आज कॉफी पिताना वाटले की चला कॉफीचा कप कॉफी संपल्यावर कसा दिसतो ते टिपून ठेवावे.
आपल्याल कप कसा वाटला ते जरूर सांगा.
कॅमेरा : निकॉन कूलपिक्स एस ४
समय : रात्र. फोटोत फ्लॅश वापरावा लागला.
ऍपरचर शटरस्पीड कुठे कळतो? माझ्या कॅमेर्यात ती सोय दिसत नाही.
फोटो टाकणे या प्रकाराचे विडंबन कसे करावे याचा विचार करताना हे सुचले. कसे वाटले? सर्वांनी ह.घ्यावे.
--लिखाळ :)
प्रतिक्रिया
24 Sep 2008 - 1:59 am | प्रियाली
कपातून कॉफी प्यायला देऊन नंतर रिकाम्या कपात राहिलेल्या डागांवरून आणि थेंबांवरून भविष्य सांगण्याची पुरातन पद्धत आहे. बहुधा ग्रीस आणि आजूबाजूंच्या देशांत. ;) आता इथले ज्योतिषी सुरू झाले नाहीत म्हणजे मिळवली. ;)
मी फक्त एवढंच सांगू शकते की कॉफी उत्तम झाली असावी आणि आनंदाने गट्ट केलेली असावी.
24 Sep 2008 - 2:58 pm | लिखाळ
>>मी फक्त एवढंच सांगू शकते की कॉफी उत्तम झाली असावी आणि आनंदाने गट्ट केलेली असावी. <<
खरे आहे :)
पण अनेकदा वर्तमानस्थिती आणि साधारण भूतकाळ बरोबर आला की आमच्या त्या ज्योतिषावर प्रचंड विश्वास बसतो. हा..भविष्य थोडे किंवा फारच चुकले तर चालुन जाते..माणूस आहे चुका होणारच :)
-- (जातक) लिखाळ.
पुढल्या दोन वर्षात परदेशवारीचा योग आहे ! तुम्ही प्रयत्न केलेत तर होउन जाईल..पण त्यानंतर योग दिसत नाही. अश्या भोंगळ विधानांनी त्रस्त.
24 Sep 2008 - 4:20 am | टग्या (not verified)
पिऊन झाल्यावर कपाला चिकटून उरलेल्या (सायमिश्रित) कॉफीची आणि टेबलाच्या/लाकडी फ्लोअरिंगच्या (नेमकं काय?) उडालेल्या पॉलिशची रंगसंगती छान जमलीय.
24 Sep 2008 - 2:23 am | टग्या (not verified)
विडंबनाची कल्पना आवडली. पुढल्या वेळेस जमल्यास चरणार्या डुकरांचा क्लोज़अप व्हिडियो (आवाजांसकट) अपलोड करता आला तर पहावा म्हणतो... (कॅमेरा कुठला ते घरी जाऊन पहावं लागेल. बहुधा कॅनन ए७५० की ए५७० की असंच काहीतरी...)
24 Sep 2008 - 2:59 pm | लिखाळ
आभार ! आणि वाट पाहतोय...
24 Sep 2008 - 2:27 am | धनंजय
मुद्दे चांगले आहेत. रंगसंगती महत्त्वाची याबद्दल टग्या यांच्याशी सहमत.
![](http://farm2.static.flickr.com/1245/1253921760_9a1c2a31cf.jpg)
![for sale!](http://images.inmagine.com/img/imagesource/is579/is579036.jpg)
आणखी काही चित्रे:
यातील रंगसंगतीही खासच :
हे पुढील चित्र तर विक्रीसाठी ठेवले आहे!
यातून पैसेही मिळू शकतात तर!
**(सीरियसली - वरील पहिले चित्र फारच चांगले काढलेले आहे, विडंबनातही फोटोग्राफरची सफाई दिसते.)**
24 Sep 2008 - 2:48 am | टग्या (not verified)
पहिले चित्र हॉट कलर स्कीमचे उत्कृष्ट उदाहरण आहे, तर दुसरे चित्र हॉट कलर स्कीम आणि कोल्ड कलर स्कीम एकाच चित्रात एकत्र नांदू शकतात हे उत्तमरीत्या दर्शवून देते.
