तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास २

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
27 Apr 2016 - 12:52 pm

..
..
रात्रीच्या रेल्वे प्रवासात
नेहेमीसारखेच
तु लोअर बर्थवर व मी मिडल बर्थवर पडतो..
झोपायच्या आधी मी पुन्हा
समोरच्या साईडबर्थवर पहुडलेले
सुंदर प्रकरण
किलकिल्या डोळ्यांनी
बोगीच्या सरकारी मंद प्रकाशात..
न्याहाळण्याचा
प्रयत्न करत असतो..
थोडा वेळ जातो आणि अचानक
कबरीतुन एखादा खूनी हात वर यावा तसा... (आभार रामसे बंधु)
तुझा हात येतो..
अन पाठोपाठ तुझा आवाज...
..अहो... झोपलात का?
...नाही?
...हात द्या हातात...!
हे नेहेमीचेच असते!
मी ही हातात हात देतो..
माझ्या बोटांशी लडिवाळपणे तू खेळत राहतेस..
थोडा वेळ जातो अन समजते..
मी तुझ्या प्रत्येक बोटांचे हलकेच चुंबन घेतो...
मग तू हात खाली घेत म्हणतेस..
झोपा आता निवांत..आंणि सांभाळून..
नाहीतर खाली पडाल..!
समोरचे सुंदर प्रकरण
किंचित हसल्यासारखे वाटते.....
बर्रर्रर्र ..माझ्या फोनवर मेसेज येतो..
..ती झोपली...आता झोपा तुम्हीसुध्दा...!
तेव्हाच इंजिनची शिटी वाजते...
अन रेल्वेच्या खडखडात मला
गडगडाटाचा भास होतो..
मला तिथे तेव्हा तू खरोखरच
एखाद्या पल्लेदार प्रवासासारखी
खूप खूप आवडतेस....!

- कानडाऊ योगेशु

(टू बी कंटीन्युड....)
तेव्हा मला तू फार फार आवडतेस...प्रवास १!

कविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

जेपी's picture

27 Apr 2016 - 12:57 pm | जेपी

=))
आवडल..

अभ्या..'s picture

27 Apr 2016 - 12:57 pm | अभ्या..

अरे वा. मस्त हे पण.
आमच्या चौराकाकांचा बांगडीवाल्या हातात दोरी असलेला पोपट आठवला. ;)

नाखु's picture

27 Apr 2016 - 1:03 pm | नाखु

आता आगीन गाडीत पण ?
तरी अजून बोट-बैलगाडी-चारचाकी-रिक्षा-दुचाकी-सायकल राहिले आहेत.

याची नोंद घेणे.

स्वगतः जबरा लिहितोय हा योग्या.

चांदणे संदीप's picture

27 Apr 2016 - 1:14 pm | चांदणे संदीप

अवघडे!

अवघडल्यासारख होतंय आता...! ;)

Sandy

वैभव जाधव's picture

27 Apr 2016 - 1:20 pm | वैभव जाधव

थोडक्यात 'पब्लिक डिस्प्ले ऑफ अफेक्शन' आवडते म्हणा की....!

वपाडाव's picture

27 Apr 2016 - 2:00 pm | वपाडाव

Vice-versa कधी घेउन येणार?

झेन's picture

27 Apr 2016 - 5:25 pm | झेन

मन वढाय वढाय
उभया पिकाताल ढोर
किती हाकल हाकलं
फ़िरि येत पिकाव

असं बाहिणाबाईंनी नेमक्या शब्दात सांगितल आहे.ते प्लेन, ट्रेन आणि बोट मधे पण लागू आहे.

कानडाऊ योगेशु's picture

27 Apr 2016 - 6:22 pm | कानडाऊ योगेशु

धन्यवाद मंडळी.

जव्हेरगंज's picture

27 Apr 2016 - 7:54 pm | जव्हेरगंज

लय भारी !

एक एकटा एकटाच's picture

27 Apr 2016 - 9:22 pm | एक एकटा एकटाच

हे
सहिय यार..........

रातराणी's picture

27 Apr 2016 - 10:54 pm | रातराणी

जरा मसाला कमी पडला का यात!?

वीणा३'s picture

28 Apr 2016 - 1:47 am | वीणा३

आवडलं

बोका-ए-आझम's picture

28 Apr 2016 - 8:45 am | बोका-ए-आझम

.

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2016 - 9:43 am | प्रमोद देर्देकर

आवडंलं हे पण आणि या आधीचे पण.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2016 - 10:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच आवडलं !

-दिलीप बिरुटे
(सहप्रवासी)

कानडाऊ योगेशु's picture

28 Apr 2016 - 11:36 am | कानडाऊ योगेशु

-दिलीप बिरुटे
(सहप्रवासी)

आज मला "जिस स्कूल मे तुम पढते हो उस स्कूल के हम हेडमास्टर है!" हा डायलॉग खर्या अर्थाने समजला. ;)