यूट्यूबवर सर्फींग करत असताना काही अपरिचित तरीही अतिशय नादमधुर वाद्यांशी संबंधित व्हीडीओज पहायला मिळाले. त्यांच्याशी संबंधित यूट्यूब दुवे येथे मुद्दाम टेक्स्ट स्वरुपात डकवत आहे जेणेकरुन आपणांस ही त्यांचा आनंद घेता येईल. तसेच त्या त्या वाद्याशी संबंधित विकीपीडियावरील माहिती थोड्याफार प्रमाणात सोबत देत आहे. ते ते वाद्य कसे दिसते हे संबंधित यूट्यूब व्हीडीओत दिसेलच, त्यामुळे स्वतंत्र वर्णन करत बसण्याची गरज नाही. तसेच वाद्याचे मूळ इंग्रजी स्पेलींग मुद्दाम दिलेले आहे जेणेकरुन तुम्हाला तो कीवर्ड वापरून यूट्यूबवरील इतर व्हीडीओदेखील पाहता येतील. ऐकताना हेडफोन वापरले तर जास्त चांगले!
आपल्याला काही माहिती असेल तर ती पण ऍड करा.
1) Array Mbira – हे आधुनिक काळातील साधारण हार्प किंवा बेल्स सारखे वाद्य आहे. 60 च्या दशकात यूएसए मध्ये बिल वेसली यांनी हे वाद्य प्रथम तयार केले. परंतु त्याचे मूळ आफ्रिकन Mbira या वाद्यामध्ये आहे. त्यानंतर यात अनेक बदल / सुधारणा होत गेल्या आहेत.
2) Harp – हे वाद्य एशिया, युरोप येथे अति प्राचीन काळापासून माहीत आहे. सामान्यतः प्रबोधनकाळात या वाद्याला फार मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता लाभली. अगदी एका हातात धरता येतील अशा छोट्या आकारापासून ते स्वतंत्र बैठक व्यवस्था लागेल अशी मोठी हार्प्स उपलब्ध आहेत. खाली एलिसा सादिकोव्हा या छोटुकलीचा हार्प वाजवतानाचा व्हीडीओ आहे. केवळ अप्रतिम श्रवणानुभव आहे. डोळे बंद करुन हेडफोन लावून ऐकलेत तर अतिशय सुंदर अनुभव येईल. तिच्या हार्प वाजवतानाच्या हालचाली तर एखाद्या परीची आठवण करुन देणा-या आहेत. एकदा तरी नक्कीच ऐका.
3) Mbira / Kalimba – हे वाद्य आफ्रिकेत हजारो वर्षांपासून प्रचलित आहे. तीन हजार वर्षांपूर्वी लाकडाचा वापर होत होत होता तर साधारण दीड हजार वर्षांपूर्वी धातूचा वापर केला जाऊ लागला. याला गंमतीने thumb piano असेही म्हणतात. कारण वाजवताना होणारा अंगठ्यांचा वापर. हे वाद्य Gods must be crazy या हॉलीवूड चित्रपटात बरेच वापरलेले आहे.
4) Eagle Bone Whistle – आपल्याकडील अलगुजसारखेच वाद्य. पण अतिशय अप्रतिम माधुर्य आहे ध्वनीत. स्थानिक अमेरिकन जनजाती याला अतिशय पवित्र वस्तू मानतात आणि याचा वापर त्यांच्या धार्मिक समारंभांमध्ये करतात. हा पावा अमेरिकन बाल्ड ईगल आणि गोल्डन ईगल यांच्या लांब पंखांच्या अस्थिपासून करतात. याच्या ध्वनीने आत्मे आकर्षित होतात असा समज आहे. परंतु आता अमेरिकन बाल्ड ईगल आणि गोल्डन ईगल यांना संरक्षित पक्षी असा दर्जा देण्यात आलेला आहे.
5) Gajda / Goat Bagpipe – हं बरोबर ओळखलंत! एका मृत बोकडापासून बनवलेला बॅगपाईप. बोकडाचे डोके आणि खूर देखील त्याला जोडलेले असतात. बोकडाच्या पोटाची थैली ही पेटीच्या भात्यासारखी काम करते. (मीठ लावून बोकडाची पोटाची थैली वाळवली जाते.) अतिशय विचित्र दिसणारं तरीही अतिशय श्रवणीय आहे. युरोपातील बाल्कन प्रदेशात अधिक प्रसिद्ध आहे.
6) Ancient Sambuca – एक प्राचीन आशियाई वाद्य. फिनिशियन आणि ऍरेमाईक लोकांत प्रचलित असलेले. याचा उल्लेख बायबलमध्ये देखील आहे.
7) Lyre – मूळचे ग्रीक अतिप्राचीन वाद्य. ब-याच जुन्या ग्रीक चित्रांत हे वाद्य वाजवणारी माणसे दिसतात.
8) Mayan Clay Flute – आंजावर फारशी माहिती मिळाली नाही. मायन संस्कृतीत प्रचलित असलेल्या चीनीमातीपासून बनवलेल्या फ़्ल्यूटचा व्हीडीओ सोबत दिला आहे.