24 Sep 2008 - 2:33 am | नंदन
फोटोग्राफी इज नॉट एव्हरीवन्स कप ऑफ कॉफी, असे यातून सुचवायचे नाही ना? :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
24 Sep 2008 - 2:36 am | टग्या (not verified)
इट सीम्स टू बी इन्डीड एवरीवन्स कप ऑप कॉफी असं सुचवायचं असावं असं वाटतंय.
म्हणजे आपला जो तो येतो, इथे उठसूट फोटो चिकटवतो...
24 Sep 2008 - 3:00 pm | लिखाळ
जरा मजा हो..
24 Sep 2008 - 2:47 am | प्रियाली
फोटोंच्या विडंबनासाठी काही कल्पना
१. झिजलेली चप्पल
२. शिंकताना वाकडा झालेला चेहरा
३. जांभई देताना उघडलेला जबडा
४. घरातला कचर्याचा डब्बा
५. महिने न महिने न धुतलेला कमोड (अनेक बॅचलरांकडे असण्याची शक्यता आहे ;))
24 Sep 2008 - 3:09 am | टग्या (not verified)
६. केस रंगवल्यावर शॉवरमध्ये होणारी अभावित चित्रकला. (बॅचलर असण्याची अट नाही. [रंगवणारा/रीस] केस असणं आवश्यक. ;))
७. नाकपुडीच्या अंतर्भागाचा खालून वरती अशा अँगलमध्ये कॅमेरा धरून क्लोज़अप.
८. (व्हिडिओसाठी) जेवत असताना बाकीचा चेहरा वगळून केवळ तोंडाचा क्लोज़अप.
24 Sep 2008 - 3:10 am | प्रियाली
९. केस नसलेल्या चकचकीत टाळक्यावर परावर्तीत झालेली कोणतीही वस्तू. ;) (खरंतर हा अवॉर्डविनिंग फोटो व्हायला हरकत नाही) ;)
24 Sep 2008 - 3:02 pm | लिखाळ
असाच विचार करता वरचा फोटो निघाला :)
बाकी टकलावर परावर्तीत झालेल्या वस्तूच्या फोटोला बक्षिस मिळेल हा अंदाज खरा वाटतो :)
--लिखाळ.
24 Sep 2008 - 4:09 am | टग्या (not verified)
हा (आतापर्यंत उडवला नसल्यास) माझ्या संग्रही सापडण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही. बहुधा दोन ते तीन वर्षे जुना असावा. छायाचित्रकाराचे वय (फोटो घेतेवेळी) तीन ते चार वर्षे. कॅप्शन: 'अ सायलेंट जर्नी थ्रू डॅडीज़ नॉस्ट्रिल्स'. कॅमेरा: कोडॅक पी-८५० किंवा असाच काहीतरी. सेटिंग्ज: हाताला येतील ती.
24 Sep 2008 - 6:53 am | एकलव्य
:) आणखी काही संदर्भ व्यनिने पाठवितो.
