्वाती दिनेश's picture

24 Sep 2008 - 8:40 pm | स्वाती दिनेश

मिश्किल लेखन आवडले, शितल!
असेच म्हणते.धनंजय सारखेच.
स्वाती

बेसनलाडू's picture

25 Sep 2008 - 5:08 am | बेसनलाडू

(मिश्किल)बेसनलाडू

प्राजु's picture

24 Sep 2008 - 8:20 pm | प्राजु

आम्ही बेंगलोर गेलो होतो बाबांच्या कॉन्फरन्स साठी. बाबा सकाळी सकाळी हॉटेलच्या रूममध्ये कॉन्फरन्स साठी तयार होत होते. ते दाढी करत होते. मी बाबांना २ वेळा हाक मारली पण त्यांना ऐकायला नाही गेली. मला माहिती नव्हतं बाबा दाढी करताहेत ते. मी बाथरूमचं दार धकलून आत गेली. आणि सहजच... "काय हो बाबा ओ का नाही देत तुम्ही??" असं म्हणत त्यांच्या हाताला धरून ओढलं आणि नेमकी एका बाजूची मिशी कापली गेली. "अगं!!!!!!!!!!!!" इतकंच म्हणाले बाबा. आणि त्यांचा तो अवतार पाहून मला जाम हसू आलं. आता बाबांच्या पुढे प्रश्न होता बिनमिशीचं कॉन्फरन्स ला कसं जायचं.
नीट शेव्हिंग करून बाबा गेले कॉन्फरन्स ला. त्यानंतर जो लंच होता त्यासाठी आम्हीही गेलो होतो. तिथे बाबांचे एक जर्मनचे मित्र म्हणाले ," यॉर डॅड इज लूकिंग यंग नाऊ, इजन्ट ही??"
मला मात्र हसू दाबणं फारच कठीण जात होतं...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

24 Sep 2008 - 8:27 pm | झकासराव

"जिनकी मुंछे नही होती
उनका मन साफ नही होता."
इति- उत्पल दत्त
चित्रपट गोलमाल :)
मी अजुन पर्यंत तरी कधी काढली नाही मिशी. :)
माझ एक चित्र काढल होत "लिम्बुटिम्बु" याने.
ते कुठेस सापडल तर टाकतो इकडे :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

लिखाळ's picture

24 Sep 2008 - 8:32 pm | लिखाळ

लेख छान आहे.. प्रतिसाद आणि किस्से सुद्धा मजेदार.

विचित्र मिश्यांमध्ये मला 'अगाथा ख्रिस्थी'ची जी मालिका पूर्वी टिव्हीवर लागे त्यातल्या मुख्य डिटेक्टिव्ह्चे हर्क्युल पायरोचे काम केलेल्या डेविड शुट्झच्या मिशा आठवतात. मिशीला तूप लाऊन फिरणे हा वाक्प्रचाराचा तो प्रत्यक्षात उपयोग करी असे वाटायचे.

--लिखाळ.

सर्किट's picture

24 Sep 2008 - 9:48 pm | सर्किट (not verified)

डेव्हिड सुशे चा पॉहरो हा पहिल्यांदा पाहिला तेव्हा अगाथा ख्रिस्टीला जसा अपेक्षित होता तसाच वाटला.

मिश्या, अंडाकृती डोके, आणि स्वतःच्या मेंदूविषयी दुर्दम्य आत्मविश्वास !

त्याचा विकीपीडियावरचा फोटो मात्र बिनमिशीचा आहे.

http://en.wikipedia.org/wiki/David_Suchet

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Sep 2008 - 8:59 pm | ब्रिटिश टिंग्या

मी कधी कधी मिशी ठेवतो.....कधी काढतो.....
सबकुछ मुड पे डिपेंड है!

(मिशीवाला) टिंग्या

रेवती's picture

24 Sep 2008 - 9:30 pm | रेवती

हा लेखाचा विषय होऊ शकतो असे कधी डोक्यात आले नव्हते. मला तर कोणी मिशी काढली काय आणि ठेवली काय, काहीच कळत नाही.
माझा नवरा एकदा मिशी काढून आला तर मला समजलेही नाही. शेवटी त्यानेच सांगितले.

