विश्वास आणि त्या पाठोपाठ येणार्या श्रद्धा सकारात्मक, रचनात्मक मंगलमय असतील आणि त्यात काही अनीष्ट आलेले नाहीना हे पाहून सुधारणाकरुन मार्गक्रमण केले तर काहीच समस्या नाही. बर्याचदा तसे होत नाही. आपलाच विश्वास आपलीच श्रद्द्धा केवळ खरी हा अट्टाहास साध्य करण्यासाठी सोईस्कर तत्वज्ञान उभेकरणे आणि अशा तत्वज्ञानातील तार्कीक उणीवांकडे लक्ष वेधण्यात विलंब झाल्याने भक्त वेगळ्याच दिशेने धावतात कुठे तरी नुकसान होते, कुठेतरी रक्त सांडते कुठे तरी माणसे संपतात आणि मग असे तत्वज्ञान उभे करणार्यांकडे सुजाण लोक दिगमूढ होऊन बघतात की हे कसं झाल आणि पुढे काय ?
सध्या महाराष्ट्रातून प्रसारीत होणार्या तत्वज्ञान चर्चेत आहे. पण हे केवळ महाराष्ट्रात होते असे नाही. केरळासारख्या उच्चसाक्षरता असलेल्या प्रदेशातील मेडीकल प्रोफेशन परेशान आहे. विशेषतः कोझीकोडे आणि मलपूरम या केरळातील दोन जिल्ह्यातून लसीकरण न झाल्याने diphtheria सारख्या आजारांनी दगावलेल्या केसेस पुढे येत आहेत. आजार पसरवणार्या जिवाणू आणि विषाणूंना खच्ची करून लसींच्या माध्यमातून शरीरात असलेल्या पांढर्या रक्तपेशींना लढण्यासाठी पूर्वतयारी करून घेतली म्हणजे जेव्हा आजाराचा हल्ला होतो तेव्हा तुमचे शरीर जिवाणू आणि विषाणूंचा अधिक चांगला मुकाबला करू शकते हा लसीकरणाचा फायदा (यात काही चुकल्यास डॉक्टर लोकांनी दुरुस्ती करावी).
केरळातील कोझीकोडेच्या डॉ. बीना उमेन यांच्याकडे मृत्यूच्या दाढेत पोहोचलेल्या अफझाझची केस आली आणि त्याला वाचवता आले नाही डॉक्टर भावूक झाल्या त्यांना प्रश्न पडला अफझाझच्या मृत्यूचा दोष कुणाचा अफझाज चे लसीकरण न करणार्या पालकांचा की लसीकरण विरोधात चुकीचे मार्गदर्शन आणि खोट्या अफवा पसरवणार्यांचा ? अफझाझच्या मृत्यूचे प्रमाणपत्र बनवणार्या डॉ. महमद नियास यांनी फेसबूकवर पोस्ट टाकली 'त्याच्या कडे पाहताना लसीकरणा विरुद्ध पेटवणार्यांना मी मनातल्या मनात हजारो बोल लावले, आधी मुलाच्या पालकांना बोल लावले पण लक्षात आले ती केवळ त्यांची चूक नाही लसीकरणा विरोधात प्रचार करणार्यांना उघडे पाडण्यासाठी आणि लसीकरणाच्या फायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यामध्ये आपला समाज अयशस्वी ठरला आहे'
वृत्तपत्रीय माध्यमातून केरळातील आरोग्य विषयक ज्या बातम्या पुढे येत आहेत त्या नुसार अफझाज सारख्या अनेक निष्पापांना आज विज्ञानाला लसीकरणाच्या माध्यमातून प्राण वाचवणे शक्य असूनही त्यांच्याच समाजात पसरवलेल्या अफवांमुळे प्राण गमवावे लागत आहेत.