24 Sep 2008 - 5:23 am | टग्या (not verified)
रहस्यकथेसाठी मुखपृष्ठावरील छायाचित्र म्हणून उत्कृष्ट आहे. (पार्श्वभूमी ही रंग उडालेले टेबल नसून रंग उडालेले लाकडी फ्लोअरिंग आहे याची भरपूर वेळ नीट निरीक्षण केले असता खात्री पटावी.) प्लॉटमध्ये कोणीतरी कोणालातरी कॉफीत विष घालून मारणे हे ओघानेच आले. ज्याअर्थी पिणाराची कॉफी संपूर्ण पिऊन झाली आहे त्याअर्थी विष रक्तात हळूहळू भिनणारे आहे. म्हणजे सायनाइड नसावे. (नेमके काय असावे ते कधी कोणाला कॉफीतून विष घालून मारले नसल्यामुळे मला सांगता येणार नाही. तज्ज्ञांनी माहितीत भर घालावी.) मुडदा कपाशेजारी पडलेला नाही. याचा अर्थ कॉफी पिऊन झाल्यावर बर्याच अवधीनंतर व्हिक्टिमास ('व्हिक्टिम'साठी इथे फिट्ट बसेल असा मराठी प्रतिशब्द काय?) मृत्यू आला असावा. ही आत्महत्या असावी की खून? आत्महत्या नसावी. कारण आत्महत्या असती तर कप असा जमिनीवर पडून राहिला नसता. मृताने तो कॉफी पिऊन झाल्यावर स्वयंपाकघरातील सिंकात किंवा डिशवॉशरमध्ये जाऊन नीट ठेवला असता. निश्चितपणे खूनच झाला आहे. व्हिक्टिम हा आरामात दिवाणखान्यात किंवा स्वयंपाकघरातील ब्रेकफास्ट एरियात (पण लाकडी फ्लोअरिंग आहे त्याअर्थी दिवाणखान्यापेक्षा स्वयंपाकघरातील ब्रेकफास्ट एरिया असण्याची शक्यता अधिक. दिवाणखाना असता तर कार्पेट असण्याची शक्यता ५०-५०.) जमिनीवर आडवा होऊन कॉफी पीत असावा. कॉफी नुकतीच संपली असावी, आणि अचानक मळमळल्यामुळे वांती काढण्यासाठी कप जमिनीवर तसाच टाकून तो तातडीने बाथरूममध्ये पळाला असावा, आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला असावा. (बाथरूमचा नीट शोध घेतल्यास मृतदेह तेथेच सापडावा.)
ज्याअर्थी ही आत्महत्या नाही, त्याअर्थी ती कॉफी त्याला कोणीतरी बनवून दिलेली असावी. याचा अर्थ तो एकटा राहत नसावा. मात्र तो विवाहितही नसावा, कारण त्याची बायको त्याला असे जमिनीवर पहुडून कॉफी पिऊन देणे केवळ अशक्य! म्हणजे बहुधा रूममेटबरोबर राहत असावा, आणि रूममेटनेच त्याला कॉफी बनवून दिली असावी. मात्र मृत्यूनंतर लगेचच कोणीतरी येत आहे असे वाटल्यामुळे रूममेटला पळ काढावा लागला असावा. कारण कॉफीचा कप जागचा हलवून त्याची विल्हेवाट लावण्याइतकाही वेळ त्याला मिळालेला दिसत नाही. म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट तर निश्चितच लावता आलेली नाही. मृतदेह खात्रीने बाथरूममध्येच सापडावा!
खुनाचे कारण (मोटिव्ह) पैसा हे निश्चित नसावे. कारण ज्याअर्थी १. मृत हा बॅचलर होता आणि २. त्याला रूममेट घेऊन राहण्याची गरज भासत होती त्याअर्थी आणि ३. एकंदरीतच फ्लोअरिंगची अवस्था पाहता तो सधन नसावा. बहुधा प्रेमाचा त्रिकोण असावा असा कयास करायला हरकत नसावी. (अशा प्रकारच्या रहस्यकथांत बहुधा पैसा नसला तर प्रेमाचा त्रिकोण हेच कारण बहुतांशी असावे असा अंदाज आहे. खूप रहस्यकथा वाचलेल्या नसल्यामुळे खात्रीने सांगता येत नाही, त्यामुळे यावर एक्सपर्ट कॉमेंट्स इतर सूत्रांकडून येतीलच. पण एखाद्या हेरगिरीच्या प्रकरणातून वगैरे रुममेटने काटा काढण्याइतका मृत किंवा त्याचा रूममेट चित्रावरून तरी ग्लॅमरस वाटत नाही. असता तर कॉफीच्या कपाऐवजी व्हिस्कीचा पेला आणि एखाद्या बर्यापैकी ऍशट्रेवर एखादा अर्धाजळका चिरूट नसता पडला? तेव्हा प्रेमाचा त्रिकोण असण्याचीच शक्यता अधिक. या अँगलवर अधिक संशोधन केल्यास बहुधा लीड्स मिळावेत.) एलेमेंटरी!