9) Beautiful girl playing an unknown instrument – नेटवर एवढीच माहिती दिसतेय. वाद्याचा काही उल्लेख नाहीये दिसत. पण ऐकण्यासारखे आहे. मला वाटतं टॅंक ड्रमच आहे.
10) Bellowphone - विकीवर काही माहिती उपलब्ध नाही. पण बहुतेक आधुनिक काळातील वाद्य आहे. शिट्ट्या मारल्यासारखा ध्वनी आहे. पण एकंदरीत आनंदी, उत्साही ध्वनी आहेत.
11) Tank Drum – रिकाम्या प्रोपेन टॅंकपासून बनवले जातात. त्याच्यावरती स्वराच्या कंपनानुसार विशिष्ट आकारात खाचा कापून तो तो स्वर निर्माण केला जातो.
या प्रवासात तुम्हांला देखील काही अपरिचित तरीही मधुर आवाजाची वाद्ये पहावयास मिळतील. ती येथे ऍडवलीत तर धन्यवाद.
प्रतिक्रिया
1 Apr 2016 - 1:11 pm | उगा काहितरीच
वाह ! क्या बात है ! आवाडला लेख आणी वाद्येही. विचित्र आहेत वाद्ये पण अगदी मधुर आवाज आहे. मला ते ८ नंबरचं विशेष आवडलं . अगदी स्वर्गीय आवाज वाटतो.
1 Apr 2016 - 1:12 pm | उगा काहितरीच
*आवडला
1 Apr 2016 - 1:18 pm | विजय पुरोहित
दोन क्रमांकाचा हार्प ऐक!
अप्रतिम, स्वर्गीय, हेवनली ही सगळी विशेषणे फिक्की पडतात.
1 Apr 2016 - 1:21 pm | उगा काहितरीच
हा तो पण ऐकला. भारी आहे. (तसे सगळेच एकापेक्षा एक सरस आहेत)
1 Apr 2016 - 1:21 pm | तिरकीट
छान माहीती आहे.
lyre आणी Harp मधे आपल्याकडच्या 'स्वरतरंग' शी साधर्म्य वाटते.
1 Apr 2016 - 1:25 pm | रामदास
1 Apr 2016 - 1:32 pm | पद्मावति
मस्तं लेख. ती हार्प वाजवणारी खरोखरच परी दिसतेय...angel...
1 Apr 2016 - 2:00 pm | मराठी_माणूस
शरीराच्या कुठल्याही अवयवाचा स्पर्श न करता वाजवलेले अफलातुन वाद्य Theremin .
https://www.youtube.com/watch?v=MJACNHHuGp0
1 Apr 2016 - 2:21 pm | विजय पुरोहित
खरोखर अफलातून प्रयोग आहे...
1 Apr 2016 - 2:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
अनवट वाद्यांचा दृक्श्राव्य परिचय करून देणारा सुंदर लेख !
2 Apr 2016 - 9:20 pm | विजय पुरोहित
धन्यवाद सर!
तुमची आणि रामदासकाकांची उपस्थिती महत्वपूर्ण आहे. बरे वाटले. धन्यु पुन्हा...
1 Apr 2016 - 2:46 pm | विजुभाऊ
क्रमांक ९ चे वाद्य "हँग ड्रम " हे आहे. याला स्टील ड्रम असेही म्हणतात.
https://www.youtube.com/watch?v=xk3BvNLeNgw
कॅलिप्सो स्टील ड्रम हा जरा वेगळा असतो . हा तालवाद्य आणि स्वतन्त्र वाद्य म्हणूनही वाजवला जातो.
https://www.youtube.com/watch?v=GaNjXwElAUE
1 Apr 2016 - 2:50 pm | विजुभाऊ
स्टील ड्रम हे वाद्य अक्षरशः लोखंडी ड्रमवर हातोड्याचे घाव घालून त्याला पोचे आणले जातात. प्रत्येक पोच्यातून वेगळा आवाज येतो.
https://www.youtube.com/watch?v=woBZME7sN3E
2 Apr 2016 - 9:22 pm | विजय पुरोहित
विजुभाऊ...
अभ्यासपूर्ण सहभागाबद्दल धन्यवाद...
1 Apr 2016 - 6:22 pm | हकु
बऱ्याच विविध वाद्यांची माहिती झाली. क्रमांक ७ आणि ९ ची वाद्ये विशेष आवडली. आणि क्रमांक २ ची मेलडी सुद्धा. गोट बॅगपाईप ऐकताना आपल्या 'तारपा' ची आठवण आली.
2 Apr 2016 - 10:42 am | विजय पुरोहित
बॅगपाईप ऐकताना आपल्या 'तारपा' ची आठवण आली.
रोचक आहे. काही माहिती असेल तर अॅडवा कृपया.
