देशोदेशीची वाद्ये: पोलँड

विजय पुरोहित's picture
विजय पुरोहित in जनातलं, मनातलं
9 Apr 2016 - 1:58 pm

पोलॅंड किंवा पोलॅंडचे गणराज्य हा मध्य युरोपातील आकारमानाने एक मोठा देश. युरोपात आकाराने 9वा तर लोकसंख्येने आठवा देश. साधारण इ.स. 966 पासून या देशाचे स्वतंत्र अस्तित्व नकाशावर दिसू लागले. या देशाचे संगीत स्वतंत्रपणे 13व्या शतकापासून विकसित होत आलेले आहे.

या देशाविषयी अधिक भौगोलिक, राजकीय तसेच सांस्कृतिक माहिती विकीच्या https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj... या पृष्ठावर मिळेल.

प्रमुख पोलिश वाद्येः

1) Polish fiddle Suka – युरोपियन व्हायोलीनचाच एक प्रकार पण सामान्य व्हायोलीनच्या तुलनेत नेक अगदी विस्तृत आहे हे लगेच ओळखू येतेय. खुंट्यांची रचना पण अगदीच साधी आहे. यावरुन हा व्हायोलीनच्या उत्क्रांतीमधील एक ‘हरवलेल दुवा’ असावा असे मत आहे. हे वाद्य पूर्णपणे विस्मृतीत गेलेले होते आणि एका संग्रहालयात केवळ एका चित्रात ते चितारण्यात आलेले होते. तेवढ्याच उपलब्ध चित्रावरुन Andrzej Kuckzowski यांनी सर्वप्रथम हे वाद्य 1988 मध्ये पुन्हा तयार केले. खालील व्हीडीओतील कलाकार Maria Pominowska यांनी हे वाद्य परत लोकप्रिय करण्यास हातभार लावला. हे वाद्य वाजवत गाणे म्हणताना त्यांची गानसमाधी लागलेली दिसून येते. अद्भुत अनुभव आहे!

https://youtu.be/Oz56GvcUdgg

2) Plock Fiddle – पोलिश व्हायोलीनचाच अगदी प्राथमिक अवतार. अगदी ठोकळेबाज रचना आणि फिंगरबोर्डचा अभाव ही स्पष्ट वैशिष्ट्ये आहेत. तरीपण संगीताच्या गोडीत कुठेही कमी नाहीये. वर नमूद केलेल्या Maria Pominowska यांनी हे इतिहासजमा झालेले वाद्य परत प्रचारात आणलेले आहे. केवढे प्रेम आपल्या सांस्कृतिक ठेव्यांविषयी! मी गंधर्व वेद पुस्तकात पाहिलेली अनेक भारतीय वाद्ये मला अशा वेळीस आठवतात. काय होईल त्यांचं? काळाच्या प्रवाहात त्यांच्या स्वरांना पुन्हा गुंजारव करण्याचे सद्भाग्य मिळेल का? की केवळ संग्रहालये आणि संदर्भ ग्रंथ त्यांच्या नशिबी येणार?

असो, व्हीडीओ खाली आहेः

https://youtu.be/0jcIPgv6iPA

3) Tatra Mountain Music – पोलॅंडशी संबंधित संगीत यूट्यूबवर सर्च करताना टॅट्रा माउंटेन संगीत हा एक प्रकार बराच दिसून आला. जरा तपास केल्यावर कळले की टॅट्रा माउंटेन हा पर्वतीय प्रदेश सौंदर्यासाठी अतिशय प्रसिद्ध असून अनेक हौशी संगीतकारांनी त्याविषयी आपआपल्या पद्धतीनुसार, आवडीनुसार संगीत निर्माण केलेले आहे. खालील व्हीडीओ पाहात पाहात संगीताचा आस्वाद घ्या. सोबत काही रंगीत संगीत असेल तर मग स्वर्गात गेल्याचीच अनुभूती. मानसिक कल्पनाशक्तीच्या जोरावर तुम्हांला त्या तिथे प्रत्यक्ष गेल्याचा अनुभव घेता येईल.