शितल,
तू सांगितलेले किस्से वाचून गम्मत वाटली.
आता वेणी, अंबाडा, हेयरपीना याबद्दलही लिही ना! (ही चेष्टा नव्हे.)

रेवती

प्रभाकर पेठकर's picture

24 Sep 2008 - 10:26 pm | प्रभाकर पेठकर

मिशीचे डायरेक्ट नाते व्यक्तिमत्त्वाशी आहे. दाढीचे तसे नाही. ह्याला कारण बिनदाढीचे किंवा गुळगुळीत दाढी केलेलेच पुरूष नजरेस पडत असतात. मुस्लीम समाजात मिशी ठेवत नाहीत पण दाढी ठेवतात. त्यांच्या दाढीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यांच्या दाढीवरून व्यक्तिमत्त ठरत असेल. ते असो पण आपल्यात दाढी ठेवणारे कमी आणि मिशी ठेवणारे बहुसंख्य आहेत.
झुबकेदार अस्ताव्यस्त मिशी, झुबकेदार पण विंचरून आकार दिलेली मिशी, छपरी मिशी, फक्त वरून कट दिलेली मिशी, व्यवस्थित ट्रिम केलेली पण टोकाला आकडे असलेली मिशी, व्यवस्थित ट्रिम केलेली मध्यम मिशी, टोके वर चढवलेली मिशी, टोके उतरती ठेवलेली मिशी, टोके हनुवटी कडे उतरवलेली मिशी, पातळ मिशी, नाकाच्या मध्यावर रूंद आणि टोकाकडे निमुळती टोकदार मिशी, तलवार कट मिशी, अगदी रेघ मारल्यासारखी मिशी, हिटलर मिशी, ढेकूण छाप मिशी आणि अजिबात नसलेली मिशी असे मिशीचे अनेकविध प्रकार अनेकविध व्यक्तिमत्त्वे दर्शवितात.
जाड झुबकेदार अस्ताव्यस्त मिशी बाळगणार्‍या पुरुषाचा आवाज भरदार, स्वभाव कडक, करारी, वृत्ती हिंसक असेलसे वाटते. तशी त्या चेहर्‍याला शोभून दिसते. अशा मिशीच्या पुरुषाचा आवाज नाजूक्-कोवळा असेल तर तो विनोदी वाटतो. असा पुरूष काही कारणाने हमसाहमसी रडत असेल तरी ते चित्र आपल्या मेंदूला स्विकारार्ह वाटत नाही.
ह्या उलट अजिबात मिशी नसलेल्या पुरूषाचा आवाज जाऽऽऽड आणि भरीव असेल तर आपल्या त्या पुरुषाच्या व्यक्तिमत्वाबाबतच्या अपेक्षांना तडा जातो.
का कोण जाणे, शार्प तलवार कट मिशा ठेवणारा माणूस टापटीप आणि व्यवस्थितपणाचा कळस वाटतो. तो जर अस्ताव्यस्त कपडे घालणारा अजागळ असेल तर ते चित्र आपले मन लगेच स्विकारत नाही.
असो. मिशांचे नाते असे व्यक्तिमत्त्वाशी निगडीत आहे.
मिशा ठेवणे आणि अजिबात न ठेवणे ही दोन्ही स्थित्यंतरे सुरूवातीला समोरच्याच्या नजरेला झटका देणारी असली तरी कालांतराने स्विकारली जातात. पुन्हा काही वर्षांनी त्यात बदल केला तर पुन्हा झटका बसतो.

अवांतरः गीनिज बुकासाठी रेकॉर्ड म्हणून ५-५ फुट वगैरे वाढविलेली मिशी विचारात घेतलेली नाही, हे सहज कळावे.

सुचेल तसं's picture

25 Sep 2008 - 10:08 am | सुचेल तसं

पेठकर साहेब,

नेहेमीसारखाच उत्तम प्रतिसाद....

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

यशोधरा's picture

24 Sep 2008 - 10:28 pm | यशोधरा

मस्त लिहिलेस शीतल!! :)

शितल's picture

24 Sep 2008 - 10:33 pm | शितल

पेठकर काका,
मस्त प्रतिसाद, त्यात मिशी कोणत्या कोणत्या प्रकारे असु शकते हे सांगितले आणि त्याचा व्यक्तीमत्वाशी असलेला संबंध ही .
:)

आनंदयात्री's picture

24 Sep 2008 - 11:09 pm | आनंदयात्री

छान लेख शितल. नेहमीप्रमाणे हटके विषयावर.