काय अफवा पसरवल्या जात आहेत ? प्राण्यांपासून मिळवलेले विषाणू आणि जिवाणू शरीरात सोडणे इस्लाम मध्ये निषीद्ध आहे (हे सर्वांदेखत नसताना आपापसात सांगितले जात असण्याची शक्यता) , 'मानवाला इश्वर गर्भातच सगळ्या गोष्टी देऊन पाठवतो म्हणुन लसीकरणाची काही गरजच नाही' अशा आशयाच्या त्या शिवाय अजून इतरही अफवा प्रचार विवीध प्रकारे केला जातो आहे. त्यात भर म्हणून केरळातील युनानी आणि निसर्गोपचार करणारे व्यावसायीक लसीकरणाने मूळातली प्रतिकार शक्ती कमी होते मग युनानी आणि निसर्गोपचाराला शरीर साथ देत नाही असा खोटा प्रचार करतात.
गेल्यावर्षी सप्टेंबर महीन्यात अफझाजचे प्रकरण झाल्या नंतर केरळातील मलपूरम जिल्ह्यात सर्वेक्षण केले असता १,७०,००० मुलांचे/मुलींचे लसीकरणच उपरोक्त कारणांनी पालकांनी करुन घेतलेले नाही हे पुढे आले. या अफवांवर श्रद्धा ठेवणार्या श्रद्धावानांच्या अफवांचे निराकरण करणे केरळातील डॉक्टर लोकांसमोरचे आज सगळ्यात मोठे आव्हान ठरत आहे.
मेडीकल तथ्यांमध्ये काही चुकले असल्यास डॉक्टर लोकांनी दुरुस्ती सुचवावी.
प्रतिक्रिया
9 Jul 2016 - 6:00 pm | कंजूस
त्यांना करावेसे वाटत नसेल तर नको करू दे.मेडिकलवाल्यांनी कशाला त्रास करून घ्यायचा?
9 Jul 2016 - 6:34 pm | माहितगार
धागा लेखाचा मुख्य उद्देश श्रद्धावानांचे कुतर्क त्यांच्याच पुढील पिढीच्या भविष्याशी कसे खेळू शकतात या कडे लक्ष वेधणे आहे.
9 Jul 2016 - 6:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी
श्रद्धावान आणि मूर्ख यांमध्ये फरक आहे.
तूम्ही सांगेतलेली लक्षणे मूर्खांची आहेत.
9 Jul 2016 - 6:06 pm | माहितगार
केरळ वॅक्सीनेशन हे गूगल न्यूज मध्ये सर्च करून पहावे. असा प्रचार करणारी आणि पालनकरणारी पब्लिक स्वतःला श्रद्धावान म्हणून विशीष्ट (की अनिष्ट ?) निर्णय घेत असेल तर ?
9 Jul 2016 - 6:25 pm | धनंजय माने
खाली मुंडी... शी पहिल्यांदाच सहमत. श्रद्धा कशावर आणि कुणावर ठेवायची यासाठी सुद्धा अक्कल लागते आणि ती अक्कल वापरायला 'अमुक एका शांतताप्रिय' धर्मात बंदी आहे.
9 Jul 2016 - 7:16 pm | अत्रुप्त आत्मा
टनाटनी मरती धर्माच्या कर्माने,
मग काहीही म्हणोत धनंजय माने! ;)
9 Jul 2016 - 8:09 pm | धनंजय माने
अजून अजून जुळवा ना यमक
बघू किती आहे तुमच्यात धमक ;)
9 Jul 2016 - 9:42 pm | अत्रुप्त आत्मा
=))
जेव्हढे खाल धर्माचे नमक
तेव्हढी वाढेल तुमची कुमक! ;)
9 Jul 2016 - 9:43 pm | अत्रुप्त आत्मा
9 Jul 2016 - 7:15 pm | नगरीनिरंजन
जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा सुरु होते. ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते. ज्यांना उदंड तर्कशक्ती असते ते अश्रद्ध असतात. बाकीचे मध्येच कुठेतरी घुटमळत असतात.
