मन

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
19 Sep 2008 - 11:23 am

सुविचारांचे मार्ग सोडूनी
अगतिक झालो, बोलबोललो
अर्थ सोडला मग शब्दांनी
शब्द नव्हे 'ते मन अज्ञानी'

न जाणता बोलून गेलो
पश्चातापी जळू लागलो
कां बोललो? ऐसे झाले
मनामधे मग विचार आले

कोठून झाली बुध्दी ऐसी ?
क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ?
कां जाहलो वेडे आपण ?
कां विसरूनी गेलो माझे 'मी पण '?

पण हे . . . .
असेच घडायचे होते
दैवाचे फासे उलटे
जीवनाच्या वाटेवरती
अ र्ध्यात हरवले नाते.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

19 Sep 2008 - 11:37 am | मदनबाण

मस्त मुक्तक.. :)

मदनबाण>>>>>

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

राघव's picture

19 Sep 2008 - 11:42 am | राघव

छान लिहिलंय. अर्थात् मुक्तक म्हणणे जिवावर येतंय. मी आपला या रचनेस कविताच म्हणतो.


कोठून झाली बुध्दी ऐसी ?
क्षणोक्षणी कां फिरे अशी ती ?

हे विशेष.

मुमुक्षु

दत्ता काळे's picture

19 Sep 2008 - 11:48 am | दत्ता काळे

मुमुक्षु

टिचकी मारताना काहीतरी घोळ झाला, असो.

एक विनंती
तुम्ही मला एकेरीनेच संबोधा.