सरफरोशी की तमन्ना

अनिरुद्धशेटे's picture
अनिरुद्धशेटे in जे न देखे रवी...
20 Sep 2008 - 6:19 pm

सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल मे है,
देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है !

करता नही दुसरा, कुच बातचीत,
देखता हु मै जिसे वो तेरी मेहफिल मे है !

ए शहिदे मुल्के-मिल्लत मै तेरे उपर निसार,
अब तेरी हिम्मत का चर्चा, गैर की मेहफिल मे है !

वक्त आने पे बता देन्गे, तुझे ए आसमा,
हम अभीसे क्या बताए, क्या हमारे दिल मे है !

खीन्चकर लाइ है सबको, कत्ल होने की उम्मीद,
आशिको का दम, घुटते हुए कातिल मे है !
देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है

सरफरोशी की तमन्ना, अब हमारे दिल मे है,
देखना है जोर कितना, बाजुए कातिल मे है !

मुळ कवी >शहीद अशफाक्-उल्ला-खान

इतिहासविचार

प्रतिक्रिया

फटू's picture

21 Sep 2008 - 9:42 am | फटू

कवितेच्या नावावरून या "सरफरोशी की तमन्ना" या अजरामर काव्याचं मराठी रुप पाहायला मिळेल असं वाटलं होतं...

असो... एक वेडावाकडा प्रयत्न आम्ही करुन पाहीला...

हुतात्मा व्हायची ईच्छा तशी आमच्या नसानसात आहे
पाहायचं आहे आम्हालाही, किती जोर त्यांच्या दंडात आहे

का न बोले दुसरा, शब्द न येती ओठी तयाच्या,
पाहतो तयास आम्ही, तुझ्या मैफीलीतही तो अबोल आहे

अर्पण करतो स्वत:स तुला, झालास राष्ट्रासाठी अमर तू
तुझ्या धैर्याची चर्चा आता शत्रुच्या गोटातही होत आहे

ऐक तूही निळ्या आभाळा, वेळ आल्यावर दाखवू आम्ही
आताच कशास बोलू, काय आमच्या मनात खदखदत आहे

आणले खेचून सार्‍यांस, आयुष्यास संपवण्याच्या ईच्छेने
पाहून देशप्रेम आमचं, भरली धडकी शत्रुच्या उरात आहे
पाहायचं आहे आम्हालाही, किती जोर त्यांच्या दंडात आहे

हुतात्मा व्हायची ईच्छा तशी आमच्या नसानसात आहे
पाहायचं आहे आम्हालाही, किती जोर त्यांच्या दंडात आहे

(मायभूमीपुढे नतमस्तक),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अनिरुद्ध,

पूर्ण कवीता इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
मात्र एक शंका आहे - कवी कोण? मला तरी कवी हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल वाटतात.

हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल, हुतात्मा अशफाक उल्लाह खान, हुतात्मा ठाकूर रोशनसिंह, हुतात्मा राजेंद्र लाहिडी हे सगळे काकोरी कटातले अभियुक्त - सगळे एकाच दिवशी म्हणजे १९ डिसेंबर १९२७ फासावर गेले व अजरामर झाले.

याच कटातील आणखी एक अभियुक्त हुतात्मा प्रमोद रंजन चौधरी या सर्वांच्या खूप आधी म्हणजे २६ सप्टेंबर १९२६ रोजी अलिपूर तुरुंगात फाशी गेले होते.

या सर्वांच्या स्मृतिस सादर प्रणाम!

साक्षी

शिशिर's picture

21 Sep 2008 - 5:23 pm | शिशिर

मला ही तीच शंका आहे. ह्या कविते चे कवि राम प्रसाद बिस्मिल आहेत.