https://youtu.be/wdsqOSDeFUE

4) Hurdy Gurdy – नाव, आकार, रंग-रुप, वाजवण्याची पद्धत आणि ध्वनी सर्वच बाबतीत अगदी हटके असलेलं वाद्य. प्राचीन काळापासून पोलॅंडमध्ये दारोदार संगीत सेवा सादर करुन पोट भरणा-या लोकांचं हे वाद्य. पण बहुतेक वेळेस असे लोक प्राचीन दंतकथा, जादूटोणा, तंत्र-मंत्र वगैरेत तज्ञ समजले जात. हे वाद्य जरी अगदी विचित्र दिसत असलं तरी तसं काही नाहीये. वादक उजव्या हाताने एक हॅंडल फिरवतो, जे पुन्हा एका चाकाला फिरवते. ते चाक मुख्य तारांवर घासून बेसिक ध्वनी निर्माण करते. त्याच वेळीस वादक डावा हात कीबोर्डावर फिरवून सप्तकाच्या लाकडी कीज दाबून अपेक्षित स्वर निर्माण करतो. पण या वाद्यात एक किर्र्र्र किर्र्र आवाज येतोय सूक्ष्मसा, तो मला आवडलेला नाही अजिबात. अनेक व्हीडीओ चेक केले तरी तो आवाज काही पाठ सोडीना. मग जे त्यातल्या त्यात चांगले वाटले ते अपलोड केलेले आहेत.

https://youtu.be/ypuaJLHK_LQ

हा एक अजून मजेशीर व्हीडीओ सापडला. यात हे वाद्य चक्र न फिरवता केवळ बोटांनी वाजवलेले आहेत. ध्वनी अप्रतिम आहे. शिवाय तो किर्र्र किर्र्र आवाज येत नाहीये. मधूनच कुत्री, कोंबडी, चिमण्या, मांजरे यांचेही मजेशीर आवाज येताहेत. अतिशय झकास आहे. ऐकून बघाच.

https://youtu.be/I67UexqArvY

5) Accordian – युरोपात सर्वत्र प्रसिद्ध असलेले वाद्य. साधारण आपल्या पेटीसारख्याच तत्वावर काम करणारे. ध्वनी देखील तसाच आहे. खालचा व्हीडीओ अगदी मस्त आहे. ऐकून पहा.

https://youtu.be/q7exjxtrczY

वरील व्हीडीओपेक्षा खालील व्हीडीओ मोठा आहे एक तासाचा. पण एकॉर्डीयन अगदी अप्रतिम माधुर्याने वाजवलेय. शक्य असेल तर आस्वाद घ्या. मधलाच एखादा पीस चार-पाच मिनिटे ऐकलात तर डेटा फारसा खर्च नाही होणार. मी पण तेच केलेय.

https://youtu.be/9S9vBzujgtM

अजून एक झकास व्हीडीओ आहे. येथे ऍकॉर्डीयनच्या स्वरांना वेगळेच सौंदर्य आलेले आहे. अगदी गोव्याच्या समुद्रकिना-यावर गेल्याचा जबरदस्त फील येतोय. अगदी ऐकाच! Wieslawa Dudkowiak या पोलिश ऍकॉर्डीयन वादक म्हणून आंजावर ब-याच प्रसिद्ध दिसत आहेत.

https://youtu.be/aEE8IM3ukC8

6) Polish Violin – व्हायोलिन आज जगभर प्रसिद्ध असले तरी ठिकठिकाणी त्याने त्या त्या मातीचा सूर उचललेला आहे. खालील व्हीडीओत पोलिश पारंपारिक पद्धतीचे व्हायोलिन संगीत आहे. व्हीडीओ 12.36 मिनिटांचा आहे. पहिल्यांदा सामान्य व्हायोलिन आणि त्याला संवादी सुरांत साथ देणारे व्हायोलिन कुटुंबातीलच एक मोठे, जास्त Bass गुणधर्म असणारे वाद्य (मला नक्की नाव आठवत नाही) अप्रतिम हार्मनीने वाजू लागतात. 2.04 मिनिटावर त्यात पोलिश पारंपारिक डफाची (Tambourine) दणदणीत एंट्री होते तेव्हां अंगावर काटाच येतो. मस्त आहे. ऐकाच!

