॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
15 Jul 2016 - 10:50 pm

॥सांगा तुकारामा : अभंग-१॥

ठेविले अनंते । तैसे कैसे राहू ।
तूच सांग पाहू । तुकोराया ॥१॥

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

आयातुनी माल । शत्रू देशातला ।
माझ्या सृजनाला । बुडविती  ॥३॥

माझ्या निर्यातीची । वाट अडविती ।
जागोजागी भिंती । उभारुनी ॥४॥

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

लबाडीला चांदी । ऐद्यांना अभय ।
आणि हयगय । श्रमिकांची ॥६॥

                        - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१५/०७/२०१६

अभंगअभय-काव्यवाङ्मयशेतीकविता

प्रतिक्रिया

इथे मंबाजीचे । सत्तांध वारस ।
माझे गळी फास । टाकताहे ॥२॥

व्वा सुंदर.

या आयडीने याशिवाय वेगळं लेखन केलेलं मला अजिबात दिसलेलं नाही.

गणामास्तर's picture

16 Jul 2016 - 12:22 am | गणामास्तर

तुमचं बरूबराय पन अमुक इका प्रकारचं लिवू नका आशी बळजोरी करता यित नस्ती सुड्राव.

चांदणे संदीप's picture

16 Jul 2016 - 7:46 am | चांदणे संदीप

अभंग आवडले!
मुटे सर वेल डन, कीप इट अप! :)

Sandy

माहितगार's picture

16 Jul 2016 - 12:54 pm | माहितगार

गोऱ्यांची जनुके? । गोऱ्यांचेच रक्त? ।
त्वचा काळी फक्त? । इंडियाची? ॥५॥

वंशद्वेष ?

गंगाधर मुटे's picture

16 Jul 2016 - 7:50 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!