विसोबा खेचर's picture

25 Sep 2008 - 12:58 am | विसोबा खेचर

आम्ही मिशी ठेवत नाही परंतु हा छोटेखानी लेख मात्र आवडला! :)

बिन्धास्त बबनी's picture

25 Sep 2008 - 6:57 am | बिन्धास्त बबनी

लेख आणि त्यावरील प्रतिक्रिया वाचून ह. ह.पु.वा. !

मुक्तसुनीत's picture

25 Sep 2008 - 8:03 am | मुक्तसुनीत

मिशी म्हण्टल्यावर अनेक ऐतिहासिक व्यक्ति समोर येतात :
१. बडे गुलाम अली साहेब : एकदम जोरदार मिश्या
२. हिटलर : चार्ली चॅप्लीन ने आपल्या मिशांच्या साधर्म्याचा उपयोग द ग्रेट डिक्टेटर मधे केला.
३. स्टालिन : सैतानी बिग ब्रदरच्या भरघोस मिशा.
४. लोकमान्य टिळक : नरकेसरीला शोभणार्‍या सणसणीत !
५. तानाजी : टोकावर लिंबू राहात असे अशी आख्यायिका

जैनाचं कार्ट's picture

25 Sep 2008 - 9:33 am | जैनाचं कार्ट (not verified)

आमची तर घर की खेती.. जेव्हा हवी असे वाटली मिशी तेव्हा ठेवली नाय तर उडवली B)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग

मदनबाण's picture

25 Sep 2008 - 9:55 am | मदनबाण

आपल्या ला बॉ मिशी शिवाय काय जमत नाय !!,,माझी सुध्दा चुकुन एकदा मिशी दाढी करताना अर्धवट उडाली होती !!
तेव्हा पुर्ण मिशी उडवलेल्या अवस्थेत माझाच चेहेरा मलाच ओळखीचा वाटेना.....

(मिशी समर्थक)
मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

अभिजीत मोटे's picture

25 Sep 2008 - 12:32 pm | अभिजीत मोटे

मला वाटतं मिशी आणी अंडरलाईन (लिहीताना वापरतात ती) यांत साम्य असते. दोन्हीचा ऊद्देश एकच. अंडरलाईन शब्दाला वजन प्राप्त करुन देते, तर मिशी व्यक्तिमत्वाला.
............अभिजीत मोटे.

प्रभाकर पेठकर's picture

25 Sep 2008 - 1:42 pm | प्रभाकर पेठकर

दोन्हीचा ऊद्देश एकच.
फक्त ही उच्चारलेल्या वाक्याच्या वर असते. (वाक्य तोंडून बाहेर पडते). त्या मुळे आपण ह्याला 'ओव्हरलाईन म्हणूया का?

राहूल's picture

25 Sep 2008 - 3:13 pm | राहूल

सहीच विषय आहे!

शंकर पाटलांच्या कथांमध्ये मिशांसाठी वापरलेले इरसाल शब्द आठवले. 'छपरी' मिशा (घराच्या छपरासारख्या), 'ढेकूण' छाप मिशा (ढेकणासारख्या), 'पाती' मिशा (कांद्याच्या पातीसारख्या), 'तलवार' छाप मिशा (तलवारीसारख्या) वगैरे.

जाता जाता एक फालतू अलंकार. (बहुतेक 'अनुप्रास'?)
मांजरीच्या मिशीवर बसलेल्या मस्तवाल माशीकडे बघत मामा स्वतःच्या मिशीची मशागत करत होता; त्या मिषाने मशिन चालवणार्‍या मावशीला मिश्किल हसू फुटले... माशाअल्ला!

अगदीच पी.जे.:)

राहूल.

शितल's picture

25 Sep 2008 - 6:09 pm | शितल

मिशी वर मिपाकरांनी स्वतःच्या परीने मस्त किस्से सांगितले,
काहींनी मिशी संदर्भात प्रतिक्रेयेत फोटो ही मस्त दिले आहेत
सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद !
:)