- परंतू नियतीच्या मनात मात्र एक वेगळाच डाव ठरलेला होता
अलकाचे लग्न जुळत नव्हते, तिच्या वडिलांनी ब-याच ठिकाणी बोलणी करुन पाहिली होती, परंतू सगळीकडे नकारघंटाच ऐकू येत होती. अलकाचे दिसणे वागणे खूपच चांगले होते, परंतू का कोणास ठाऊक सर्व लोक कृष्णाला खूृृप घाबरत असायचे. कृष्णााला मात्र या गोष्टीचा थांगपत्ता नव्हता, तो आपल्या बहिणीसाठी वणवण फिरत असायचा.
कृष्णाच्या वडिलांचा कृष्णापेक्षा त्याच्या सावत्र भावावर सावजीवर खूपच जीव होता.आपल्या संपत्तीमधील अर्ध्याहून अधिक हिस्सा त्यांनी त्याच्यासाठी राखून ठेवला होता, परंतू कृष्णाला मात्र एवढी मरेस्तोवर मेहनत करुन काहिही मिळू दिले नव्हते.कृष्णाला या गोष्टीचे काहीच सोयरसुतक नव्हते. लहानपणी आई देवाघरी गेल्यावर वडिलांनीच त्याचा सांभाळ केला होता, परंतू ते कृष्णाला सारखे हिडिस पिडीस करत असायचे.
देव कृष्णाची परिक्षा पाहत होता, परंतू अखेरीस एके दिवशी त्याला अलकासाठी मनाजोगे स्थळ मिळाले. सर्व काही व्यवस्थित होते, प्रथमतः कृष्णाची पसंती म्हणून त्याच्या वडिलांनी नाक मुरडले होते, परंतू नंतर मुलीच्या सुखासाठी त्यांनी लग्नाला होकार दिला. सर्व ठिक होते, आणी ऐन मुहूर्तावरच नव-याकडच्या मंडळींना कृष्णााची असलियत समजली आणी त्यांनी भर मांडवातच लग्न मोडून टाकले. सर्व लोकांच्या देखत कृष्णाच्या वडिलांचा फेटा लाथेने उडवला गेला, परंतू कृष्णा मात्र षंढपणे होणारा हा अपमान पाहत होता.
(क्रमश-)
प्रतिक्रिया
20 May 2016 - 6:11 pm | मराठी कथालेखक
पंधरा दिवसांनी दूसरा भाग.. आणि तो हि इतका लहान...
गरीब मिपाकरांवर अन्याय करताय :)