आयुष्यात पहिल्यांदा कुठल्या चित्रपटाची गाणी मी तो पहायच्या आधी एवढी ऐकली असतील.. असो.. याचे श्रेय प्रमोशनकारांना देण्यात येते...
खरं तर ती अती वापरलेली गावाकडची भाषा trailor मध्ये समजली.... आणि मी picture न बघण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं...
सोमवारी अचानक box office चे विक्रम मोडलेले idiot box ने दाखवले आणि मराठी बाणा जागवत म्हटलं वीकेंड ची वाट न पाहता बघूनच यावा.. मंगळवार शोधला...
तसं पाहिला तर कथा काही नवीन नाही... पण च्या मारी अर्ची खूप भाव खावून गेली राव... नुकतीच नववी पास झाल्याचं समजलं... पण कॅमेरा समोर एक क्षण म्हणून वाटलं नाही कि हा तिचा पाहिला picture आहे असं... खरच भावली...
परश्या पण तेवढाच छान वावरलाय कॅमेरा समोर( तो दिसायलाच फार आवडला.. त्याने होडीतून मारलेली उडी तर..आय हाय ....) नागेशचं दिगदर्शन छानच..त्याची स्वताच्याच movie मध्ये थोड्या साठी का होईना acting करण्याची सुभाष घई स्टाईल आवडली... पक्षांचे उडणारे थवे तर अप्रतिम...
अर्थात मी इथे गाण्यांबद्दल बोलतच नाहीये... अजय अतुल ला प्रणाम!!! Zingat च्या तालावर ठाणेकरांनी theatre मध्ये न नाचण्याचा सभ्य पणा मात्र तेवढा दाखवला... बिना संगीताचा शेवट आणि निशब्द प्रेक्षक यांनी त्या निस्सीम शांततेत भर घातली.....
एकूणच काय तर आवडला...
प्रतिक्रिया
5 May 2016 - 12:35 pm | चौथा कोनाडा
छान नजर आहे तुमची !
5 May 2016 - 1:28 pm | यमगर्निकर
मी हि हा चित्रपट कालच कोल्हापुरात पाहिला, मस्तच आहे फक्त शेवट्ची २ मिनटे सोडली तर....., चित्रपटाच्या सुरवाती पासुन मध्यंतरापर्यंत खुप धमाल आहे, बर्याच अस्सल गावरानबाजाच्या डायलोगवर प्रेक्शक फुल टु कल्ला करतात, आणि झिंगात गाण्याच्या वेळि तर प्रेक्शकांनि संपुर्ण थियेटरच डोक्यावर घेतले, मध्यंतरापर्यंत अशीच धमाल चालु होति पण मध्यंतरानंतर कथा पुर्णपने वेगळ्या वळनावर येते, इथे पार्श्वसंगिताचा वापर अगदि आभावानेच केला आहे आणि शेवट तर डोकं सुन्न करुन गेला ( असा शेवट बघुन आमच्या माघील ओळितिल एका काकूंना भोवळ आली ) काहि वेळापुर्वी झिंगाट गाण्यावर थियेटर डोक्यावर घेणारे आम्हि प्रेक्शक सुन्न डोक्याने बाहेर पडलो