वैधानिक इशारा : वरील कवितेतील पात्रांचे विचार्/दृष्टीकोन सर्वस्वी कवीचे आहेत.सदर घटना सत्य आहे का काल्पनिक ह्याबाबतीत कवी मौन बाळगत आहे.
------------------------------------------
गोव्याच्या त्या तत्सम एक्झॉटीक बीच वर
उघडाबंब मी..
शार्कच्या नजरेप्रमाणे..
कपड्यांना चिकटलेली..
नितळ शरीरे पाहण्यात बिझी असताना...
"अहो जास्त पुढे जाऊ नका.
तुम्हाला साडेचार फुटात पोहायची सवय आहे..."
असा डायरेक्ट
आत्म्याशीच संवाद साधणारा
आवाज येतो...!
ती तूच असतेस.
समुद्राच्या पाण्यात तू
अलगद
अंदाज घेत उतरतेस....
एक एक पाऊल
पुढे टाकत..!
अन पावलागणिक
ओले होणारे
तुझे अंग पाहत...
मी स्तब्ध राह्तो...!
अन मग हळुहळू तू ही
त्या नितळ अंगांसारखीच
एक ओलेती अप्सरा बनुन..
माझ्याजवळ येऊन..
अंगाला खेटुन....
त्या दुसर्या नितळ अंगाकडे पाहत..
मिशिकलपणे म्हणतेस...
वा अगदी मरमेड वाटती आहे ना..
दिल खुश हो गया..!
मी नकळतपणे हो म्ह्णतो...!
तिचा बॉयफ्रेंड पाहीलात का?
अन मग माझे लक्ष जाते..
एक दणकट सांड
लाटेसोबत
तिला कवेत घ्यायचा
ट्राय मारत असतो..
अन मग तू म्हणतेस..
मेड फॉर इच आदर कपल..
डिट्टो आपल्यासारखेच..
हँडसम आहे ना तो ही...?
हे ऐकुन मी माझे नुकतेच
सुटु लागलेले पोट
मुद्दामुन
आत घ्यायचा प्रयत्न करतो
अन तेव्हाच एक लाट
मुद्दामुन..
टपली मारल्यागत येते
आणि तुला
अलगद
माझ्या
बाहुपाशात आणुन सोडते.
एरवी घरंदाजपणा जपणारी तू
तिथे
अलगद
माझ्या
मिठीत निथळतेस..
मला समजते.....
मिठीत घ्यायला अवघड असते..
पण मिठित जायला सोपे असते..
(हँडसम हंक ट्राय मारतोय..)
तेव्हा तू मला समुद्राच्या निळाईगत फार फार आवडतेस..
लाट किनार्याच्या बाहुपाशात हसत हसत विरल्याचा मला भास होतो..!
.
.
.
.
.
(नंतर तू आणि ते नितळ अंग किनार्यावर उन्हात एकत्र केस वाळ्वत असताना
मैत्रिणीप्रमाणे काय बोलत असता देव जाणे..)
(तो हँडसम हंक आणि मी तेव्हा चड्डीत घुसलेली वाळु कशी साफ करायची याचा विचार करत असतो..)
- कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
30 Apr 2016 - 1:44 pm | वैभव जाधव
पहिल्या दोन इतकी सहज नाही वाटली. स्वारी!
तसंही वाचकांचा विचार करुन समोर आलेलं साहित्य कृत्रिम वाटतं.
30 Apr 2016 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पहिल्या दोन कविता अगदी सहज आलेल्या होत्या समुद्र लाटेसारख्या... आता कृत्रिम लाटा वाटल्या.
-दिलीप बिरुटे
-दिलीप बिरुटे
30 Apr 2016 - 9:18 pm | कानडाऊ योगेशु
वैभव आणि प्रा.डॉ. तुम्ही दखल घेताहात तेच मुळात माझ्यासाठी महत्वाचे आहे.
बाकी आवडणे नावडणे चालतच राहील.!
30 Apr 2016 - 6:12 pm | बाबा योगीराज
मला तर तिन्ही भाग आवडले.
मस्त हलकं फुलक लिखाण.
प्राडॉ आणि वैजा यांचं म्हणणं पण जरा पटतंय पण, अजून गोआ डोक्यातून उतरलं नाहीये. म्हणून मला तर हा हि भाग आवडला.
30 Apr 2016 - 6:32 pm | टवाळ कार्टा
खि खि खि...मस्त जमलीये
फक्त
एरवी घरंदाजपणा जपणारी तू
तिथे
अलगद
माझ्या
मिठीत निथळतेस..
हा भाग खटकला...
30 Apr 2016 - 6:53 pm | चांदणे संदीप
मला आधी सांगा, तुमचा वाडा वैग्रे आहे क्काय? ;)
Sandy
30 Apr 2016 - 8:13 pm | विजय पुरोहित
अगागा...
योगेशराव लैच पेटल्येत...
पण मस्तच...
अगदी हाॅट हाॅट हाॅट...
30 Apr 2016 - 8:24 pm | जव्हेरगंज
शेवटच्या दोन कंसांची गरज नव्हती हो कानडाऊ. उगाच ओढून ताणलेली वाटली.
बाकी हॉट!
30 Apr 2016 - 9:30 pm | कानडाऊ योगेशु
@प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.
@ट.का.
@चांदणे संदीप
येस घरंदाज शब्द आला कि कसा चौसोपी वाडा..मिशा पिळणारा कुणी पाटील व मग ठशठशीत कुंकु लावलेली कारभारीण असाच गोतावळा डोळ्यासमोर येतो.
घरंदाजपणा बद्दल्ची एक फिट्ट प्रतिमा डोक्यात बसली आहे आपल्या.
बहुदा जयश्री गडकर ,आश काळे टाईप फिल्ममुळे.
पण लिहिताना जसा शब्द सुचला तसा लिहिला.
आणि तसेही पाटलाने आणि पाटलीणीने गोव्याच्या समुद्रात बीचवर थोडे लगट केले तर त्यात वावगे काय? :) (ह.घ्या)
@जव्हेरगंज
खरेतर "काय बोलत असता देवजाणे" हे पालुपद पहिल्या दोन कवितेतही होते पण नंतर काढुन टाकले. इथे तसेच राहीले.
30 Apr 2016 - 10:26 pm | टवाळ कार्टा
आपली घरंदाजपणाची व्याख्या आपणच बदलायला हवी ओ...नैतर वरच्या व्याख्येत बाबा आमटेसुध्धा नै बसत
1 May 2016 - 12:13 pm | कानडाऊ योगेशु
माझीही ती व्याख्या नैचहैना मुळी.
बकी वाघाबरोबर नदीत उतरणार्या डॉ.प्रकाश आमटेंना पाहुन त्यांना घरंदाज जाऊ दे शेरंदाज माणुस म्हणावे वाटते.!
1 May 2016 - 12:19 pm | टवाळ कार्टा
आमटे घराण्याबद्दल काही बोलणारे आपण कोण हो?
30 Apr 2016 - 10:38 pm | खटपट्या
बर्या आहेत कविथा...
30 Apr 2016 - 10:41 pm | वैभव जाधव
आण्णा, कुठे साऊथइंडिअन style मध्ये घुसलात?
कविथा नका म्हणू ओ. नमिथा आठवते.
1 May 2016 - 10:12 am | रातराणी
आवडली!!
10 May 2016 - 5:36 pm | पथिक
आवडली.