तो नुसता ह्ंसायचा

तिमा's picture
तिमा in जे न देखे रवी...
9 Jun 2016 - 3:32 pm

तो नुसता हंसायचा, फारफार तर खुणा करायचा

तसा कधीचाच येऊन बसला होता,माझ्या साठीनंतर

पण, त्याला घाई नव्हती ,कसली मायाही नव्हती

लहानपणी,तरुणपणीही, कधी दिसला होता

पण तेंव्हा मधेच लुप्त झाला होता

बासष्ठीला हॉस्पिटलातही उशाशीच होता, स्तब्ध पहात होता

मी विचारलं तर ,अजून वेळ आहे म्हणून खुणावत होता

पंचाहत्तरी करायची का बाबा, मुलगा विचारत होता

हा मागे मिष्किलपणे डोळे मिचकावत होता

ऐंशीनंतर जरा धुरकट दिसू लागले होते

तरी हा स्वच्छ दिसत होता

कालांतराने ही गेली तेंव्हा दोन दिवस गायब होता

सगळे पाहुणे गेले आणि पुन्हा दिसू लागला होता

नव्वदी गांठल्यावर सगळे शतायुषीचा आग्रह करत होते

तेंव्हाही तो शांतपणे हंसत होता

न्हाणीघरांत तोल गेला आणि सभोवतालचे धूसर झाले

तेंव्हा फक्त्, सेचुरी नशिबांत नाही

असे अस्पष्ट पुटपुटला होता

मुक्त कवितामुक्तक

प्रतिक्रिया

मारवा's picture

9 Jun 2016 - 5:07 pm | मारवा

आवडली.
मस्तच.

पद्मावति's picture

9 Jun 2016 - 5:39 pm | पद्मावति

सुरेख!

वा. मृत्यूलाच मित्र बनवलंय. फार छान!

खटपट्या's picture

9 Jun 2016 - 8:45 pm | खटपट्या

खूप छान.

पाषाणभेद's picture

9 Jun 2016 - 10:03 pm | पाषाणभेद

शेवटची कलाटणी छान
(पण मग कविता कशी लिहीली?)

शलभ's picture

9 Jun 2016 - 11:15 pm | शलभ

छान

तो नुसता हंसायचा, फारफार तर खुणा करायचा

मला वाटलेलं पांडू असेल रात्रीस खेळ चाले चा ;)

रमेश भिडे's picture

9 Jun 2016 - 11:41 pm | रमेश भिडे

ये म्हटलं तरी येतो, नको म्हटलं तरी येतो!

अत्रुप्त आत्मा's picture

10 Jun 2016 - 12:13 am | अत्रुप्त आत्मा

आवडली.

तिमाजीपंत, आवडलं बर का काव्य.
मस्तय एकदम.

आतिवास's picture

10 Jun 2016 - 7:55 am | आतिवास

अवांतर - हंसायचा ऐवजी हसायचा असा शब्द हवा असं वाटतं.

नाखु's picture

10 Jun 2016 - 8:13 am | नाखु

कवीता... मित्रायन आवडले.

सुपातला नाखु

स्पा's picture

10 Jun 2016 - 8:20 am | स्पा

ह ह ह अण्णा ईलय

देशपांडे विनायक's picture

10 Jun 2016 - 9:21 am | देशपांडे विनायक

छान !
'' सेचुरी नशिबांत नाही '' हे सांगण्याचा अधिकार त्यालाच तर आहे

जव्हेरगंज's picture

10 Jun 2016 - 9:36 pm | जव्हेरगंज

क्या बात!

पैसा's picture

10 Jun 2016 - 9:45 pm | पैसा

खूप छान लिहिलंय.

एक एकटा एकटाच's picture

10 Jun 2016 - 11:55 pm | एक एकटा एकटाच

जबरी

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Jun 2016 - 7:16 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !

तिमा's picture

11 Jun 2016 - 9:31 am | तिमा

सर्व वाचकांचे व प्रतिसादकांचे आभार.

वपाडाव's picture

13 Jun 2016 - 5:08 pm | वपाडाव

हे हे हे... जबरा