गाव बदललाय!

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जे न देखे रवी...
21 Mar 2016 - 3:25 am

परवा बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी जाउन आलो,
सगळं बदललय!
हल्ली फाट्यावरून तासभर डोंगर वाट तुडवत जावं लागत नाही,
सगळ्यांकडे गाड्या आहेत.
सुर्य मावळल्यावर वेशीतल्या पिंपळाच्या पारावरही गर्दी होत नाही,
घराघरात टीवी आलेयत.
पहिल्यासारखा पहाटे चंद्राच्या प्रकाशात गाव उजळून निघत नाही,
सगळीकडे बल्ब लागलेयत.
शाळा सुटल्यावर मुले पटांगणात गोट्या आणि विटी दांडू खेळत नाहीत,
शिकवण्या असतात.
मारुतीच्या देवळापुढे शेकोट्या करून तरुण गप्पा मारत बसत नाहीत,
स्मार्टफोन आलेयत.
लहान मुले गुरव काकांकडे पेटी, बासरी, तबला शिकायला येत नाहीत,
कराटे आणि स्पोकन इंग्लिश आलंय.
मामाच्या घरी जेवताना पहिल्यासारख्या गप्पा, हसणं -खिदळणं होत नाही,
खंडोबाची मालिका असते.

उन्हाळ्यात शहरातल्या मावश्या इकडे येत नाहीत,
मुलांना उनाचा त्रास होतो.
मांगोबाच्या माळावर मखमली हिरवळ पाहायला मिळत नाही,
दुष्काळ आहे म्हणतायेत.
माझी आजीही पोट फुटेस्तोवर दुध प्यायचा आग्रह करत नाही,
एकच गाय राहिलेय.
आजकाल पोहायला, कपडे धुवायला नदीवर गर्दी होत नाही,
नदी कोरडी पडलीये!

मलापण यावेळी तिकडे गेल्यावर पाहिल्यासारखे करमले नाही,
कदाचित शहराची सवय लागलीये!

मुक्त कवितासमाज

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

31 Mar 2016 - 6:13 pm | विजय पुरोहित

लेख आवडला निशांत साहेब...

गावाकडील आठवणी येऊ लागल्या...

निशांत_खाडे's picture

3 May 2016 - 12:42 pm | निशांत_खाडे

धन्यवाद!

बाबा योगिराज's picture

3 May 2016 - 12:46 pm | बाबा योगिराज

आवड्यास.

निशांत_खाडे's picture

3 May 2016 - 12:50 pm | निशांत_खाडे

थांकू!

जव्हेरगंज's picture

3 May 2016 - 1:02 pm | जव्हेरगंज

वा !
भिडली !!

जबरदस्त !!!

विजय पुरोहित's picture

3 May 2016 - 1:09 pm | विजय पुरोहित

कविता परत एकदा वाचली आणि तितकाच आनंद पुन्हा देऊन गेली..
धन्यवाद...

प्राची अश्विनी's picture

3 May 2016 - 7:14 pm | प्राची अश्विनी

आवडली.

एस's picture

3 May 2016 - 7:53 pm | एस

कविता आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

3 May 2016 - 9:10 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर.

निशांत_खाडे's picture

3 May 2016 - 10:36 pm | निशांत_खाडे

जव्हेरगंज,आत्मबंध,एस,प्राची अश्विनी,विजय पुरोहित
थांकू ऑल...

आवडली कविता! माझ्या मामाचे गाव पण असेच होते आणि असेच बदलले आहे. फाट्यावरून शेत, नाले यामधून अर्धा तास चालत जावं लागायचं. वीज नव्हती. उन्हाळ्यात रात्री सगळे जन बाज टाकून रस्त्याच्या आजूबाजूला झोपायचे. अशा सुंदर चांदण्या दिसायच्या !

साहेब..'s picture

5 May 2016 - 10:22 am | साहेब..

भावना पोहोचल्या.
मामाचं नाही पण आता माझंच गाव मला आता बदलल्यासारखं वाटतं