प्रेमाच्या त्रिकोणाच्या तिसर्या कोनामध्ये पट्टीच्या डिटेक्टिवांस काडीचेही स्वारस्य नसावे.
रहस्यकथेचे शीर्षक काय असावे? 'कॉफीच्या पेल्यातील वादळ'? 'रिकाम्या पेल्याचे रहस्य'? 'विषाची परीक्षा'? की आणखी काहीतरी? सूचना आणि निविदा मागवण्यात येत आहेत.
24 Sep 2008 - 7:41 am | घाटावरचे भट
'व्हिक्टिम'साठी इथे फिट्ट बसेल असा मराठी प्रतिशब्द काय?
'जातक' हा शब्द कसा वाटतो??? ;)
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
24 Sep 2008 - 3:05 pm | लिखाळ
रहस्यकथा मस्तच ! :)
व्हिकटिम = जातक
जोरदार.. (हशा आणि टाळ्या)
--लिखाळ.
25 Sep 2008 - 9:04 am | प्रकाश घाटपांडे
पुण्यात पुर्वी एका ज्योतिषाचा खुन झाला होता. असाच हॉटेल मध्ये खोली घेउन तो ज्योतिषाचा धंदा करायचा. काही तरी कारणाने त्याची आन जातकाची बाचाबाची झाली असावी त्यातुन त्याचा खुन झाला. इथे व्हिक्टिम ज्योतिषी झाला.
प्रकाश घाटपांडे
24 Sep 2008 - 8:00 am | विसोबा खेचर
हा हा हा!
टग्या, रहस्यकथेचा प्रतिसाद लै भारी रे! :)
आपला,
(००७) तात्या.
24 Sep 2008 - 9:12 am | सुनील
ज्याअर्थी पिणाराची कॉफी संपूर्ण पिऊन झाली आहे त्याअर्थी विष रक्तात हळूहळू भिनणारे आहे. म्हणजे सायनाइड नसावे. (नेमके काय असावे ते कधी कोणाला कॉफीतून विष घालून मारले नसल्यामुळे मला सांगता येणार नाही. तज्ज्ञांनी माहितीत भर घालावी.)
विष बहुधा साखर / स्वीटनर मध्ये असावे. ज्याअर्थी जवळपास चमचा दिसत नाही, म्हणजेच साखर / स्वीटनर कॉफीत विरघळले गेले नव्हते. शेवटी चाखल्यावर व्हिक्टीमचा मृत्यू झाला हे उघड आहे!
डॉ सुनील वॅटसन
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Sep 2008 - 9:36 am | प्रभाकर पेठकर
वरील तपासात 'बाथरूम'ला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
आत्महत्या असावी. पण विषारी कॉफी प्यायल्यावर नंतर पश्चाताप होऊन ते विष शरीराच्या सर्व मार्गांनी बाहेर टाकण्याच्या प्रयत्नात आत्महत्याकार बाथरूमकडे धावला असावा. त्यामुळे.....
मृतदेह खात्रीने बाथरूममध्येच सापडावा!
24 Sep 2008 - 2:44 pm | प्रियाली
इतक्यात काढलेला किस विसरलात का काय? रहस्यकथेचं नाव अर्थातच,
जाम कोणी देई (इथे जाम म्हणजे कॉफी, नाहीतर लोक म्हणायचे स्ट्रॉबेरी जामात विष होतं ;) )
24 Sep 2008 - 8:03 am | विसोबा खेचर
छ्या! असले चहा कॉफीचे रिकामे कप पाहायला आपल्याला नाय आवडत! :(
तात्या.
24 Sep 2008 - 3:06 pm | लिखाळ
बरोबर आहे..चित्राचा विषय कोणता असावा यावर सुद्धा चित्रकाराने विचार करावाच :)
--लिखाळ.
