ध्वनी अनुदिनी पुष्प - 1 - मुंबई ग्राहक पंचायत - ओळख - श्री अशोक रावत
ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था - श्री. कमलाकर पेंडसे
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार,
आज आपल्या समोर सादर आहे या ध्वनी अनुदिनीचे (Audio Blog) तिसरे पुष्प.
या भागात आपण तक्रार मार्गदर्शनाची माहिती घेणार आहोत. तक्रार केव्हा, कशी, कोठे करावी, त्याचा पाठपुरावा कसा करावा याचे योग्य विवेचन श्री. विवेक पत्की यांनी या संभाषणात केले आहे.
खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन आपल्याला ही माहिती ऐकता येईल.
तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की
(वरील लिंक ही साउंडक्लाऊड या संकेत स्थळाकडे जाते. पुर्वीप्रमाणे येथे ऑडिओ फाईल अंतर्भूत करता येत नसल्याने लिंक दिलेली आहे)
आपल्याला सदर फाईल खाली दिलेल्या लिंकवर टिचकी मारुन सदर फाईल डाऊनलोड करुन आपल्या मोबाईल, संगणक, पेन ड्राईव्ह ने टिव्हीवर अशा विविध पध्दतीने ऐकता येईल.
ध्वनी अनुदिनी - पुष्प 3 - तक्रार मार्गदर्शन - श्री. विवेक पत्की
सदर डाऊनलोड केलेली फाईल मुंबई ग्राहक पंचायतीच्या पूर्वपरवानगी शिवाय त्यातील माहिती बदलता, एकत्र करता, तसेच व्यावसायिक कामासाठी वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी.
सदर फाईल ही mp3 या स्वरुपातील असून 14 मिनिटे 02 सेकंदाची व 12.8 MB आकाराची आहे.
आपल्या प्रतिक्रीया/सूचना यांचे स्वागत आहे.
धन्यवाद.
अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
जाता-जाता: दादर (पश्चिम), मुंबई येथील गेल्या दोन वर्षापासून बंद असलेले मुंबई ग्राहक पंचायतीचे तक्रार मार्गदर्शन केंद्र 8 मार्च 2016 पासुन पुन्हा सुरु झालेले आहे. सदर मार्गदर्शन केंद्राचा पत्ता व कामकाजाच्या वेळा - ग्राहक तितुका मेळवावा या मुंबई ग्राहक पंचायतीच्या मुखपत्रात नमूद केलेल्या आहेत.
सदर ध्वनी अनुदिनी मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
प्रतिक्रिया
11 May 2016 - 11:00 pm | मारवा
फक्त एक सुचवणी करावीशी वाटते बघा तुम्हाला पटल तर
कवितावाचनाचे रेसीटेशनचे काही भाग टाकले तर आनंद होइल.
13 May 2016 - 6:46 am | सस्नेह
गल्ली चुकलं की वो !
13 May 2016 - 6:49 am | सस्नेह
धन्यवाद.
आपले कार्यक्षेत्र फक्त पुणे मुंबई आहे असं दिसतं.
इतर महाराष्ट्रासाठी ग्राहक पं आहे का ? असल्यास लिंक द्या.
13 May 2016 - 9:26 am | पुणे मुंग्रापं
स्वयंसेवी संस्था असल्याने कार्यक्षेत्र कार्यकर्ते आहेत तेथे म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई, पुणे, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा काही भाग अशा ठिकाणी कार्यकर्ते काम करतात. अन्य जिल्ह्यातून असे काम करण्यासाठी कार्यकर्ते उभे राहिल्यास मुंबई ग्राहक पंचायत तेथेही कार्यरत होईल.