2 Apr 2016 - 4:44 pm | हकु
तारपा हे आपल्या भारतीय आदिवासींमध्ये लोकप्रिय असलेले वाद्य. तारपा वाजवणारी व्यक्ती मध्यभागी उभी राहते आणि ईतर आदिवासी स्त्री- पुरुष हातात हात घालून त्याच्याभोवती वर्तुळाकार कक्षेत नाच करतात. याला 'तारपा नृत्य' म्हणतात. हल्ली शहरातल्या बऱ्याच मिरवणुकांमध्ये या नृत्याला लोकाश्रय मिळू लागला आहे.
बाकी ह्या वाद्याबद्दल सध्या तरी विशेष काही माहिती माझ्याकडे नाही. बहुधा दुधी भोपळ्यापासून हे वाद्य बनवले जाते. सध्या एक छायाचित्र.
1 Apr 2016 - 6:38 pm | अभ्या..
मस्त रे मांत्रिका.
हार्प सोडले तर इतर वाद्ये प्रथमच पाहण्यात आली. मस्त एकदम. धन्यवाद
1 Apr 2016 - 6:46 pm | उल्का
खूप छान माहिती आहे. वा खू योग्य!
1 Apr 2016 - 6:57 pm | चौकटराजा
हा धागा असा आहे की इथे वादावादी वाले याना प्रशन पडेल की कसे खुसपट काढावे. असेच धागे येत जाउ द्या. हार्प हे वाद्य सुरेखच वाजते. यु त्यूब वर शोध घेतला तर मानव जातीच्या कल्पकल्तेने थक्क व्हायला होते .
1 Apr 2016 - 10:43 pm | उगा काहितरीच
हाहाहाहा!
1 Apr 2016 - 8:10 pm | विद्यार्थी
मस्त, यातले एखादे वाद्य सोडले तर बहुतेक कुठलीच वाद्ये माझ्या पाहण्यात, ऐकिवात नव्हती. माहितीबद्दल धन्यवाद.
1 Apr 2016 - 10:55 pm | बोका-ए-आझम
संगीत ही वैश्विक भाषा आहे!
2 Apr 2016 - 11:00 am | अन्नू
हार्प सोडलं तर एकही वाद्य आमच्या पाहण्यात आलं नाही. :(
अरेरे, किती आंम्ही अज्ञानी?
अजुन आंम्हाला साधं शंखसुद्धा करता फुंकता येत नाही!
2 Apr 2016 - 11:04 am | विजय पुरोहित
साक्षात अन्नू मलिकचे एवढे घोर अज्ञान!
अरेरे, मग बाकीच्यांची काय कथा?
(ह.घ्या.)
2 Apr 2016 - 11:11 am | अन्नू
=)) =))
2 Apr 2016 - 12:05 pm | नाना स्कॉच
वाह वा!!!
राजकीय अन तर्ककर्कश्य धाग्यांच्या मांदियाळी मधे एक सुखद हवेची झुळुक आहे हा धागा
आपले असंख्य आभार
2 Apr 2016 - 3:50 pm | कवितानागेश
एक दिजीरादू नावाचे ऑस्ट्रेलियन वाद्य आहेतीथल्या आदिवासींचं.
त्याची क्लिप मिळाली तर टाकते.
2 Apr 2016 - 4:20 pm | प्रदीप
माहितीपूर्ण लेख. धन्यवाद
2 Apr 2016 - 4:48 pm | स्वाती दिनेश
माहितीपूर्ण लेख आवडला,
स्वाती
3 Apr 2016 - 9:45 am | विजुभाऊ
मरिंबा हे एक अफ्रिकन वाद्य
याला लाकडी पट्ट्यातून ध्वनी निर्माण करत झायलोफोन सारखे वाजवतात
3 Apr 2016 - 9:52 am | विजुभाऊ
हा पहा मरिंबाचा आणखी एक अविष्कार.
3 Apr 2016 - 9:56 am | विजुभाऊ
3 Apr 2016 - 10:02 am | विजुभाऊ
स्टील ड्रम चे हे आणखी एक उदाहरण.
3 Apr 2016 - 10:18 am | विजुभाऊ
हा मिरिंबा चा ऑर्केस्ट्रा.
4 Apr 2016 - 10:20 am | विजय पुरोहित
धन्यवाद विजुभाऊ!
सगळे व्हीडीओ छान आहेत...
3 Apr 2016 - 1:04 pm | gogglya
संगीत कुठलाच भेद भाव मानत नाही हे वैश्विक सत्य आहे.
3 Apr 2016 - 1:34 pm | तर्राट जोकर
पुरोहित्जी, खुप छान लेख. खूप वेगवेगळ्या वाद्यांची माहिती आणि ऐकण्याचे सुख मिळाले. नेहमी असे वेगवेगळे संगित ऐकणे मानसिक शांतीसाठी आवश्यक असते. सवयीच्या झालेल्या संगितापासून वेगळे काही ऐकले की अध्यात्मिक आनंद मिळतो.
4 Apr 2016 - 8:33 am | मितान
सुरेख माहितीपूर्ण लेख !!!
यंदाची संस्कार भारतीची डायरी वाद्यांवरच आधारित आहे. प्रत्येक पानावर एक वाद्य आणि थोडक्यात माहिती आहे. मिळाली तर अवश्य घ्या.