11 Jul 2016 - 10:34 am | गॅरी ट्रुमन
सहमत आहे. न्यूटन आणि अॅडम स्मिथ यांच्यासारख्यांकडे तर्कबुद्धीचा पूर्णच अभाव होता म्हणून त्यांच्याकडे उदंड श्रध्दा होती :)
11 Jul 2016 - 1:02 pm | आनन्दा
तीव्र असहमत. न्यूटनाकडे श्रद्धा होती म्हणून "खाली पडलेले सफरचंद हे देवाच्या दयेने खाली पडले आहे असे म्हणून गप्प बसला नाही". खरे तर डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांमधला फरक दाखवायला हे सुंदर उदाहरण आहे.
11 Jul 2016 - 1:03 pm | आनन्दा
हा टायपो आहे. नाहीतर मला माईसाहेबांच्या पंगतीत नेऊन बसवाल म्हणून सांगितले. न्यूटनाकडे असे म्हणायची आपली लायकी नाही.
11 Jul 2016 - 4:15 pm | टवाळ कार्टा
इथे मिपावरच कोणीतरी न्युटनचे नियम चूक असू शकतात असे म्हणालेले...मिपाकरांना कमी समजू नका ;)
11 Jul 2016 - 4:28 pm | माहितगार
:):)
11 Jul 2016 - 5:22 pm | गॅरी ट्रुमन
तुमच्या तीव्र असहमतीस अतीतीव्र असहमती. तुम्ही गल्ली चुकत आहात साहेब.
मी ज्या प्रतिसादाला उत्तर दिले होते त्यातील वाक्य आहे: "जिथे तर्क संपतो तिथे श्रद्धा सुरु होते. ज्यांना तर्कबुद्धी खूपच कमी असते त्यांना उदंड श्रद्धा असते." म्हणजे उदंड श्रध्दा असायला तर्कबुद्धी कमी असणे गरजेचे आहे असा म्हणायचा अर्थ झाला नाही का? बरं नुसते एवढ्या एका वाक्यावरून असा निष्कर्ष काढता येणार नाही असे म्हणाल तर त्यापुढचेच वाक्य--"ज्यांना उदंड तर्कशक्ती असते ते अश्रद्ध असतात."
म्हणजेच वरील प्रतिसादात तर्कशक्ती आणि सश्रद्ध असणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत असा काहीसा सूर निघत आहे. न्यूटनच्या मते हे विश्व देवाने बनविले तर आहेच पण त्याबरोबरच देवाचे या विश्वात वर्चस्व चालते आणि या विश्वात देवाची "Propensity to action" असते. म्हणजे न्यूटनला नक्की काय म्हणावे? सश्रध्द की अश्रध्द?
जर का सश्रध्द म्हटले तर वरील प्रतिसादाप्रमाणे त्याला तर्कबुद्धी कमी असायला हवी. बट अलास... तसे काही नव्हते हे अगदीच सर्वमान्य आहे.
11 Jul 2016 - 6:12 pm | आनन्दा
ते पुढचे वाक्य वाचले नव्हते. माझी तीव्र असहमती मागे घेऊन सहमती पुढे करत आहे.
11 Jul 2016 - 6:15 pm | गॅरी ट्रुमन
:)
9 Jul 2016 - 8:22 pm | कंजूस
*
डॅाक्टर कधीकधी रुग्णास सांगतात अंडी खा तरी शाकाहारी लोक ती खात नाहीत.असाच हा एक प्रकार धरा आणि सोडून द्या.
11 Jul 2016 - 1:00 pm | आनन्दा
वडाची साल पिंपळाला?
11 Jul 2016 - 3:43 pm | मराठी कथालेखक
अंडी न खाणं जीवावर बेतणार असतं का ?
11 Jul 2016 - 5:14 pm | गामा पैलवान
नगरीनिरंजन,
तुम्हाला आनन्दा यांचं डोळस श्रद्धा आणि अंधश्रद्धा हे विभाजन मान्य आहे का?
आ.न.,
-गा.पै.