24 Sep 2008 - 9:55 am | भडकमकर मास्तर
फोटोच्या विडंबनाची कल्पना मस्त...
पण प्रतिसादाचे विडंबन करायला फोटोग्राफीची माहिती नाही...
नाहीतर रंगसंगती, ऍपर्चर, स्पीड, लेन्स असल्या शब्दांचा मार्मिक गुंता ठोकून दिला असता...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
24 Sep 2008 - 9:57 am | प्रकाश घाटपांडे
जिप्सी जमातीत कॉफी पिउन झाल्यावर तळाशी राहिलेल्या गाळातुन पण भविष्य सांगणारे महाभाग आहेत.
प्रकाश घाटपांडे
24 Sep 2008 - 11:17 am | रामदास
पंतांच्या आत्मचरीत्रात या भविष्य कथनाचा उल्लेख आहे.
त्यांच्या बदलीचे भविष्य त्यात बरोबर सांगीतले असा उल्लेख आहे.
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
24 Sep 2008 - 9:34 pm | लिखाळ
आम्ही इन्स्टंट कॉफि प्यायल्याने त्यात गाळ उरला नाही. उरली ती कॉफिच.. आता आमच्या भविष्यात कप धुणे आहे हे नक्की.
-- (कुडमुड्या ज्योतिषी) लिखाळ.
24 Sep 2008 - 9:40 pm | टग्या (not verified)
> आम्ही इन्स्टंट कॉफि प्यायल्याने...
अरे वा! मग तर इन्स्टंट भविष्य कळेल. ;)
> आता आमच्या भविष्यात कप धुणे आहे हे नक्की.
बघा काय म्हणालो मी? कळलं की नाही लगेचच? ;)
24 Sep 2008 - 10:14 pm | मध्यमवर्गीय
हा कॉफिचा पेला जीवनाचे महत्व आणि त्या अनुषंगाने जीवनात येणारे कडू गोड अनुभव अधोरेखित करतो.
पेल्यातील संपलेला चहा हे जीवनातल्या संपत आलेल्या पळांचे/घटकांचे प्रतिक आहे.
पेल्यात तळाशी राहिलेला चहा हेच दर्शवतो कि अजून काहि क्षण शिल्लक आहेत. (जान अभी बाकि है मेरे दोस्त!!!)
चहा मधील गोडवा हा जीवनातल्या सुखद आणि आनंदि क्षणांचे द्योतक आहे तर चहा पावडरितला कडवट पणा अप्रिय घटना अधोरेखित करतो.
पेल्या बरोबर बशी नाहि म्हणजे जीवनातल्या अंतिम क्षणी जीवनसाथीचा अभाव.
(छे! कंटाळा आला)
24 Sep 2008 - 11:20 pm | लिखाळ
>>पेल्या बरोबर बशी नाहि म्हणजे जीवनातल्या अंतिम क्षणी जीवनसाथीचा अभाव.<<
रसग्रहण आवडले.. तुम्ही रसग्रहण करा आम्ही कॉफी ग्रहण करतो :)
--लिखाळ.
26 Sep 2008 - 7:53 pm | लिखाळ
मंडळी,
आपण या कॉफिच्या कपाकडे पाहिलेत आणि तो आपल्याला आवडला याचा आनंद वाटला :).
खरेतर व्यंगचित्रामध्ये जसे थोडिशी अतिशयोक्त्ती करुन विनोद निर्माण करतात तसाच विनोद 'चित्रे टाकणे' या प्रकावर करायचा हा प्रयत्न होता. आपण सर्व तो खेळीमेळीने घ्याल अशी खात्री होती आणि ती सार्थ ठरली. खेळीमेळीच्या प्रतिसादासाठी सर्वांचे आभार.
-- लिखाळ.
29 Sep 2008 - 12:19 pm | ध्रुव
फोटो तितका काही इंट्रेस्टींग नाहि :)
बाकी फोटो बद्दलची माहिती, फोटो संगणकावर नेल्यानंतर, प्रॉपर्टीस मध्ये कळेल.
--
ध्रुव