https://youtu.be/8y6whOO346c

एक अप्रतिम पोलिश लोकगीत आणि व्हायोलिनचा मानवी भावनाविष्कारः खालील व्हीडिओ अगदी कर्मधर्मसंयोगाने मला ऐकू वाटला. खरे तर हे एक प्राचीन लोकगीत आहे आणि व्हायोलिन साथीपुरते वापरलेले आहे. पण गीत सुरु होताना व्हायोलीन जो काही मानवी मनातील सुप्त, अनामिक भावभावनांचा दणदणीत आविष्कार करते. शप्पथ!

https://youtu.be/mGGhutvH_BE?list=RDOj4RBVRJIuc

7) Tambourine – आपल्याकडील डफासारखे वाद्य. खालील व्हीडीओत ते कसे वाजवायचे आहे याची थोडी माहिती दिलेली आहे. पाहण्यासारखे आहे.

https://youtu.be/4UJT9sM_ABo

8) Zlobcoki – याचा उच्चार पोलिश लोकच जाणोत! सामान्यतः व्हायोलिनसारखीच रचना आहे. पण आकार अतिशय अरुंद व चिंचोळा असल्याने Treble गुणधर्म भलताच वाढलेला दिसून येतो आहे. एक कसाबसा सुदैवाने व्हीडीओ मिळाला आहे पण तो एका खाजगी वेबसाईटवर आहे. तुम्हाला प्रथम वेबसाईटवरच जावे लागेल. असो.

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rj...

इतर अनेक वाद्ये आहेत. पण त्यांचे व्हीडीओ उपलब्ध नसल्याने उल्लेख केलेला नाही. रोमानियन वाद्यांच्याविषयी जितकी भरभरुन माहिती उपलब्ध आहे, तितकी पोलिश संगीतवाद्यांविषयी अजिबात नाही हे नमूद करतो. असो, तुम्हांला अजून काही माहिती असेल तर कृपया उल्लेख करावा.

(एम्बेड कोड का काम करत नाहीयेत देव जाणे! गेल्या दोन्ही लेखांच्या वेळीस वाईट अनुभव आला. कुणी सांगू शकेल का काय चूक होतेय नक्की?)

संगीत

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

9 Apr 2016 - 2:21 pm | उगा काहितरीच

१)

.
.
२)

.
.
3)
.
.
४.१)

.
.
४.२)
.
.
५.१)

.
.
५.२)
.
.
५.३)
.
.
६.१)
.
.
६.२)
.
.
७)

.

विजय पुरोहित's picture

9 Apr 2016 - 2:29 pm | विजय पुरोहित

धन्यवाद उ.का. अगदी पर्फेक्ट काम केलंस.

कंजूस's picture

9 Apr 2016 - 5:38 pm | कंजूस

trial testing

DEADPOOL's picture

9 Apr 2016 - 9:59 pm | DEADPOOL

एकदम भारी लिहिलय
दंडवत घ्या
आणि ऊका यांचे अभिनंदन!

उगा काहितरीच's picture

9 Apr 2016 - 11:03 pm | उगा काहितरीच

साहेब , उका म्हणा हो ! वेगळाच फील येतोय ऊकाला. ;-) आणि अभिनंदन का ?

पैसा's picture

12 Apr 2016 - 1:44 pm | पैसा

लेख आवडला. असे लेख अजून येऊ द्या. प्रतिसाद येवोत किंवा नाही.

विजुभाऊ's picture

12 Apr 2016 - 1:46 pm | विजुभाऊ

हर्डीगर्डी हे वाद्य पूर्वी ऐकले होते.
एकोणिसाव्या शकतातले हे वाद्य प्रामुख्याने भिकारी , फिरस्ते वगैरे वाजवायचे. या वाद्याला फारशी प्रतिष्ठा नव्हती.
मात्र गिटारच्या तुलनेत असलेली स्वराची आस हे वाद्याचे वैषिष्ठ्य

पद्मावति's picture

12 Apr 2016 - 5:03 pm | पद्मावति

छान लेख. आवडला.

बोका-ए-आझम's picture

12 Apr 2016 - 6:12 pm | बोका-ए-आझम

पुभाप्र!