11 Jul 2016 - 10:27 pm | पैसा
संजय गांधी पाहिजे होता. त्याना म्हणावे स्वतःच्या पोरांना खड्ड्यात नेऊन मारा पाहिजे तर, पण असले प्रताप नकोत. उद्या एखाद्या पोराला लस न दिल्यामुळे आजार होऊन ते मेलं तर हेच लोक उपचार करणार्या डॉक्टरच्या नावाने शिमगा करतील.
11 Jul 2016 - 11:03 pm | बोका-ए-आझम
संजय गांधी असता तर काय झालं असतं?
11 Jul 2016 - 11:26 pm | पैसा
विकि वरून चोप्य पस्ते.
काही लोकांना सुधारायला अशी झोंडशाहीच लागते. मुलांच्या जिवाशी प्रश्न आहे तेव्हा सक्तीच हवी.
11 Jul 2016 - 11:54 pm | पैसा
मी वर थोडे अवांतर केले आहे त्याबद्दल माफी असावी. पण लहान मुलांच्या जिवाशी खेळ होत आहे हे बघून भयंकर संताप आला. तुमच्या मूळ मुद्द्याबाबत बोलायचे तर विश्वास, श्रद्धा, अंधश्रद्धा हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत का इथून सुरूवात होईल. त्याच्या व्याख्या कोणीतरी करतीलच.
त्या मूर्ख लोकांचे हे सगळे वागणे त्यांची विचारशक्ती सक्तीने झोपवली आहे याचे लक्षण आहे. कोण्या देवाच्या नावाचे दुकान घालणार्यांची चलाखी. पण त्या दुकानदारांचे ऐकून तसे वागणार्या लोकांना ते समजावणे फार कठीण आहे. तिथे कायदा किंवा सरकार यांच्यासारखा मोठा दादाच पाहिजे. मुलाला लस दिली नाही तर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न वगैरे दोन चार मोठमोठ्या कलमांखाली दंड ठेवला पाहिजे. तरच ते वठणीवर येतील. गेल्या काही वर्षात हे धर्मवेड सगळीकडेच, सगळ्याच समुदायात वाढत्या प्रमाणात दिसत आहे. नुसते वाचून हळहळण्यापलिकडे आपल्या हातात काही नाही.
12 Jul 2016 - 9:05 am | माहितगार
संताप वाटणे सहाजिकच आहे, धर्मांधता खरेतर शेखचिल्ली सारखी असते, त्यांच्या त्यांच्या आप्तस्वकीयांचेच अधिक नुकसान करुन घेतात. इतर धर्मीयात याची अंशतःतरी जाणीव असते जी त्यांच्यात अद्याप नाही. त्यांच्यात सख्ख्या चुलत बहीण भावांच्या विवाहांचे मोठे प्रमाण असल्यामुळे बर्या पैकी प्रमाणात नवजात मुले जेनेटीक डिफेक्टस घेऊन जन्मत असणारं. त्यांच्यातील भारतातील एक अल्ट्रा मायनॉरीटी सर्व लहानमुलींना खतना सारख्या बेक्कार प्रथेद्वारे.. काय म्हणावे प्रश्न पडतो. व्यक्ति स्वांतत्र्य न जपणार्या कायद्यांना पर्सनल लॉ म्हणून मिरवतात इतर धर्मांचे नाव पुढे करून स्वधर्मीय स्त्रीयांवरच अन्याय करतात,
आमेरीकनांना बांग्लादेशातून तेल किंवा इतर काहीही नैसर्गीक साधन संपत्ती मिळत नाही, आमेरीकेने तयार कपड्यांच्या आयातीत विशेष कोटा देऊन बांग्लादेशची आर्थीक स्थिती सुधारली निर्यातीत मदत करणार्यांच्या जिवावर उठण्याची विपरीत बुद्धी त्यांना त्यांची धर्मांधता देत आहे.
कमाल असते अशा धार्मिक शेखचिल्लींची.